सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ रे मोरया… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
आद्य पुजेचा मान तुला
गणपती बाप्पा मोरया
*
गणनायक सर्वजनांचा
हे लंबोदर मोरया
*
सुखकर्ता तू दुःख निवारक
गजवदना तू मोरया
*
समाजातल्या अनास्थेला
आस्थेत बदला मोरया
*
भोवतीच्या चूक करणारा
नीट समज द्या मोरया
*
अपेयपान मंडळात करणारा
उलट्या होवो मोरया
*
गर्दीत महिलांना त्रास देती
त्यांची बोटे झडो मोरया
*
कर्कश्य गाणी लावती त्यांची
सिस्टिम बंद पाड मोरया
*
वर्गणीत करी काळेबेरे तया
स्टेजवरून पाड मोरया
*
प्रसादात घडे हेराफेरी
उपास घडो त्या मोरया
*
भक्ती करतो मनापासुनी
तो आनंदी सदा असे
तूच तयाचा रक्षणकर्ता
तया जीवनी नीत सुख वसे…
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈