डॉ. मधुवंती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ सूक्ष्मजीव… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
💐जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐
(सूक्ष्मजीव शास्त्र व कविता यांचा समवाय साधण्याचा प्रयत्न. कोणत्याही विज्ञान शाखेतील पुस्तकांच्या निर्मितीसाठी, परस्पर मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण यशस्वी होण्यासाठी भाषा ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.)
☆
सूक्ष्मजीव असति जळी स्थळी काष्ठी आणि पाषाणी
करावी लागते सूक्ष्मदर्शकातून त्यांची नेमकी पहाणी
*
सुंदर निर्मियले जग हे परमेश्वराने चित्र मनोवेधक जाहले
मानवा बरोबर जीवाणू, विषाणू, अल्गी प्रोटोझोआ अवतरले
*
विरजण लावत, इडलीचे पीठ आंबवत आई-आजी मोठ्या झाल्या.
लॅक्टोबॅसिलस आणि यीस्ट त्यांच्या प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू लागल्या
*
ॲंटोनी, पाश्चर, ॲलेक्झांडर, रॉबर्ट यांनी आयुष्य सर्व वाहिले.
सूक्ष्मजीवांवर संशोधन करताना जीवन समर्पित जाहले.
*
आरोग्य, उद्योग, औषधे, अन्न सुरक्षा यांना विस्तारते सूक्ष्मजीवशास्त्र
अथांग पसरलेले सखोल, शाश्वत असे हे मार्गदर्शक तत्त्वांचे शास्त्र
*
महाकुंभ मेळ्यात भरला माणसांच्या गर्दीचा अपूर्व हाट
कोडे सुटेना साथीचे रोग नाहीत गंगेचे गुण आवडीने गाई भाट
*
ठेवला प्रश्न पुढे उत्तर शोधण्या सर्व ज्ञानी संशोधक प्रतिभावान
उत्तर मिळता सुदिन म्हणूया संसाधने असती ही गुणवान
*
जागतिक कविता दिनी प्रसन्नतेने वाहते ओंजळभर कृतज्ञ फुले
आशिर्वाद गुरूंचे घेऊनि विस्तारू विज्ञान कक्षा वेचूनि ज्ञान फुले
☆
© डॉ. मधुवंती कुलकर्णी
जि.सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈