मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतर्बोल ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? अंतर्बोल  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

फांदीवरी येऊनी बैसली

यौवना ही अशी एकांती

चलबिचल चाले अंतरात

मनी विचार दाटूनी येती..

वाटे तिजसी कुणीच नसावे

आज माझ्या अवतीभवती

गहिरे अंतर्बोल ह्रदयातले

पुस्तकामधूनही डोकाविती..

धुंदमंद मोकळ्या हवेत

निसर्गाचिया सान्निध्यात

अस्फुटसे बोल अंतरीचे

गूज-गुपीत राखी मनांत..

बंधही होती तरलशिथिल

हरपले जगताचेही भान

स्मरविव्हळ त्या शब्दांनी

झूलती बोल गाती आत्मगान..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळोखाची कूस ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काळोखाची कूस ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

आता अंधार्‍या वाटेवर चालताना

जुन्या आठवणींच्या सुखद स्मृती मागे-पुढे येताहेत

दिवली होऊन….

आईचा पदर धरून घरभर फिरणारी मी

शाळेत  गेल्यावर

घरच विसरणारी मी

गाण्याच्या स्पर्धेत सुवर्ण चषक घेऊन

घरी आलेली मी….

आणि कौतुकाच्या डोळ्यांनी ओवाळणारी आई …..

आणि चषक घेऊन घरभर नाचणारी मी

 

तुझ्या बाहुवर, अवघं विश्व विसरून

नि:शंकतेने झुलणारी मी

आणि आश्वस्त करणारे तुझे बलदंड बाहू …..

नि आश्वस्त होणारे मी ……….

 

बाळाची चाहूल लागल्यावर

विस्मित, आनंदित मी ……

बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजताना

स्वर्गसुख म्हणतात ते हेच, असं म्हणत

प्रत्येक क्षण असासून जगणारी मी ….

 

 बाळाचं तरुण होणं कधी कसं घडलं

 कळलंच नाही……

मग त्याच्यावर भाळून घरी आलेली राजकन्या ,

माझी बाळी कधी झाली, कळलंच नाही…..

 

मग त्यांचा अंकूर, तजेलदार, टवटवीत, गबदूल

गडबड्या, बडबड्या, धडपड्या

मांडीवर लोळत

आजी गोष्ट…  आजी गोष्ट…

चा लकडा लावणारा…..आणि त्यांना  गोष्ट सांगताना 

पन्हा एकदा आईपण अनुभवणारी मी …..

 

सांजवेळी बागेतल्या झोपाळ्यावर बसून

 उतरती ऊन्ह पाहत,

 जुन्या कडू-गोड आठवणींची उजळणी करत,

  तृप्त, कृतार्थ जीवन जगल्याचा

  आनंद जागवते आहे   

  या क्षणी 

समोरून जाणारी ती अंधारी वाट

खुणावते आहे ‘चल लवकर’

म्हणते आहे.

मी त्यावरून चालते आहे.

मी पुढे पुढे जाते आहे…..

माझ्या सुखद स्मृती

मला साथ करताहेत.

कदाचित काळोखाची कूससुद्धा

इतकीच सुंदर, सुरम्य असेल.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 90 – रेशीमगाठी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 90 – रेशीमगाठी ☆

प्रेमाचे सार

जीवनास आधार

रेशीमगाठी

दैवाचे देणे

प्रेम पाशाचे लेणे

रेशीमगाठी

अंतरी गूढ

मना लागते ओढ

रेशीमगाठी

मन मोहिनी

प्रित फुले जीवनी

रेशीमगाठी

लाभो जीवनी

ही प्रेम संजीवनी

रेशीमगाठ

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हुकूमत वेळेची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ हुकुमत वेळेची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जन्म मृत्यूची वेळ

असते विधात्याच्या हाती

प्रत्येक गोष्टीची एक वेळ

ठरवत असते नियती ||

 

काळवेळेचे भान ठेवत

वेळ पाळत जावे

वेळेआधी अन वेळेनंतर

काही मिळत नाही हे उमजावे ||

 

वेळ फार महत्वाची

क्षणक्षण मोलाचा असतो

अचानकपणे एक क्षण

आयुष्याला कलाटणी देतो ||

 

गेलेली वेळ कधीच

परतून पुन्हा येत नाही

आयुष्याचा नियम मोलाचा

वेळे इतके काही मौल्यवान नाही  ||

 

वेळ हसवते वेळ रडवते

वेळेमुळे दु:खाला विसर पडतो

प्रत्येक जण कुणीही असो

वेळेचा मात्र गुलाम असतो ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 114 – धुंद झाले मन माझे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 114 – विजय साहित्य ?

☆ धुंद झाले मन माझे  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

धुंद झाले मन माझे

शब्द रंगी रंगताना

आठवांचा मोतीहार

काळजात गुंफताना…….॥१॥

 

धुंद झाले मन माझे

तुझें मन ‌वाचताना

प्रेमप्रिती राग लोभ

अंतरंगी नाचताना……..॥२॥

 

धुंद झाले मन माझे

हात हातात घेताना

भेट हळव्या क्षणांची

प्रेम पाखरू होताना……..॥३॥

 

धुंद झाले मन माझे

तुझ्या मनी नांदताना

सुख दुःख समाधान

अंतरात रांगताना……….॥४॥

 

धुंद झाले मन माझे

तुला माझी म्हणताना

भावरंग अंगकांती

काव्यरंगी माळताना……॥५॥

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

भेटून आले तुला,

 मनास हर्ष झाला!

जीवनी या जगण्याला

परिसस्पर्श झाला !

 

ओढ तुला भेटण्याची,

 मनी सारखी लागली !

बोलले नाही जरी,

 भाव जाणलास तूही!

 

ओढ तुझी अनामिक,

 असतेच ही मनाला!

फुलवून आनंद देते,

 माझ्या खुळ्या मनाला!

 

आठवण तुझीच मजला ,

 येथेच हर क्षणाला !

समजून तूच घे या,

माझ्या खुळ्या मनाला!

 

नको रागावूस तू,

 चेहरा ठेव हासरा!

तुझ्या आनंदातच,

 आहे मला किनारा!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाव ☆ कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ ☆ नाव ☆ कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे ☆

उलटलेल्या

या दुपारच्या वेळी

ऊन स्वतःला विसरलेलं असतं.

क्वचित कुठे

त्याचे पाण्याने मुडपलेले ढलपे दिसतात

जरि मोकळ्या मोतिया आकाशाला 

त्याचा मागमूसही नसतो

भोवताली पाहताना

पायाखालची वाट हरवलेली असते.

तुला

हे सांगितलं तर खर वाटणार नाही…

त्या उन्हाला मी तुझं नाव दिलेलं असतं.

`

 – कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे  (पु.शि रेगे)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 100 – अष्टविनायक…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य # 100 ?

☆ अष्टविनायक…! 

मोरगावी मोरेश्वर

होई यात्रेस आरंभ

अष्ट विनायक यात्रा

कृपा प्रसाद प्रारंभ….!

 

गजमुख सिद्धटेक

सोंड उजवी शोभते

हिरे जडीत स्वयंभू

मूर्ती अंतरी ठसते….!

 

बल्लाळेश्वराची मूर्ती

पाली गावचे भूषण

हिरे जडीत नेत्रांनी

करी भक्तांचे रक्षण….!

 

महाडचा विनायक

आहे दैवत कडक

सोंड उजवी तयाची

पाहू यात एकटक….!

 

थेऊरचा चिंतामणी

लाभे सौख्य समाधान

जणू चिरेबंदी वाडा

देई आशीर्वादी वाण…!

 

लेण्याद्रीचा गणपती

जणू निसर्ग कोंदण

रुप विलोभनीय ते

भक्ती भावाचे गोंदण….!

 

ओझरचा विघ्नेश्वर

नदिकाठी देवालय

नवसाला पावणारा

देई भक्तांना अभय….!

 

महागणपती ख्याती

त्याचा अपार लौकिक

रांजणगावात वसे

मुर्ती तेज अलौकिक….!

 

अष्टविनायक असे

करी संकटांना दूर

अंतरात निनादतो

मोरयाचा एक सूर….!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फरक… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? कवितेचा उत्सव ?

☆ फरक…. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बोलण्यास्तव गोड त्यांनी तिळगुळ वाटला

सहज जगण्यात अमुच्या गोडवा

नकळत दाटला

 

अपेक्षेने स्वार्थ सिद्धी च्या त्यांनी उपवास  ही धरीयला

उपाशी नको पोरे म्हणुनी माऊलीने तो सहज घडविला

 

दिसण्या सुंदर त्यांनी घाम ही गाळला

तडजोडीत जीवनाच्या आम्ही

नकळत तो ढाळला

 

शेकण्यास्ताव हात त्यांनी  होळ्या भडकविल्या

आम्ही कवडश्याच्या प्रकाशाने

मशाली पेटविल्या

 

मिरविण्या स्व त्यांनी किती भूमिका वठवील्या

जगता जगता सहजतेने आम्ही

माणूसच घडविला

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 120 ☆ वृत्त – मेनका ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 120 ?

☆ वृत्त – मेनका ☆

 मी अशी का गोंधळाया लागले

बोल माझे अडखळाया लागले

 

वाट माझी वेगळी होती तरी

का बरे इकडे वळाया लागले

 

मेनका मोठी अनोखी अप्सरा

कन्यकेला आकळाया लागले

 

तू तिथे आहेस एकाकी जरी

चंद्र तारेही जळाया लागले

 

लावल्या पैजा जरी त्यांनी किती

मोल त्याचेही ढळाया लागले

 

वेगळी आहे कहाणी आपली

शेवटी आता कळाया लागले

 

ठेव तू बांधून पाण्याला तिथे

डोह आता खळखळाया लागले

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares