मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अयोध्या डायरी  भाग-१– लेखक : श्री विश्वास चितळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ अयोध्या डायरी  भाग-१– लेखक : श्री विश्वास चितळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

अयोध्या वरून परत येत आहे . सर्व चितळे परिवार कडून  श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाता आले, रीप्रेझेन्ट करता आले. संपूर्ण कार्यक्रमात खूप ऊर्जा जाणवली.  आपल्या सर्वांकडून श्रीरामाला वंदन करून आता परत येत आहे. 

पुष्करने ही यात्रा  छान घडवून आणली. 

कार्यक्रम संघ परिवाराने खूप आखीव घडविला. 

मी सकाळी ९:३० वाजता गेलो  व  आसनस्थ झालो . शेजारी तंजावर चे राजे भोसले बसले होते . मी मराठीत सायली  बरोबर बोलत होतो . ते पाहून  राजांनी मराठी मध्ये माझ्याशी सवांद साधला व विचारले आपण कोठून आलात . तंजावर मध्ये अजून हि २०० मराठी  कुटुंब राहत आहेत . त्यांनी व राजेंनी अजूनही मराठीची नाळ सोडली नाही व त्यांनी मला  तंजावर चे निमंत्रण दिले . 

आणखी थोड्या वेळात हेमामालिनी यांचे आगमन झाले . संयोजक त्यांना प्रथम रांगेंत बसण्यासाठी सांगत होते पण त्यांनी, मी आपल्या जावया बरोबर आले आहे असे म्हणत, माझ्या शेजारी असलेल्या खुर्ची वर बसणं पसंत केले .मी त्यांना माझी जागा देवूं केली ती त्यांनी न स्वीकारतां

सांगितले की मी इथेच बसेन .

आम्ही सर्व स्थिरस्थावर होत असताना सोनू निगम ,शंकर महादेवन यांच्या जय श्री रामाच्या गीतांनी वातावरण भक्तीमय झाले .सर्व आसमंत जय श्रीरामांच्या  उद्घोषांनी प्रफुल्लीत झाला.

संघाचे स्वयंसेवक सर्वांची अंत्यत अदबीने विचारपूस करत होते. 

समोरील कलात्मक रामलल्लाचे निवासस्थान इतक्या सुंदर पानाफुलांनी सुशोभीत केले होती कि  ती भव्य वास्तू , जणू स्वर्गातुन अवतरली आहे असा भास होत होता.

संपूर्ण अयोध्या नगरी आणि भारत ह्या मूहूर्ताची वाट पाहत होते, तो क्षण आला .मा.प्रधानमंत्री मोदीजी पूजा साहित्य घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढून गर्भ गृहःमध्ये गेले .

गणेश स्तुती सुरु झाली . संकल्प गुरुजी सांगू लागले .सनई चवघड्यांचा मंगल स्वर मंदिरातून येवू लागला .

मंत्र घोषात पूजा सुरु झाली. आम्हा सर्वांना स्वयंसवेकांनी घंटा दिल्या .घंटा वाजू लागल्या .जय श्री रामांचा उद्घोष  टिपेला पोचला .

आर्मीच्या दोन हेलिकॉप्टरांनी बरोबर प्राणप्रतिष्ठे च्या क्षणी गुलाब पाकळ्यांचा  वर्षाव सुरु केला 

आणी समोर असलेल्या स्क्रीन वर श्री राम लल्लांचे  दर्शन झाले . 

क्रमशः…….

लेखक : श्री विश्वास चितळे

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 250 ⇒ D A U D ( दौड़)… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “D A U D ( दौड़)।)

?अभी अभी # 250 ⇒ D A U D ( दौड़)… ? श्री प्रदीप शर्मा  ?

वर्ष १९९७ में राम गोपाल वर्मा की एक फिल्म आई थी जिसका शीर्षक अंग्रेजी में DAUD था, लगा, फिल्म दाऊद इब्राहिम पर केंद्रित होगी। फिल्म आकर चली भी गई, बाद में कहीं पढ़ने में आया, फिल्म का नाम हिंदी में दौड़ था। हिंदी दिवस पर खयाल आया, दौड़ को वे लिखते भी कैसे, अगर DAUR लिखते, तो दौर भी हो सकता था। उदाहरण स्वरूप दिलीप कुमार की फिल्म नया दौर NAYA DAUR को ही ले लीजिए। इसी अंधी दौड़ में योग, yoga, राम, Rama और विस्तार Vistara हो गया है।

दुनिया आज दौड़ नहीं, भाग रही है, बचपन से जवानी, जवानी से बुढ़ापा, स्कूल, दफ्तर, शादी ब्याह, जन्म मरण, की भागमभाग के बाद एक उम्र ऐसी आ जाती है जब सुबह शाम टहलने चले जाते हैं आसपास के बगीचों में, कोई पूछता है, तो यही कहने में आता है, अब कहां आना और कहां जाना। 

इंसान की दौड़ मस्जिद तक हो या मंदिर तक, हर व्यक्ति जीवन में गति भी चाहता है और ठहराव भी। कहीं ज़िन्दगी में गति है, तो कहीं ठहराव। मिल्खा सिंह और पी टी उषा ने तो दौड़कर ही न केवल अपनी मंज़िल हासिल की, अपितु देश का गौरव भी बढ़ाया। एक तरफ अंधी दौड़ है। दौड़ सके तो दौड़।

दौड़ प्रतिस्पर्धा भी हो सकती है और मैराथन भी। लेकिन जब मैराथन भी प्रतियोगिता हो जाए तब साथ साथ नहीं दौड़ा जाता। आप साथ साथ चल तो सकते हो, लेकिन साथ साथ मंज़िल नहीं पा सकते। कहीं मंज़िल दौड़ने पर भी नसीब नहीं होती और कहीं मंज़िल खुद दौड़ी चली आती है। कहीं अजगर चाकरी नहीं करता तो कहीं, न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:।।

एक सच्चे भक्त और आशिक में कोई फर्क नहीं होता। उसकी दौड़ उसके दिल तक ही सीमित होती है, वह नगरी नगरी द्वारे द्वारे नहीं भटकता। वह कहता है ;

ओ महबूबा,

तेरे दिल के पास ही है मेरी मंज़िले मक्सूद।

वो कौन सी महफ़िल है जहां

तू नहीं मौजूद।।

लेकिन फिर भी जब तक घट घट व्यापक हमारे आराध्य मर्यादा पुरुषोत्तम राम, असली अयोध्या में विराजमान नहीं हो जाते, हमारी दौड़ पूरी नहीं होती। फिर हमारी भी दौड़ अयोध्या तक ही सीमित रहेगी। और अगर हमारे रोम रोम में राम है तो यही राम मंदिर रोम में भी बनेगा और पेरिस में भी। भारत किसी दौड़ में पीछे नहीं।

जिस भक्त की लाज बचाने भगवान दौड़े चले जाते हैं, क्या वह भक्त अपने भगवान के लिए थोड़ी भी दौड़ नहीं लगा सकता।

फिर भी होते हैं कुछ मेरे जैसे आलसी, जो कहते हैं, बस ज़रा गर्दन झुकाई, देख ली तस्वीरे यार।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  3




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मृत्युपत्र हे संपत्तीची वाटणी करणारं असतं, मात्र वैद्यकीय इच्छापत्राद्वारा माझ्या शरीराचं काय करायचं, मला व्हेन्टिलेटरवर ठेवावं का? किती दिवस ठेवायचं? माझ्या आजारपणावर ०किती खर्च करायचा, शरीर वा अवयव दान करायचे का यांसारख्या इच्छा लिहून ठेवता येतात.

अठरा वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी   ‘बंध-अनुबंध’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका कमल पाध्ये एकटय़ाच राहत होत्या. डॉ. रोहिणी पटवर्धन आणि प्रमोदिनी वडके-कवळे त्यांची काळजी घेत असत. एक दिवस त्यांनी आपले डॉक्टर सुभाष काळे व या दोघींना घरी बोलावलं व सांगितले, ‘हे बघा डॉ. काळे माझ्यावर उपचार करतात. तुम्ही दोघी माझी काळजी घेता. इथून पुढे जर मी आजारी पडले आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन तर तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी तुम्हा सर्वासमक्ष स्वेच्छेने माझा निर्णय जाहीर करीत आहे!’ 

‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या संकल्पनेची मुळं वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या मनांत इथेच रुजली आणि पुढे त्यांनी त्यांच्या प्रसाराचं कार्य सुरू केलं. ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत प्रचलित असली तरी भारतात मात्र अजून म्हणावा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. पण बदलत्या काळानुसार आज ‘वैद्यकीय इच्छापत्रा’ची निकड भासू लागली आहे हे निश्चित! वस्तुत: ही संकल्पना अद्याप कायद्याच्या चौकटीत नसली तरी  ती एक विचारांची दिशा आहे. ‘माझे वा माझ्या शरीराचे हाल होऊ नयेत, माझ्या कुटुंबियांना निर्णय घेण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये. त्यांच्यावर महागडय़ा उपचारांचा ताण पडू नये,’ या भूमिकेतून वृद्ध आपली इच्छा या ‘लिव्हिंग विल’ द्वारे व्यक्त करू शकतात. 

आपलं शरीर व तब्येत हीसुद्धा एक प्रकारे आपली मालमत्ताच नसते का? मग त्यासंबंधी निर्णय निदान भविष्यकाळातील वैद्यकीय उपचारांबाबतचे आपले आपणच घ्यायला नको का? एखाद्याला बिछान्याला खिळून जगायचं नसेल किंवा कृत्रिम वैद्यकीय उपचार करून घेऊन जिवंत राहायचं नसेल, पण असे निर्णय घेण्यास तो समर्थ नसेल तर आपल्या प्रकृतीसंदर्भात कोणते उपचार केले जावेत वा जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ अर्थात ‘वैद्यकीय इच्छापत्र’! या ‘लिव्हिंग विल’मध्ये आयुर्मर्यादा वाढवणारे कोणतेही उपचार उदा. नळीने अन्न देणं, व्हेन्टिलेटरवर ठेवणं वगैरे करू नयेत असे स्पष्ट निर्देश करता येतात. तसेच देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान यांसारख्या इच्छांचाही उल्लेख करता येतो. मात्र आपले फॅमेली डॉक्टर आणि कुटुंबियांशी नीट चर्चा करूनच हे इच्छापत्र बनवायला हवे. इतकं सगळं करूनही रुग्णालयातील आपल्या आई वडिलांच्या बाबतीत काय करायचं, हा निर्णय शेवटी मुलांकडे रहातोच. वृद्धांसाठी आपली इच्छा व्यक्त करण्याचा फक्त हा एक मार्ग आहे.

आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचं ते ‘लिव्हिंग विल’ आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे असं लिहून त्यावर डॉक्टर सही करतात. त्याचबरोबर पती अथवा पत्नी तसंच मुलं व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सहय़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावं लागतं. हे नोटराईज केल्यामुळे ज्येष्ठांची तशी इच्छा होती हे स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर या इच्छापत्राच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या लागतात. फक्त हे इच्छापत्र करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाची चर्चा पती-पत्नी, मुलं, डॉक्टर व सुहृद यांच्याबरोबर अवश्य करावी. तरच या इच्छापत्रातील इच्छांची पूर्तता होण्याची खूप शक्यता असते. 

”अर्थात तरीसुद्धा अनेक वेळा समोर मृत्यू दिसू लागताच तोंडाने कितीही निरवानिरवीची भाषा केली तरी रुग्ण उपचार सुरू ठेवायला सांगतात. व जोपर्यंत रुग्ण आपली इच्छा व्यक्त करण्याच्या परिस्थितीत असतो तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसारच उपचार केले जातात. अनेक वेळा रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल तरी भावनेच्या भरात नातलगच रुग्णास उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरतात व ‘लिव्हिंग विल’ला विरोध करतात. एक डॉक्टर म्हणून नातलगांच्या मताचा आदर केला जातो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाही.’

अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर असणारे व ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करणारे            डॉ. दिलीप देवधर ‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती सांगतात. ‘लिव्हिंग विल’ अमलात आणताना एक डॉक्टर म्हणून आमचे काही निकष असतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचं वय ७५ च्या वर असेल तरच हा निर्णय घेतला जातो. त्यातही आम्ही डॉक्टर रुग्णावरील उपचार एकदम बंद करत नाही. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असेल तर साधारणपणे ७२ तासांत व जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसांत शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ लागतं. जर तसं झालं नाही तर रुग्णाचे जवळचे नातलग, फॅमिली डॉक्टर, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असे सर्व जण एकत्र बसून चर्चा करतात व त्यानंतरच रुग्णाने शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असा निर्णय घेतला जातो. अर्थात अशा वेळी रुग्णाने स्वत: जर असं वैद्यकीय इच्छापत्र केलं असेल तर सर्वानाच हा कठीण निर्णय घेणं सोपं जातं व जवळच्या नातलगांना अपराधीभाव येत नाहीत.

सर्वसाधारणपणे डॉक्टरांचा अनुभव असा आहे की मध्यमवर्गीय माणसं भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाच्या उपचारांसाठी भरमसाट खर्च करतात. वेळेला जमीनजुमला, दागदागिनेसुद्धा विकतात. भारी व्याजाने कर्ज उचलतात. त्यांची पुढची दहा-पंधरा र्वष कर्जफेडीतच जातात व ज्या रुग्णासाठी ते आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढतात तो रुग्णही हाताला लागत नाही व निराशा पदरी पडते. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर ते कुटुंब मोठय़ा संकटातून वाचू शकतं.

आज माणसाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे आर्थिक गणितं साफ बदलली आहेत. वैद्यकीय खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याने जबाबदारी घेऊन रुग्णाला त्याच्या परिस्थितीनुसार सल्ला देणारे डॉक्टर आता राहिले नाहीत. हल्लीची तरुण पिढी व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी असते. त्यामुळे परावलंबी रुग्णाला सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. बरेच वेळा अशा मृत्युशय्येवरील रुग्णाला ठरावीक मुदतीपुढे हॉस्पिटलही ठेवून घेत नाहीत. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर केवळ कृत्रिम यंत्रणांवर जिवंत असणाऱ्या रुग्णाच्या नातलगांना कटू निर्णय घेण्यासाठी ‘लिव्हिंग विल’ हा फार मोठा दिलासा ठरू शकतो.

परदेशस्थ मुलं तिथल्या नियमांप्रमाणे इथेही उपचारांची दिशा ठरवण्याचा आग्रह धरतात. त्यांना इथल्या अडचणी व मर्यादा लक्षात येत नाहीत व त्याचा इथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व जवळचे नातलग यांना खूप त्रास होतो. आई-वडील तब्येतीने धडधाकट असतानाच परदेशस्थ मुलं, इथे ज्येष्ठांची काळजी घेणारे दोन नातलग आणि डॉक्टर यांनी एकत्र बैठक घेऊन पुढील काळात ज्येष्ठ आजारी पडल्यास त्यांच्या उपचारांची दिशा, व्याप्ती व मर्यादा यांचा साकल्याने विचार करून असं ‘वैद्यकीय इच्छापत्र’ केलं तर ते सर्वानाच खूप सोयीचं होईल. अर्थात त्यासाठी निरोगी वृद्धांनी एखाद्या तरी डॉक्टरशी सतत संपर्कात राहून नियमित वैद्यकीय चाचण्या कराव्यात.

‘सनवर्ल्ड’वरील याच सदरातील लेखानंतर रोहिणी पटवर्धन त्यांना अनेक फोन आले. त्यांतील एका ज्येष्ठाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते सांगत होते, ”मी युद्धनीतितज्ज्ञ म्हणून नोकरीनिमित्त सतत फिरतीवर होतो. सतत बाहेरगावी राहिल्यामुळे नातलगांशी माझा संबंध नाही. मला मुलं नाहीत. पत्नी हयात नाही. मी एकटाच आहे. मी तुमच्याकडे रोख रक्कम जमा करेन. त्यांतून खर्च भागेल एवढेच वैद्यकीय उपचार तुम्ही माझ्यावर करा. मी हे लेखी स्वरूपात दिलं तर तुम्ही मला प्रवेश देणार की नाही?”

‘वैद्यकीय इच्छापत्र’ अशा एकटय़ा अविवाहित, विनापत्य, मुलं असूनही जवळ नाहीत वा ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही त्यांच्यासाठी वरदान आहे. तसंच असाध्य व्याधींनी पीडित ज्यावर औषध व उपचार उपलब्ध नाहीत अशांसाठीही ते उपयुक्त आहे. 

आयुष्यभर ज्या मुलांवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्यासाठी कष्ट उपसतो, त्यांच्यावर अनावश्यक उपचाराचं ओझं लादणं वा त्यांना अप्रिय निर्णय घ्यायला लावणं यापेक्षा व्यावहारिक विचार करून ‘लिव्हिंग विल’ चा पर्याय स्वीकारणं अधिक योग्य आहे नाही का?     

वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी  संपर्क साधा –                    

लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन 

मो – ९०२८६६४३३३   

प्रस्तुती  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – कविता ☆ करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण“)

✍ करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

सफ़्हा -ए -महब्बत पर  हम रकम नहीं होते

दोस्त प्यार के किस्से फिर भी कम नहीं होते

करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण

मस्जिद और मन्दिर में फटते बम नहीं होते

काश प्यार से इन्सां आये रोज सुलझाते

जिंदगी की जुल्फों में पेचो खम नहीं होते

तुमने क्या सवाँरा है चश्मे मिह् र से अपनी

वर्ना चाँद से रोशन आज हम नहीं होते

कर्ब -ए -दहर को अपने तुम न रखते दिल में तो

दास्ताने गम सुनकर चश्मे नम नहीं होते

नफ़रतें जलाते तुम हम परायापन अपना

है जो आज दुनिया में घोर तम नहीं होते

आज इस हकीकत को जानते हैं अंधे भी

दिखने वाले सब इंसा मुहतरम नहीं होते

काश वो अरुण मुझको भूलते नहीं ऐसे

दर्दे दिल नहीं होता रंजो गम नहीं होते

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -1 श्री संभाजी बबन गायके 

(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी) 

तब्बल पंचवीस वर्षांनी ‘ती’ माझ्यासमोर उभी होती. अगदी पहिल्यांदा भेटली होती त्यावेळी माझ्या नजरेत भरलेले तिचे डोळे मात्र अजूनही तसेच होते…. चमकदार आणि एखाद्या खोल सरोवरासारखे…. नीतळ!

त्यावेळी सलग एक महिनाभर कित्येक वेळा बाजारात कधी वाणसामान तर कधी दूध तर कधी भाजीपाला घेण्यास आलेली ‘ती’ भेटली होती मला. मी ही असाच योगायोगाने त्याच ठिकाणी असायचो. कदाचित आम्ही असे भेटावं असंच विधिलिखित असावं.

अमृतसरमध्ये मी माझ्या मामांकडे आलेलो होतो. मी बारा वर्षांचा आणि ‘ती’ नऊ वर्षांची. माझे मोकळे सोडलेले लांब केस आणि तिची घोळदार सुरवार…. कुणीही ओळखेल आम्ही दोघंही शीख आहोत!

पहिल्या भेटीत तिच्याकडून मला समजलं की ती इथं तिच्या मामाकडे राहते. दुस-याच भेटीत मी तिला मस्करीत विचारलं होतं…”तुझं लग्न ठरलंय का?” त्यावर ती ‘ईश्श…!चल हट!” म्हणत लाजून तिथून पळत तिच्या मामाच्या घराकडे गेली होती. असं खूप वेळा झालं. माझा तोच प्रश्न आणि तिचं तेच उत्तर! तिला हे असं विचारताना मला गंमत वाटायची. पण का कुणास ठाऊक तिचं लग्न ठरू नये असं मला वाटत राहायचं!

एकेदिवशी माझ्या नेहमीच्या प्रश्नाला मात्र तिने अनपेक्षित उत्तर दिलं,” हो, ठरलं माझं लग्न! तुला दिसत नाही का माझ्या अंगावरचा रेशमी, फुला-फुलांचा शालू?” आणि असं म्हणून ती तिथून धावत धावत परत गेली आणि पुन्हा कधीच दिसली नाही!

मला धक्का बसला…. खरं तर असं धक्का बसण्यासारखं काही नव्हतं…पण मलाच कळलं नाही काय झालं ते!

मलाही पुरत्या ठाऊक नसलेल्या एका अनामिक निराशेने मी धावत घराकडे निघालो. वाटेत उभ्या असलेल्या एकाला गटारात ढकलून दिलं, हातगाडीवाल्याच्या हातगाडीवरलं दूध सांडवलं, एका कुत्र्याला विनाकारण दगड फेकून मारला, नदीवरून आंघोळ करून सोवळ्यात परतणा-या एका पुजा-याला मुद्दाम धडक दिली आणि त्याच्याकडून ‘आंधळा’ अशी उपाधी स्विकारली…. घरी कसा आलो ते समजलेच नाही! कशाचा राग आला होता… कुणास ठाऊक?

बाजारातल्या टांगेवाल्यांच्या नेहमीच्या गोड शब्दांतील ओरडण्याकडे आज माझे लक्षही गेले नाही…. इतर ठिकाणचे टांगेवाले रस्त्याने चालणा-यांना शिव्या घालतात तसे इथले टांगेवाले जीभ चालवत नाहीत…. गोड शब्दांत पण नेमकं असं बोलतात की…. माणूस बाजूला झालाच पाहिजे.. खजील होऊन!

त्यानंतर ती दिसली, भेटली नाही… कोण जाणे कुठे गेली असावी… लग्नानंतर! आणि आज तीच माझ्यासमोर उभी होती. मी तिला ओळखायच्या आतच तिनेच मला ओळखलं.. अगदी नावानिशी!

मिसरूड फुटताच मी फौजेत भरती झालो. लग्न झालं, मुलं झाली. बालवयातील त्या महिनाभरातल्या त्या भेटी आणि ती माझ्या स्मृतींच्या पडद्यामागे नाहीशी झालेली होती.

पलटणीतून सात दिवसांची सुट्टी घेऊन गावी आलो. शहरातल्या न्यायालयात वडिलोपार्जित शेतीवाडीचा खटला सुरू होता, त्या कामासाठी आलो होतो. तिथेच पलटणीच्या कमांडरचा आदेश मिळाला…. ‘फौज परदेशात कूच करणार आहे. युद्धावर जायचंय… ताबडतोब हजर व्हा.’

आमच्या तुकडीचे नायक सुभेदार हजारासिंग अमृतसरमध्येच भेटले. त्यांना आणि त्यांच्या मुलाला, बोधासिंग, दोघांनाही पलटण कमांडरसाहेबांचा आदेश मिळाला होता. ते ही कामे आटोपती घेऊन फौजेत परतण्याच्या तयारीत होते.

सुभेदार साहेब मला म्हणाले, ”लहानासिंग, तु तुझ्या गावावरून निघताना माझ्या घरावरून जाशील ना, तेंव्हा माझ्या घरी ये. आपण तिघे मिळूनच निघू!”

मी ताबडतोब घरी पोहोचलो, बांधाबांध केली, आई-वडिलांचा, पत्नी, मुलांचा निरोप घेतला आणि अंगावर वर्दी चढवून माझी ट्रंक डोक्यावर घेऊन निघालो. वाटेत सुभेदार साहेबांच्या गावच्या वळणावरून त्यांच्या घराकडे गेलो. मी आल्याचे अंगणातूनच साहेबांना आवाज देऊन सांगितले. साहेब आणि त्यांचा नौजवान मुलगा, बोधासिंग तयार होऊनच बाहेर आले.

“लहनासिंग, घरात जा. माझ्या पत्नीला तू ओळखत नसशील बहुदा.. कारण ती रेजिमेंटच्या क्वॉटर्समध्ये कधी राहिलीच नाही. पण तिने तुला लांबून येताना पाहताच ओळखलंय वाटतं. तिने तुला आत बोलावलंय. जा, ती काय म्हणतेय ते बघून ये!”

मी आश्चर्यचकित होऊन साहेबाकडे पाहिलं. मी तर या सुभेदारणीला आधी कधीच भेटलो नव्हतो. मग ती कशी मला ओळखते? कमाल आहे! तरीही मी सुभेदार साहेबांचा हुकूम समजून घरात गेलो.

घराच्या आतल्या ओसरीवर ती उभी होती. ढिली सलवार, त्यावर हिरव्या रंगाची ओढणी, अंगापिंडाने एखाद्या सरदारणीला शोभेल अशी.

“लहनासिंग! आठवतंय… तो अमृतसरचा बाजार, तुझं मला ‘लग्न ठरलंय का?’ म्हणून छेडणं आणि माझं ‘चल हट’ म्हणत पळून जाणं?” ती चेह-यावर आठवणींचा फुलोरा फुलवीत म्हणाली.

तळ्याच्या काठावर उभे राहून फक्त एक पाय पाण्यात, फक्त थोडासा ओला करून घ्यावा, म्हणून बुडवावा आणि तिथे पाणी प्रचंड खोल असावं, आणि आपण थेट तळाशी जावं, असं झालं मनाला. ती आता अशी दिसते? नंतर कधी कशी भेटली नाही? मनासारखं झालं असतं तर आज तिचा मुलगा बोधासिंग… आमच्या दोघांचा मुलगा असता… नाही? माझं मन पंचवीस वर्षे मागे गेलं.

“लग्न होऊन मी या सुभेदाराच्या घरात आले. सगळं व्यवस्थित होतं. सरकारने यांना शौर्य गाजवल्याबद्दल तिकडे गावाकडे जमीन बक्षिस देऊ केलीये. आता कुठं स्थिरस्थावर होतंय असं वाटू लागतं न लागतं तोच ही मेली लढाई सुरू झाली. आणि ती ही आपल्या मुलुखात नाही तर लांब तिकडे विलायतेत. आणि आता हे दोघं बाप-लेक निघालेत मोहिमेवर.” ती बोलतच राहिली.

“एक पाठोपाठ चार मुलगे घातले वाहे गुरूंनी पदरात. पण पहिले तिघे हे जग सोडून गेले लवकरच. आणि हा धाकटा बोधा, माझा एकुलता एक लेक, बापाच्याच पावलावर पाऊल टाकून फौजेत भरती झालाय. म्हणतो, बापा सारखंच नाव कमावेन.”

“लहनासिंग, माझं एक काम करशील?” तिने विचारले.

नाही म्हणायचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. ती काय सांगते आहे हे ऐकण्याआधीच मी मनानेच होकार दिलाही होता.

“लहनासिंग, लढाईत या दोघांची जबाबदारी आता तुझी. यांना काहीही होऊ देऊ नकोस. बोधासिंग अजून लहान आहे. एकच वर्ष झालंय फौजेत भरती होऊन. बोधाला सांभाळून परत आणशील लढाईतून? सुभेदारसाहेबांच्याही पाठीशी उभा राहशील ना? मी तुझ्यापुढं पदर पसरते! या दोघांशिवाय या जगात माझं दुसरं कुणीही नाही रे!” तिच्या डोळ्यांत आसवं आणि आवाजात कंप होता…!

“सुभेदारणी! तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही! ह्या दोघांची जबाबदारी आता माझी…. तुम्ही मला हक्काने सांगितलंत… हेच खूप आहे माझ्यासाठी!” असं म्हणत तिच्या पाणीदार डोळ्यांत पहात मी तिला पाठमोरा न होता, मागे मागे सरकत घराच्या उंब-याबाहेर पडलो.

सुभेदार साहेब आणि बोधासिंग चार पावलं पुढे होते… मी लांब लांब ढांगा टाकीत त्यांच्या पुढे जाऊन चालू लागलो. बोधासिंगची एक वळकटी माझ्या डाव्या हातात घेतली.

बोधासिंग माझ्याकडे पहात राहिला आणि मी त्याच्याकडे पाहून हसलो… ”चलो, पुत्तर! बहोत लंबा सफर है!”

सुभेदारणी आमच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात उंब-यामध्ये उभी असेल याची मला खात्री होती. मात्र मी मागे वळून पाहिले नाही… पण तिचा चेहरा मात्र डोळ्यांसमोरून जात नव्हता…. ती नजर माझा अगदी परदेशातल्या या बर्फाने गाडल्या गेलेल्या खंदकामध्येही सोबत होती आणि तिचे शब्द….. ‘माझ्या नव-याला आणि मुलाला सांभाळशील ना, लहनासिंग?’

आता माझी लढाई दोन्ही आघाड्यांवर होती… शत्रूला ठार करणे आणि या दोघांना शत्रूपासून दूर ठेवणे.. आणि सहीसलामत घरी पाठवणे… तिच्याकडे!

परदेशातल्या लढाईतल्या मैदानातील खंदकातील आज आमचा पाचवा दिवस…. कसला गोळीबार नाही की समोरासमोरची हातघाईची लढाई नाही. घोड्याला रपेट नसली आणि सैनिकाला लढाई नसली की ते अस्वस्थ होतात… तसंच झालं होतं सर्वांचं.

सुभेदार साहेब म्हणाले, ”अजून फक्त दोन दिवस. दोन दिवसांनी ताज्या दमाची कुमक येईल, मग आपण मागे हटू.”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #215 ☆ दोरी होती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 215 ?

दोरी होती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मी दुःखाला उगा कशाला चिवडत बसलो

दोरी होती साप म्हणूनी बडवत बसलो

शांत जळाची पारदर्शिता तळ दाखवते

भंग शांतता करून पाणी ढवळत बसलो

डाग चांगले असे ऐकले कुठेतरी मी

कारण नसता चिखल मातिला तुडवत बसलो

नवीन ढाबळ नवीन पक्षी जमा जाहले

विद्रोही पक्षांणा दाणे भरवत बसलो

लोहारच मी दागदागिने मला न जमले

युद्धासाठी बर्ची भाले बनवत बसलो

इंग्रज गेले मोगल गेले काळ लोटला

अजून त्यांचे कित्ते आपण गिरवत बसलो

अधुनिकतेची खोटी स्वप्ने बघता बघता

संस्काराच्या नात्यालाही फसवत बसलो

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 216 ⇒ मटरगश्ती… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “मटरगश्ती…।)

?अभी अभी # 216 ⇒ मटरगश्ती… ? श्री प्रदीप शर्मा  ?

मैं लाल लाल टमाटर नहीं, हरा भरा मटर हूं, हरा भरा अर्थात् मेरे अंदर भी हरा भरा, और मैं बाहर से भी हरा। मुझे अंग्रेजी में pea कहते हैं और मैं भी बीन्स प्रजाति का ही एक सदस्य हूं।

दाने दाने पर लिखा है छीलने वाले का नाम। मुझे जो छीलता है, वह पहले मुझे चखता है और अगर मैं मीठा हुआ, तो मेरी खैर नहीं। मालवा की काली मिट्टी में मैं बटले के नाम से जाना जाता हूं। ठंड के मौसम में मैं हर सब्जी वाले के पास, और हर घर में बहुतायत से उपलब्ध होता हूं।।

रसोई घर में ऐसी कोई सब्जी नहीं, जिसमें मेरा योगदान ना हो। पुलाव हो या बिरयानी, आलू गोभी हो या पत्ता गोभी, जहां टमाटर, वहां भी मौजूद हरा भरा मटर। मटर पनीर बच्चों, बड़ों, सभी की पसंद भी रही है, और कमजोरी भी। कल ही हमने मैथी, मटर, मलाई बनाई।

ठंड के मौसम में हर सब्जी में गश्त लगाना मेरा कर्तव्य भी है और अधिकार भी।

जब कभी होटलों में किसी सब्जी के बारे में एकमत नहीं होते, तब मिक्स वेज का नंबर आता है। जिसे सब्जी में से बच्चे चाव से बीनकर खाते हैं, वही तो बीन्स कहलाते हैं।।

आलू और भुट्टे की कचोरी की तरह ही बटले की भी कचोरी बनाई जाती है। मौसमी स्वाद अपनी जगह है, फिर भी त्वरित उपयोग के लिए यह मटर आजकल बारहों महीने सुफला के नाम से हर जगह उपलब्ध होता है। समझदार गृहणियां तो सीजन में सस्ते मटर फ्रीज में संभालकर रख लेती हैं।

इस मौसम में घरों में मटर का आना, बच्चे बड़े सभी मटरगश्ती करते हुए, एक एक दाना मुंह में रखते जाते हैं और उधर बेचारे बचे हुए मटर सब्जी, पुलाव सहित अन्य स्वादिष्ट डिशेज में मटर गश्ती करते देखे जा सकते हैं। बहुत सस्ते हैं, स्वादिष्ट हैं, दानों से भरपूर हैं, हरे भरे मटर।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “किंकर्तव्यविमूढ़” ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। क्षितिज लघुकथा रत्न सम्मान 2023 से सम्मानित। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं  (वार्षिक)  का  सम्पादन  एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत हैआपकी विचारणीय लघुकथा “किंकर्तव्यविमूढ़“.)

☆ लघुकथा – किंकर्तव्यविमूढ़ ☆ डॉ कुंवर प्रेमिल

वह किंकर्तव्य विमूढ़ है।

-क्योंकि उसकी अपनी पत्नी उसका कहा नहीं मानती।

-क्योंकि उसका अपना बेटा उसका कहा नहीं मानता।

-क्योंकि उसकी अपनी बेटी उसका कहा नहीं मानती।

उन सबके अपने-अपने टारगेट है और वह स्वयं बिना किसी टारगेट का है। उसके अपने ये टारगेट उसके हाथ से फिसलते चले गए हैं।

वह किंकर्तव्यविमूढ़ होकर निरुद्देश्य जीवन की पटरी पर सुनसान पथ का राही बनकर रह गया है।

🔥 🔥 🔥

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अमर्त्य ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – अमर्त्य ? ?

जानता हूँ,

यही सोच रहे हो कि

हर बार उगला

हलाहल तुमने

और मैं अब तक

‘जीवेत् शरद: शतम्!’

चकित हो ना?

सुनो भुजंग,

सहानुभूति है तुमसे,

जानता हूँ,

अमर्त्य नहीं मैं

पर क्या करूँ,

मेरी भावनाओं

के अमृत का घनत्व

बहुत अधिक है;

तुम्हारे दयनीय विष की

द्रव्यता की अपेक्षा! 

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

नवरात्रि साधना के लिए मंत्र इस प्रकार होगा-

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

🕉️ 💥 देवीमंत्र की कम से कम एक माला हर साधक करे। अपेक्षित है कि नवरात्रि साधना में साधक हर प्रकार के व्यसन से दूर रहे, शाकाहार एवं ब्रह्मचर्य का पालन करे। सदा की भाँति आत्म-परिष्कार तथा ध्यानसाधना तो चलेंगी ही। मंगल भव। 💥 🕉️

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळ… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

ओंजळ…. ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती….’ म्हणत दोन्ही हातांची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते करदर्शनम्’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हातांनी आपण नमस्कार करतो! ओंजळ म्हटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण! सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला! दानशूर कर्णाची  ओंजळ कधी रीती राहत नव्हती. गंगा स्नानानंतर तो हा दान यज्ञ करीत असे ओंजळीने! दानशूर कर्णाची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते देण्यात व्यस्त असे!

त्यामुळे कर्णाकडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवच कुंडले ही अशाच वेळी मिळवली. ओंजळ हे दातृत्वाचे प्रतीकच आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्यायले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते, तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखी वाटते !दानासाठी आपण हाताचे महत्त्व सांगतो तसेच ओंजळ ही नेहमी दोन हाताने दान देण्यासाठीच असते!

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते! सकाळच्या वेळी जर कोणी सुवासिक जाई, जुई, मोगरा, बकुळी यासारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हाऱ्यात सजलेली पाहताना ते फुलांनी सजवलेले परमेश्वराचे रूप पाहून मन भरून येते. ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते.ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते!

भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेले ओंजळभर पाणी याचे महत्त्व माणसाला खूपच असते. अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय राहत नाही! जे मिळते ते समाधानाने घ्यावे त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते! ओंजळ भरून लाह्या जेव्हा पती-पत्नी लाजा होमात घालत असतात, तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात! जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकांसाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात, तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी घेतात, जणू आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते!

‘ओंजळभर धान्य’ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे रूपांतर एका मोठ्या धान्य साठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही, पण अशा असंख्य ओंजळींच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते.

गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये. त्यांना फार तर पैसे देऊ नये पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी. त्याकाळी अन्नदानाचे पुण्य मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण लक्ष्मीचे जे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत असते आणि तिची ओंजळ सतत भरभरून वाहत असते ,असे ते चित्र असते. अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असं मनात येतं! लक्ष्मीपूजनाला आपण अशा लक्ष्मीची पूजा करतो. आत्ता आठवली ती व्ही शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री ,जी ओंजळीतून फुले उधळीत असते! त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की ते चित्र आपल्या सर्वांच्या मन: पटलावर कोरले गेले आहे!

आपल्या दोन हातावरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो. जेव्हा ते दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते. अशी ही “ओंजळ “शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडते असं मला वाटतं, पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळीला सतत ओतत रहाण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळीसाठी मला वाटतं!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈