डॉ. शैलजा करोडे
कवितेचा उत्सव
☆ “नेत्रदान…” ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
☆
नेत्र द्वार शरीराचे
दावी निसर्गसौंदर्य
प्रकाशाचे वरदान
असे देवाचे औदार्य
*
कोणी असतो जन्मांध
कोणी अपघातग्रस्त
नेत्रविकारांनी कोणी
असे सातत्याने त्रस्त
*
फक्त काळोख जीवनी
देऊ दिव्य अनुभूती,
नको तयांना मदत
नको ती सहानुभूति
*
करू उजेडाचे द्वार
किलकिले तयांसाठी
करूनिया नेत्रदान
उतराई होण्यासाठी
*
मृत्यूनंतरही रहा
नेत्र रूपात जिवित
शुभ्र प्रकाशाची वाट
तम काळोख चिरित
*
*मरूनीया जगी परी
किर्तीरूपी ते उरावे
करूनीया नेत्रदान
खरे उद्दीष्ट साधावे
☆
© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]