मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #249 ☆ कात टाकतो मी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 249 ?

☆ कात टाकतो मी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येता समीप थोडा धुंदीत चालतो मी

रानात केतकीच्या गंधात नाहतो मी

*

माझ्या मनात ठसली ती केतकी सुगंधी

पाहून केतकीला जुन कात टाकतो मी

*

असतात डंख काही प्रेमातही विखारी

घायाळ केतकीच्या प्रेमात वाटतो मी

*

आनंद सोबतीला नसतो कधीच कायम

जखमेस सोबतीला घेऊन जागतो मी

*

होतेय फार जळजळ जागेत तेवढ्या ह्या

उगळून चंदनाचा थर फक्त लावतो मी

*

आहेत सर्प काही वस्ती करून येथे

केवळ तुझा निरागस गुण गंध मागतो मी

*

माझ्यात केतकीचा आलाय गंध थोडा

येतात साप जवळी दचकून पाहतो मी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्रीत या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ मैत्रीत या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नको सजवू तू 

नको गाजवू तू 

चल रुजवूया 

मैत्र्य आता ||

 

नको सजवू तू 

नको गाजवू तू 

चल रुजवूया 

मैत्र्य आता ||

 

नको जीव देऊ 

नको जीव घेऊ 

जीव जडवूया 

मैत्रीत या ||

 

नको ते वचन 

नको ती शपथ 

काळीज जाणू या 

दोघांचेही ||

 

नको तो खुलासा

नको तो उसासा 

मिळेल दिलासा 

मैत्रीत या ||

 

असो किती दुःख 

असुदे ते सुख 

दोघे अंतर्मुख 

मैत्रीत या ||

 

कुठेही कसेही 

जगाच्या या पाठी 

एकमेकांसाठी 

मैत्री असे ||

 

जीवाच्या पातूर 

जयाच्या खातीर 

जीव हा आतूर 

मैतर हे ||

सगळ्यांना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

कविता – मैत्री… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

मित्र असावा वटवृक्षासारखा

बारा महिने गार सावली देणारा

*

दुःखाचा वणवा दूर सारणारा

चेहऱ्यावर थोडंसं हसू आणणारा

*

आरशात प्रतिबिंब त्याचेच दिसावे

आयुष्यातील काही क्षण मित्रांसाठी असावे

*

मनमोकळे बोलणे असावे

एकमेकांना आनंदी ठेवावे

*

एकतरी मित्र असा असावा

मनातील दुःख त्याला कळावे

*

त्याने वाटेत फुलं अंथरावे

त्याने फक्त माझ्यासाठी जगावे

 – दत्तकन्या

मैत्री दिनाच्या सर्व मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 

© सौ. वृंदा गंभीर

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ (1) कारगिल विजय-दिन… (2) स्थितप्रज्ञ तो एकमेव… (3) लाडकी बहीण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  # 1 ?️?

 

? – कारगिल विजय-दिन… – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

उतुंग आमची उत्तर सीमा,

कारगील तिथला मानबिंदू !

वाईट नजर शत्रूची त्यास,

शीर शत्रूचे तिथेच छेदू !

*

भारत मातेच्या मुकुटासाठी,

कारगिलवर पाकचा हल्ला !

रणशिंग फुंकले शूरविरांनी ,

दुम दुमला एकच तो कल्ला !

*

डोळ्यात तेल घालून जवानांनी,

सीमेवर दिवसरात्र घातली गस्त!

बिशाद केली त्या पाकड्यांनी,

केले तिथेच  त्यांना उध्वस्त !

*

इंच इंच भूमीसाठी,

उंच उंचावर जवान लढले !

मातृभूमीच्या रक्षणासाठी,

हसत हसत धारातीर्थ पडले !

*

रक्त सांडले जवानांनी,

कारगिल भूमी केली पावन !

स्मरण  आज विजय दिनाचे,

देशवासी करती वीरांना नमन !

*

जय हिंद

?️?  चित्रकाव्य  # 2 ?️?

?स्थितप्रज्ञ तो एकमेव– ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

संकटातही न डगमगता,

दिनक्रम राही ज्याचा ठाम |

कोणी वंदावे कोणी निंदावे,

स्थितप्रज्ञ तो एकमेव तळीराम |

*

कोणतेही असो संकट,

तो दिनक्रम मोडत नाही |

प्रयत्नांची पराकाष्ठा करून,

साथ तिची सोडत नाही |

*

सुखाचा असो वा दुःखाचा क्षण,

तिच्या प्रेमावरून नाही तो ढळत |

तिला सोडून जगात दुसरीकडे,

लक्ष त्याचे कधीच नाही ते वळत |

*

व्यसनमुक्तीचे संदेश गप्पा,

त्याच्या लेखणी ठरतात व्यर्थ |

एक एक प्याला रिचवत,

आला दिवस लावतो सार्थ |

*

एकच प्याला मधील सुधाकर,

त्याच्यासाठी आदराचे स्थान |

आपल्याच  मस्तीत जगायचे,

कशाला बाळगावे जगाचे भान |

*

दि 04 ऑगस्ट 2024

?️?  चित्रकाव्य  # 3 ?️?

? – लाडकी बहीण… – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

पंधराशे येती | आता खटाखट |

चला पटापट | बहिणींनो  ||१||

*

दिवाळखोरीला | एक नवी वाट |

तिजोरीला चाट | लावुनिया ||२||

*

अक्कल धावते | आता घोड्यापुढे |

हातबट्टा पाढे | घोकूनिया ||३||

*

करदात्या तुझी | चालतसे लूट |

सत्ता ही बेछूट  | भोगायसी ||४||

*

आंधळं दळत | कुत्र पीठ खातं |

असंच घडतं |  कलयुगी ||५||

*

फुकट मिळते | नसते किंमत |

कशी ही हिम्मत | निर्णयाची ||६||

*

लाडकी बहीण | राखा तिची लाज |

नको तिला साज | बिब्बा म्हणे ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

☆ मैत्री… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

तुझी माझी मैत्री

थोडी जगावेगळी..

तू शांत संयमी,

तर मी बडबडी..

 

तुझी माझी मैत्री

नात्यापलीकडली,

एकमेकांत गुंतलेली..

माझी दुःख, तुझी फुंकर

दुधात विरघळलेली जणू साखर..

 

तुझी माझी मैत्री

घट्ट रेशीम बंध..

विश्वास आणि प्रेमाचा

मलमली अनुबंध..

 

तुझी माझी मैत्री..

जणू सर पावसाची..

उन पावसात भिजून

इंद्रधनू फुलवणारी..

 

तुझी माझी मैत्री..

जणू चादर धुक्याची

गुलाबी थंडीत ही

जणू आभाळ पांघरलेली..

 

तुझी माझी मैत्री..

यशाची साथी

अपयशातही सदैव सोबती..

 

तुझी माझी मैत्री

शरदाचं चांदणं..

काळोख्या रात्रीत ही..

सदैव मनात फुलणं..

 

तुझी माझी मैत्री

कृष्ण अर्जुनासारखी..

प्रत्यक्ष न लढता ही

मार्ग दाखवणारी..

 

तुझी माझी मैत्री..

 कर्ण दुर्योधनासारखी..

हार समोर असूनही

साथ न सोडणारी..

 

तुझी माझी मैत्री..

एकमेकांसाठी जीव देणारी..

अंधाऱ्या रात्रीत ही

न डगमगता सोबत चालणारी..

 

तुझी माझी मैत्री..

प्राजक्ताचा गंध जणू..

क्षणाच्या सहवासात ही..

सुगंधाने दरवळणारी..

 

तुझी माझी मैत्री

जणू ज्योत दिव्याची..

स्वतः जळून ही..

प्रकाश पसरविणारी..

 

तुझी माझी मैत्री..

चंदनाचे खोड जणू..

झिजता झिजता ही

शितलता देणारी..

 

तुझी माझी मैत्री..

प्रेम, विश्वास,राग, लोभ

ह्यांच्याही पलिकडली..

एकमेकांत विरघळून ही

स्वतःचं प्रेमळ अस्तित्व 

अविरत जपणारी..

 

तुझी माझी मैत्री

म्हणजे वाळवंटातील पाणपोई

तहान भागवता भागवता पथिताची

 स्वतः तृप्त होणारी..

 

तुझी माझी मैत्री

म्हणजे सावली वटवृक्षाची

सुखाच्या गारव्यात न्हाऊन ही

आनंदाने दुःख झेलणारी..

 

मैत्रीच्या ह्या नात्याला

दृष्ट न लागो कोणाची..

हेच एक मागणे असे मनी..

आभाळभर शुभेच्छांची

उधळण करते ह्या मैत्री दिनी..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस कविता — ओढ / सोबत ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस कविता — ओढ / सोबत ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

(१) ओढ

 

प्रियन ! 

मी एक माझ्या नावाची 

होडी सोडते,

तू ही एक तुझ्या नावाची

होडी सोड,

आपण नाही भेटलो तरी 

त्या भेटतीलच एखाद्या लाटेत 

अन् पोहोचवतील एकमेकांपर्यंत

आपली ओढ

 

(२) सोबत…  

 

प्रियन !

तुला तिथल्या चांदण्यातही 

थोडा पाऊस हवा

मला इथल्या पावसातही 

थोडं चांदणं हवं

थोडा तू पाऊस घे, 

थोडं मी घेते चांदणं

माझ्या ओल्या उशी खाली

तुझ्या उष्ण निश्वासाला

प्रियन ! 

एवढी सोबतही आता पुरेशी आहे!

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 184 ☆ अभंग… मैत्री ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 184 ? 

अभंग… मैत्री  ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

मैत्रीचे सु-सूत्र, अतर्क्य कठीण

घ्यावे समजून, अनुभवे.!!

*

वरवडे नको,  मैत्रीचा दिखावा

सतत असावा, स्नेहभाव.!!

*

मैत्रीत नकोच, धन व्यवहार

असो सदाचार, ममत्वाचा.!!

*

छंदो-गामात्यांची, मैत्री आठवावी

मनी साठवावी, प्रेमादरे.!!

*

कनोज शाखेचा, कवी तो कलश

मैत्रीचा विशेष, त्याच्या ठाई.!!

*

मित्रत्व जपण्या, मृत्यू आलिंगन

वाहिले जीवन, मित्रासाठी.!!

*

संभाजी राजेंची, साथ नं सोडीली

रक्ताने लिहिली, मैत्री गाथा.!!

*

कविराज म्हणे, माझ्या जीवनात

ऐसा प्रत्यक्षात, मित्र यावा.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सावळा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सावळा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

ना फिक्का पांढरा

ना गर्द काळा

कातरवेळेचा साथी

श्यामसुंदर सावळा

*

दैवी अलंकारांविना

दिसे खरे सौंदर्य

माणूस म्हणून जयाचे

वादातीत आहे कर्तृत्व

*

किती आले अन् किती गेले

कधी ना कधी स्वतःसाठी रडले

स्वतः जन्मून कुशीत मृत्यूच्या

त्याचे डोळे इतरांसाठीच ओले

*

कुणी पाजे दूध विषारी

कुणी बांधे झाडास

राधाही जाई सोडून तरीपण 

हृदय फुलांचे कळे तयासच 

*

उदास राजे अन् जनता

जिवंत चिखल हताश

तो कायम आशावादी जिथे

अर्जुनासारखा अर्जुन निराश

*

जीवनाचे इतके प्रेम

इतरांत दिसत नाही

स्वतःच असे तो ‘विजय‘

वैजयंतीमालेची त्याला गरज नाही

*

खरा मानव पुरोगामी

नाही दांभिक घमंडी

जयाच्या सेनेत घेई

लढायचा मान तो शिखंडी

*

जगणे त्याचे फार खरे

तलवारीस पाणी बुद्धीचे

रानात निराशेच्याही तरी 

आश्वासक सूर त्याच्या बासरीचे

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पागोळ्यातून गळता पाणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ पागोळ्यातून गळता पाणी…  ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पाऊस कोसळे येथे

पाऊस कोसळे तेथे

छपरावर पाऊस पडता

पगोळीतून धार वहाते

*

 पागोळ्यातून गळता पाणी

 वाटतसे अभंग वाणी

 खळखळ वाहत जाता

 जलप्रवाही जाती मिळोनी

*

  जल प्रवाह वाढत जाता

  नदी नाल्या येतसे पूर

  पालख्या जमती जैश्या

  जरी एरवी असती दूर

*

  जल ओढ्यानदीतले ते

  सागरास जाऊन मिळते

   वारीत पालख्या जमता

  मग भक्तीचा सागर बनते

*

 या सागराची गोड गाज

 विठ्ठल पांडुरंगाचा गजर

 वैकुंठरूपी पंढरीत आता

 सारा उसळेल रत्नाकर

*

 इथे शब्दांचीच रत्ने

नामगजरी  अभंगात  

भक्तिधन ज्याचे त्याचे

 नाही इथे जात पात – – 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “फिरून आली तुझी आठवण…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ फिरून आली तुझी आठवण…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

(नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा पावनखिंडीतील चित्त थरारक शौर्याचा ऐतिहासिक आठवण)

*

आज अचानक फिरून आली तुझी आठवण

बलिदानाने पवित्र झाली तुझी आठवण

*

स्वराज्य रक्षण करण्यासाठी पहा मावळे

पन्हाळ्याहून घोडखिंडीत तुझी आठवण

*

मंतरलेल्या रात्री मग प्राणांची बाजी

सहा हजारा पुरून उरला तुझी आठवण

*

तलवारीचे वार  झेलले निधडी छाती

यमधर्माला थांबवणारी तुझी आठवण

*

तोफांचा आवाज ऐकुनी प्राण सोडला

राजासाठी बलिदानाची तुझी आठवण

*

पावन झाली घोड खिंड ही रक्त सांडले

पावनखिंडीत नरवीरा रे तुझी आठवण

*

बाजीप्रभूस मुजरा माझा अभिमानाचा

प्रताप सारा आठवणारी तुझी आठवण

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print