श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ सखा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
(मात्रवृत्त जीवनलहरी)
६+६ (१२) मात्रा
तुझा सखा बनेन मी
तुला मनी स्मरेन मी
जगात या जगायला
कसा तरी शिकेन मी
प्रवास संपतो तिथे
जरा पुढे निघेन मी
म्हणू कसा अधांतरी
तुझ्या मनी नसेन मी
आरसा दुभंगतोय
मला कसा दिसेन मी
प्रतारणा नको करू
किती झुरू मरेन मी
सुखात नांद तू सखे
व्यथांसवे जगेन मी
ख-या रुपास शोधण्या
नभाकडे बघेन मी
कुणास दोष द्यायला
,जगात या नसेन मी
लिहावया सृती तुझ्या
वनात ही बसेन मी
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈