मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 38 ☆ मुक्तविचार… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 38 ☆ 

☆ मुक्तविचार… ☆

(एक सकाळी माझ्यासोबत घडलेली एक घटना,मला खूप काही सांगून गेली,आणि त्याच अनुषंगाने मी काही ओळी तयार केल्या,ज्या मला सहज स्फुरल्या…..)

 

एक फुलपाखरू मला,स्पर्श करून गेलं

अचानक बिचारं ते, माझ्यावर आदळलं

कसेतरी स्वतःला सावरत सावरत

उडण्याचा स्व-बळे, प्रयत्न करू लागलं

त्याला घेतलं मी जवळ

स्नेहाने अलगद ओंजळीत भरलं

झाडाच्या एका फांदीवर मग

त्याला हळूच सोडून दिलं…

त्याला सोडलं जेव्हा,तेव्हा ओंजळ माझी रंगली

पाहुनी त्या रंगाला मग कळी माझीच खुलली

हसू मला आलं विचार सुद्धा मनात आला

ना मागताच मला फुलपाखराने त्याचा रंग सहज बहाल केला,परोपकार कसा असतो निर्भेळ

याचाही मग पुरावा मला मिळाला…!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बंद खोलीमध्ये ☆ श्री शरद कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ बंद खोलीमध्ये ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

बंद खोलीमध्ये,

एकांताचा बोधिवृक्ष असतो.

त्याच्या छायेखाली,

बरच कांही समजून घ्यायच असतं

 

बंद खोलीमध्ये,

एक समजूतदार फडताळ असतं.

तिथं अस्ताव्यस्त आठवणी,

न पाठवलेली पत्रं,

अपूर्ण लिखाण व्यवस्थित

ठेवायचं असतं.

 

बंद खोलीमध्ये,

खिडकीतून येणार्‍या कवडशातून, मनातला अंधार

समजून घ्यायचा असतो.

 

बंद खोलीमध्ये,

एक गूढ गुहा असते.

त्यातल्या हिंस्र जनावराला-

करुणेन समजून घ्यायचं असत.

 

बंद खोलीमध्ये,

स्तत:ला स्वत:पासून,

बाहेरच्या जगापासून,

जाणीवपूर्व

विलग करायचंअसतं.

 

©  श्री शरद कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विंदा करंदीकर स्मृती दिनानिमित्त – आयुष्याला द्यावे उत्तर.. स्व विंदा करंदीकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

स्व विंदा करंदीकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’

जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०

 

 ☆ कवितेचा उत्सव ☆ विंदा करंदीकर स्मृती दिनानिमित्त – आयुष्याला द्यावे उत्तर.. स्व विंदा करंदीकर ☆

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆

(१४ मार्च ..ज्ञानपीठ पुरुस्कार विजेते महाकवी स्व विंदा करंदीकर यांचा अकरावा  स्मृतीदिन ..त्या निमीत्ताने त्यांची एक कविता…)

 

असे जगावे दुनियेमधे,आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर।।

 

नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी तार्‍यांची

आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची।।

 

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर।।

 

पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना

हंसु असावे ओठांवरती, काळीज काढून देताना।।

 

संकटासही ठणकावून सांगणे, आता ये बेहत्तर

नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर।।

 

करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना

गहिवर या जगास सार्‍या, निरोप शेवटचा देताना।।

 

स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर…।।

 

  • स्व विंदा करंदीकर

 

?? अशा आवेशपूर्ण,स्फूर्तीदायक,निर्भीड सकारात्मक संवेदनशील काव्यरचनाकाराला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण स्मृतीवंदना!!! ??

 

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शुक्राची चांदणी.. ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ कवितेचा उत्सव ☆ शुक्राची चांदणी.. ☆ श्री मुबारक उमराणी ☆

चांदणी शुक्राची

मनात फुलते

पहाट गारवा

फुलात झुलते

 

सरत्या रात्रीला

सलाम करते

दुःखाचा ओहोळ

सुखानी भरते

 

क्षितिज किनारी

रांगोळी पेरते

शुक्राची चांदणी

मनात कोरते

 

रातीच्या हुंकारी

निशब्द पावते

काळोखी  काजळ

नयनी लावते

 

निघाल्या चांदण्या

सूर्याच्या स्वागते

रातराणी गंध

हुंगाया लागते

 

दमले किटक

भैरवीच गाते

चांदण्या फुलांत

माळुनच जाते

 

ओल्याच दवात

झाडच भिजते

हिरव्या चुड्यात

शृंगार सजते

 

गारवा सोसत

गवत हसते

काट्याच्या मनात

अंधार लसते

 

पाखरांचे पंख

गारवा सोसते

पिलांच्या चोचीत

अंधार ठोसते

 

अंधार गडद

ह्दयी गिळते

पहाटे क्षितिज

प्रकाश पिळते

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

जगायचे तर आनंदाने जगणे सुंदर आहे

भवसागर हा तरण्यासाठी म्हणती दुर्धर आहे

 

कर्म धर्म तर गोंदण होते जन्मासोबत भाळी

जगणे मरणे याच्या मधले जीवन अंतर आहे

 

सुरुवातीचे परावलंबन सरते उरते काही

कर्म चांगले देते किर्ती उरणे नंतर आहे

 

परावलंबन सरते तेव्हा स्वावलंबनी व्हावे

निसर्गातली अदभुत शक्ती इथे निरंतर आहे

 

विशाल जगती नवीनतेची नवी योजना मांडा

जग झुलवाया हाती तुमच्या मोठा अवसर आहे

 

प्रेम आंधळे नका म्हणू ना ते तर डोळस आहे

सुखी व्हायचे दोघा वरती सगळे निर्भर आहे

 

लळा जिव्हाळा प्रेम वाढवा माणुसकीचे नाते

तुमच्यासाठी हे जग दुसरे मायेचे घर आहे

 

दु:ख दळायला बसताना ही गीत सुखाचे गावे

संसाराची होते ओवी हेच बरोबर आहे

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 62 – सारे सुखाचे सोबती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 62 – सारे सुखाचे सोबती ☆

काठी सवे देते राया

हात तुज सावराया।

बेइमान दुनियेत

आज नको बावराया।

 

थकलेले गात्र सारे

भरे कापरे देहाला।

अनवाणी पावलांस

नसे अंत चटक्याला।

 

तनासवे मन लाही

आटलेली जगी ओल।

आर्त घायाळ मनाची

जखमही किती खोल।

 

मारा ऊन वाऱ्याचा रे।

जीर्ण वस्त्राला सोसेना।

थैलीतल्या संसाराला

जागा हक्काची दिसेना।

 

कृशकाय क्षीण दृष्टी

वणवाच भासे सृष्टी।

निराधार जीवनात

भंगलेली स्वप्नवृष्टी।

 

वेड्या मनास कळेना

धावे मृगजळा पाठी।

सारे सुखाचे सोबती

दुर्लभ त्या भेटीगाठी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शांतादुर्गा.. ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ कवितेचा उत्सव ? शांतादुर्गा.. ? सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

शांतादुर्गा पाठीराखी आई

हाकेसरशी धावून  येई

संकट दूर पळूनी जाई

शांतादुर्गा तीच माझी आई !

 

नेसे शालू रंगीत  नऊवार

शोभे नानाअलंकार त्यावर

रंगीत फुलेमाळा सभोवार

रुप दिसे ते राजस सुंदर!

 

जसे गाईचे वासरु

शेळीचे छोटे कोकरू

शांताईचे मी लेकरू

घाली मायेची पाखरू !

 

नाम घेता तिचे  हो मुखी

जीवन हो आनंदी सुखी

न राही कोणी कष्टी दु:खी

शांतादुर्गा ती पाठीराखी!

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य – भगवन शंकर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य – भगवान शंकर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

भस्म विलेपित

देव महादेव शिव

रौद्ररूपी निव

अंगीकार ….!

 

शिवलिंग रूप

दुध, जल, अभिषेक

भक्तीभाव  नेक

पुजनात….!

 

उमा महेश्वर

त्याचा त्रिलोकी स्विकार

स्मशान संचार

उद्धारक….!

 

शिव लिलामृत

करा श्रवण पठण

शिवाचे मनन

लवलाही …..!

 

गणेशाचे पिता

निलकंठ शोभे नाम

कैलासाचे धाम

शिवलोक……!

 

त्रिशूल डमरू

सवे नंदी शिवगण

त्रिनेत्री सुमन

शंकरासी ….!

 

मार्त॔ड भैरव

अवतारी शिवाचेच रूप

सृजन स्वरूप

ओंकारात…..!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 69 – स्त्री आणि कविता…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #69 ☆ 

☆ स्त्री आणि कविता…! ☆ 

कधी नुकत्याच

जन्मलेल्या मुलीमध्ये,

कधी आई मध्ये,

कधी बाई मध्ये,

कधी बहिणी मध्ये,

कधी अर्धंगिनी मध्ये,

प्रत्येक स्त्री मध्ये,

मला दिसत असते,

पुर्ण अपुर्ण अशी…

रोज एक नवीन

कविता…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार 

दूर कुठे क्षितिजाशी टेकडीच्या माथ्यावर |

शांत रम्य जागी उभे एक शिवाचे मंदिर ||१||

 

चार वृक्ष भोवताली दिसे वनश्रीची शोभा |

गाभाऱ्यात तेज फाके शिवपिंडीची ती प्रभा ||२||

 

भक्तिरंगी परिसर होई सांजेच्या वेळेला |

पक्षी येती झाडांवर भक्तगण आरतीला ||३||

 

पलीकडे शांत नदी जळ संथ संथ वाहे |

उतरत्या सांजवेळी सूर्य डोकावून पाहे ||४||

 

एक भगवी पताका मंदिराच्या वर डुले |

शांत नदीपात्रामध्ये दूर दूर होडी चाले ||५||

 

भास्कराचा लाल गोळा बुडताना पाण्यावर |

येई क्षितिजाभोवती लाल केशरी किनार ||६||

 

मंद नंदादीप तेवे शंकराच्या गाभाऱ्याशी |

हळू येई संध्याराणी कुठे कुठे क्षितिजाशी ||७||

 

नंदादीपाच्या तेजाने जाई भरून गाभारा |

झाला निशेच्या अधीन रम्य आसमंत सारा ||८||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares