मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 110 – ग्वाही ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 110 – विजय साहित्य ?

☆ ग्वाही  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

माझं आणि कवितेचं

जिव्हाळ्याचं जुनं नातं .

काळजाच्या माजघरी

आठवांचे आहे जातं.

 

जातं आठवांचे दळी

अनुभूती  घेत जाऊ 

साध्या सोप्या शब्दातून

प्रतिभेच्या गावा जाऊ.

 

काळजास टोचलेले

झाले व्यक्त नात्यातून

संवेदना जाणिवांची

डोकावते काव्यातून.

 

कधी मुक्त कधी बद्ध

तिचे वय फुलण्याचे

आहे जनक मी तिचा

कार्य नाते जपण्याचे .

 

असो प्राजक्त बकुळ

कधी रानातला मेवा

कवितेत गवसला

बापलेकी श्वास  ठेवा.

 

बाल तरूण वृद्धांचे

लेक करी संगोपन

नाही ठेवले एकटे

सदा आनंद वर्धन.

 

जीवनाच्या रंगमंची

एक नाते भारवाही

कवितेने मिरवावी

माझ्या असण्याची ग्वाही .

 

असे नाते अशी माया

शब्द सुता करीतसे

नाना रूपे साकारूनी

यशकीर्ती देत  असे.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनामृत ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवनामृत ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

थेंब थेंब हा पाण्याचा

हिऱ्या मोत्याच्या तोलाचा

जपू त्याला जीवापाड

खरा आधार जीवाचा ||

 

पाण्यासाठी डोळा पाणी

पाण्याविना होई ऱ्हास

पाणी रक्षी जीवनास

रक्षू आपण पाण्यास ||

 

पाणी हवे जगण्याला

कोंब उगे जळापोटी

पाणी अडवूनी भरू

माय धरणीची ओटी ||

 

पावसाच्या धारांतुनी

करी जीवन संवाद

चराचरा व्यापितसे

माय धरेचा आनंद ||

 

ध्यानीमनी जपू एक

मंत्र खास प्रगतीचा

पाणी अडवू जिरवू

मार्ग राष्ट्र विकासाचा ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 96 – माझी कविता ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #96  ?

☆ माझी कविता 

मात्राव‌त्त- वनहरीणी (८+८+८+८ =३२)

 

हातामधल्या कलागुणांची सुंदर मुर्ती माझी कविता

कथा  सांगते मने जोडते मला घडविते माझी कविता

व्यासंगाची अजोड माया  आठवणींचा ठेवा जपते

एखादी तर मनात ठसते दैवत माझे माझी कविता

 

कधी वाचते आयुष्याला धडा अनुभवी कधी गिरवते

कविता माझी मी कवितेचा नवी नवी बघ वाट गवसते

नातेबंधन दृढ करीते कविता ठरते जीवन दात्री

लेखणीतुनी येते धावत कविता माझी  मला बिलगते

 

बदलत जाते जीवन माझे   नदीपरी ही येते धावत

संजीवन ती जाते देउन पहा राहते उरी खळाळत

कविता भासे कधी लेक तर कधी भासते आई माझी

जीवन छाया माझी कविता सखी परी त्या येते सोबत  

 

लळा लाविते रसिक जनांना कविता माझी आहे तळमळ

विचार मंची खुलते कविता सरून जाई सारी मरगळ

ओढ लाविते मना मोहवी कविता माझी आहे जीवन

माझी कविता फुले सुगंधी पहा पसरला त्यांचा दरवळ

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक धडा मज …. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ एक धडा मज …. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

क्षणात येते क्षणात जाते लहर सुखाची

कायमची ती असेल जवळी समजत गेले…

 

दु:ख्ख असूनी कायम जवळी पचवत गेले

सहवासाने कायम त्याला जवळी केले ….

 

लळा लागला दु:ख्खाचा त्या कळले नाही

आयुष्याचा भाग तयाला समजत गेले …

 

आता सुखाला उरली नाही जागा जवळी

खेदाने त्या जागा सहजी भरत गेले …

 

कळत नाही फरक आता सुखदु:ख्खातील

अंगावरची लव जणू  कुरवाळीत गेले …

 

सहवासाने सहजी जिरती गोष्टी सगळ्या

एक धडा मज जीवन तेव्हा शिकवून गेले …

 

आताच रुळले सारे संगती कळून आले

“सुखदु:ख्खे समेकृत्वा “जीवन होऊन गेले….

 

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 117 ☆ ग़ज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 117 ?

☆ गज़ल☆

वज्र वा पाषाण आहे तो

अर्जुनाचा बाण आहे तो

 

जाणले होते कधी काळी

झेप वा उड्डाण आहे तो

 

झेलले आरोप मी येथे

का बरे हैराण आहे तो

 

मोह माया लोभ ही नाही

रे गुणाची खाण आहे तो

 

मी कशाला ठेवले हृदयी ?

या कुडीचा प्राण आहे तो

 

हा लढा आहे कशासाठी?

मांडलेले ठाण आहे तो

 

ताटवे फुललेत दाराशी

का असा वैराण आहे तो

 

© प्रभा सोनवणे

(१७  जानेवारी  २०२२)

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रभात फेरी ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रभात फेरी ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

सोनपिवळी पहाट

सौरदिवा तेवतोय

वासुदेव अजूनही

दवबिंदू झेलतोय

 

अजरामर प्राचीन

भारतीय लोकधारा

खेडोपाडी अजूनही

वाहतो मंजुळ वारा

 

विकासाच्या वाटेवर

वासुदेवही धावले

गाणी गात घरोघरी

आकाशवाणीत भेटले

 

गंधाळलेले सुस्वर

रामप्रहरी ऐकता

ईश्वराची भेट घडे

भूतकाळाची सांगता

 

महत्त्व दानधर्माचे

सांगती शुभशकुन

वासुदेव हो निघाले

येता सूर्यनारायण

 

धुके हळूच विरता

नवीन आशा उमंग

मनातल्या गाभाऱ्यात

शितल भावतरंग

 

प्रभात फेरी ही न्यारी

भेट ती जिवाशिवाची

अमर ही परंपरा

स्वाभिमानी भारताची.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 121 ☆ माफ कर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 121 ?

☆ माफ कर ☆

जीवनाच्या गाडीला

रिवर्स गियर असता तर

आलो असतो माघारी

जोडलं असतं पुन्हा घर

गेलोय आता खूप पुढं

म्हणतो तुला माफ कर

 

घड्याळाचा काटा हा

उलटा फिरला असता तर

गाठलं असतं तारुण्य

बोललो असतो प्रेमावर

चूक माझी झाली थोडी

प्रिये मला माफ कर

 

पश्चिम माथ्यावरचा सूर्य

पूर्वेकडे आला तर

पुन्हा दोघे भेटलो असतो

प्रेमात पडली असती भर

सूर्य आहे हट्टी फार

निघून गेलाय दूरवर

 

त्याचीच होईल सात जन्म

मागितला होतास वर

नाही भेटलीस याही जन्मी

मला म्हणालीस माफ कर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फेरे… ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ फेरे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सारे दैवगतीचे फेरे

प्रारब्धाचे जीवन मृत्यू घेरे.

 

मना कधी ना गवसती

हातावरच्या रेषा होती

कुठे विसावे नि निवारे

सारे दैवगतीचे फेरे.

 

कधी कुणा सुख मिळती

कधी कुणा वेळ छळती

भिरभिरे भोगाचे वारे

सारे दैवगतीचे फेरे.

 

किती केलै सोसले दुःख

आनंदाची शमे ना भुख

जीव आत्म्याची वाट दारे

सारे दैवगतीचे फेरे.

 

जपले लाख नाही चुकले

भले भले प्राणाशी झुकले

खोटी आशा संकटा सामोरे

सारे दैवगतीचे फेरे.

 

कुणा मिळते जीवदान

असे बडा तो दैववान

लौकिक आयुष्याचे निखारे

सारे दैवगतीचे फेरे. 

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 65 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 65 ? 

अभंग… ☆

वात कफ पित्त, त्रय दोष युक्त

नच कधी मुक्त, जीव पहा…!!

 

रोगाचे आगार, मानवाचा देह

सुटतो का मोह, कधी याला…!!

 

संपूर्ण आयुष्य, हावरट बुद्धी

नाहीच सुबुद्धी, याच्याकडे…!!

 

शेवट पर्यंत, पाहिजे म्हणतो

स्वतःचे करतो, अहंकारी…!!

 

वाईट आचार, सदैव साधतो

देवास भजतो, स्वार्थ हेतू…!!

 

कवी राज म्हणे, स्वभाव जीवाचा

उपाय कुणाचा, चाले ना हो…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रतिभा आणि प्रतिमा….! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ प्रतिभा आणि प्रतिमा….! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

 

☆ प्र ति भा ! ☆

सारे जगात म्हणती

देवी शारदेच देणं

नसे सर्वांच्या नशिबी

असले सुंदर लेणं

 

तो मातेचा अनुग्रह

मग हृदयी जाणावा

निर्मून छान साहित्य

हात लिहिता ठेवावा

☆ आणि प्र ति मा ! ☆

 

ती जी दिसे आरश्यात

सांगा असते का खरी

का खरी जपून ठेवी

जो तो आपल्याच उरी

 

जी दिसे चार चौघात

खरंच फसवी असे

 प्रत्येकास दुसऱ्याची

 नेहमीच खरी भासे

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares