मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बैलपोळा ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ बैलपोळा ☆ श्रीशैल चौगुले ☆

राजा मातीतला

पूजा बैलपोळा

 

कष्ट  जुंपणीत

थोर साधाभोळा.

 

ओझे नांगराचे

वा ‘जु’ गाडीगोळा

 

नसे  जन्मशीण

सेवा  रानमाळा.

 

काय आठवणी

सांगू  देवशाळा.

 

नाही बैलावीन

मृत्यू  जन्मकळा.

 

नत्  चरणांशी

माया कुरवाळा.

 

नाते सोबतीचे

संसारा  ऊबाळा.

 

डोले पिकपाणी

श्रेय   बैलदळा

 

सण  आनंदाचा

धन्य बैलपोळा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 77 – कोरा कागद…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #77 ☆ 

☆ कोरा कागद…! ☆ 

मी को-या कागदावर

नुसता शुन्य जरी काढला ना

तरी..,

बापाला त्यात विहरीच चित्र दिसत…

 

चार ओळींचा जन्म माझा

चार ओळींत जगतो

चार ओळींची ओळख माझी

चार ओळींत मांडतो…

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रात्रीच्या चांदण्यात..☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

 

 

? कवितेचा उत्सव ?

☆ रात्रीच्या चांदण्यात.. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

रात्रीच्या चांदण्यात प्रीत रंग रंगू दे

धुंद या वेळी हात हाती असू दे !

 

सडा प्राजक्ताचा पडेल सभोवताली

चांदण्याचे आभाळ झुकेल खाली

चार चांदण्या तुझ्यासवे वेचू दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

धुंद धुंद  ही हवा

सुगंध वाहतो  मरवा

सुगंध तुझ्या मरव्याचा आज

श्वासात जरा दरवळू दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

नको ना  दूर जाऊ असा

थाम्ब, ये जवळी राजसा

प्रीतीत चिंब होऊ दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

नकोच सजना आता दुरावा

तुझ्यासवे तो चांदवा भेटावा

मंद मंद चांदण्यात या

श्वास धुंद होऊ दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 101 ☆ गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 101 ?

☆ गझल ☆

 

मिळती मला तुझीही ती पोफळी कदाचित

बसती घडी इथेही मग वेगळी कदाचित

 

काजू रसाळ असती, बागा फळाफुलाच्या

माझ्याच मालकीच्या त्या नारळी कदाचित

 

गोव्यात राहते तर होती धमाल मोठी

दिसली मलाच असती ती मासळी कदाचित

 

जन्मास घातले तू त्या कोकणात देवा

आजोळच्या घराची सय कोवळी कदाचित

 

घाटावरीच होते प्रारब्ध नांदण्याचे

बोरी ब-याच होत्या सल बाभळी कदाचित

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरता श्रावण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरता श्रावण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

आला सरता श्रावण ,

   मन माझे हुरहुरे !

वर्षेची ती रिमझिम,

   अंगणात झुर झुरे !

 

 जाई पावसाची सर ,

   भिजवी सृष्टीचा शेला!

दिसे  नभी अंगावर ,

   इंद्रधनुष्याची  माला !

 

हिरवीगार ही सृष्टी ,

   लोभवते क्षणोक्षणी!

किमया ही निसर्गाची,

    भूल घाली मनोमनी !

 

अरे, श्रावणा,श्रावणा,

  तुझे अप्रूपच मोठे !

कृष्णजन्माची ती वेळा,

   नेते आनंदाच्या वाटे!

 

सृष्टी गीत गाता गाता,

   जाई श्रावण पाऊल !

स्वागताला आतुरलो ,

   लागता गणेश चाहूल !

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरती मंगळागौरीची ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

अल्प परीचय

आयुष्याच्या मध्य वळणावर विसाव्याच्या क्षणी माझी कविता फुलली. १५० कविता केल्या आहेत. पुस्तक अजून काढले नाही. काव्यसंमेलनात वाचन केले आहे. सांगली आकाशवाणी साठी सुध्दा वाचन केले आहे…???

? कवितेचा उत्सव ?

☆ आरती मंगळागौरीची ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆ 

जय देवी जय देवी

जय मंगळागौरी

श्रावण मासी तुझे

व्रत धरीते मनी…||धृ||

 

भक्तिभावे ओवाळीन

तुज सोनिया ताटी

पूजनासी आणिली

सोळा परींची पत्री

नाना अलंकारे

शोभते शिवरमणी ||१||

 

अभ्यंग स्नानादिक

सुमनांचा भार

धूप, दीप, नैवेद्य

 

रांधीती नार

हर्षे अर्पण करिते

तू सौभाग्यदायनी ||२||

 

अर्पिते सप्रेमे

तन मन धनासी

शरणागत मी,

सेवा मानून घे माझी

कृपाळू शिवकांते

मज रक्षावे संकटी.||३||

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

१/९/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 101 ☆ उदासवाणे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 101 ☆

☆ उदासवाणे ☆

मुठीत होते उदासवाणे जीवन धरले

मूठ उघडता पक्षी सारे हवेत उडले

 

नाचावेसे मला वाटले आनंदाने

आनंदाश्रू फक्त नाचले मला न जमले

 

रावण होता पराक्रमी तरि तुटून पडलो

अन् सीतेला वाचवताना पंखच तुटले

 

फिनिक्स पक्षी होणे नाही नशिबी माझ्या

राखेमधुनी उठणे होते त्याला जमले

 

सुख दुःखाच्या झाडावरती घरटे होते

फांदी हलता मनात माझ्या वादळ उठले

 

म्हणून घेतो मीच स्वतःला इथे कविश्वर

कबीर लिहितो तसे कुठे मज दोहे सुचले 

 

मला स्वतःचा निषेध करता आला नाही

कुठे बरोबर कोठे चुकलो नाही कळले

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगात रंगला श्रावण… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगात रंगला श्रावण… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

नभी दाटून आले मेघ

बरसल्या श्रावण धारा..

मनही झाले चिंब चिंब

बेधुंद करी हा वारा..

 

थेंब थेंब पिऊन ही धरती

तृप्त होतसे क्षणोक्षणी..

मृदगंध दरवळे चहूकडे

इंद्रधनू उमटे मनोमनी..

 

रंगात रंगला श्रावण

किती हे आनंदाचे सण..

मोहरून जातसे माहेरी

त्या माहेरवाशिणीचे मन..

 

ऊन पावसाचा हा खेळ

निसर्गाचा अनुपम मेळ..

झाडे,वेली, प्राणी, पक्षी

सारेच आनंदी असा हा परिमळ..

 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 46 ☆ आयुष्याची संध्याकाळ… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 46 ? 

☆ आयुष्याची संध्याकाळ… ☆

आयुष्याची संध्याकाळ

खूप भयाण ठरते

आपले असून सर्व काही

मिळत काहीच नसते…!!

 

आयुष्याची संध्याकाळ

विचार करायला लावते

तुरुंगवास की, अज्ञातवास

कोडे कधीच नं सुटते…!!

 

आयुष्याची संध्याकाळ

सर्व पर-स्वाधीन सर्व होते

राहून सामोर पाणी तरी

घशाला नित, कोरड येते…!!

 

आयुष्याची संध्याकाळ

एकटे आपण सदैव असतो

चौघांच्या खांद्यावर जातांना

घरात गरम गरम भात शिजतो…!!

 

आयुष्याची संध्याकाळ

प्रत्येकाला भोगावी लागते

कितीही कमवा धन परंतू

शेवटी आमंत्रण “निधन” असते

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिक्षक दिन विशेष – गुरूदक्षिणा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ शिक्षक दिन विशेष – गुरूदक्षिणा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मातीच्या या गोळ्याला तुम्ही दिला आकार

आज असे सत्कार ,गुरूजी,आज असे सत्कार .

 

ज्ञानाची तुम्ही दिलीत दीक्षा

वेळप्रसंगी करूनी शिक्षा

क्षणोक्षणी घेऊन परीक्षा

त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने दिला आम्हा आधार

आज असे सत्कार,आपला,आज असे सत्कार.

 

मन-भूमीतील काढूनिया तण

संस्कारांचे करून शिंपण

गुणवत्तेचे शोधुनिया धन

त्या कष्टाचे फलित,अमुचे विवेक आणि विचार

आज असे सत्कार ,आपला,आज असे सत्कार,

 

दिवस आजचा गुरुपूजनाचा

तव स्मरणाचा, कृतज्ञतेचा

ज्ञानमंदिरा आठवण्याचा

गुरूदक्षिणा एकच, तुमचे स्वप्न करू साकार

आज असे सत्कार,आपला,आज असे सत्कार

गुरूजी,आज असे सत्कार

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares