मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य फाटले तेव्हा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ आयुष्य फाटले तेव्हा…  सुश्री नीलांबरी शिर्के 

आयुष्य फाटले तेव्हा

शब्दांनी शिवत गेले

जोडून शब्द मी तेव्हा

कविता करीत गेले

 मुडपून दुखऱ्या  भागा

हळुवार घातली टिप

प्रत्येक टाक्यामागे

मुरे अश्रू आपोआप

ते जिथे फाटले ज्यादा

टाक्यांनी शिवले नाही

रफूच्या छान धाग्यांची

मी केली हो चतुराई

ठिगळाच्या तुकड्यांनी

मी कधी सांधले नाही

काढून त्वचेची साल

मी दु:ख झाकले बाई

आयुष्य वाटते आता

सुरेख तलमसे वस्त्र

आतून टोचती टाके

की  तडजोडीचे अस्त्र

 टोचोत कितीही टाके

 जखमी  आतूनी त्वचा

 त्या जखमांना परंतू

 कधी फुटणार नाही वाचा

 चेहऱ्यावरचे सदैव हासू

 फसवी जगासह मजला

 भुलून  जाऊन आपसूक

 जपते या महावस्त्राला

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 185 ☆ अभंग…कर्म बंध ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 185  ? 

☆ अभंग… कर्म बंध ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

श्रीकृष्ण सांगती, अर्जुनासी कर्म

जाणावेची मर्म, याचे पार्था.!!

*

कर्माचे बंधन, मजला नाही रे

वेगळा आहे रे, सर्व अर्थी.!!

*

ऐसे जे जाणती, ऐसे जे मानती

त्यासी नं लागती, कर्म बंध.!!

*

कविराज म्हणे, गीता अभ्यासावी

सदैव करावी, उजळणी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वीर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

वीर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वा-यावरी वराती नसतात निघत काही

पण बातम्या कशा या येतात उडत काही

*

पोथीत वाचलेले सत्यात आणण्याला

देवा समोर दुबळे बसतात जपत काही

*

होतात वीर योद्धे आधार भेटला की

करताना वार वर्मी पदरात लपत काही

*

बुजगावणीच येथे नखरेल भाव खाती

सोडून राखणीला पळतात दडत काही

*

टुकडे गिळायला ही झुकतात लाळघोटे

झालेत भाट तेव्हा आलेत जगत काही

*

रस्त्यात खूप गर्दी झालीय शोषितांची

खिडकीतुनीच धनको बसलेत बघत काही

*

लाटूनिया खजिना झालेच साव होते

पसरून पाय दोन्ही पडलेत कुजत काही

*

देवा तुझ्या घरी पण कसलाच न्याय नाही

भुलवून भक्त ढोंगी झालेत संत काही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जात… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ जात… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

पावसाला जात नाही म्हणूनच तो पडतो आहे

जातीसाठी घालून गोंधळ माणूस  रडतो आहे

*

संप मोर्चे आणि उपोषण जातीसाठी चालू आहे

नाही जात निसर्गाला  म्हणून तो बहरतो आहे

*

प्रसंगी खून सांडते, वाढते शत्रुत्व जातीसाठी

माणसाला का कळेना?आपण काय करतो आहे

*

क्षणभंगुर आपले जीवन , केंव्हाही येथून जाणे

कळून ही सारे तो का ?संपत्तीने घर भरतो आहे

*

बांधूनी बंगले चार ठिकाणी राहतो एक ठिकाणी

येणे  नाही काहीच सवे, तरी का राबतो आहे?

*

जगा माणसासाठी आणि माणसासारखे रहा

देव तुझ्यातच असता तो  का जगी फिरतो आहे

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “माझी कविता…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझी कविता…” ☆ श्री आशिष मुळे ☆

माझी कविता म्हणजे

मला जड झालेली मुलगी नाही

आयुष्यभर हृदयाशी सांभाळाया

मला तर काहीच हरकत नाही

*

हवीहवीशी नसेल जरी ती इतरांसी

तिच्याविन मला दुसरी सोबत नाही

बाजारात जरी जागा नसली

हृदयीच्या देव्हाऱ्यात जागेची कमी नाही

*

पुसती मला प्रसिद्धी किती

मागती हुंडा याची जाण नाही

जरी बाप गरीब मी कवितेचा

तिच्या आईची ह्यांना कल्पना नाही

*

ठीक आहे होणार नाही बेस्ट सेलर

तरी ती माझी आहे दुसऱ्याची नाही

माझ्यासाठी ती माझी मोक्ष-लक्ष्मी

प्रकाशकांच्या ती नशिबी नाही

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एक – काव्ये दोन – भक्त रिंगण सोहळा…  ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ चित्र एक – काव्ये दोन – भक्त रिंगण सोहळा…  ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

(१) 

वाखरीतले रिंगण

उद्या विठ्ठल दर्शन

पांडुरंग भेटीलागी

कासावीस झाले मन

*

वारीतून चालताना

टाळ चिपळ्याची धून

आता लागलीसे आस

 कधी होईल दर्शन

*

 माय चंद्रभागा स्नान

 होई शिणवटा दूर

 भूमिवरचे हे वैकुंठ

 अजी हेच पंढरपूर

*

 आधी कळस दर्शन

 मग पुंडलीक पायरी

 देवळात प्रवेशता

 उभी माऊली सामोरी

*

 स्पर्श होत माऊलीचा

 सारा शीण गेला दुरी

 डोळाभरून पहाते

 पांडुरंगा परोपरी

*

 भेट घेता विठ्ठलाची

रखुमाई बोलावते

 ठेवी डोईवर हात

 मन भरूनिया येते

*

 शांत शांत होता मन

 सरे सारी धाकधूक

 परतूनी कधी येणे

पांडुरंगाला ठाऊक

*

विठ्ठल  विठ्ठल 

कवयित्री : नीलांबरी शिर्के

(२) 

*

पेपरात पाहताना    

भक्त रिंगण सोहळा

गेले वारीमधे मन

पाहते तो याची डोळा

*

टि व्ही लावता घरात

दिंड्या पताकांची दाटी

सावळ्याची घडो वाटे

याच जन्मी डोळा भेटी

*

 मनी भेटीलागी आस

 विठू हाच नित ध्यास 

 वारीमधे मिसळून

 वाटे झेलावा पाऊस

*

पावसात चिंब व्हावे

भक्तिरसात नहावे

रिंगणाच्या सोहळ्यात

देहभान विसरावे

*

 विसरावे वाटे सारे

संसाराचे व्यापताप

 परतूनी आल्यावर

 मन होई शांत शांत

*

 व्याप सारे सांभाळाया

 माऊलीच देते बळ

 विठ्ठल, विठ्ठल मुखी नाम

 माझे जगण्याचे बळ

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आय कन्फेस… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? कवितेचा उत्सव ?

आय कन्फेस…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

(सहवास फक्त सुखासाठी नसावा ,सावरण्यासाठीही असावा.जसा शरीर न् मनाचा सहवास..! मनाचा सद्सद्विवेकाचा अंकुशच तर शरीर-मनाच्या सहवासाचं प्रयोजन..! पण तोच अंकुश जुमानला नाही तर..? याच जर-तरची ही कविता…!)        

……..

त्याचा रंग,आकार,उंची,रूंदी

कांहीच  कधी नव्हतं जाणवलं

तेच माझं मन एक दिवस

माझ्या अलगद स्वप्नात आलं

तिर्‍हाईतासारखं समोर उभं राहिलं !

उभ्या शरीरात भरून राहिलेली 

मनाची माझ्या रिती पोकळी…

चटकन् जाणवली न् मी त्याला ओळखलं…

तेही मग भरून पावलं

छानसं हसलं,तेवढ्याशा हसण्यानंही ….

त्याचं थकलं रूप एकदम उजळलं  !

“किती थकलायस..,किती वाळलायस..”

त्याला मी एवढंच विचारलं

त्यातल्या ओतप्रत ओलाव्यानं,

ते…थोडं शहारलं…!

रोखून  फक्त पहात राहिलं ..

नजरेतली त्याच्या धग पाहून

मी हळूच खाली पाहिलं

त्याला नजर द्यायचंच टाळलं..!

माझीच किंव केल्यासारखं

उपहासानं ते म्हणालं ,

“तुझ्या सुखाच्या इमल्याचं,

बांधकाम आता सुरू होतंय

‘पायाभरणीचा दगड’म्हणून..

तूच तर माझा बळी देतोयस..

मरण माझं आता असं

अटळ तर आहेच,

सोबत बोचरी एक खंतही आहे..

माझं हे बलिदान व्यर्थच तर जाणार आहे……

अरे,असं रानोमाळ भटकून सुखाच्या शोधात

मिळवू शकशीलही तू सुख समाधान..,पिऊन मृगजळ,

पण मीच हयात नसेन तेव्हा 

ते ठेवशील कुठे, ..कुणाजवळ..?”

अभय मागत ते मला सतत हेच 

विचारत राहिलं आणि चिडून जाऊन मीच त्याला मुठीत पकडून आवळून टाकलं….

त्याच्याच  आकांताने जेव्हा

दचकून झोपेतून जाग आली,आळसावलेल्या सुस्त शरिराने मनाच्या उभारीची वाट पाहिली…..पण..मन..??

ते तर केव्हाच मेलं होतं..,

मीच..मीच त्याला मारलं होतं…!!

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हास्यमुद्रा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हास्य मुद्रा ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

हास्य मुद्रा तुझी पाहता

मन माझे मोहूनी गेले

चिंब भिजले यौवन तव

मनास या गुंतवित गेले

*

तव रुपाची नशा आगळी

अंगावरी चैतन्य झळाळी

हिरव्या मखमालीची वसने

वरती ही नक्षी  सोनसळी

*

लेकुरवाळे रुप साजिरे

पाना फुलांतून विलसते

तृप्त अशी ही प्रियतमा

मला प्रीतीने साद घालते

*

दूर जरी मी असलो राणी

तुला भेटतो क्षितीजावरी

आपुली प्रीती युगायुगांची

निळी शाल तुज मी पांघरी

*

 सरिता निर्झर सागरही 

वृक्षवल्ली वनराई अपार

खग-विहगांचे कूजन रंगे

केशकलापी पुष्पसंभार

*

पाऊस धारांमध्र्ये सखये

प्रीती ही भरास आली

चैतन्याच्या उर्मीने भारली

नभ धरेची प्रीत आगळी

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 184 – माझे माहेर माहेर ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

रंजना जी यांचे साहित्य # 184 – माझे माहेर माहेर ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

(अष्टाक्षरी रचना)

माझे  माहेर माहेर।

जणू  सुखाचा सागर।

अशा थकल्या मनाला।

भासे मायेचे आगर॥

*

माय माऊलीचे प्रेम

जसा फणसाचा गर।

तिच्या शिस्तीच्या धारेला

शोभे वात्सल्याची जर॥

*

आंम्हा मुलांचे दैवत

बाबा आदर्शाची खाण ।

लाखो बालकांचा दादा

त्यांना साऱ्यांचीच जाण॥

*

नाही आपपर भाव

संस्कारांनी शिकविले।

हवी मनाची श्रीमंती

अंतरात रुजविले॥

*

प्रिती भावा बहिणीची

बंध रेशीम धाग्यांचा ।

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे

मंत्र यशस्वी नात्यांचा॥

*

असे माहेर लाखात

जणू बकुळीचे फूल।

 देव दिसे माणसात

देई संकटांना हूल।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ करू तेज-पूजा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ करू तेज-पूजा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

दीप अवसेस पूजलेले दीप पाहून

मेणबत्तीदाणी बसली पहा रुसून॥

*

आसन आपले झालेले उदास पाहून

धागा जळे मेणबत्तीचा,गेले मेणाश्रू वाहून॥

*

सिंहासनास आली दया, गेले कानी सांगून

विझताना वात जा दूसरी लावून ॥

*

लावलेली दुसरी ज्योत, राहील मशाल होऊन

प्रज्वलीत तेज जाईल पुढे घेऊन ॥

*

माणूसही गेला म्हणजे, दिवा एक तेवतो

एका जन्मातूनी जाता जीव दुसरा घेतो ॥

*

तेज जन्मे तेजातून, नियम नियतीचा असा

तेज पूजा करण्याचा, दीप अवसेस वसा॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares