मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोवळे शैशव, पेलीत चाले… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? कोवळे शैशव, पेलीत चाले ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

कोवळे शैशव, पेलीत चाले

डोक्यावर जडभार

पुस्तक खेळण्याच्या जागी

 देई दगडाला आधार

डोळ्यांमधील निरागसता

काळजास जाऊन भिडते

बीनभिंतीची शाळा निष्ठूर

ही कसली परिक्षा  घेते

परिक्षा कसली शैशवसारे

भाराखाली दबुन गेले

 सुखस्वप्नाचे प्रश्न बोलके

ओझ्याखाली थिजून गेले

चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पळसफुल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पळसफुल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पालवीविना फुलतो

कसा पळसफुल

ऋतुतला हा बहर

ऊन्हातली ही भुल.

 

कोकीळ कंठ मधूर

ऊसंती जीवा धीर

स्वरात  प्रेम व्यथा

हृदयी स्मृती संकुल.

 

जरा वार्याचा स्पर्श

डोळे दिपवी नभ

झळा अस्वस्थ देहा

वाटा जुन्या विपुल.

 

लागे डुलकी क्षणा

मनात भेटी गाठी

जीवन सरले जे

जणू पळसफुल.

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य #97 – वीण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 97 – वीण ☆

संसाराची वीण अचानक उसवत गेली।

आयुष्याची घडी अनोखी चकवत गेली।

 

गोड गुलाबी स्वप्न मनोहर तुझेच सखये।

अर्ध्यावरती डाव असा का उधळत गेली।

 

घरट्यामधली पिले गोड ही किलबिलणारी।

पंखामधली ऊब तयांच्या हरवत गेली।

 

काळासंगे झुंझ देत ही घुटमळणारी।

ओढ लावूनी छबी तुझी ग रडवत गेली।

 

देऊ कसा ग निरोप तुजला आज साजणी।

मनी वेदना पुन्हा पुन्हा ती उसळत गेली।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साक्षीस चंद्र… ☆ कै अशोकजी परांजपे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ साक्षीस चंद्र… ☆ कै अशोकजी परांजपे ☆

साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते

त्या भोगल्या क्षणांना नव्हतेच काही नाते

 

डोळ्यात बिंब होते नुसते भिजून गेले

नि:श्वास ते कळ्यांचे कोषांत लाजलेले

होता फुलून आला अंगावरी शहारा

गात्रांत मात्र राजा कसलेच भान नव्हते!

 

प्रतिसाद मूक होता ओठांत थांबलेला

तो शब्द रे सुखाचा ह्रदयात कोंदलेला

गालावरी खुळी रे कळ एक साचलेली

दुःखात की सुखी रे ,काहीच ज्ञात नव्हते !

              

– कै अशोकजी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्रागौरीचे गीत… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ भक्तीगीत. चैत्रा गौरीचे… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

ये गं, ये गं, चैत्रागौरी,

ये, … ये गं,ये गं चैत्रागौरी

 

दारी घालिते चैत्रांगण

स्वागताला कोकिल कुजन

सोनियाचा झुला गं देवघरी

नैवेद्याला ठेवते आंबे,डाळी

ये गं, ये गं चैत्रागौरी

 

भक्तिभावे गं खेळ मांडीला

अत्तराचा सडा शिंपला

चराचरी वसंत सोहळा

प्रेमे वाहते मनमोगरा

ये गं, ये गं चैत्रागौरी

 

तुजसाठी, हळदी कुंकूराशी

ओवाळीते मी पंचप्राणांसी

ओटी भरण तुझ्या रूपांची

घरी-दारी नांदो सुख शांती

ये गं, ये गं चैत्रा गौरी

ये.. ये गं, ये गं चैत्रागौरी

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

४/४/२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #119 – विजय साहित्य – स्री म्हणजे खेळणे नव्हे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 119 – विजय साहित्य ?

☆ स्री म्हणजे खेळणे नव्हे…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कठपुतळीच्या सवे

नाच नाच नाचविले.

रीतीरिवाजाच्या पोटी

नारीलाच नागवले.

 

जन्म द्याया हवी नारी

नारी शय्या सोबतीला .

छळ करण्याचा चळ

आला कधी संगतीला.

 

कारे तुझ्या अर्धांगीला

दिली जागा वहाणेची

जाग आली पुरूषाला

छेड काढता मातेची.

 

देह नारीचा भोगाया

नरा कारे चटावला

बळी बहिणीचा जाता

मग का रे पस्तावला ?

 

छळवाद अमर्याद

किती भोगायचे भोग.

वास्तल्याच्या कातड्याला

वासनेचा महारोग.

 

नारीच्याच वेदनेने

जन्म झाला पुरूषाचा .

किती सोसायचा सांग

माज त्याच्या पौरूषाचा.

 

सळसळे रक्तातून

माय भगीनीचा पान्हा

सांगा कुठे झोपलाय

कुण्या यशोदेचा कान्हा?

 

नको समजू स्त्रियांना

कुण्या हातचे खेळणे.

तिची हारजीत  आहे

तुझ्या अस्तित्वाचे देणे. . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांच्या गावात… ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

? कवितेचा उत्सव  ?

☆ शब्दांच्या गावात… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

कधी वाटे मजला की

आपण शब्द बनावे

 

या ओठातून त्या ओठी

अलगद गिरकत जावे 

 

कधी शिरावे निलआभाळी

पाऊसगाणे छेडित जावे

 

उडूनी जावे विहंगदेशी

कोकिळकंठी मधुर स्वरावे

 

हळूच उतरूनी नदीकिनारी

लाटांवरी झुलताना गावे

 

प्रकाशवाटा जिथ सांजवती

कातरसूर मारवा बनावे

 

अलवार शिरावे कवीच्या चित्ती

कविता होऊन बरसून जावे

 

असे होऊनी शब्दरुपापरी

शब्दांच्या गावात फिरावे

 

अर्थ निराळा शब्द शब्द जरी

गुपित मनीचे कविता व्हावे

 

जात पंथ ना धर्म तरीही

शब्दांचे या गीत बनावे

 

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वासंतिक मास… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वासंतिक मास… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(अष्टाक्षरी)

वासंतिक मास आला

सृष्टी संपन्न जाहली

प्रतिपदा शुभ दिन

गुढ्या तोरणे सजली॥१॥

 

गुढी पाडवा म्हणती

सीता राम आले घरा

अंगणात रंगावली

होतो आनंद साजरा ॥२॥

 

मांगल्याची गुढी उभी

बांधुनिया वस्त्र जरी

साखरेची शोभे माळ

लांब अशा काठीवरी ॥३॥

 

वाद्ये मंगल वाजती

वर्षारंभ मराठ्यांचा

सुमुहूर्त शुभकार्या

घास श्रीखंड पुरीचा ॥४॥

 

नव वर्षाची प्रतिज्ञा

करू आपण सर्वांनी

नको राग नको द्वेष

प्रेमे राहू उल्हासानी ॥५॥

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #107 – पाऊस…!  ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 107 – पाऊस…! 

तुझ्या माझ्यातला पाऊस

आता पहिल्यासारखा

राहिला नाही..

तुझ्या सोबत जसा

पावसात भिजायचो ना

तसं पावसात भिजण होत नाही

आता फक्त मी पाऊस

नजरेत साठवतो…

आणि तो ही

तुझी आठवण आली की

आपसुकच गालावर ओघळतो..

तुझं ही काहीसं

असंच होत असेल

खात्री आहे मला

तुझ्याही गालावर नकळत

का होईना

पाऊस ओघळत असेल…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रेशीम गुंता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ रेशीम गुंता…    सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

माझे अंबर मला मिळाले

आनंदाने पंख पसरले

जोर देऊनी उडू पाहता

आपोआपच पंख मिटले

 

पंखानाही कळून आले

फक्त तुम्हा आभाळ मिळाले

कर्तव्याच्या रेशमी दोरांनी

पाय तुझे गुंतुन बसलेले

 

डोळेभरुनी आभाळ पहा तू

आपुलकीने प्रेमही कर तू

मुक्तपणाने विहरायाचे तव

ह्रदयामाजी स्वप्न दडव तू

 

पायामधला  रेशीम गुंता

नखानखांशी गुंतत जातो

खंत तयाची करता करता

हताशतेला   भक्कम करतो

 

म्हणून आपण आपुलकीने

जे आहे ते मान्य। करावे

नियती निर्मित रेशीम गुंत्याशी

स्नेहभारले  प्रेम करावे

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares