सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 134
☆ गझल… ☆
चांगले आहे कुणाची भिस्त व्हावे
आपल्या मस्तीत जगणे मस्त व्हावे
घातल्या आहेत कोणी या पथारी
मी कशासाठी इथे संन्यस्त व्हावे
मागण्या आहेत ज्या त्या माग राजा
राज्य कोणाचे कसे उद्ध्वस्त व्हावे
पांगले आहेत येथे कळप सारे
विश्व त्यांचे का बरे बंदिस्त व्हावे
शिस्त त्यांनी लावली होती मलाही
का तरी आयुष्य हे बेशिस्त व्हावे
उगवले नाहीच जर जन्मून येथे
का असे वाटे तुला मी अस्त व्हावे
तोच आहे नित्य माझा पाठिराखा
वाटते आता मला आश्वस्त व्हावे
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈