मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

 

☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी  

मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो ! अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले ! 

“ संस्कृत दासबोध ! “ अरे बापरे ! प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद ! कसं शक्य आहे?

हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा ! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला ! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला !

आता आली का पंचाईत ! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा? समर्थांची प्रार्थना केली मनोमन…अणि दिवस पुढे सरले… पण नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे “ .. …रामशास्त्री…असो. समर्थेच्छा !

वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल ! त्यात संघाची चड्डी घातलेली, त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…

म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला !

एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला ! “कोण रे तू? इथं कुठं वाट चुकलास?”

मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला…” जा पळ घरी…इथं काय मिळणार तुला?

जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊ देत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे. इथं काय ठेवलंय..  दगडं आणि माती ! “ 

मी म्हणालो, “ इथंच तर खर सुख आहे बाबा ! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?” 

बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला ! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, “ अस्सं !!! बर मग जा आत ! “

मी दर्शन घेऊन परत आलो ! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती !

मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय?”

“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात !” 

“वेळापुरे? श्याम?” .. “अरे श्याम नाही राम !”

आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! अरे बापरे ! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, “ ते संस्कृत दासबोध कर्ते? “ 

“तिथं तिथं…” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, ” तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते ! मी साधा मास्तरडा रे ! मला काय दगड कळतंय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक…त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही !”

मती सुन्न झाली ! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?

नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे ! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय ! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहून अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे !

बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले– “ घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा ! तरच कार्य सिद्धीस जाईल ! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला ! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून ! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत ! काय चमत्कार आहे हा ! वाचून पहा ग्रंथ ! खरोखरीच अप्रतिम झाला आहे !

मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध.कॉम वर आला !

ते म्हणाले, “अरे माझी मूर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे ! त्यांना विचार आणि दे टाकून ! माझे काय आहे त्यात !”…. 

डोळ्यात पाणी आले…पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले– “अरे अरे अरे ! सांभाळ ! डोक्याला शेण लागेल तुझ्या !”

मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, ” मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या  आणि खो खो खो हसू लागले !

— त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले !

अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे !

हा संस्कृत दासबोध dasbodh.com वर नक्की वाचा ! आवडॆल तुम्हाला !

॥ www.dasbodh.com ॥

लेखक : अज्ञात. 

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

नमस्कार ! दिनांक ८/ ०५/२०२३ ला राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर येथे गेलो होतो.

एखाद्या पंचतारांकित हॉटेलात जातोय की काय असाच भास आला ! 

दवाखान्याची इतकी भव्यता, अत्याधुनिक यंत्रणा आणि सुंदरता बघून खूप अभिमानस्पद वाटलं , की माझ्या देशात सुद्धा अश्याप्रकारचे दवाखाने तयार होत आहेत. 

आम्हा सगळ्यांना खूप सुरक्षित आणि आरामदायक वाटले !  रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आहे! संपूर्ण कर्मचारी अतिशय ज्ञानी आणि मैत्रीपूर्ण आहेत ! खोली अतिशय स्वच्छ आणि आरामदायक आहे! दिलेले अन्न अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होते ! एकूणच, मला खूप सकारात्मक अनुभव आला !

कर्करोग या संकटाशी लढण्यासाठी इथे ‘कर्कयोद्धा’ ची फौज तयार करत आहेत. दवाखान्याच्या मिशनमधील प्रत्येक भागधारक, मग तो रुग्ण, काळजीवाहू, नातेवाईक किंवा इथले सेवा सहयोगी–  हा सुद्धा कर्कयोद्धा आहे.

कार्यक्षमता, टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षा आणि सौंदर्यशास्त्र या मूल्यांवर राष्ट्रीय कर्करोग संस्थेची योजना आखली आहे.—- कर्क योद्धा, परिवार शक्ती, कर्क सेवक, आंतरिक संगत, सबकी लडाई ह्या तत्वांवर चालणारी ही संस्था आहे.

आज तुम्हा सगळ्यांना ऊर्जा कार्यक्षमता या तत्त्वावर कश्या प्रकारे ही संस्था आधारित आहे? हे सांगण्याचा प्रयत्न करतो – हा प्रकल्प पूर्णपणे सौर उर्जेवर आहे. सौर ऊर्जेच्या प्लेट्स च्या खालच्या सावलीचा उपयोग काय करायचं?, तर तिथे गाड्या पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्या भागात फुलबाग सुद्धा फुलविली आहे. अश्या प्रकारे आम्ही ऊर्जा सुद्धा तयार करू – जागेचा पुनर्वापर करू – फुलबाग सुद्धा फुलवू, हेच तत्व अश्या प्रकारच्या कृतीतून दाखवून आपल्या सगळ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे. 

लेखक : श्री सूरज पाल

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेंगोल — राजदंड” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ““सेंगोल — राजदंड”  ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

“सेंगोल” – या राजदंडाची उंची ५ फूट आहे. तो चांदीचा असून त्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे. त्याच्या माथ्यावर शिवाचे प्रिय वाहन “नंदीबैल”  विराजमान आहे, ज्याला निष्पक्षता आणि न्यायाचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे. हा राजदंड राजाने हाती धारण करणे म्हणजे धर्माशी अतूट, अविचल आणि तत्त्वनिष्ठ राहून शासन करण्याची जबाबदारी पार पाडणे.                                            

१४ ऑगस्ट १९४७ रोजी,  शेवटचा ब्रिटिश व्हॉईसरॉय – लॉर्ड माऊंटबॅटन यांना सत्तांतराचे प्रतीक म्हणून काही दृष्यस्वरूपातील चिन्ह हवे होते. तसे त्यांनी पं.नेहरूंना सुचवले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते – माननीय सी. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी. ते थोरापल्ली, जिल्हा कृष्णगिरी, तामिळनाडू (तेव्हाचे मद्रास राज्य) येथील रहिवासी होते. त्यांच्या मनावर चोल राजवंशाचा मोठा प्रभाव होता. राजसत्तेच्या सत्तांतराच्या समारंभात हा ‘सेंगोल’ (राजदंड) विधिपूर्वक नव्या शासकाच्या हाती सुपूर्द करण्यात येई. राजाजींनी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील “थिरूवदुथुराई अधिनाम (मठ),  (Thiruvaduthurai Adheenam (Mutt) या धर्मपीठाशी संधान साधून चेन्नईतील “व्युमिडी बंगारू चेट्टी” या सराफी-पेढीकडून हा “सेंगोल” तयार करून घेतला. त्यावेळी त्याची किंमत रू.१५,०००/- होती.             

                                             

अशा रीतीने १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा “सेंगोल” (राजदंड) पं. नेहरूंच्या घरी त्यांचे हाती या मठाच्या साधूंकडून विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

तो ‘सेंगोल’ (राजदंड) अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील संग्रहालयात वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रदर्शित करण्यात आला होता.          

मात्र आता, कालच उद्घाटन झालेल्या नव्या संसद-भवनामध्ये, लोकसभा अध्यक्षांच्या सन्मान्य आसनाशेजारी त्याची सन्मानपूर्वक स्थापना होत असून, ती तामिळनाडूतील त्याच मठाच्या साधूंकडून विधिपूर्वक केली जाईल.

माहिती संग्रहिका :: सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-9… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-9…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

की गोडीनेच आपुली गोडी

अनुभवावी घेऊनि तोंडी?

तैसी आपुली एकमेका आवडी

इंद्रियातीत परमात्मस्वरूप गोडी॥४१॥

 

आतुर मी घेण्या तुझी भेट

आत्मतत्त्वाचे परि साटंलोटं

केवळ उपाधी, देह देहाच्या भेटी

आत्मतत्वांच्या भेटी, हो सिद्धभेटी

भयभीत मी, न बिघडो सिद्धी

भेटीची, देहभेटीच्या उपाधी॥४२॥

 

तव भेटीचा मी विचार करिता

तुझे मन मायावी नेते द्वैता

मनास येवो अवस्था उन्मनी

तरीच होशील आत्मज्ञानी

दोन आत्म्यांची न होता भेट

तव दर्शन कैसे होई सुघट॥४३॥

 

तुझी कल्पना, वागणे, बोलणे;

चांगले असणे अथवा नसणे

न स्पर्शी ते स्वरूपा तटस्थ

कर्माकर्म केवळ इंद्रियस्थ॥४४॥

 

चांगया तुजसाठी करणे वा

न करणे, हा विकल्प नसावा

देहेंद्रियांनी व्यवहार करावा

तो आत्मस्वरूपी न घडावा

आत्मतत्वाचा मी उपदेश करावा

तो मीपण माझे जाई लयत्वा॥४५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.) इथून पुढे — 

“डॉक्टर साहेब, या प्लेटलेट्स गोळा कशा केल्या जातात ? प्लेटलेट्स देण्यासाठी दात्याचे काही निकष असतात का आणि प्लेटलेट्सचेही रक्तगट असतात का हो ?” – रजत.

— जरा शास्त्रीय आणि तर्कशुद्ध महत्त्वाचे प्रश्न ऐकून डॉक्टरसाहेबांची कळी खुलली आणि ते समजावून सांगू लागले.—- 

“रक्तदानापेक्षा प्लेटलेट डोनेशनचे निकष कांकणभर जास्तच काटेकोर असतात. दाता वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा लागतोच, शिवाय डोनेशनच्या किमान ४८ तास आधीपासून दारू पिणे, तंबाखू सेवन हे सगळंच कटाक्षाने बंद ठेवावे लागते. हिमोग्लोबीन १२.५ पेक्षा अधिक असावं लागतं आणि प्लेटलेट संख्या प्रति मिलीलिटर २,६५,००० पेक्षा जास्त असावी लागते.– दात्याच्या शरीरातून रक्त काढणे सुरू करतात, यंत्राद्वारे त्या रक्तातून प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि उरलेले रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडलं जातं.  (डायलिसिस करताना कसं शरीरातील रक्त काढलं जातं, शुद्ध केलं जातं आणि ते शुद्ध रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं, तसंच.) साधारण एक दीड तास ही प्रक्रिया चालू राहते. तसेच ही प्रक्रिया करणाऱ्या यंत्राचा संच हा फक्त एकदाच वापरला जातो. व त्या वापरानंतर तो मोडीत काढला जातो (only one time use, disposed after single use). त्यामुळे दात्याला संसर्ग होण्याची तिळमात्रही शक्यता नसते. रक्तदानात तुमच्या शरीरातून रक्त काढून घेतले जाते, म्हणून तुम्हाला recovery साठी तीन महिन्यांपर्यंत परत रक्तदान करता येत नाही. प्लेटलेट डोनेशन मात्र दर पंधरा दिवसांनी करता येते. आणि तसं ते करावंही, आज प्रचंड गरज आहे. आणि हो, प्लेटलेट्सना रक्तगटाचं बंधन नसतं, बरं का ! कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स कोणत्याही रक्तगटाच्या पेशंटना चालतात. करोना काळात पेशंटची मोठी गैरसोय होत होती, अशा वेळी व जेव्हा कधी तातडीची गरज असेल, तर दाता सुदृढ असेल तर डबल डोनेशनही घेतले जाते. आणि हो, आपण दिलेल्या प्लेटलेट्स कोणाला दिल्या गेल्या हे दात्याला कधीच सांगितले जात नाही. आजवर फक्त एकदाच हा रिवाज मोडला गेला. ज्यांच्या सांगण्यावरून मी त्या दिवशी डोनेशनला गेलो होतो त्या बालविभागाच्या प्रमुखांनी दुसऱ्या दिवशी ज्या लहानग्याला माझ्या प्लेटलेट्स दिल्या होत्या, त्याच्या पालकांचा आलेला आभाराचा मेसेज मला forward केला होता. दानाच्या प्रक्रियेसाठी इतका वेळ देणं, त्या मोठ्या सुईच्या वेदना सहन करणे, आणि पुन्हा पंधरा दिवसांनी हीच प्रोसेस रिपीट करणं – तुम्हाला अनाकलनीय वाटेल कदाचित, पण आपली ही कसरत कोणाचा तरी जीव वाचवत आहे, ही भावना, ही जाणीव आपल्याला प्रेरणा देत रहाते. दान केलेले रक्त तीन आठवड्यांपर्यंत साठवता येते, पण प्लेटलेट्स फक्त पाचच दिवस टिकू शकतात, त्यामुळे आणखीन दाते पुढे येण्याची नितांत गरज आहे.”

— डॉक्टर सुयोग भरभरुन सांगत होते.

घरी परतताना, चक्क बंड्याही शांत होता, रजत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता, आणि एकदम तो उद्गारला, “बंडूशेठ, तू म्हणतोस तेच खरं. तो ब्राझीलचा चिकिन्हो स्कार्पा आणि हे डॉक्टर सुयोग दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. — त्या चिकिन्होने गाडी जमिनीत गाडायचा गाजावाजा केला, एवढंच तुला आठवलं. पण त्याने पुढे काय म्हटलं, ठाऊक आहे का तुला ?”

बंड्यांनं नकारार्थी मान हलवली. 

” तो म्हणाला, ही गाडी माझ्या मृत्यूनंतर मला उपयोगी पडेल म्हणून मी गाडायचे ठरवले, तर तुम्ही माझी हुर्यो उडवलीत, मला नावं ठेवलीत, माझी अक्कल काढलीत. मग तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अनमोल अवयव तुम्ही जेव्हा जमिनीत गाडता, तेव्हा तुमची ही बुद्धी कुठे जाते ? त्यापेक्षा अवयव दान करा, अन्य गरजूंना मदत करा.”

“ अरे Organ donation ला प्रसिद्धी देत होता तो. तसंच या डॉक्टरांना स्वतःच्या कौतुकाची, मानमरातबाची हौस नाहीये. पण असं हे आचरट title पाहिलं, असं heading पाहिलं, असा मथळा पाहिला, की कोण आहे हा टिकोजीराव ? या उत्सुकतेने तरी लोकं ही बातमी वाचतील आणि प्लेटलेट डोनेशनला प्रेरित होतील – उद्युक्त होतील, म्हणून त्यांचा हा खटाटोप. – तुला माहित आहे का, डॉक्टरांनी आत्तापर्यंत तब्बल ७५ वेळा प्लेटलेट डोनेशन केले आहे ?”

— रजत विचारत होता, आणि बंड्या प्लेटलेट डोनेशन करण्यासाठी कोणाला संपर्क करायचा हे विचारणारा मेसेज सुयोग सरांना पाठवत होता.

— समाप्त —

 (डॉ. सुयोग कुळकर्णी MD आयुर्वेद आणि त्यांनी ७५ वेळा केलेले प्लेटलेट डोनेशन ही १००% सत्य घटना आहे. प्लेटलेट डोनेशन या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉ. सुयोग यांना ९८२०२५९५६९ या क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

पत्रकार रजत सरदेसाई एका MD (आयुर्वेद) डॉक्टरांची मुलाखत घ्यायला चालले होते. बरोबर त्यांचा मित्र बंड्या काळे होताच. डॉक्टरांनी मुलाखतीचे शीर्षक “मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे” हेच राहणार असेल तरच मुलाखत देईन असं म्हटल्याने हे दोघं बुचकळ्यात पडले होते. बंड्याला तर ब्राझीलमधील चिकिन्हो स्कार्पा या अब्जाधीशाची आठवण आली. त्याने, मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, त्याच्या चार कोटी रुपयांच्या बेंटली गाडीचं शाही इतमामात दफन करायचं घोषित केलं होतं. 

 “तो स्कार्पा आणि हे डॉक्टर, दोघेही विक्षिप्तपणाबाबतीत एकाच माळेचे मणी दिसतायत,” असं म्हणत म्हणत, बंड्या आणि रजत, मुलाखत देणाऱ्या दादर, मुंबईच्या डॉ. सुयोग कुळकर्णी यांच्याकडे पोचले. 

 रजतने भेटल्याभेटल्या मुद्द्यालाच हात घातला, “सर, कटाक्षाने आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करणारे म्हणून तुमचा छान नावलौकिक आहे. पण मुलाखतीचे शीर्षक हेच हवे हा तुमचा अट्टाहास का ? याबद्दल काही सांगाल का, प्लीज ?”

 “होय. पहिल्याप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल मला कोणतेही प्रमाणपत्र अथवा पुरस्कार नकोय. तो तर माझा पेशाच आहे, त्याबद्दल मी फी – पैसे आकारतो. त्यामुळे त्याबद्दल वेगळा पुरस्कार मागणं, हे मला तरी पटत नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला extreme वाटेल. पण असं आहे बघा की, खेळाडू असो, वा चित्रपट अभिनेता, किंवा अगदी एखादा शास्त्रज्ञ – या सगळ्या जणांना त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिले जात आहेत. पण मी जे काम करतो ते पूर्ण निस्वार्थीपणे, अगदी नव्या पैशाचाही फायदा न घेता. आणि शिवाय ते समाजाच्या प्रचंड उपयोगाचे आहे. म्हणूनच माझे ठाम प्रतिपादन आहे की ” मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे ! “ डॉक्टर शांतपणे पण आग्रहाने बोलत होते.

 “पण असं तुम्ही काय जगावेगळं करता ?” न राहवून शेवटी बंड्याने मध्ये नाक खुपसलंच. 

“मी प्लेटलेट डोनर आहे.”

 बंड्याच्या चेहऱ्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह.

 “बंडूदादा, पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells WBC), तांबड्या रक्तपेशी (red blood cells RBC) यांच्याप्रमाणे प्लेटलेट या आपल्या रक्तात असतात. WBC, RBC यांच्यापेक्षा आकारात खूपच लहान. एक मिलीलिटर रक्तात तब्बल अडीच लाखांहून जास्त प्लेटलेट्स असतात. जखम झाल्यावर आलेले रक्त थांबवणे हे यांचं प्रमुख काम,” रजतने थोडक्यात प्लेटलेट्सची कुंडली मांडली. 

 “हां, हां. ते त्या पलीकडच्या गल्लीतील राजूच्या वडिलांना डेंग्यू झाला होता, तेव्हा त्यांच्या या प्लेटलेट कमी झाल्या वगैरे ऐकलं होतं. अरे, पण रक्तदान ऐकलं होतं, ही प्लेटलेट डोनेशन काय भानगड आहे ?” बंडूतील शंकासूर काही शांत होईना.

 “ज्या पेशंटच्या रक्तातील प्लेटलेट संख्या कमी आहे, अशांची जर मोठी शस्त्रक्रिया होणार असेल, किंवा काही अपघात वगैरे झाला असेल तर त्यांना प्लेटलेट्स द्याव्या लागतात. ” – डॉक्टर साहेब. “आणि दुसरा मोठा गट म्हणजे कॅन्सर पेशंट्सचा. कॅन्सर उपचारातील केमोथेरपीचा एक वाईट साईड इफेक्ट म्हणजे याने प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या कमी होते.”

 “सर, खरं सांगू का, मला एक कळलं नाही”, बंडू निरागसपणे आपलं घोडं पुढं दामटत होता, ” की समजा झाल्या रक्तातील प्लेटलेट्स कमी, तर एवढं काय आकाश कोसळणार आहे ? म्हणजे, तुम्ही म्हणता तसं ज्यांना अपघात झाला आहे, जखम झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे अशांचं ठीक आहे एक वेळ, पण बाकी असा कुठे आपल्याला एवढा रक्तस्त्राव होतो की जो थांबवायला या अशा इतरांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स घ्याव्या लागतील ?”

 बंड्याच्या अश्या या un-diplomatic बोलण्याने रजत चांगलाच कावराबावरा झाला, पण त्याला आश्र्वस्त करत डॉक्टरसाहेब सांगू लागले, ” सर्वसामान्यांना कल्पना नसते पण दैनंदिन जीवनात असंख्य वेळा आपल्या शरीरात सूक्ष्म रक्तस्त्राव होत असतात. जोरात शिंकलात, किंवा शौचाला जरा जास्त जोर केलात तरी रक्तस्त्राव होतो. ज्यांच्या प्लेटलेट्सची संख्या सुयोग्य आहे, अशांच्या शरीरात हा रक्तस्त्राव इतक्या बेमालूमरीत्या आणि इतक्या सहजी आणि इतक्या लगेच थांबवला जातो की ते आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे त्याचं महत्त्वही उमगत नाही. पण जर हे छोटे छोटे रक्तस्त्राव थांबले नाहीत तर त्याचं पर्यवसान internal haemorrhage (हॅमरेज) मध्ये होतं आणि पेशंटच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आणि कर्करोगाच्या पेशंटसची रोगप्रतिकार क्षमता अशीही कमी झाली असते, त्यामुळे त्यांच्याबाबतीत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.”

 डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं. 

–क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १ ते ७

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे.  आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या सात ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

यच् चि॒द्धि ते॒ विशो॑ यथा॒ प्र दे॑व वरुण व्र॒तम् । मि॒नी॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥

वरूण राजा तुमची प्रजा अज्ञानी आम्ही

तुमची आज्ञा आम्हा अज्ञा उमगत ना काही

अवधानाने उल्लंघन झाले अमुच्या आचरणे

विशाल हृदयी क्षमा करोनी हृदयाशी घेणे ||१|| 

मा नो॑ व॒धाय॑ ह॒त्नवे॑ जिहीळा॒नस्य॑ रीरधः । मा हृ॑णा॒नस्य॑ म॒न्यवे॑ ॥ २ ॥

आज्ञेच्या अवमानासाठी  देहान्त शासन 

कोप करोनी आम्हावरती नका करू ताडण 

झाला आज्ञाभंग तरी तो केला ना बुद्ध्या 

नका देऊ हो बळी अमुचा तीव्र अपुल्या क्रोधा ||२|| 

वि मृ॑ळी॒काय॑ ते॒ मनो॑ र॒थीरश्वं॒ न संदि॑तम् । गी॒र्भिर्व॑रुण सीमहि ॥ ३ ॥

वेसण घालूनिया वारूला योद्धा बांधून ठेवी

स्तोत्रे तशीच अमुची वेसण मना जखडूनि ठेवी

सुखा मागण्या तुमच्या ठायी बद्ध आम्ही होतो

तव चरणांवर अर्पण करुनी श्रद्धा  निरुद्ध करतो ||३||

परा॒ हि मे॒ विम॑न्यवः॒ पत॑न्ति॒ वस्य॑इष्टये । वयो॒ न व॑स॒तीरुप॑ ॥ ४ ॥

द्विजगण अवघे घेत भरारी अपुल्या कोटराते

मनोरथांची कल्पना तशी तुम्हाकडे पळते

तुमच्या चरणी आर्त प्रार्थना आलो घेऊनिया  

सुखलाभाच्या वर्षावाचे दिव्य दान मागण्या ||४||

क॒दा क्ष॑त्र॒श्रियं॒ नर॒मा वरु॑णं करामहे । मृ॒ळी॒कायो॑रु॒चक्ष॑सम् ॥ ५ ॥

चंडपराक्रम अलंकार हा तुमचा वरूणदेवा

प्रसन्न होऊन अमुच्यावरती यज्ञी झडकरी धावा

तुष्ट होऊनीया भक्तीने आम्हाला वर द्यावा

जीवनात अमुच्या वर्षाव सुखतृप्तीचा व्हावा ||५||

तदित्स॑मा॒नमा॑शाते॒ वेन॑न्ता॒ न प्र यु॑च्छतः । धृ॒तव्र॑ताय दा॒शुषे॑ ॥ ६ ॥

उभय देवता अती दयाळू स्वीकारून घेती

समसमान वाटुनिया अमुच्या हविर्भागा घेती

आज्ञाधारक यजमानावर प्रसन्न ते होती

वरदायी होती, तयाला निराश ना करिती ||६||

वेदा॒ यः वी॒नां प॒दम॒न्तरि॑क्षेण॒ पत॑ताम् । वेद॑ ना॒वः स॑मु॒द्रियः॑ ॥ ७ ॥

मुक्त विहंगत व्योमातुनिया द्विजगण अगणित

मार्ग तयांचा कसा जातसे  हे जाणुनि आहेत  

निवास यांचा सागरावरी सदैव नि शाश्वत

तारु तरंगत कैसे जात ज्ञात यांसि वाट ||७||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)  

https://youtu.be/YfxdaAdbE_8https://youtu.be/YfxdaAdbE_8

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 1-7

 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब पाकिस्तानात आहे …. पुण्याच्या सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. या जोश्यांपैकी श्री अनंत जोशी यांना पाकिस्तानने त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिली म्हणजेच व्हिसा दिला आणि हे जोशी मार्च २००४ मध्ये पाकिस्तानात गेले. 

जिथे भगवान नरसिंह अवतरीत झाले, श्रीविष्णू यांचा हा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ती जागा त्यांना बघायची होती आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. श्री जोशी पाकिस्तानी पंजाबच्या मुल्तान भागात आले. येथील प्रल्हादपुरी मंदिरात ही पावन जागा आहे. या फोटोत जो स्तंभ दिसत आहे, तो तोच स्तंभ आहे ज्यातून श्रीनरसिंह, श्रीविष्णू यांचा पाचवा अवतार प्रकट झाला होता. 

बर्‍याच जोशी कुळांचं श्रीनरसिंह हे कुलदैवत असतं. कदाचित या जोश्यांचंही असेल आणि आपल्या कुळाच्या ईष्ट दैवताचं मूळ स्थान बघण्याची यांची इच्छा असेल. फोटोत बहुतेक ते कुलदैवताच्या मूळ स्थानी जिथे हा स्तंभ फाकलेला आहे, म्हणजेच जिथून श्री नरसिंह स्तंभ फाडून बाहेर आले तिथे जलाभिषेक करत असावेत. 

या जोश्यांचे अनेक आभार कारण त्यांच्यामुळेच हा खांब फोटोत का होईना बघता येत आहे. त्यांच्या या मुल्तान भेटीत त्यांच्यासमोर मुन्शी अब्दुल रहमान खान यांनी लिहिलेलं आणि उलूम-इस्लामिया-चाहलक यांनी प्रकाशित केलेलं “तारीख-ए-मुल्तान” नावाचं एक उर्दू पुस्तक प्रस्तुत करण्यात आलं. यातील थोडी अनुवादित माहिती मध्यंतरी वाचनात आली होती. 

सप्तपुरी म्हणजेच काशी, अयोध्या, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, द्वारका, कांची अशी अतिशय पावन ठिकाणं आज आपल्या देशात आहेत, असंच एक ठिकाण होतं मूलस्थान म्हणजेच मुल्तान. श्रीविष्णू आणि सूर्यदेव यांची भूमी असलेल्या या आद्यस्थानाचा (आद्यस्थान हे या मुल्तानचं कितीतरी नावांपैकी एक नाव) इतिहास खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. आज श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी मंदिर यांची नावे घेतली जातात. पण यांच्यापेक्षाही संपन्न देवस्थान जर कुठलं होतं, तर ते हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आदित्याचं देवालय – मुल्तानचं सूर्य मंदिर.

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।।गङ्गा दशहरा।।… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

।।गङ्गा दशहरा।।☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत गंङ्गा नदीचा जो उत्सव करतात, त्याला दशहरा किंवा गङ्गोत्सव म्हणतात.

भगीरथांच्या प्रदीर्घ प्रयत्नांती , ज्येष्ठ शुद्ध दशमीस, मंगळवारी, हस्त नक्षत्रावर गङ्गा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले.

या १० दिवसांमधील,  गङ्गा- स्नानाच्या योगाने 10 पातकांचे, रोज एक याप्रमाणे क्षालन होते, म्हणून याला “दश-हरा” म्हणतात.

यालाच “गङ्गावतरण” असेही म्हणतात. गङ्गेचे अवतरण, हिंदू लोक, हा “दशहरा-काल” एक  सण म्हणून साजरा करतात.  गङ्गेचे, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले.  हा सण दहा दिवस साजरा केला जातो.  ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी.

माँ गङ्गा नदीला, संपूर्ण विश्वात सर्वात पवित्र नदी मानले जाते. 

सर्व नद्यांचे , मनुष्य जातीवर खूपच उपकार आहेत.  सर्व नद्या पवित्र व साक्षात जलदेवता आहेत.  त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, नद्यांची पूजा केली जाते. 

गङ्गा नदीने आपल्या पिताश्रींना,  म्हणजे श्री शिवजींना विचारले,  की सर्व लोक माझ्या मध्ये येऊन स्नान करून आपली पापे धुवून टाकतात.  माझ्याकडे, साठलेल्या या सर्व पापांचे,   निर्मूलन करण्यासाठी, मी काय करू?  तेव्हा श्रीशिवजींनी सांगितले,  की तू श्रीनर्मदा- मैया मध्ये जाऊन स्नान कर.  व त्यायोगे, तू , स्वतःला शुद्ध करून घेऊ शकशील;  कारण श्रीनर्ममदा ही स्वतःच पापनाशिनी आहे.  त्यामुळेच या दशहराच्या कालखंडात श्री नर्मदा मैया मध्ये स्नान केल्यामुळे गङ्गास्नानाचेही पुण्य लाभते. 

काही ऋषींनी असेही पाहिले आहे की, श्री श्रीगङ्गा- मैय्या ही काळ्या गाईच्या रुपाने,  श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी येते व परत जाताना ती शुभ्र रंगाची होऊन जाते.  म्हणून या गङ्गा दशहराच्या काळात, गङ्गामैया,  नर्मदा मैया किंवा त्यांच्या किनारी जाणे शक्य नसेल, तर कोणत्याही नदीमध्ये त्या दोघींचे नाव घेऊन स्वतःच्या पापनाशनासाठी स्नान करावे.  पुण्यशालिनी अशा सप्त नद्यांचे स्मरण करावे.

आपल्या निवासाच्या ठिकाणी जी नदी आहे, तिचेसुद्धा आपल्यावर खूप मोठे ऋण असते.  तिची पूजा करावी.  मैय्याला खस (वाळा), कापूर, सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. ओटी भरावी.  नैवेद्य दाखवावा.  ऋतुकालोद्भव अंबा अर्पण करावा. मैय्याला भरवावे.  काठावर दिवे लावावे.   त्यांची स्तोत्रे म्हणावीत.  

गावातील सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.

आद्य श्री शंकराचार्यांनी गङ्गाष्टक, गङ्गा स्तोत्र,  यमुनाष्टक, नर्मदाष्टक,  मणिकर्णिकाष्टक अशा स्तोत्रांची रचना केलेली आहे.  नद्यांवरती इतरही बरीच काही स्तोत्रे आहेत.  त्यांचे पठण करावे.  श्री जगन्नाथ पंडित यांनी गङ्गालहरी स्तोत्र याची सुंदर रचना केलेली आहे. श्री शंकराचार्य व श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा लहरींची रचना केलेली आहे.  श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी कृष्णा लहरींची पण रचना केलेली आहे. या स्तोत्रांमध्ये या नद्यांची स्तुती केलेली आहे, महती सांगितलेली आहे व फलश्रुती पण सांगितलेली आहे.  तरी या दहा दिवसात अशा प्रकारे उपासना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा.  श्री जगन्नाथ पंडितांनी गङ्गा लहरी रचताना गङ्गास्तुतीच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहेच.  ज्या लोकांना, योग मार्गाने आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धता करून घेता येणे जवळ जवळ अशक्य असते,  त्यांना या नद्यांच्या उपासनेमुळे, स्तवनामुळे,  त्या प्रकारची नाडी शुद्धी प्राप्त करून घेता येत असते, असे शास्त्र वचन आहे,  भागवत पुराणात याचा उल्लेख आहे.  या काळामध्ये नदीमध्ये स्नान, जप जाप्य उपासना व दान करणे या गोष्टींमुळे उच्च दर्जाची अध्यात्मिकता प्राप्त होते. 

पूर्वीचे काळी, म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी, मंदिरांमधून, जसे आपण नवरात्र साजरे करतो, तसे गङ्गा दशहरा काळांत,  दहा दिवस कीर्तन, जागरण, भागवत श्रवण, भगवत्कथा, जप जाप्य, अभिषेक होत असत.

माझी आई  “मंगला कुलकर्णी”  ही, कीर्तनकार असल्याने या दशहराच्या काळात लहानपणी,  तिची कीर्तने अनेक वेळा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते.  कारण मी तिला पेटीची साथ करत असे.  ती उच्च  विद्या विभूषित असल्याने व प्रोफेसर असल्याने तिचे अर्थार्जन बऱ्यापैकी उच्च प्रतीचे होते.  कीर्तनातून मिळालेले पैसे,   स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे नाहीत,  असे तिने ठरवले असल्याने, त्या संपत्तीचा, तिने विविध प्रकारच्या दानांसाठी विनियोग केला होता. 

अशा दशहराच्या काळात, एक प्रकारचे वाचिक तप म्हणून, कोणाचीही निंदा तसेच चहाडी, न करणे यांसारखी बंधने,  स्वतःवर लादून घेणारी बरीच मंडळी असतात.

या दहा दिवसांच्या काळात प्रामुख्याने श्री गङ्गामैया, श्री नर्मदा मैया, श्री शिवशंभू व भगवान श्री विष्णू यांची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रघात आहे. अशाप्रकारे या पवित्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपासना करून आपण आपला अध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करू या. 

या काळात ज्या सोप्या मंत्रांचा जप करावा ते असे…

१) हरगङ्गे भागीरथी।।

२) नर्मदे हर।।

३)  नमः शिवाय।।

४) राम कृष्ण हरी गोविंद।।

ज्यांना येते त्यांनी इतर विविध प्रकारची गीते,  स्तोत्रे, मंत्र यांचे पठण करावे.

या काळात गंगाकिनारी किंवा नर्मदा किनारी स्थित असलेल्या तीर्थस्नानांचे दर्शन घ्यावे. 

तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाचे आणि श्री महाविष्णूंच्या एखाद्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यावे.

ज्यांना यज्ञयाग इ. पुण्यकर्मे करणे, कोणत्याही कारणांमुळे करणे अशक्य असेल त्यांनी निदान अशी कर्मे जिथे नेहमी/ मोठ्या प्रमाणात केली जातात, अशा ठिकाणी स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्या हवनासाठी ज्या वस्तू लागतात, त्यांचे दान अवश्य करावे. 

तेही खूप पुण्यवर्धक असते.

२० मे ते ३० मे पर्यंत या वर्षीचा गंगा दशहराचा पुण्यकाल आहे.

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे 

I want to be able to be alone, to find it nourishing- not just waiting. –SUSAN SONTAG

साधारणपणे साठपासष्ठीच्या वयाच्या व्यक्ती कोणत्याही कारणाने एकत्र आल्या तरी त्यांच्या बोलण्यात एकटेपणाचा विषय आल्याशिवाय राहत नाही. —- या दृष्टीने सध्याचे समाज जीवन पाहिले तर त्यात सरळ सरळ दोन गट दिसून येतात. वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीची नवी मूल्ये, नवे विचार अगदी सहजी आत्मसात करून, भावनिक गोष्टींमध्ये  न गुंतता स्वतःला जो विचार सोयीचा आणि फायद्याचा वाटतो तो पटकन स्वीकारून पुढे चालणारा एक गट- तरुण आणि मध्यमवयीन लोकांचा !…… तर झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती समजत असली, अनुभवाला येत असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून, पुढे सर्व काही ठीकच होणार आहे -असणार आहे असा सोयीचा विचार करून, काळाची पावले न ओळखता, बेसावधपणे  जगणारा एक गट— अर्थातच वृद्धांचा !  

हे प्रकर्षाने जाणवण्याचे कारण म्हणजे, ६ मे २०२३ च्या  टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख ! विषय आहे–  एकाकीपणा —- Loneliness.  संपादकीयामधे  त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, ‘ Young people prefer new age autonomy over some idealised  intergenerational families cohesion’. 

वृद्ध, मुले आणि नातवंडे सगळ्यांनी एकत्र बरोबर राहणे आता जवळजवळ नाहीसे होताना दिसते. एवढेच नव्हे तर एका शहरात किंवा एका देशात पण ज्येष्ठांबरोबर रहात असणारे तरुणांचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होताना दिसते आहे.  भारतामध्ये  तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे जो फायदा देशाला आणि मुलांना होतो आहे, त्याच्या चर्चा होताना आपण वाचतो आणि ऐकतो आहे. तरुणांची, काम करणाऱ्यांची संख्या इतर देशांमध्ये खूप कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना अक्षरशः रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पार्श्वभूमीवर मनाने अजूनही भूतकाळातच राहणाऱ्या, आपले म्हातारपण विनात्रासाचे जाणारच आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या वृद्धांनी खरोखरीच जागे होण्याची गरज आहे. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वात उच्चपदस्थ व्यक्ती म्हणजे US Surgeon General. सध्याचे सर्जन जनरल विवेक मूर्ती  (एम.डी) यांनी एक ॲडव्हायझरी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, धूम्रपानासारखाच आणि तितकाच, एकाकीपणाही  धोकादायक आहे. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकार, अर्धांग वायू, डिमेन्शिया यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते. पण सध्या  घरात बोलायला माणसे नाहीत आणि असली तरी त्यांना गप्पा मारायला वेळ नाही अशी परिस्थिती ! मग वेळ घालवण्यासाठी वृद्ध मोबाईलच्या विळख्यात  सापडतात. अशा व्यक्तींना मानसिक रोग होण्याचा धोका अधिक आहे हे स्वतः ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. 

घरात माणसे उपलब्ध नसतील तर आपल्याला चार चौघांमध्ये सुरक्षितपणे राहता येण्यासाठी  निवासाचे काही वेगळे पर्याय शोधण्याची गरज आहे. तसेच जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनीही वृद्धांना ती जाणीव प्रकर्षाने करून द्यायला हवीच आहे. ही जाणीव केवळ आर्थिकच नाही, तर अनेक स्तरावर करून घेणे आवश्यक आहे.  मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बरोबर कोणीतरी असणे, किंवा अशी व्यक्ती वेळेवर उपलब्ध होणे,  ही आजची मोठी गरज आहे.  पण त्याची शक्यताही कमी होत चाललेली आहे. त्यासाठी सुरक्षितता आणि सोय यांची सांगड घालून पुढची वाटचाल करायला हवी आहे. यासाठीचा सध्या उपलब्ध असलेला एक मार्ग म्हणजे ‘ वृद्ध – निवास ! ‘  पूर्वी त्याला वृद्धाश्रम म्हणत.  पण आता मात्र वृद्धाश्रमापेक्षा वृद्धनिवासच म्हणणे योग्य ठरेल….   वृद्धनिवासांबद्दल एक नकारात्मक अशी भावना सर्वांच्याच मनात आहे. वृद्धांच्या , मुलांच्या आणि समाजाच्याही मनामध्ये ! त्याचं कारण म्हणजे  वृद्धाश्रमात राहिले तर मुले काळजी घेत नाहीत असा अर्थ काढून जगाकडून  आपल्या मुलांना/कुटुंबाला नावे ठेवली जातील अशी भीती वृद्धांना वाटते. ही भीती खरी आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहण्याची गरज कोणाला वाटत  नाही..

यासाठी खरंतर वृद्ध- निवासाचा पर्याय नेमका  कसा आहे?..तो जास्त सुखकर आणि सोयीचा कसा होऊ शकतो? ते समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती मिळाली  तर वेळ आल्यावर असा निर्णय घेणेही  सोपे होऊ शकते ..

(हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन यासाठी ‘वृद्धनिवास‘ या विषयावर ‘सनवर्ल्ड फॉर सिनीयर्स‘ या संस्थेतर्फे दि. २६ मे २०२३ रोजी पुण्यामध्ये  सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. —

मार्गदर्शक:- वृद्ध कल्याण शास्त्र तज्ञ, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन.—- स्वतः वृद्धांनी, पन्नाशीच्या पुढच्या होऊ घातलेल्या वृद्धांनी, वृद्ध सेवा क्षेत्रात  काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ही माहिती जाणून घेणे नक्कीच उपयुक्त ठरेल.) 

संपर्क :  प्रमोदिनी  8806180011  मृणालिनी 8767628468 ) — केवळ वाचकांच्या माहितीसाठी. 

माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print