मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पॅरिस ऑलिंपिक ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पॅरिस ऑलिंपिक ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

खेळ मांडीयेला पॅरिस देशी ।

खेळती जागतीक खेळाडू रे।

देश अभिमान आला उभारून ।

एक मेकांशी चाले स्पर्धा रे ॥१॥

*

गतीमानता, उच्चता आणि तेजस्विता 

यांचा सुंदर मेळा ।

सुवर्णं रौप्य कास्य पदक वर्षाव ।

अनुपम्य सुखसोंहळा रे॥२॥

*

वर्णअभिमान विसरली याती

खेळ खेळाडू हीच नाती ।

खिलाडू वृत्तीने जालीं नवनीतें।

हार जीत नावा पुरती रे॥३॥

*

होतो जयजयकार गर्जत अंबर

मातले हे खेळाडू वीर रे।

देशांमध्ये साधण्या एकोपा या योगे ।

पाच खंडाचे घेऊन प्रतीक रे ||४||

*

आयफेल टॉवर सम कार्य करू मोठे 

देश नाव उज्ज्वल करू 

बोलू नाही आता करून दाखवू 

कार्य नेत्रदीपक रे ||५||

*

खेळ मांडीयेला पॅरिस देशी ।

खेळती जागतिक खेळाडू रे।

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 243 ☆ अभिमंत्रित वाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 243 ?

☆ अभिमंत्रित वाटा☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्य काजळते अन्

हृदयाशी सलतो काटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा…१

*

दाटते मनात काहूर

भोवती भयाण सन्नाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….२

*

सागरी नाव वल्हवता

ग्रासती भयंकर लाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….३

*

घडलेले नसता काही

भलताच होई बोभाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….४

*

वेगळेपणा जाणवता

ऐहिकास मिळतो फाटा

तेव्हाच भेटती सखये

सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….५

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वास्तव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ वास्तव ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

पाठीवर हात ठेऊन 

लढ बाप्पा म्हणणारा 

कुठे गुंतलाय 

तेच काही 

कळत नाही 

 

निखळ ज्ञान देऊन

घडवणारा

आश्वासक गुरू 

काही केल्या

मिळत नाही 

 

काय करावे तरुणांनी ?

कुठे शोधावेत आदर्श ?

मार्गदर्शक 

तेच आता 

त्यांना सुचत नाही 

 

संधीसाधू समाजात 

बोकाळलेला स्वार्थ 

कुठपर्यंत मुरलाय

याचा येत नाही

अंदाज 

 

आपल्याकडं पहायचं सोडून 

जो तो पहातोय 

फक्त दुस-याकडं

दोष आपल्यातले 

लादतोय दुसऱ्यांवर 

 

आणि म्हणतोय

चाललंय तसं चालू द्या 

आपल्या हातात काय आहे 

मी सोडून सगळेच

वाया गेलेत

 

हेच आहे आजचं

वास्तव‌.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे ध्वज देवा… 🇮🇳 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ हे ध्वज देवा🇮🇳 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

तूची आमुच्या अभिमानाचा ठेवा

वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||

*

भारतमाता स्वातंत्र्याची तूच असे शान 

तुझ्या दर्शने स्फूरण येऊनी उन्नत होई मान 

तुझ्या रक्षणासाठी घडू दे सदैव उज्वल सेवा 

वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||

*

नभांतरी तू फडकत राहसी डौलाने 

देशभक्तीने उर भरूनी ये अभिमानाने 

शान तुझी लहरत राहो आशीर्वच द्यावा 

वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||

*

जतन तुझे पवित्र कर्म भान कर्तव्याचे 

प्राणप्रणाने सदैव करणे रक्षण स्वातंत्र्याचे 

अभिमानाचा तिरंगा जपू जाण जागृत ठेवा 

वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||

*

तुची आमुच्या अभिमानाचा ठेवा

वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #251 ☆ नीति… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 251 ?

☆ नीति…  ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नीति खेळ खेळवते

माणसास नागवते

*

आडवाट नको धरू

तीच वाट भूलवते

*

महालात सुख टोचे

रोज झोप चाळवते

*

अमृतात कुणीतरी

कसे वीख कालवते

*

पुरूषार्थ जागताच

अग्निकुंड पेटवते

*

निसर्गात महाशक्ति

तीच विश्व चालवते

*

धनवानस मोठ्याही

नीति साफ टोलवते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समतोल… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ समतोल…  सुश्री नीलांबरी शिर्के 

धो धो पाऊस पडो आणि

नदिस यावा मोठा पूर

माणसांतील चुकांना तो

वाहो नेऊन खूप दूर

*

वृत्ति कृतीतील चुका वाहता

परतून  याव्या  कधी ना पुन्हा

पूर जाईल ओसरून अन्

मागे राहील माणूस शहाणा

*

कधीच टाकणार नाही मग

प्लॅस्टिक गटारी रस्त्यावर

तुंबून गटारी घनकचऱ्याने 

नदीस फुगवटा, येतो पूर

*

 जागोजागी लावीन झाडे

घेईन काळजी हिरवाईची 

कळेल आपसूक ही श्रीमंती

 खरी असते मिरवायाची

*

 बँकबॅलन्स  जसा गरजेचा 

सुखी जगण्या निसर्ग बॅलन्स

दोन्हीकडचा समतोल साधून

मिळे शाश्वतता येत्या पिढीस

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्न… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वप्न… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कधीतरी कुठेतरी 

चंद्र येईल भेटीला 

छोटे लागेलही गाव 

पायतळीच्या वाटेला 

*

निष्पर्णल्या फांद्यांवरी 

चैत्र पालवी फुटेल 

सर मौनाकाशातून 

सार्थ शब्दांची येईल 

*

ऊन अडवून मेघ 

थोडी धरेल सावली 

काट्याकुट्यांची जी वाट 

होईलही मखमली 

*

याच स्वप्नांनी स्वप्नात 

रोज जाणे हरवून 

रणी यायचेच पुन्हा 

खोल जखमां घेऊन…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जिवलग मित्र सारे … ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – जिवलग मित्र सारे – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

 जन्माला जरी  आलो एकटा,

मित्रांनी नाही जाणवून दिले एकटेपण!

अनेक सुख दुःख आली,

हाक न मारता  धावून आले सारेजण!

*

बालवाडी खेळी एकत्र दमलो,

तारुण्यात मौजमस्तीत रमलो!

तिसरा अंक येईल तेव्हा येईल,

वर्तमानात एकमेकांसाठी जमलो!

*

कधी जरी उदास वाटे  मनाला,

डोळे पाहून मनातले सारे वाचतात!

कष्ट करून यश मिळते तेव्हा,

माझ्यापेक्षा तेच  आनंदाने नाचतात!

*

आर्थिक प्रगती पुढे मागे असे,

तुलना सुखाची कुणा अंतरी नसे!

एकाच कट्ट्यावर एकत्र सारे बसे,

निखळ मैत्रीचा भाव ह्रदयात वसे!

*

आयुष्यभर साथ दिलीत,

भावनांचा  केला नाही कधी धंदा!

अमरपट्टा नाही घेऊन आलो,

जाईन तेव्हा मित्रांचाच मिळू दे खांदा!

 

© श्री आशिष  बिवलकर

दि. 07 ऑगस्ट 2024

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रतिभा… आणि प्रतिमा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ प्रतिभा… आणि प्रतिमा…  ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

प्र ति भा…

सारे जगात म्हणती

देवी शारदेच देणं,

नसे सर्वांच्या नशिबी

असलं सुंदर लेणं !

*

तो मातेचा अनुग्रह

मग हृदयी जाणावा,

निर्मून छान साहित्य 

हात लिहिता ठेवावा !

… आणि प्र ति मा !

ती जी दिसे आरश्यात 

सांगा असते का खरी,

का खरी जपून ठेवी

जो तो आपल्याच उरी?

*

जी दिसे चार चौघात

खरंच फसवी असे,

प्रत्येकास दुसऱ्याची 

नेहमीच खरी भासे !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक कविता अशीही… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आरसा …—” ☆  डॉ. शैलजा करोडे

एक कविता अशीही

चिंब चिंब भिजणारी

रिमझिम पावसात

गाणे हर्षाचे गाणारी

*

एक कविता अशीही

ब्रम्हांडात फिरणारी

माझ्या हाताला धरुन

पर्यटन करणारी

*

एक कविता अशीही

माझे अश्रू पुसणारी

धीरोदात्तपणे मज

साथ संकटी देणारी

*

एक कविता अशीही

घेई गगन भरारी

क्षणार्धात सागराच्या

तळी घेऊन जाणारी

*

एक कविता अशीही

संवेदना जपणारी

मनातील भावनांना 

अलगद टिपणारी

*

एक कविता अशीही

विद्रोहाने पेटणारी

हाती घेवून मशाल

क्रांती बीज पेरणारी

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print