मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळाचा हा प्रवाह… ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काळाचा हा प्रवाह… ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर ☆ 

काळाचा हा प्रवाह वाहे

     दिवस-रात्र ही नांवे लेऊन

सुपिकतेचा-नापिकतेचा

     गाळ आपुल्या संगे घेऊन

 

काळाचा हा प्रवाह वाहे

     कधी संथ.. कुठे ओढ भयंकर

कधी कोरडा; निळ्या तळ्यासम

     तलम धुक्याची ओढुन चादर

 

प्रवाहातले…तीरावर चे

     क्षुद्र जीव हे आपण सारे

फक्त सोसणे अपुल्या हाती

     कधी ग्रीष्म..कधी वसंत-वारे

 

झाले गेले विसरुन सारे

     पुन्हा एकदा रंगू खेळी

दुःखाला ही हसण्या देऊ

     हासून आनंदाची टाळी

 

नवीन स्वप्ने, नवीन आशा

     नवी पालवी पुन्हा मनाला

विसरून चिंता..भिती उद्याची

     जगून  घेऊ अता ‘आज’ला

 

काळाचा हा प्रवाह वाहे

     वहात जाणे त्याच्या संगे

भान ठेवूनी पैलतीराचे

     पहायचे ना वळून मागे

 

काळाचा हा प्रवाह वाहे

     दिवस-रात्र ही नावे लेऊन

जे वाट्याला, भोगू…चाखू

     तळहातीचा प्रसाद समजून…..

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शक्तीपीठ ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ शक्तीपीठ ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

स्वयंभू ही सृष्टी रत्ने

किती पारखावी कशी?

सौंदर्याची खाण असे

दृष्टीत मावेल कशी?

 

निळ्याशार नदीकाठी

कातळी गं हिरवाई

जणू पाचू अंगठीत

कोंदण्याची झाली घाई

 

सिंहासन शोभे पाहा

विराजे,”जय भवानी”

बेटावरी अधिष्ठित

हो, आईगिरी नंदिनी

 

निरव शांततेत मोद

स्निग्ध श्वास परिमळे

पावन या भूमीवरी

फुलती भक्तीचे मळे

 

शक्तीपीठ रमणीय

भक्त भेटीत तुष्टते

विश्रांती घेत इथेच

स्पंदनी मंद हासते

 

गाऱ्याणी गाती सगळी

कुणी ना बोले, मी सुखी

परी ऐकून घेते, ती

कृपा करीते सुमुखी.

 

आनंदले त्रिभुवन

दिव्यस्थळी निर्मळता

देवभूमीस भेटण्या

नशीबी यावी योग्यता.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

६/१०/२०२१.

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 75 –  हा मार्ग संकटांचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 75 –  हा मार्ग संकटांचा 

हा मार्ग संकटांचा, अंधार दाटलेला।

शोधू कसा निवारा, जगी दंभ दाटलेला।धृ।।

 

हे मोहपाश सारे, अन् बंध भावानांचे।

मी दाखवू कुणाला, आभास वेदनांचे।

प्रेमात ही आताशा , हा स्वार्थ  साठलेला।।१।।

 

लाखोत लागे बोली,व्यापार दो जिवांचा।

हुंड्या पुढे अडावा, घोडा तो भावनांचा ।

आवाज प्रेमिकांचा, नात्यात गोठलेला।।२।।

 

ही लागता चाहूल , अंकूर बालिकेचा।

सासूच भासते का , अवतार कालिकेचा।

खुडण्यास कळीला , हा बाप पेटलेला।।३।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जाणा-या पावसाकडे पाहून ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ जाणा-या पावसाकडे पाहून ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

 

खुळ्यासारखा ,जाता जाता,कोसळला आज पुन्हा

जाता जाता सोडून गेला ,पाऊस हिरव्या गर्द खुणा //

 

येताना हा असाच आला,सारे काही धुऊन गेला

येणे जाणे विसरू नका हो,किती सांगतो कुणा कुणा

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा /1/

 

ओली चिंब झाडे झुडपे,अंगावरती थेंब टपोरे

तनासंगती मनास अपुल्या भिजवून गेला पुन्हा

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

गाशील तू जर विरह तराणे,तरीच होईल माझे येणे

पाठ वळविता, आठवणीचा धरतीला निरोप देई जुना

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

पुन्हा एकदा येई दुरावा,तरीच मिळतो शालू हिरवा

सृजनशक्तिचा घेऊन येईल तिजसाठी नजराणा

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

खुळ्यासारखा,जाता जाता, कोसळला आज पुन्हा 

जाता जाता सोडून गेला, पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ब्रह्मचारिणी ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ ब्रह्मचारिणी…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

तपाचरणी ब्रह्मचारिणी

तुझी पूजा द्वितीय दिनी

तपमाला तव उजवे हाती

कमंडलू शोभतो वाम हाती!

पत्रीसेविता तूच हिमपुत्री

कठोर तप तव आचरणी

अपर्णानामे प्रसिद्ध होसी

भोळा शंकहरही वरसी !

वैराग्य सदाचार संयमाची

ज्योतीर्मय प्रेरक तू होसी!

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोरीवरचे पातळ ☆ वि. म. कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ दोरीवरचे पातळ ☆ वि. म. कुलकर्णी ☆

लटकते दोरीवरी

आज हिरवे पातळ

घडी मोडुनिया ज्याची—

झाला नाही फार  वेळ

 

आज इथे आणि तिथे

येई कंकण – झंकार

उष्ण तरूण रक्ताचा

उच्चारीत अनुस्वार

 

काळी पोत गो-या कंठी

दावी लाडिक लगट

तास बिल्वरांवरचे

नव्हाळीने मिरवत

 

उभी बुजून दाराशी

कोरी मख्मली चप्पल

कोरी ट्रंक सामानात

करी उगाच धांदल

 

आज फिरती घरात

दोन अचपळ डोळे

दोरीवरचे पातळ

मंद झुळुकीने हले !

 

वि. म. कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शैलपुत्री ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ शैलपुत्री…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

त्रिशूल धारिणी नंदी वाहनी

 प्रकट झाली प्रथम दिनी

शोभे ललाटी अर्धचंद्र

साजे वसन मंगल शुभ्र !

 हिमालय कन्या देवी सती

कमळपुष्प शोभते हाती

निश्चलता वसे स्थिर मनी

शैलपुत्री प्रथम पूजनी !

प्रेरणादायक ठाम वृत्ती

अशी नवदुर्गा शैलपुत्री !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 81 – पाऊस ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #81 ☆ 

☆ पाऊस ☆ 

 

तुझ्या माझ्यातला पाऊस

आता पहिल्यासारखा

राहिला नाही..

तुझ्या सोबत जसा

पावसात भिजायचो ना

तसं पावसात भिजण होत नाही

आता फक्त मी पाऊस

नजरेत साठवतो…

आणि तो ही

तुझी आठवण आली की

आपसुकच गालावर ओघळतो..

तुझं ही काहीसं

असंच होत असेल

खात्री आहे मला

तुझ्याही गालावर नकळत

का होईना

पाऊस ओघळत असेल…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाते कोण मनात ☆ स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत)

स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत) 

Va Ra Kant Kavya Vishwa - Posts | Facebook

(जन्म – 6 ऑक्टोबर 1913 – मृत्यु – 8 सप्टेंबर 1991)

? कवितेचा उत्सव ?

☆ गाते कोण मनात ☆ स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत)

गाते कोण मनात ,

कळेना,गाते कोण मनात ?

 

जरी शतावधी कविता लिहील्या

शंभरदा वाचिल्या,गायिल्या

शब्द कुणाचा,सूर कुणाचा ?अजुनि मला अज्ञात.            1

 

पुशिले त्याचे नाव फुलाला

गाव तयाचे उषे-निशेला

मिचकावुनि कुणी डोळा जातो,

काळ्याभोर जळात               2

 

अभिमानाने कधी दाटतां

‘रचिले मी हे गाणे ‘ म्हणता

‘गीतच रचिते नित्य तुला रे,’ फुटे शब्द ह्रदयात                        3

 

कळेना,गाते,कोण मनात ?

 

स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत) 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊसातील भेट…. ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊसातील भेट…. ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

       माळरानी त्या भेटीत

       दाटे पाऊस मनात

       वारा सुटता सोसाट

       आला पाऊस रानात

 

       हात हातात गुंतता

       स्पर्श झाले रे बोलके

       गवतात चालताना

       मन झाले रे हलके

 

       पावसाची सर प्याले

       मीच पाऊस रे झाले

       रंग न कळे ऋतूचे

       मीच बावरी रे झाले

 

       गीत तुझे येता ओठी

       आठवण ती छळते

       गार वारा मारी मिठी

       भेट तुझी ती स्मरते

 

       भेटणार आता कधी

       किती ऋतू आले गेले

       नयनात दाटे पाणी

       काळीज झाले रे मुके

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

सांगली 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares