मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंदन करूया भारत भू ला… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वंदन करूया भारत भू ला… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

वंदन करुया भारतभूला

प्रिय अमुच्या या जन्मभूमीला //धृ//

 

प्रणाम अमुचा भुमातेला

रक्षण कर्त्या क्रांतिविरांना

टिळक, नेहरु, गांधी यांना

वंदन करुया नेताजींना //1//

 

नांदती येथे आनंदाने

हिंदू मुस्लिम बंधुत्वाने

राहती सारे एकोप्याने

लढती पहा ते सामर्थ्याने //2//

 

वारसा आम्हा संस्कृतीचा

इतिहास पहा दिव्यत्वाचा

शौर्य, पराक्रम शूर शिवबाचा

मंत्र मिळाला स्वातंत्र्याचा //3//

 

मान आम्हाला हिमालयाचा

तसा जिव्हाळा जलधारांचा

रक्षक आहे सामर्थ्याचा

सुजलाम सुफलाम भारतभूचा //4//

 

डौलत आहे सदा आमूचा

तिरंगी झेंडा सन्मानाचा

सदैव उन्नत माथा अमूचा

मनी असू द्या भाव क्रांतीचा //5//

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 122 ☆ रानमेवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 122 ?

☆ रानमेवा ☆

पंख मनाला फुटावे मला जाता यावे गावा

माझी प्रार्थना येवढी स्वीकारावी माझ्या देवा

 

माझं माहेर हे खेडं त्याचं मनाला ह्या वेड

माझ्या सोबत वाढलं सोनचाफ्याचं ते झाड

किती दूर गेलं तरी मनी गंध आठवावा

 

काट्यातली पाय वाट होती नागिनी सारखी

काटे टोचती पायाला तरी होते त्यात सुखी

त्याच धुळीच्या वाटेचा मला वाटतोय हेवा

 

थाटमाट शहराचा माया ममतेला तोटा

लेप चेहऱ्यावरती आत मुखवटा खोटा

अशा खोट्या सौंदर्याचा मला मोह कसा व्हावा

 

किती दिसाचे ते अन्न सांगा असेल का ताजे ?

रोज खातात मिठाई शहरातले हे राजे 

रोज दिवाळी साजरी त्यात नाही रानमेवा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह आणि मन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ देह आणि मन…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 मनाचा शिंपला,

    विचारांचा मोती!

  तेजस्वी सुंदर ,

    पहाट समयी !

 

 वाटते ते जग,

  अगाध अतर्क्य!

 तुझेच हे रूप,

    करितसे सार्थ!

 

  आत्मा आणि तूच,

     आवरण देही !

   मनाच्या संपुटी,

     नांदतच राही!

 

© सौ. सुहास उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे#66 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 66 ? 

द्यावा घासातील घास… ☆

द्यावा घासातील घास…

खरी मानवता हीच सांगते

ओळख मनुष्याची अशीच होते.. १

 

द्यावा घासातील घास…

जगी अन्नमय असतो

अन्नदान उपाय, श्रेष्ठ ठरतो… २

 

द्यावा घासातील घास…

आत्मा तृप्त होईल

सत्कार्य सहज साधेल… ३

 

द्यावा घासातील घास…

परंपरा अवलोकन करा

ग्वाही देईल पूर्ण ही धरा… ४

 

द्यावा घासातील घास…

तोष सहज मनास होई

फुलते पानोपानी  जाई-जुई… ५

 

द्यावा घासातील घास…

व्यर्थ द्रव्य, कुणासही न द्यावे

प्रभू चिंतन, सतत निर्भेळ करावे… ६

 

द्यावा घासातील घास…

राज हे उक्त केले

शब्द हे असे अवतरले

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अल्लड प्रेमास – कविवर्य गोविंदाग्रज ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

२६ मे- कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरींचा आज जन्मदिन - MH20 News : Aurangabad Latest News | Live News | Happenings

कविवर्य गोविंदाग्रज

? कवितेचा उत्सव ?

☆ अल्लड प्रेमास – कविवर्य गोविंदाग्रज ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

क्षणभर वेड्या प्रेमा थांब !

अधिर मनासह जासी कोठे ?

चुकशिल-संकटि पडशिल वाटे

जग हे सारे बा रे खोटे !

हृदय सोडुनी;गड्या म्हणोनी,

जाई न कोठे लांब !

 

क्षणी पांढरा,क्षणीच काळा,

रंग आवडे असा जगाला,

ठाव तयाचा कुणा न कळला !

खुळ्या तुलाची,अशा जगाची

कळेल का कृती सांग ?

 

कविवर्य गोविंदाग्रज

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लाल परी….. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? कवितेचा उत्सव ? 

☆ लाल परी…..☆ श्री विजय गावडे ☆  

एसटी कामगार दुखवट्यात!

कम्बारडा मोडला कचाट्यात!!

 

लाल परी लाल परी

कीत्या बसले डायवर घरी?

कंडक्टरांची झोळी कीत्या

बसली कोनात खुंटेवरी?

 

काय सांगा दादा तुका

लाल परी डोळ्यात खुपा

गरीबाची कोणाक चाड

त्येंची आपली धनात वाढ

 

मंत्री आपल्ये गाडयेत फिरती

सामान्यांची चाल धरतीवरती

कोनाक ठाये कित्येक मेले

वि्लिनिकरणात गडप झाले

 

सुने रस्ते, सुने आगार

गाव पडले गपगार

लुटले जाती गरीब धोंडारी

मंत्री संत्री राजकारण करी

 

इले नेते,  गेले नेते

घोळ घालती अ जानते

एसटी कामगार बाबडो बेजार

कोणी तरी करारे विचार!

 

© श्री विजय लक्ष्मण गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द माझे..सोबती होतात ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द माझे सोबती होतात… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

भजनातून भगवंतापर्यंत नेतात

टाळ मृदंगाच्या तालावर डोलतात

गीत सुरेल बनून ओठी येतात

शब्द माझे..सोबती होतात.

 

काळजात रुतलेल्या भावनांना

अबोल झालेल्या त्या हुंदक्यांना

हळुवार बोलते करून जातात

शब्द माझे..सोबती होतात

 

आधाराच्या शब्दांनी हातात हात देतात

आशीर्वादाच्या सुमनांनी ओंजळ भरतात

अडीच अक्षरांनी जगणे गंधित करतात

शब्द माझे..सोबती होतात

 

कधी मान देतात,अपमान ही करतात

जखमेवरचा ढलपा काढून मोकळे होतात

कधी मलम होऊन अलवार फुंकर घालतात

शब्द माझे…सोबती होतात

 

ज्ञानेश्वरीचे ओवी,कबिराचे दोहे

 नाथांचे भारुड..गीतेचा अध्याय होतात

जगण्यास नवीन दिशा देतात

शब्द माझे..सोबती होतात

 

प्रेमात पडायला शिकवतात

जगण्याचा आनंद देतात

शब्दसरीत न्हावूनी मने तृप्त होतात

शब्द माझे..सोबती होतात

   शब्द माझे..सोबती होतात

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ घर कौलारू ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? घर कौलारू ? ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर  

 

सुंदर कौलारू घरकुल

निवांत श्रास निःशब्द शांतता

श्वास निर्मळ अन् खुला निसर्ग फणस,आंबा,नारळ,पोफळीची शांत छाया

नाही कोठे रोगांची छाया

सोबत येथे नेहमीच व्रुक्षवल्लरीची

सुगंध दरवळतो दोन दारीच्या फुलांचा

अन् मोहरलेल्या आंब्याचा

पक्षांचे मंजुळ गुंजन

अन् कोकीळांचे कुजन

सौंदर्य आगळे तेआभाळीचे

बलाकमाळ,पक्षथव्यांचे

अन् चंद्रसुर्याच्या विविध प्रकाशछटांचे

मिळे खाण्यास रुचकर रानीचा मेवा

स्वछंद पर्यटन अन् निवांत सामाधानाचा वाटे हेवा

पोहचल्या येथे नव्या सुविधा जरी

ओढ नित्य त्या बालपणीच्या आठवणींची परी

रंम्य परीसर नित्य वास

परमात्म्याचा येथे वास

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फिदा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ फिदा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

चुकेन मी,चुकशील तू,माहित होते तुला मला जर

तक्रारीची कशास भाषा,चालून येता इतुके अंतर

 

उणे अधिक जे घडून गेले,तुलाही ठावे,मलाही ठावे

नकळत सारे घडून गेले,मनात नव्हते कुठले कावे

 

क्षमायाचना नकोच , नकोच आता व्यक्तही दिलगीर

खेळ कशाला शब्दांचा हा असेच होते घडायचे जर

 

मुले,माणसे,नाती-गोती,मित्रांचा हा परिवार असे

रमून गेलो त्यातच आपण,थांबायाला सवड नसे

 

शंख शिंपले आठवणींचे किना-यावरी झाले गोळा

जपून सारे ठेवायाचे , हीच असे ती आली वेळा

 

लाटेवरती लाटा झेलत तू ही आलीस, मी ही आलो

जरी सरकली वाळू तरीही कधीच नाही वाहत गेलो

 

असेच राहू चालत आणिक अशीच ठेवू साथ सदा

अताजराशी ओळख झाली चल परस्परांवर होऊ फिदा

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवा गणेश  देवा…. ☆ श्री रविंद्र सोनवणे

श्री रविंद्र सोनवणे

अल्प परिचय

नाव :   रवींद्र प. सोनावणी

कार्यक्षेत्र: राष्ट्रीय संगीत, नाट्य केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

ध्वनी मुद्रण +प्रोजेक्शन शाखेत १९७७-२०१३ कार्यरत

छंद  : वाचन- थोरांची आत्मचरित्र – कविता कै. पु. ल. देशपांडे + कै. अशोक रानडे (या दिग्गजांचा सहवास)

१० फेब्रुवारी – २०१३ निवृत्त

को. म. सा. प पाली बल्लाळेश्वर काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक ( २०१२)अनेक कवि संमेलनात सहभाग.

 

? कवितेचा उत्सव ?

☆ देवा गणेश  देवा…. ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆ 

देवा गणेश देवा तू सृष्टीचा नियंता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला  अनंता

 

श्वासात तूच आहे

हृदयी तुझाच वास

चोचीत पाखरांच्या

तू भरवितोस घास

स्वामी चराचराचा आदर्श तू विधाता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

दे शक्ती बुद्धी विद्या

दे ध्यास  सद्गुणांचा

वरदान दे प्रभू रे

व्हावी विनम्र वाचा

देतोस मुक्तहस्ते तू एकमेव दाता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

पुष्पातला सुवास

मकरंद तु पराग

झुळझुळ वाहणारा

तू रंग अन तरंग

देहात जागणारा चैतन्यदायी आत्मा

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

माता पित्यास आम्ही,

तुझिया रूपात पाहू,

श्रम शक्तीच्या पूजेला

सारे आयुष्य वाहू

अस्तित्व जाणवावे तव गीत गात असता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

© श्री रविंद्र सोनवणे

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

भ्रमणध्वनी : ९२२२०५३४३५/८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares