सौ. जयश्री पाटील
अल्प परिचय
नाव- सौ.जयश्री अनिल पाटील.
शिक्षण – बी. कॉम.
प्रकाशन – कविता संग्रह व बाल कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.
सन्मान एवं पुरस्कार –
- नवरत्न काव्य पुरस्कार.
- ऑनलाइन व्हाट्सअप च्या माध्यमातून राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभाग व सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय, हृदयस्पर्शी, भावस्पर्शी पुरस्कार.
सम्प्रति – अनेक मासिकं किशोर ,जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, जन स्वास्थ्य, संवेदना इत्यादी मधून कविता व लेख प्रसिद्ध. दिवाळी अंकांतून लेख व कविता प्रकाशित. सकाळ सप्तरंग, पुढारी बहार मधून कविता प्रसिद्ध. आकाशवाणी वरून काव्यवाचन कार्यक्रम.
अनेक ठिकाणी काव्यवाचन तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती .अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग.महिला मंडळ व भजनी मंडळ अध्यक्षा. बॅडमिंटन व रींग टेनिस चॅम्पियन.
कवितेच्या उत्सव
☆ सावळ्या रे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
तुझ्या दर्शनासी देवा
पंढरीच्या रे विठ्ठला
भेटीसाठी सावळ्या रे
जीव माझा आतुरला….१
धाव घेईल मन माझे
जीव होई कासावीस
कृपा करी भगवंता
मना तुझीच रे आस….२
मुखी तुझे नाम गोड
नित्य तुझाच रे ध्यास
दंग तुझ्या कीर्तनात
वाटे रहावे रात्रंदिस….३
तान्हे बाळ आईसाठी
टाहो फोडे वारंवार
तुझ्या कुशीत विसावा
मिळावा रे क्षणभर….४
रूप तुझे पाहूनीया
तृप्त होते माझे मन
तुझ्या भक्तीसाठी देवा
जन्म जावा हा संपून….५
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈