मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वचनपूर्ती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ वचनपूर्ती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नित्यनेमे करितो रे

तुझ्या जन्माचा सोहळा

आनंदाने रंगूनिया

फुले भक्तीचाच मळा  ||

 

आम्ही सारे फक्त तुझ्या

पालखीचे होतो भोई

मस्त नाचता नाचता

रंगू भजनाचे ठाई ||

 

तूच फक्त नाही देवा

बाकी सारी तीच कथा

नित्य कानावर येई

द्रौपदीची नवी व्यथा ||

 

वाट बघतोस का रे

शंभर अपराधांची

नाही कुणालाच भीती

वाढ होते माजोऱ्यांची ||

 

धर्म संस्थापनेसाठी

अधर्माला निर्दालून

विश्‍वाच्या कल्याणास्तव

दिले येण्याचे वचन ||

 

द्रौपदीचा पाठीराखा

धर्माचा रक्षणकर्ता

धाव घेई आम्हास्तव

होऊनी सहाय्यकर्ता ||

 

पुरे झाली तुझी लीला

आता प्रत्यक्ष प्रकट

सांग पुन्हा नवी गीता

हाक आमुचा शकट ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत सांज ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ वसंत सांज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

झुकते आभाळ जिथे

घरटे असती माझे

मावळ दिशा मैफल

मनात स्मृतींची मौजे.

 

हळु सप्तक वसंत

हृदया देई ऊसंत

झुळूक गारवा स्पर्श

वायू भावगीत वाजे.

 

समुद्र किनारी गाज

अगंतुक झाके लाज

पसरुन पंख नभ

कुसूम ललाटी साजे.

 

क्षणिक सुखावा नेत्री

ओलावा दवाचे थेंब

पापण्या वेलींचे पर्ण

सजून सांज विराजे.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 61 – मी एक ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 61 – मी एक ☆

मी एक

असे  आईची आस

बाबांचा श्वास

अंतरीचा

 

मी एक

ताई म्हणे परी

दादाच्या अंतरी

बाहुलीच

 

मी एक

करी प्रयत्न खास

प्रगतीचा ध्यास

अविरत

 

मी एक

राणी आहे सजनाची

माझ्या मनमोहनाची

अखंडीत

 

मी एक

बनली कान्हाची मैय्या

जीवन नैय्या

सानुल्याची

 

मी एक

जरी हातात छडी

मनात गोडी

विद्यार्थ्यांची

 

मी एक

सदा भासते रागीट

प्रेमही अवीट

सर्वांसाठी

 

मी एक

कशी सांगू बाई

सर्वांची माई

योगायोग

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाट ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ पहाट ☆ श्री प्रकाश लावंड ☆

     कितीकदा खरडावी

जिण्यावरली  काजळी

किती  टाकू  तराजूत

माझ्या कष्टाच्या ओंजळी

 

सारं आयुष्य टांगलं

असं पासंगाच्या पारी

तरी  पारडं  राहिलं

कायमच  अधांतरी

 

किती भरावा रांजण

त्याची थांबंना गळती

येता येता सुखं सारी

वाऱ्यावरती  पळती

 

जादा मागत नाहीच

मोल कष्टाचं रं व्हावं

शेतामध्ये  राबताना

गाणं सर्जनाचं गावं

 

उत्साहात उगवावी

माझी प्रत्येक पहाट

समाधानानं लागावी

राती धरणीला पाठ

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळी… ☆ श्री कमलाकर नाईक

श्री कमलाकर नाईक

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – बी.काॅम., डी.बी.एम्.

सम्प्रत्ति – गॅमन इंडिया लि. मधून निवृत्त.

 ☆ कवितेचा उत्सव ☆ सावळी… ☆ श्री कमलाकर नाईक ☆ 

गो-या आई पोटी जन्मा आले

ना कोणा आनंद ना सुख झाले

 

नाही आले घरी वाजत गाजत

नाही केले कुणी माझे स्वागत

 

नावालाच माझे बारसे केले

सावळीचे नाव शामली झाले

 

नव्हता कोणाचा स्पर्श मायेचा

नव्हता कोणाचा शब्द प्रेमाचा

 

नव्हते जगात कोणी माझ्यासाठी

रानफूल झाले माझी मीच मोठी

 

उरी स्वप्न सैनिक होणे देशासाठी

झाले पूर्ण देवा, उभा माझ्या पाठी

 

मिडियाने चढवले  डोईवर मला

गणगोतानी  केले जवळ मजला

 

आता  चिमुकली सावळी शामली

जनसागराच्या प्रेमात बुडून गेली.

 

© श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 77 – विजय साहित्य – माय मराठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 77 – विजय साहित्य – माय मराठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

माय मराठी मराठी, जसे बकुळीचे फूल

दूर दूर पोचवी गं ,  अंतरीचा परीमल . . . !

 

कधी  ओवी ज्ञानेशाची ,  कधी गाथा तुकोबांची

शब्द झाले पूर्णब्रम्ह,  गाऊ महती संतांची. . . . !

 

संतकवी,  पंतकवी, संस्कारांचा पारीजात .

रूजविली पाळेमुळे,  अभिजात साहित्यात. . .  !

 

कधी भक्ती, कधी शक्ती,  कधी सृजन मातीत

नृत्य, नाट्य, कला,क्रीडा,  धावे मराठी ऐटीत. .  !

 

माय मराठीची वाचा,  लोकभाषा अंतरीची .

भाषा कोणतीही बोला,  नाळ जोडू ह्रदयाशी . .  !

 

कधी मैदानी खेळात, कधी मर्दानी जोषात.

माय मराठी खेळते, पिढ्या पिढ्या या दारात. ..!

 

कोसा कोसावरी बघ,  बदलते रंग रूप.

कधी वर्‍हाडी वैदर्भी, कधी कोकणी प्रारूप. . . !

 

माय मराठीचे मळे , रसिकांच्या काळजात.

कधी गाणे, कधी मोती, सृजनाच्या आरशात. . !

 

महाराष्ट्र भाषिकांची, माय मराठी माऊली

जिजा,विठा,सावित्रीची,तिच्या शब्दात साऊली . !

 

अन्य भाषिक ग्रंथांचे, केले आहे भाषांतर

विज्ञानास केले सोपे, करूनीया स्थलांतर. . . !

 

शिकूनीया लेक गेला, परदेशी आंग्ल देशा

माय मराठीची गोडी, नाही विसरला भाषा. . . !

 

नवरस,अलंकार, वृत्त छंद,साज तिचा .

अय्या,ईश्य,उच्चाराला, प्रती शब्द नाही दुजा.. !

 

माय मराठीने दिला, कला संस्कृती वारसा

शाहीरांच्या पोवाड्यात,तिचा ठसला आरसा.  !

 

माय मराठीने दिली, नररत्ने अनमोल.

किती किती नावे घेऊ, घुमे अंतरात बोल. . .!

 

माय मराठी मराठी, कार्य तिचे अनमोल .

शब्दा शब्दात पेरला , तीने अमृताचा बोल. . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोंडमारा ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

☆ कवितेचा उत्सव ☆ कोंडमारा ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

यशाचं शिखर

परदेशात प्राप्त केलस

तिथं आपलं अस्तित्व दाखवलस

 

फोनवरून बोलतोस

नेटवरून भेटतोस

याने तुझ्या आईचे

समाधान होत नाही

 

मनातली अस्वस्थता

कोणाला ही दाखवत नाही

 

उगीचच घरातून

सैरावैरा धावते

तुझ्या आठवणीने

डोळ्यात पाणी येते

 

येणाऱ्या जाणाऱ्या ना

तुझ्या खोड्या सांगते

मोडक्या तोडक्या

खेळण्यात तुझे

बालपण शोधते

 

माझ्यांने तिचे हाल

पाहावत नाहीत

तिला धीर देण्याची

माझ्यात हिंमत नाही

 

एकदा तू येवून जा

तिच्या मायेला

पूर येवू दे

मनाचा कोंडमारा

रिता होवू दे

 

मनाचा कोंडमारा

रिता होवू दे

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 68 – ग़ज़ल…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #68 ☆ 

☆ ग़ज़ल…! ☆ 

(मात्रावृत्त .)

एकटाच रे नदीकाठी या वावरतो मी

प्रवाहात त्या माझे मी पण घालवतो मी

 

सोबत नाही तू तरीही जगतो जीवनी

तुझी कमी त्या नदीकिनारी आठवतो मी

 

हात घेऊनी हातात तुझा येईन म्हणतो

रित्याच हाती पुन्हा जीवना जागवतो मी

 

घेऊन येते नदी कोठूनी निर्मळ पाणी

गाळ मनीचा साफ करोनी लकाकतो मी.

 

एकांताची करतो सोबत पुन्हा नव्याने

कसे जगावे शांत प्रवाही सावरतो मी .

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 88 – ☆ [1] स्वप्नकळ्या / [2] रानफुले ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 88 ☆

 [1] स्वप्नकळ्या / [2] रानफुले ☆ 

(दोन जुन्या कविता १९८५/८६ साली लिहिलेल्या….१९८९ ला प्रकाशित झाल्या होत्या! लोकप्रभा मध्ये प्रकाशित झालेली “स्वप्नकळ्या” आवडल्याची सुमारे चाळीस पत्रे आली महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून!“लोकप्रभा” उदंड खपाचं साप्ताहिक होतं आणि त्या काळात मोबाईल/इंटरनेट नव्हतं!)

[1] स्वप्नकळ्या

माझ्या  स्वप्नांच्या मुग्धकळ्या

उमलल्याच नाहीत,

तुझ्या आयुष्यातले

सुगंधी क्षण-

माझ्या नव्हते तरीही,

गंधवेडे मन धावत राहिले,

तुझ्यामागे उगीचच !

वळचणीला बसलेली

माझी मूक स्वप्ने

आज निसटत आहेत,

पागोळ्यांसारखी !!

(१९८९-लोकप्रभा)

[२] रानफुले

तुझ्या वाटेवर

मी सांडले माझे अश्रू ,

त्यातील वेदनेच्या,

बीजांकुराची-

आज रानफुले झाली आहेत!

तू माघारी आलास तर-

तुला दिसतील त्या फुलांत

माझ्या व्यथित मनाची

हळूवार स्पंदने!

पण तू बदलली आहेस,

तुझी वाट,

आणि माझ्यापर्यंत येणारे रस्ते,

बंद केलेस कायमचेच!

(रविवार सकाळ १९८९ )

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेमात पडता ☆ मेहबूब जमादार

 ☆ कवितेचा उत्सव ☆ प्रेमात पडता ☆ मेहबूब जमादार ☆ 

बनांत हिरव्या भान हरपले मज कळले नाही

मी सामावले तुझ्यात केंव्हा मज कळले नाही

 

ब-याच दिवसांत होते कांहीसे नुसते पहाणे

जवळ येवूनी कधी बोलले मज कळले नाही

 

रात दिस तू माझ्या नयनी ऊठता बसता

भाव सारे नयनांत  दाटले मज कळले नाही

 

प्रेमाच्या वाटा असती खडतर जाणूनी होते

त्या वाटेवर कधी प्रेम लाभले मज कळले नाही

 

प्रेमात पडता खरे फुलून जाते अवघे जीवन

ह्रदयात तूझ्या मी रूजून गेले मज कळले नाही

© मेहबूब जमादार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares