श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
चवचाल शेंग ! ?
श्री प्रमोद वामन वर्तक
चवचाल ‘चवळीची’ शेंग
पडे ‘पडवळाच्या’ प्रेमात
उडवू म्हणे लग्नाचा बार
मंडईच्या हिरव्या मांडवात
ऐकून बोलणे ‘चवळीचे’
लागे ‘पडवळ’ हसायला
लग्न झाले ‘डाळिंबीशी’
तप लोटली संसाराला
हिरमुसली चवळीची शेंग
भिडे लाल भोपळ्याला,
लग्न करशील माझ्याशी
नेईन परदेशी हनिमूनला
छान तुझे प्रोपोजल, पण
उशीर केलास विचारायला
उगा कशा लाऊ गालबोट
गवारी सोबतच्या लग्नाला
बावचळली चवळीची शेंग
काय करावे तिला सुचेना
आता कांद्या बटाट्या विना
आधार तिला कुणाचा ना
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈