मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यावेळी श्रावण… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

यावेळी श्रावण  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

खूप वेदनादायी 

मावळलेला हर्ष 

टोचणारी हिरवळ

क्षणात करपवणारे ऊन

वेदनेने चिंब करणारा पाऊस

ऊन सावलीच्या खेळात

होरपळणारा विलाप

हृदय पिळवटणारा होता.

यावेळी श्रावण वेगळाच होता.

*

कळीच्या पाकळ्या विस्कटल्या

फुले चुरगळून

मातीत मिसळली

त्यांचा आक्रोश आसमंताला

अस्वस्थ मेणबत्ती विझून 

न दिसणाऱ्या आसवांचा

 पूर आला होता.

मनामनांतला क्रोध

असहाय्य होऊन

रस्त्यावर सांडत होता.

यावेळी श्रावण वेगळाच होता.

*

श्रावणी सुंदर हिरवळीवर

फुलराणी खेळत होत्या,

कुणी शाळकरी, तर कुणी डॉक्टर मुली,

मनमुराद बागडत…

आपल्याच कामात रममाण होत्या..

कुणी क्रूर अमानवी विकृतीने 

घात केला.

 कळ्यांच्या मनातला

स्वप्तरंगी इंद्रधनु तोडला होता

यावेळी श्रावण वेगळाच होता.

यावेळी श्रावण…

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्य … ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  स्वातंत्र्य… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

रंग वेगळे ढंग वेगळे

स्वातंत्र्याचे वारे वेगळे ।। धृ ।।

*

सत्तेसाठी होती गोळा

जातीसाठी हात चोळा

आरक्षणाचे वारे आगळे

स्वातंत्र्याचे वारे वेगळे

*

सबका साथ सबका विकास 

झुंडशाहीचा मतलब खास

 सरकारी खुर्चीचा अभ्यास

 लोकशाहीचे मंत्र आगळे

स्वातंत्र्याचे वारे वेगळे 

*

 भ्रष्ट सत्ता भ्रष्टाचारी नेते 

 नवगणिताचे वारे वाहते

 कुठले मंत्री कुठले खाते

 बरबटलेले हातच सगळे

स्वातंत्र्याचे वारे वेगळे

*

गोरगरीब अपंग जनता 

कुठे आहे राजा जाणता

इतिहास सगळा बदलून टाकता 

आहे इथे सगळेच काळे

स्वातंत्र्याचे वारे वेगळे 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #256 ☆ अधर्म… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 256 ?

☆ अधर्म ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दुष्काळाच्या झळा पाहुनी पाझर होऊ

हसवायाचे व्रत घेऊनी जोकर होऊ

*

धर्म आपला माणुसकीचा एकच आहे

सांग कशाला हवी दुष्मनी मैतर होऊ

*

कसा पहावा अधर्म येथे या डोळ्यांनी

तिसरा डोळा उघडू आणिक शेखर होऊ

*

पिझ्झा बर्गर नको व्हायला आता आपण

गरिबाघरची कायम आता भाकर होऊ

*

रस्त्यावरती पोर कुणाचे उघड्यावरती

थंडी आहे त्याच्यासाठी लोकर होऊ

*

माझ्यासाठी कायम झाला बाप फाटका

त्याच्यासाठी आता कोरे धोतर होऊ

*

पोट मारुनी पैसा पैसा जोडत गेला

त्याच्यासाठी भक्कम आपण लॉकर होऊ

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऑर्डर, ऑर्डर… ऑर्डर…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ ऑर्डर, ऑर्डर… ऑर्डर…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

अनेक ऑर्डर ऐकतच 

आपण होतो मोठे,

होती ज्याचे जन्मभर 

फायदे आणि तोटे ! 

*

खडी ऑर्डर बाबांची

ऐकू येता आपल्याला,

मूड नसतांना देखील 

बसतो मग अभ्यासाला ! 

*

“आऊट” ऑर्डर कॉलेजला

आपण घेत नाही मनावर,

फायनलला करून अभ्यास 

पास जेमतेम काठावर ! 

*

“अहो ~~” ची गोड ऑर्डर 

मिळे लग्नानंतर ऐकायला,

होता लग्नाला दहा वर्ष 

माधुर्य तिचे जाई लयाला ! 

*

चांगल्या वाईट ऑर्डरींना 

जातो नोकरीत सामोरे,

रीटायरमेंट पर्यंत मग 

विसरून जातो ते सारे ! 

*

आणि….

*

वरची शेवटची ऑर्डर,

येत नाही कधी सांगून,

मनी “त्याच्या” आले की 

तोच जातो वर घेऊन !

तोच जातो वर घेऊन !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदकंद… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदकंद… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गालात हासते अन स्वप्नात रंगते मी

डोळ्यात पाहतांना नात्यात गुंतते मी

*

तो मंद गार वारा स्पर्शून खास गेला

कुठल्यातरी स्मृतींना जागून लाजते मी

*

घाटात वाट जाते ही दूर दूर कोठे

माझ्याच आठवांशी बंदिस्त राहते मी 

*

त्या धुंद सागराच्या भेटीत खूष धरणी

लाटेत चिंब ओली बेधुंद नाचते मी

*

या भूतलावरी हा आनंदकंद माझा

येथेच स्वर्ग आहे आनंद शोधते मी

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पितृपक्ष…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पितृपक्ष…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार ! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध ! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान !

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुन्हा-पुन्हा स्वप्न.. ! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पुन्हा-पुन्हा स्वप्न.. ! ☆ श्रीशैल चौगुले ☆

हिरव्या तलवारीवर

 सोनेरी रुदनाचे ज्योती

वार किरणांचा भारी

धारदार डोलती पाती

*

सप्तरंगी नभात युध्द

क्षितीजा हरवणे जिद्द

उन पावसाचा हा खेळ

झर्या-नाल्यांची पार हद्द

*

खळखळ मंजुळ साद

प्रेमगप्पा पाखर पंखा

फडफड भिजरे अंग

टपटप धारांचा डंका

*

श्रावण चाहुल काळजा

चोहिकडेही गजबजा

सारे रान, माळ हसरे

दुर डोंगरी ऋतू साजा.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 190 ☆ प्रेम… प्रेमकाव्य… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 190 ? 

☆ प्रेम… प्रेमकाव्य… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अष्टाक्षरी…)

प्रेम… प्रेमकाव्य…

प्रेम काय असतं…

 

प्रेम एक, अडीच अक्षराचं पत्र

प्रेम एक, मंत्रमुग्ध करणार स्तोत्र

प्रेम म्हणजे, आकर्षण

प्रेम म्हणजे, समर्पण.!!

 *

प्रेम एक, निर्मळ सरिता

प्रेम एक,  मुक्त कविता.!!

 *

नकोत प्रेमात वासना

असाव्या फक्त संवेदना.!!

 *

नुसते शरीराचे, आकर्षण नसावे

प्रेमाने प्रेमाला, हस्तगत करावे.!!

 *

विचार करावा, कोमल मनाचा

प्रेमात राहून, मन जिंकण्याचा.!!

 *

नकोत नुसते, गलिच्छ इशारे

प्रेमासाठी मन, शुद्ध ठेवा रे.!!

 *

गंध असल्यावर

फुले हातात असतात

गंध संपल्यावर

फुले कचऱ्यात सापडतात.!!

 *

प्रेमाचे सूत्र

मुळीच असे नसते

असे असेल तर

प्रेम लगेच संपते.!!

 *

वासनांध प्रेमाला

हवस म्हणतात

त्यात मग कुठे

बलात्कार होतात.!!

 *

म्हणून सांगतो

प्रेम अपराध नसतो

निर्मळ प्रेम

मनाचे मन जोपासतो.!!

मात्र प्रेमात पडून, वेळ निभावणे

गरज संपली की, साथ सोडणे.!!

 *

हा मात्र अक्षम्य, गुन्हा ठरतो

एखाद्याचा मृत्यू, हकनाक होतो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कोण मी ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कोण मी ? ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

कोण मी काय आहे

माझे मलाच कळू दे

प्रत्येक नावाआधी

जाणून स्वतः ला थोडे घे…

*

जग हे सुंदर, जीवन सुंदर

नात्यांमुळेच अर्थ जगण्याला

प्रत्येक नात्यात सिद्ध करताना

का होई जीव मग अर्धा अर्धा…..

*

लेक, पत्नी, सून, आई

बहिण, भावजय, मैत्रीण

कोणासाठी कोणीतरी तू झाली

स्वतः ला मात्र विसरून गेली….

*

सगळ्यांची आवडती होता होता

सतत बदलत तू गेली

खरी तुझी तुला सांगा आता

ओळख काय मागे उरली…. ?

*

सतत होताना परफेक्ट

झाला तुझ्यावरच इफेक्ट

करता करता सारं एक्सेप्ट

स्वतःला मात्र करत गेलीस रिजेक्ट…

*

नातं स्वतः शी असतं पहीलं

त्याला तोडून चालत नसतं

रोजच्या घाई गडबडीतही

स्वतः साठी काही क्षण जगायचं असतं…

*

रहा नक्कीच जगासोबत

जगून घे प्रत्येक नात्यासोबत

पण साथ स्वतःची सोडू नको

हरवून स्वतःलाच जगू तू नको…

*

जगात कुठेच मिळणार नाही

सुख समाधान शांती

तुझ्यातच आहे दडलेलं सारंकाही

त्यासाठीच बघ जोडून नातं स्वतःशी…

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता !. श्री प्रमोद वामन वर्तक ☆

साम्य वाटले मजला 

PC आणि गणेशात,

सांगतो समजावून कसे 

धरा तुम्ही ते ध्यानात !

 साऱ्या विश्वाची खबर

 लंबकर्ण कानी आकळे,

 साठवी माहिती जगातून

 PCचे इंटरनेट जाळे !

सोंड मोठी वक्रतुंडाची

करी दुष्टांचे निर्दालन,

अँटीव्हायरस करतो 

स्व जंतूचे स्वतः हनन !

 ठेवी लंबोदर उदरात

 भक्तांच्या पाप पुण्याला,

 PCची हार्डडिस्क पण 

 येते ना त्याच कामाला ?

येई स्वारी गजाननाची

मूषक वाहना वरुनी,

PCचा माऊस पण चाले

एका चौकोनी पॅडवरुनी !

.

पण

.

भले भले भरकटती

PCच्या मोह जालात,

एकच गणेश बुद्धिदाता

ठेवा कोरून हृदयात !

ठेवा कोरून हृदयात !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print