मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(वरील सुंदर पेंटिंग पाहून आठवल्या शांताबाईंच्या काव्यपंक्ती…! — संग्राहक : चंद्रशेखर देशपांडे ) 

या वळणावर वळताना मज

आठवते, की हेच तुझे घर

कोनावरले झाड तेच ते

अजुन ढाळिते हळवा मोहर

*

या वळणावर वळतांना मी 

कितीदा झाले कंपित, कातर

वीज धावली तनूतुनी जरि –

क्षण अडखळले पाऊल आतुर !

*

ओठांवरचे अधीर हासू

धीट लाजही डोळ्यांमधली

पुन्हा पुन्हा मनी घुटमळणाऱ्या

कवितेतील भावोत्कट ओळी –

*

अता न उरले तसले काही

संथ जाहले डचमळुनी जळ

गहन एकदा जे गमले मज

आज तयाचा सहज दिसे तळ

*

वळणावर या वळता तरिही

भरते काही उरी अनावर –

सुन्या मनाच्या भूमीवरती

ढळत राहतो हळवा मोहर !

कवयित्री – शांताबाई शेळके

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनाचे मंदिर… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ मनाचे मंदिर सुश्री नीलांबरी शिर्के 

मन मंदिरा देव्हारी

सदविचार गाभारा

सद वर्तन हा देव

मांगल्य ये परिसरा

*

 मन मंदिर स्वच्छता

 नीत्य नियमीत व्हावी

 माया ममतेची फुले

 अंतरातच फुलावी

*

 नको द्वेष न् मत्सर

 आप पराचे अंतर

 सत् कर्म करूनिया

 जपू मनाचे मंदिर

 

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य – “छोट्या छोट्या चुका…!” ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य – छोट्या छोट्या चुका…! ☆ श्री सुजित कदम ☆

त्याच त्याच गोष्टीआपण

किती वेळा ऐकतो

तरीसुद्धा आपण पुन्हा

त्याच चुका करतो…!

*

चुकांमधून काहीतरी

शिकता यायला हवं

कुठे चुकलो आपण

हे समजून घ्यायला हवं

*

पुन्हा पुन्हा त्याच चुका

म्हणजे शुद्ध गाढवपणा

चुकून सुद्धा नाही म्हणणं

म्हणजे केवळ मूर्खपणा

*

चुकलं तर चुकूदे

हरकत नाही काही..

आपण काही कुणी

साक्षात परमेश्वर नाही

*

चुकांमधून थोडा तरी

बोध घ्यायला हवा

पुन्हा चुक होणार नाही

हा संकल्प करायला हवा…

*

लहानपणी ऐकलेल्या

गोष्टी जरा आठवूया.

छोट्या छोट्या चुका आता

आपणच आपल्या टाळूया…!

© श्री सुजित कदम

मो .. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गय… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ गय… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सुखाला नुसते ‘शब्द’देखील सहज गवसत नाहीत

पण दुःख मात्र सोबतच घेऊन येते आपली ‘लय’

*

त्या वेशीवरती जर नसतीच झाली आपुली भेट

तर डोळ्यांमध्ये का दाटून आली असती ‘सय’

*

रोज सुचतच नाही लिहायला मजला काहीबाही

पण लिहिते करते दुःखानेही सोडून जायाचे ‘भय’

*

तसे ऋतूंचे बहरणे होते नेहमी‌प्रमाणेच सुरळीत

पण बेसावध क्षणी मोहरण्याचे होते आपुले ‘वय’

*

मी थांबले होते नंतर त्या मोहक वळणापाशी

पण होकाराच्या विलंबाने केलीच नाही माझी ‘गय’

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लाडाची गं लेक माझी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ लाडाची गं लेक माझी… ☆ सुश्री त्रिशला शहा

लाडाची गं लेक माझी

आली माझ्या गं भेटीला

कशी दिसते साजिरी

द्रुष्ट लागू नये तिला

*

आला संक्रांतीचा सण

काय सांगू तिचा थाट

काळी नेसली चंद्रकळा

गोड हसू चेहऱ्यावर

*

सासूसासऱ्यांची आहे 

लाडाची ती सून

कौतुक करती तिचे सारे

पुरविती तिची हौस

*

कशी नटली सजली

हलव्याच्या दागिन्यांनी

गळा शोभतो हा हार

आणि कानातले डूल

*

अशी सदैव असावी

हसत रहावी तु बाळा

आस हिचं माझ्या मनीची

डोळा भरुन पाहते तुला

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 258 ☆ एक उनाड दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 258 ?

☆ एक उनाड दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

वयाच्या या टप्प्यावर…

वाटते फिरता येईल तोवर,

मुक्त फिरून घ्यावे,

सुख घ्यावे आणिक द्यावे !

 *

सोबती असाव्या—

आमच्याच पोरी बाळी,

आधारासाठी लागलाच जर,

हात द्यावा त्यांनी ऐनवेळी!

 *

प्रत्येक पिढीचे असते,

जगणे निश्चितच वेगळे

साधावा संवाद तरूणाईशी,

सांगावे शल्य मनीचे सगळे !

 *

 आजचा दिवस असाच,

उनाड होता—-

मस्त रेस्टॉरंट मधे भेटलो,

रुचकर जेवणासह, बोललो !

 *

अख्खा दिवस बरोबर असता,

 आलेली मरगळ गेली निघून

सऱ्याजणींच्या मनी आता

पुनर्भेटीची मंजुळ धून !

 *

या उनाड दिवसाने

सांगितले बरेच काही,

आला क्षण मस्त मानावा

उद्याचे काय? माहित नाही !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदाचे शिंपण… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदाचे शिंपण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त कविता)

 ☆

माझे जीवनगाणे गमते

तृप्त मनाचे गायन मजला

मागे वळुनी पाहता दिसे

मळा समाधानाचा फुलला ||

 *

संसार करावा निगुतीने

नाती जपावी आत्मियतेने

कर्म चांगले सत्शील वृत्ती

समाजसेवा ध्यास मनाने ||

 *

वृथा कुणाला ना हिणवावे

उगा कुणाला ना दुखवावे

प्रेमभराने जीव लावुनी

स्नेहबंधही घट्ट करावे ||

 *

अहंकार कर्मास नासवी

अभिमान स्नेहास संपवी

तरतम भावा जाणुनिया

विवेकपूर्णा कृती असावी ||

 *

आला क्षण आपुल्याच हाती

मनमुक्त जगावे आनंदाने

आनंद वाटावा सकलांना

हसतमुखाने शुद्ध मनाने ||

 *

मायबाप हृदयी पूजिता

त्यांची शिकवण आचरते

असेच माझे जीवनगाणे

आनंदाचे शिंपण करते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

आरसा ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

करता उगी कशाला बदनाम आरश्याला

बघण्यास रूप तुमचे त्याचा गुलाम झाला

 *

पाहून आरश्याला हुरळू नका गड्यांनो

तुमचेच रूप असली तो दावतो तुम्हाला

 *

माणूस माणसाला अंदाज देत नाही

होतो तयार नकली नात्यात बांधण्याला

 *

सत्यास शोधण्याची आहेत कारणे ही

बाजार माणसांचा विकतोय माणसाला

 *

आनंद वाटताना नव्हता विचार केला

फिरले नशीब उलटे भलताच काळ आला

 *

निरखून पाहताना मी आरश्यात थोडे

आत्मा कुठे दिसेना मुखडा मलूल झाला

 *

आभार मानताना तो आरसा म्हणाला

तुमच्याच वास्तवाला लपवू उगा कशाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाहीचे स्तंभ… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाहीचे स्तंभ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(वनहारिणी – ८/८/८/८)

लोकशाहिला आधाराला

आहेत म्हणे चार स्तंभ हे

गोंधळ माजू नये म्हणोनी

असतात विधीकार स्तंभ हे

*

पळवाटांचा शोध लावती

त्यांना मोठा वचक बसावा

म्हणून येथे पोलीस रूपे

असती कार्यभार स्तंभ हे

*

ढासळू नये संसद अपुली

तोल उचलुनी सांभाळावा

यासाठी तर सुसज्ज असती

न्यायपालिका द्वार स्तंभ हे

*

पाय लंगडे तीन पाहता

चौथा आला आधाराला

सांभाळाया माध्यम म्हणजे

लेखणीचे प्रहार स्तंभ हे

*

कसले फसती पाय सदा हे

सत्तेला या सावरताना

बरेच पक्के हवे जनांचे

ऐक्याचे आधार स्तंभ हे

*

ताज घालण्या जनसत्तेला

सोनार कुशल तशीच जनता

निर्माणाला कारण बनले

सुवर्ण मंदिरकार स्तंभ हे

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सां ग ता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ सां ग ता ! ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

मन झाले मोरपीस

वाऱ्यासवे हले-डुले,

रांगोळी इंद्रधनुची

अंगा अंगात फुले !

*

 काय घडले कसे घडले

 माझे मला न कळले,

 धून ऐकून हरीची

 नसेल ना तें चळले ?

*

मनी झाली घालमेल

चुके पावलांचा ताल,

आर्त स्वर बासरीचा

करी हृदयी घाव खोल !

*

 झाले कावरी बावरी

 शोधले परस दारी,

 परि दिसे ना कुठेच

 मज नंदाचा मुरारी !

*

जादू अशी मुरलीची

वाट दावे मज वनीची,

दिसता मूर्ती हरीची

झाली सांगता विरहाची !

झाली सांगता विरहाची !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares