श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ जगद्गुरु तुकोबाराय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील … ☆
देहू गाव माझे संतांचे माहेर
इंद्रायणी काठी तुकोबांचे घर —
नाम संकिर्तन विठ्ठलाचे केले
केला उपदेश लोक उद्धरले
भक्ती मार्गासंगे जोडला संसार —
कैवल्याची खूण चित्ती समाधान
सांगे उकलून वेद, विद्या,ज्ञान
धर्म कर्मठांचे मोडले व्यवहार —
शुद्ध भक्तिमार्गी रचीयला गाथा
विठ्ठल चरणी ठेवुनीया माथा
भेदा भेद भ्रम सारियले दूर —
लोभ मोह माया मानला विटाळ
संत संगतीचा जमवुनी मेळ
टाकले वाटून ज्ञानाचे भांडार —
संत श्रेष्ठ ऐसा जगद्गुरु झाला
रंगुनी कीर्तनी अखंड नाचला
ध्यान समाधीत झाला निर्विकार —
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈