श्री मुबारक उमराणी
कवितेचा उत्सव
☆ कण तेजाचे वेचूया चला… ☆ श्री मुबारक उमराणी ☆
☆
कण तेजाचे वेचूया चला
दीप आनंदी लावू या चला !!धृ !!
*
तेज:कण चमचम
चमकती दानत्वात
लक्ष दीप उजळत
लक्षचांदण होऊ चला! !१!
*
दु:खी जन मन जगी
आसू पुसत पुसत
लाडवाचा घास भरवीत
दु::ख त्यांचे घेऊ चला !!२!!
*
तेलात उकळून कानुले
गोडवा देत म्हणते
संकटातूनच सुखाची
नवी वाट माळू चला!!३!!
*
खुसखुशीत चकली फिरे
मोतीचूर लाडवासंगे
शंकरपाळीसम सारे
गोड गोड बोलू चला!!४!!
*
अनारसे, बालूशाही, पोहे
धरून हात खाजाचा
नाजुक रवा, बेसन लाडू
म्हणे सुखाचे गाणे गाऊ चला! !५!!
☆
© श्री मुबारक उमराणी
राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈