मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पारीजात ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पारीजात… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

आज अचानक, मनात फुलला, वृक्ष पारीजात,

गुपित कानी सांगून जाता, सुगंधित वात ||धृ.||

 

तृषार्त या धरणीवर पडता, पाऊल मेंदीचे,

मनात माझ्या मळे उमलले, ते निशिगंधाचे,

कसा पोहचला? कळले नाही, ताऱ्यांनाही हात ||१||

 

काळे काळे खडक प्रसवले, निर्झर मोत्यांचे,

निनादले कानांशी अवचित, कुजन सरीतेचे,

गंधर्वाचे थवे उतरले, प्रणयगीत गात ||२||

 

आज उराशी घट्ट बिलगले, ते स्वप्नांचे ससे,

माध्यांनीला चंद्र नभीचा, मन पंखावर बसे,

सलज्ज वदना अहा! प्रगटली, संध्या ऋतुस्नात ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 131 – लागलासे ध्यास ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 131 – लागलासे ध्यास ☆

लागलासे ध्यास रे।

नित्य होई भास रे।

 

रोज तुजला शोधतो

व्यर्थ मज का आस रे।

 

त्रासलो या जीवनी

गुंतलेला श्वास रे।

 

भक्त येई दर्शना

भाव माझा खास रे।

 

भेट मजशी पावना

मांडली आरास रे।

 

पाहशी का अंत रे।

कर मनी तू वास रे। 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावली… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ सावली… 🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

जन्मासवे प्रत्येकाच्या

होई बघा जन्म हिचा,

ठेवणी प्रमाणे शरीराच्या

असती खाचा खोचा !

 

पुढे सरकता दिनमान

बदले पहा हिचा ढंग, 

कोणाचीही असली

तरी तिचा एकच रंग !

 

येता सूर्य डोक्यावरी

होई शरीरी एकरूप,

जाता तो मावळतीला

उंची तिची वाढे खूप !

 

पडता पाऊस धरेवरी

गायब झाली वाटे,

येता पुन्हा सूर्य प्रकाश

लगेच बघा प्रकटे !

 

येता अंगावरी संकटे

सगे सोडतील साथ,

पण शब्द देतो तुम्हा

नाही करणार ही अनाथ !

 

सा  व  ली !

 

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #153 ☆ जिंदगी ही… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 153 – विजय साहित्य ?

☆ जिंदगी ही… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शब्दातल्या शरांनी घायाळ जिंदगी ही

लाचार वेदनांची, जपमाळ जिंदगी ही.

 

एकेक यातनांची , जंत्री चितारलेली.

अक्षम्य त्या चुकांची, बेताल जिंदगी ही.

 

आहे अजून ताकद, हरणार ना कदापी

नापास ठरवते का, दरसाल जिंदगी ही.

 

देऊन टाकले मी, पैशातल्या सुखाला

का वेचतो गरीबी , नाठाळ जिंदगी ही.

 

शब्दास मोल नाही, दुनिया जरी म्हणाली

उध्वस्त आज करते , वाचाळ जिंदगी ही .

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #139 ☆ बाळ गीत – झाड़…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 139 ☆  बाळ गीत – झाड़…! ☆ श्री सुजित कदम ☆

परवा मी झाडाला

मारला एक दगड़

बाबा म्हणाले आईला,

“ह्याला खूप बदड.’

 

झाडाला असं कघी

दगड कोणी मारतं का?

झाडाला लागलं, तरी

झा कधी बोलतं का?

 

दगड न मारतासुद्धा

झाड खूप काही देत॑

उन्हामध्ये साबली आणि

फळेसुद्धा देतं !

 

झाडांशिवाय आपल्याला

ऑक्सिजन कोण देणार?

झाडांवरच्या चिमण्या

सांगा कोठे बरं राहणार ?

 

झाडांची काव्ठजी बाव्ठा

आपण सारे घेऊ

रोज सकाळी झाडांना

थोड पाणीसुद्धा देऊ !

 

आता कळल बाव्ठा,

झाड किती शहाणं असतं

आपल्या सर्वाँसाठी ते

दिवस-रात्र उभं असतं….!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खूळ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ खूळ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

नको शोधू माझ्या ,

कवितेचे अर्थ.

अन्वर्थक सारे,

ठरतील व्यर्थ .

नको तोलू माझ्या,

विचारांची गती.

दुर्गतीच सारी,

भ्रमिष्ट हो मती.

नको पाहू माझ्या ,

डोळ्यातली ओल.

आर्द्रताच सारी,

डोहातली खोल.

नको जोखू माझ्या ,

प्रेमाचे तू बळ.

मूलतः सारे,

अंगभूत खूळ.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अनवाणी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? अनवाणी…  ? ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

ती

अजूनही

चालतेय

त्याला

पतिपरमेश्वर मानून

त्याच्या पाठीमागे

अनवाणी पायांनी .

तिचं असं चालणं

अजूनही थांबलं नाहीए.

दगडधोंडे काट्याकुट्यांच्या आणि

फफूट्यांच्या वाटां

आता डांबरी होत चालल्या आहेत .

तिच्या अनवाणी पायांच्या

चिरत गेलेल्या टाचा

आता चकचकीत बनलेल्या डांबरी सडकेच्या

झळा सहन करत चालताहेत.

रस्त्यांनीही आपल्या बदलल्यात

रूढी परंपरा आणि चालीही…

पण ती मात्र

अजूनही परंपरेच्या

बंधनात

चालतच राहतेय

पुरुषप्रधान संस्कृतीमागे

अविरत.

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 160 ☆ एक स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 160 ?

☆ एक स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आज खूप दिवसांनी….

मीरा ठकार आठवल्या …

कुठल्याशा मैत्रिणीच्या संदर्भात—

त्या म्हणाल्या होत्या,

ती म्हणजे फक्त,  “मेरी सुनो” !!!

आणि आजच आठवला ,

आम्हाला वडोदरा नगरीत,

सन्माननीय कवयित्री म्हणून,

दावत देणारा…..

कुणीसा जामदार,

स्वतःबद्दल बरचंसं बोलून झाल्यावर,

म्हणाला होता,

मी जास्त बोलतोय का ?

सहकवयित्री म्हणाली होती,

नो प्रॉब्लेम, “वुई आर  गुड लिसनर्स” !

आणि मग आम्ही ऐकतच राहिलो,

त्याची मातब्बरी !!

 

असेच असतात…

अनेकजण…इथून..तिथून…

इकडे तिकडे…अत्र तत्र….सर्वत्र!!

 

“मेरी सुनो” “मेरी सुनो”म्हणत,

अखंड स्वतःचीच,

टिमकी वाजवणारे!!!

 

माझी श्रवणशक्ती हळूहळू

कमी होत चालली आहे,

हा सततचा अनुभव

येत असतानाच,

उजाडतो , एक नवा ताजा दिवस

या ही वळणावर,

तू भेटतोस…..

‘”सारखी करू नये खंत, वय वाढल्याची”

म्हणतोस!

आणि मी अवाक!

किती वेगळा आहेस,तू सर्वांपेक्षा !

कधीच बोलत नाहीस,

स्वतःविषयी….अहंभावाच्या खूप पल्याड तुझी वस्ती !

 

ब-याचदा विचार येतो मनात,

 

“खुदा भी आसमाँसे जब जमींपर देखता होगा, इस लडकेको किसने

बनाया सोचता होगा।”

 

मी शोधत असलेला,

“बोधिवृक्ष” 

तूच असावास बहुधा….

© प्रभा सोनवणे

५ डिसेंबर २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झेप क्षितीजापलिकडे ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ झेप क्षितीजापलिकडे ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

संसाराच्या खेळामधले

राजा आणिक राणी

निराशेच्या अंधारातील

अशीच एक विराणी

 

घर  ते होते  हसरे सुंदर

स्वप्नांनी सजविलेले

तुटीचे अंदाजपत्रक

सदा भवती वसलेले

 

तरीही होती साथसंगत

अविरत  अशा कष्टांची

भाजी भाकरीस होती

अवीट चव पक्वान्नांची

 

अचानक आक्रीत घडले

दुष्काळाचे संकट आले

शेतातील पीक करपूनी

जगणेची मुश्किल जाहले

 

नव्हती काही जाणीव

चिमण्या त्या चोचींना

राजा राणी उदासले

बिलगूनीया पिल्लांना

 

 कभिन्न अंधाऱ्या रात्री

 दीप आशेचा तेवला

 उर्मीने मनात आता

प्रकाश कवडसा पडला

 

होती जिद्दीची तर राणी

राजाचा आधार झाली

बळ एकवटूनी तीच आता

दुःखावरी सवार झाली

 

झेप क्षितीजा पलिकडे

घेण्या,

बळ हो आत्मविश्वासाचे

राजाराणीच्या संसारी

फुलले झाड सौख्याचे

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देऊन तर बघा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ देऊन तर बघा… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

नकोत आम्हाला

डोळे दिपवून टाकणा-या

झगमगत्या अनिर्बंध जहागि-या.

 

गडद दाटलेल्या मिट्ट काळोखाच्या

अगदी मध्यवर

एक प्रकाश पणती

सतत तेवत ठेवण्यासाठी

लागणारी टिचभराची सुरक्षित

जागा द्या

 

भयाण काळोखाला चिरत

जाणा-या

मंद मिणमिणत्या प्रकाश किरणांचा

मागोवा घेत तिथे जमतील

समविचारी माणसांचे थवे

शोधतील ,खोदतील, बांधतील

प्रगतीचे नवे मार्ग

माणसाला माणुसकी दाखवण्याचे

 

मग धरतीचे

तारांगण व्हायला कितीसा वेळ लागेल?

 

हळू हळू उगवतील

चंद्र सूर्य तारे

चमचमत्या प्रकाशात

 नवग्रह ही येतील

आपले सगेसोयरे सोबत घेऊन

या धरतीचा स्वर्ग बनवायला

 

तेवढीच एक अनियंत्रित टिचभर जागा

देऊन तर बघा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares