मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 85 – सत्यमेव ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 85 ☆

☆ सत्यमेव ☆

तू आहेस  माझ्या काळजाचा

एक हिस्सा!

जळी,स्थळी, काष्टी, पाषाणी

दिसावास सदासर्वदा

इतका प्रिय !

धुवाधाँर पावसात

भिजावे तुझ्यासमवेत,

एखादी चांदणरात्र

जागून काढावी

तुझ्या सहवासात,

हातात हात गुंफून

पादाक्रांत करावा

सागरी किनारा,

असे भाग्य नसेलही

लिहिले माझ्या भाळी,

पण माझ्या वर्तमानावर

लिहिलेले तुझे नाव–

ज्याने पुसून टाकला आहे,

माझा ठळक इतिहास,

त्याच तुझ्या नावाचा ध्यास

आता मंत्रचळासारखा!

भविष्याच्या रूपेरी वाटेवर

नसेलही तुझी संगत

पण माझ्या कहाणीतले

तुझे नाव

मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतके

प्रखर आणि

सत्यमेव!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कधी वाटे मला… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

 ☆ कवितेचा उत्सव ☆ कधी वाटे मला… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆ 

कधी वाटे मला………..

कधी वाटे मला गाणे होऊन जगावे

सुरांच्या धबधब्यात निरंतर न्हावे

कधी वाटे मला फुल होऊन जगावे

वारा नेइल तिथपर्यंत सुगंधरूपी दर्वळावे

कधी वाटे मला वारा  होऊन जगावे

निसर्गातील हिरवेपण शोधीत निरंतर वहावे

कधी वाटे मला वारा  होऊन जगावे

निसर्गातील हिरवेपण शोधीत निरंतर वहावे

कधी वाटे मला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगावे

दिव्यत्वाची प्रचिती येताच कर माझे जुळावे.

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी,  पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 84 ☆ तडा गेला आकाशाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 84 ☆

☆ तडा गेला आकाशाला ☆

आठवांचा हा पसारा

आहे फक्त सोबतीला

नव्या स्वप्नांच्या शोधात

मित्र परदेशी गेला

 

कधी मस्त भांडायचो

उरावर बसायचो

वैरभावाचा हा रंग

नाही कधी जोपासला

 

चिंचा झाडाच्या पाडून

सारे घ्यायचो वाटून

अशी धूम ठोकायचो

माळी येता धरायला

 

गनी शेख, गणेशास

गण्या म्हणती दोघास

जात धर्माचा पगडा

नाही मैत्रीमधे आला

 

वैरी होत गेला काळ

आणि तुटली ही नाळ

सारी पाखरे पांगली

तडा गेला आकाशाला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नकळत ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 

☆ कवितेचा उत्सव ☆ नकळत ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सकाळी पळत

संध्याकाळी  पळत

डोळ्यापुढे दिसतेय

कामाची चळत

 

दिवस आला कसा

दिवस गेला कसा

वेळ कुठे गेला

काही नाही कळत

 

काटे चालले भरभर

वाटी भरते झरझर

वाळूची धार राही

संतत गळत

 

कुठे गेल्या हसणाऱ्या

सया कधी रुसणाऱ्या

कालच तर होतो आम्ही

खिदळत खेळत

 

अचानक असा

समोर आरसा

आरशातल्या ‘मी’शी

मी नाही जुळत

 

केस कधी पिकले,

शरीर कधी थकले

काळ माझ्यापुढे

मी काळापुढे पळत

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 34 ☆ तरुणाईच्या वळणावरती… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 35 ☆ 

☆ तरुणाईच्या वळणावरती… ☆

तरुणाईच्या वळणावरती

संकटे विपुल असतात

चांगले सुविचार कमी

वाईटच अनुभव जास्त येतात…१

 

तरुणाईच्या वळणावरती

सल्लेदार खूप मिळतात

फुकट सल्ले देतील तरी

सु-संस्कारित सल्ले न्यून असतात…२

 

तरुणाईच्या वळणावरती

ऐकावे जणाचे,करावे मनाचे

स्व-अनुभूती येऊन मग पहा

कामी काम,येईल अनुभवाचे…३

 

तरुणाईच्या वळणावरती

आदर ठेवावा मोठ्यांचा

सेवा करावी, मातृ-पितृची

आधार व्हा त्यांच्या उत्तरार्धाचा…४

 

तरुणाईच्या वळणावरती

फालतू कुठला गर्व नसावा

श्रम करुनि धन मिळवावे

उगाचच रिक्त वेळ न दवडावा…५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टर्निंग पॉईंट जीवनाचा ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ टर्निंग पॉईंट जीवनाचा ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

धक्का देणारा, विषन्न करणारा ।

सहज होत्याचे नव्हते करणारा ।

सुंद नि सर्व अस्थिर करणारा ।

चालते बोलते प्रेत  बनवणारा ।

कळायचे,वळायचे बंद करणारा ।

भयाण काळ ,जणू फणा नागाचा ।

टर्निंग पॉईंट जीवनाचा ।।1।।

 

सर्वांच्या आयुष्यात उद्भवणारा ।

त्रासिक नि चिंताग्रस्त बनवणारा ।

निर्णयक्षमता शून्य करणारा ।

सुरळीत जीवनात वादळ उठवणारा ।

भविष्याचे प्रश्नचिन्ह दाखवणारा ।

दरी म्हणावी की डोंगर अडथळ्यांचा?

टर्निंग पॉईंट जीवनाचा  ।।2।।

 

पण,हाच टर्निंग पॉईंट जीवनाचा ।

घेता क्षणाचा निर्णय सकारात्मकतेचा ।

कधी ठरतो मिरॅकल जीवनाचा ।

रस्ता अडथळ्यांचा आव्हानांचा ।

‘पण’ लागतो चिकाटीचा, स्पर्धा हेलकाव्यांशी ।

युद्ध करावे आपणच, सहज न सरणाऱ्या या दिसांशी ।

विविध धड्यातून सुंदर मिळेल मार्ग,

करता मैत्री टर्निंग पॉइंटशी ।

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोनेरी सकाळ ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ सोनेरी सकाळ ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

सोनेरी सकाळ

ही धरित्री अशी

साज हिरवा ल्यायली

धुंद गंधित होऊनी

प्रतिक्षेतच हरवली

कोण हे आले पहा

रविकर हा येतसे

सुस्नात या धरित्रीला

कनकसाज चढवितसे

हा सुगंध, ही हवा

मोहिनी मज घालिते

गंधवेड्या माझ्या मना

प्रतिदिनी निमंत्रिते

रोजचेच रुपडे हे

नित्यनवे भासते

काळोख्या रात्रीतुनी

उषःप्रभा ही जन्मते.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 65 – शब्द पक्षी…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #65 ☆ 

☆ शब्द पक्षी…! ☆ 

मेंदूतल्या घरट्यात जन्मलेली

शब्दांची पिल्ल

मला जराही स्वस्थ बसू देत नाही

चालू असतो सतत चिवचिवाट

कागदावर उतरण्याची त्यांची धडपड

मला सहन करावी लागते

जोपर्यंत घरट सोडून

शब्द अन् शब्द

पानावर मुक्त विहार करत नाहीत

तोपर्यंत

आणि

तेच शब्द कागदावर मोकळा श्वास

घेत असतानाच पुन्हा

एखादा नवा शब्द पक्षी

माझ्या मेंदूतल्या घरट्यात

आपल्या शब्द पिल्लांना सोडुन

उडून जातो माझी

अस्वस्थता

चलबिचल

हुरहुर

अशीच कायम

टिकवून ठेवण्या साठी…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री ☆ श्री अनंत नारायण गाडगीळ

☆  कवितेचा उत्सव ☆ स्त्री ☆ श्री अनंत नारायण गाडगीळ  ☆ 

(- अनंता.)

तू जन्मलीस

बाळ होतीस

 

मुलगी झालीस

तरुणी बनलीस

 

पत्नी झालीस

एक नवा जीव

जन्माला घातलास

 

आई बनलीस

अनुभव घेतलास

 

माया लावलीस

माणूस घडविलास

 

तू तर सर्वांनाच

जीव लावलास

 

कष्ट अपार केलेस

जीवन सार्थ केलेस

 

वंदनीय तू झालीस

जीवनाधार झालीस

 

आ म्हणजे आत्मा

ई म्हणजे ईश्वर

आई म्हणून तू

आत्मा ईश्वराचा

भूतलावर आणलास

पांग कसे फेडावे

स्त्रीचे ते कळेना

काय म्हणून करावे

काहीच ते वळेना!

 

© श्री अनंत नारायण गाडगीळ

सांगली.

मो. 92712 96109.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ कवितेचे रसग्रहण☆ प्रस्तुति – सौ.ज्योत्स्ना तानवडे

कवी श्री वैभव जोशी

☆ कवितेचा उत्सव ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांग

देणे घेणे उतू गेले फिटले ना पांग

आता कशी श्वासांवर  लावायाची बोली

माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

 

कधीकाळी होते इथे एक गर्द रान

एका बहराची ज्याने मिरवली आण

सरूपाला अरुपाची जाहली सवय

तेंव्हाचे हे भय ज्याचे झाले आता वय

एका खिळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली

माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

 

आता माझ्या प्रार्थनेत तेवढा ना पीळ

आणि तुझ्या निळाईत नाही घननीळ

मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर

जीव ऐलतीर आणि डोळे पैलतीर

कोरड्या पात्रात उभी आठवण ओली

माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली

 

– कवी श्री वैभव जोशी

चित्र – साभार फेसबुक वाल

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares