मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

उमलावया कळ्यांची असतेच आस बाकी

मौनात आज त्यांच्या लपलाय ध्यास बाकी

 

योजून ठेवलेले घडले जरूर नाही

करण्यास साध्य सारे फुलतोय श्वास बाकी

 

खपलो जरी तरीही शेती दगाच देते

कर्जात अडकल्याचा बसतोय फास बाकी

 

संमृद्ध ज्ञानसाठा सरला कधीच नाही

उधळा कुणी कितीही दिसतेच रास बाकी

 

प्रेमात प्रेमिकांचा असतो रुबाब मोठा

संसार मांडताना होतोच दास बाकी

 

दडवून ठेवलेला गंधाळतोच चाफा

हळव्या मनास त्याचा कळतोच वास बाकी

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकांती ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ कवितेचा उत्सव ☆ एकांती ☆ श्री मुबारक उमराणी ☆

एकांती ठसते

वेदना कुणाला

काहूर सलतो

निशब्द मनाला

 

अंतरी जळतो

विचार जळण

धुरांचे वेटुळे

श्वासांचे दळण

 

थरथरे ओठ

अश्रुंचा तो पूर

स्मित हास्यरेषा

लोपतो तो नूर

 

अंकुश वेदना

सहन होईना

प्रयत्न करुनी

रडता येईना

 

रस्त्याची वर्दळ

मारीते रेघोट्या

दिवे लाल, रक्त

भरती रे पेट्या

 

धुराने माखती

फुलझाडे येथे

छळती अंतरी

वेदनेचे जथ्थे

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – वाटे तुलाच स्मरावे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ वाटे तुलाच स्मरावे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

वाटे तुलाच स्मरावे

विरहाची ज्वाला व्हावे.

स्मृती यज्ञी पूर्णाहुती

सुमनांची माला व्हावे .

 

प्रेम, प्रीती अन प्रिया

जगण्याची भाषा झाली.

बकुळीच्या झाडाखाली

जीवनाची वाचा न्हाली.

 

नवथर तारूण्याची

आस मला जगवीते.

हरण्याची नाही चिंता

भास जीवा फसवीते.

 

अनुभूती अन भाषा

रस्ते बदलत आहे .

हळवेल्या भेटी सा-या

शल्य  विचारत आहे.

 

भेटी गाठी श्वास तुझा

पदोपदी जाणवतो.

आठवांचा ऋतू  असा

आठवात घालवतो.

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ख्रिसमस ट्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ कवितेचा उत्सव ☆ ख्रिसमस ट्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

निळ्याशार त्या सागराच्या

भव्य त्या किनारी

 

गर्द त्या माडबनी

अवखळ  पक्षांपरी

वाऱ्यासंगे मारू भरारी

 

पिऊनी मग नारळपाणी

मनी भरू तरारी

दुरुनी माड पाहता  परी

जणू वाटे ख्रिसमस ट्री

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेमरंग…. ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  कवितेचा उत्सव ☆ प्रेमरंग… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

प्रेम प्रेमच असते

त्याला लांबी रुंदी नसते

ऊंची जाडीही नसते

नव्हे कसलीच भूमिती नसते…

 

प्रेम प्रेमच असते

त्याला  वय नसते

वेळही नसते

कसली चौकटही नसते……

 

प्रेम प्रेमच असते

काय पाहिलंस तिच्यात

ना रंग ना  रुप ना आकार

प्रेमात या प्नश्नाला ऊत्तर नसते…

 

प्रेम प्रेमच असते

कधी मृदु कधी कठोर

कधी अबोल कधी शब्दात असते

सदैव दवबिंदुत भिजलेले असते

 

प्रेम प्रेमच असते

मातीच्या बोळक्यांवर असते

लेकुरवाळ्या परिवारावर असते

नाति चरामी  या शपथेवरही असते……

 

प्रेम प्रेमच असते

तालात असते सुरात असते

भूपाच्या शांतरसात असते

ठुमरीच्या शृंगार रसातही असते….

 

म्हणून म्हणते

प्रेम प्रेमच असते

आभाळात मावत नसते

प्रेमाचा रंग कोणता ?माहीत नसते….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 61 – नशीबाची भाषा ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #61 ☆ 

☆ नशीबाची भाषा ☆ 

नशीब म्हणजे  असते काय

बोल मनीचे बोलत जाय .

 

नशीब म्हणजे ओली रेघ

आठवणींचा हळवा मेघ.

 

प्रयत्न सारे अपुल्या हाती

दोष नको रे दुसर्‍या माथी .

 

हसणे रडणे सारे भोग

हे जीवनातील योगायोग.

 

झुलवत ठेवी प्रत्येकाला

नशीब ज्याचे कळे न त्याला.

 

लागून राहे  एकच आशा

कळून यावी,  नशीब भाषा.

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फुलपाखरे ☆ श्री राजेंद्र परांजपे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ फुलपाखरे ☆ श्री राजेंद्र परांजपे ☆ 

रंगबिरंगी पंख पसरुनी, झुलती, डुलती !

पुष्पापुष्पांतील मोदे ती मधुघट प्राशिती !

नाचती,बागडती, आनंदे नभी विहरती !

ती पहा फुलांवर फुलपाखरे भिरभिरती!

 

नाजूक, कोमल तनू वाऱ्यावर झुलविती !

धरु पहाता हाती न येती, निसटुनी जाती !

निमिषार्धातच नच कळे, कुठे ती हरवती !

ती पहा फुलांवर फुलपाखरे भिरभिरती !

 

क्षणी इथे क्षणी तिथे, नजर ठरु ना देती !

जीवनगंध पसरवती, मनी हर्ष फुलविती !

किमया विधात्याची,अद्भुत जीव निर्मिती !

ती पहा फुलांवर फुलपाखरे भिरभिरती !

 

© श्री राजेंद्र परांजपे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 78 – हायकू ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 78 ☆

☆ हायकू ☆

वेल्हाळ पक्षी

स्वप्नातल्या गावात

मन मोहात

********

फुलपाखरू

अंगावर बसलं

फूल हसलं

******

एक साळुंकी

खुपच आवडते

का रडवते ?

******

नार शेलाटी

बाजिंदी मनमुक्त

होईल व्यक्त

****

हिर्वी बाभळ

डोहाच्या काठावर

त्या वाटेवर

****

पिवळी फुले

झुलतात फांदीत

मन गंधीत

****

वाकडी वाट

चिमुकले ते खेडे

फुलांचे सडे

****

काळी कपिला

सुन्दर तिचे डोळे

दूध  कोवळे

****

तो निवडुंग

गावाच्या वाटेवर

काटेसावर

****

मस्त साकुरा

फुलतो जपानला

गंध मनाला

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 77 ☆ वेदनेची भेट ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 77 ☆ वेदनेची भेट ☆

वेदनेची भेट झाली छान झाले

त्यामुळे मज जीवनाचे भान आले

 

समजुतीने वेदनेशी मीच घेतो

संशयाने पाहतो मज आज जो तो

 

काळजीने आज केली फार दाटी

लेक आली गोमटी ही आज पोटी

 

यातनांनी दार माझे वाजवीले

मास्क नव्हता तोड नव्हते झाकलेले

 

दिनकराने होय वनवा लावलेला

पेटले ते झाड ज्याच्या सावलीला

 

लागलेला हाच आहे घोर आता

दीन आहे त्यास येथे कोण दाता

 

नेत्र का हे पावसाळी मेघ आहे

काळ नाही वेळ नाही फाक्त वाहे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर अमृत स्वप्नांचा ☆ सुश्री पूजा दिवाण

☆ कवितेचा उत्सव ☆ वर अमृत स्वप्नांचा☆ सुश्री पूजा दिवाण ☆

सुख वाटता वाटता

पडो आभाळही थिटे

दुःख वाटण्या पहाता

हात हळू मागे तटे

 

दुःख ऐकण्या सदाच

श्रुती असावी तत्पर

दुःख कथिण्या  कधीच

ओठी पडो न अंतर

 

दुःख ऐकता ऐकता

चिंब पापणी भिजावी

सुख ऐकता ऐकता

ओठी शीळ उमटावी

 

साद सुखात दुःखाची

कुणी कधी ना ऐकली

आस दुःखात सुखाची

कुणा कधी ना सुटली

 

असा फेर हा दैवाचा

मध्ये खांब मनुजाचा

मर्त्य तनुज मनूला

वर अमृत स्वप्नांचा

 

© सुश्री पूजा दिवाण

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print