मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 232 ☆ तो दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 232 ?

☆ तो दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(जागतिकमासिकपाळीदिवस  -२८मे)

मला आठवतो

माझ्या ऋतूप्राप्तीचा दिवस-

20 नोव्हेंबर 1969!

तेरा वर्षे पूर्ण झाली तोच दिवस !

आईने बटाटेवडे आणि शिरा

केला होता ,

वाढदिवस म्हणून !

“मैत्रिणीं ना बोलव” म्हणाली होती !

पण कसं बोलवणार ?

ही गोष्ट लपवून ठेवायची होती मैत्रिणींपासून !

अपवित्र अस्पृश्य हीचभावना

बिंबवलेली मनावर –

मासिकपाळी बद्दल !

तरी ही बंडखोरी केली होती

त्या काळात ,

सत्यनारायणाचे घेतले होते

दर्शन” त्या” दिवसात !

तरी ही जनरीत रूढी म्हणून

बसावेच लागले होते “बाजूला”

माहेरी आणि सासरी ही !

आज इतक्या वर्षाने,

उठले आहे वादळ ,

बाईच्या “विटाळशी”पणाचे !

आम्ही स्विकारलेल्या अस्पृश्यतेचे आणि अपराधी

भावनेने केलेल्या त्या ऋषीपंचमीच्या उपवासाचे काय ?

आता घेतला आहे का नव्या

मनूने जन्म ?

लिहिली आहे का त्याने नवी संहिता रजस्वलेला पवित्र बनविण्याची ?

मला मात्र आज ही आठवतोय तो दिवस  –

अपराधीपणाच्या भावनेने संकोचून गेलेला !

(काही मंदिरात महिलांना प्रवेश नाही, त्या संदर्भात सुश्री तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा सुचलेली कविता)

© प्रभा सोनवणे

20 नोव्हेंबर 1969 !

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विडंबन काव्य… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ विडंबन काव्य… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

(तुझ्या गळा माझ्या गळा कवितेचं विडंबन- कै. राजकवी भा .रा .तांबे बडोदा यांची क्षमा मागुन )

पायात कळा

डोक्यात कळा

पोटात फिरतोय

वायगोळा !!

      ।। ध्रु ।।

 

तुझी कळ

माझी कळ

कुठला भोगतो

हा छळ

कुठून येणार हे बळ

मलाच तुझा कळवळा !! ।। 1 ।।

 

तुझ्या कळा माझ्या कळा

दाखवू दोघेही डॉक्टरला

 

तुला औषध

मला गोळी

आणखी इंजेक्शन कुणाला ?

वेड लागले डॉक्टरला

आपल्याला नव्हे नर्सला !! ।। 2 ।।

 

तुझी काठी

माझी काठी

फिरू दोघे नदीकाठी

सरकली गुढघ्याची वाटी

नकोच आता अटी तटी !!

(म्हातारपण हे कश्यासाठी)

हात पाय कापतात

चळाचळा ।। 3 ।।

 

तुझ्या गळा माझ्या गळा

कळा येतात वेळोवेळां

 

तुझे पित्त

माझा संधिवात

आणखी खोकला कुणाला ?

भुर्दंड नुसता खिशाला

गावठी उपाय परवडला 🤠 ।। 4 ।।

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #239 ☆ सतार हृदयी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 239 ?

सतार हृदयी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

छोटेखानी कपाट हृदयी

इथे मांडशी किती पसारा

घर शिस्तीचे माझे सासर

थंड ऋतुतही चढतो पारा

*

तो अश्रूचा आहे ओघळ

आरशास का कळते केवळ ?

जगा वाटते श्रावण धारा

इथे मांडशी किती पसारा

*

ऋतू कोवळे इथे फुलांचे

फूल पाखरा बागडण्याचे

माझ्यासाठी का ही कारा ?

इथे मांडशी किती पसारा

*

संसाराचे स्वप्न पाहिले

सुरात होते गीत गायिले

सतार हृदयी तुटल्या तारा

इथे मांडशी किती पसारा

*

दिसले कोठे गलबत नाही

नुसते पाणी दिशास दाही

मला रोखतो रोज किनारा

इथे मांडशी किती पसारा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निळी शाई… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

निळी शाई... ☆ श्रीशैल चौगुले ☆

ही निळी-निळी,शाई-शाई

माझ्या काळजाचे पान होई

भले दुःख सहजची पेई

मज जगण्याचे बळ देई

हि निळी-निळी,शाई-शाई.

*

पुस्तकांसी नाती-गोती

अंधाराला ज्ञान ज्योती

मना संवादाचा ध्यास

धागा ज्ञानेशाचा बोई

ही निळी-निळी,शाई-शाई.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ करावी कीव …पण कोणाची ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– करावी कीव …पण कोणाची? – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

घडली घटना,

गेले जीव |

ढिसाळ व्यवस्थेची,

करावी कीव |

*

मोडले संसार,

फुटल्या बांगड्या |

पुसली कुंकू,

विस्कटल्या घड्या |

*

तुटली आधाराची काठी,

हरवले पित्याचे छत्र |

होत्याच नव्हतं झालं,

नियतीचा घाव विचित्र |

*

पाच लाखाची मदत,

गेल्या जीवाची किंमत |

बजबजल्या भ्रष्टाचाराची,

वाढलीय हिम्मत |

*

अधिकारी मोकाट,

मालक निर्धास्त |

चौकशीच्या फेऱ्या,

लाल फीत सुस्त |

*

निगरगट्ट नेत्यांची वरात,

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी |

सामान्य माणसांच्या,

जीवावर उठलेले हेच वैरी |

*

फॅक्टरी इन्स्पेक्टर,

प्रदूषण मंडळ |

सगळेच खाणारे,

एकमेकांना बळ |

*

दोन दिवसाची बातमी,

मिडियाला खुराक |

पुन्हा दुसरी घटना,

कुठे बसेना चपराक |

*

कुटुंबाला दुःख,

कोसळले आभाळ |

अकाली तो गेला,

कुटुंबाची पुढे आबाळ |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वैराग्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

वैराग्य☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

केवढे हे भाग्य खोटे तू मला सोडून जावे

सारखे ध्यानीमनी मी दु:ख ते का आठवावे

*

थाटला दरबार आहे  स्वागताला वंचनेच्या

वाटते या सोहळ्याला चंद्रतारे बोलवावे

*

पेटलेला देह कोठे शांत होतो सावलीला

दैवताने घात केला हेच आता ओळखावे

*

संकटे आली तरीही  हात होते बांधलेले

संशयाला वाटले की माणसाला ठोकरावे

*

स्वप्न वेडे दिवस होते काळ सरला  वैभवाचा

थोडके उरलेत बाकी स्पर्श तेही संपवावे

*

राहिले बाकी न काही हात झाले संत दोन्ही

बदललेल्या वास्तवाने नेमके वैराग्य यावे

*

वासनांनी जींदगीला कैद केले कैक वेळा 

मुक्त तेचा काळ येता पाय गुंते सोडवावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 175 ☆ माणुसकी…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 175 ? 

☆ माणुसकी☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अंत्यओळ काव्य…)

प्रेमाचा मळा फुलला पाहिजे

मनाला मनं, भिडलं पाहिजे

आमंगल सर्व निघूनी जाता

ऐसे हे सर्व, झालेच पाहिजे.

*

ऐसे हे सर्व, झालेच पाहिजे

ऋणानुबंध जपल्या जावा

वैरभाव संपूनी सर्वतोपरी

माणुसकीच्या जावे गावा.!!

*

माणुसकीच्या जागे गावा

मनुष्य बनूनी जगून पहावे

शांत वृत्ती समतोल वृत्ती

आपुले आपण होऊनि असावे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आता तरी सावरा रे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

आता तरी सावरा रे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका

दाह आहे अंतरीचा  लेप वरचे लावू नका.

*

निसटले जे यश तयाला निश्चये मिळवेन मी

दूर माझा गाव गेला तरी  तो पुन्हा गाठेन मी

*

शब्द  साधे बोलतो तरी का बरे ते बोचती

फूल  वेचायास गेलो काटेच सारे टोचती

*

कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा

मूर्ख  सुखी लोळतो अन् शाहणा भोगी सजा

*

थांबवा हे खेळ फसवे लाज थोडी बाळगा रे

तोल ढळत्या या भूमीला, आता तरी सावरा रे

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येरे येरे पावसा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ येरे येरे पावसा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

आता बरस रे घना, झाली धरा कासावीस

हवे कशाला ते तुला, खोट्या पैशाचे अमिष?

*

साऱ्या जीव सजिवांचे, पाणी तोंडचे पळाले

डोळा दाटले पाणीही, गालावरीच सुकले

*

पहा हताशली झाडे, सुरु जाहले क्रंदन

पानाफुलांचे वैभव, दिले धरेला आंदण

*

ग्रीष्म जागचा हलेना, जसा नाठाळ पाहूणा

उरी पेटले आभाळ, कशी येईना करुणा.

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भेट सावळ्याची… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ भेट सावळ्याची… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

वैजयंती  माळा

विठ्ठलाचे  गळा 

सुखाचा सोहळा

डोळ्यापुढे माये

*

चंदनाची उटी 

मंजिरीचा गंध 

भक्तिमय मन

 जाहले गे माये

*

 तुलसी  दर्शन 

भेट सावळ्याची 

घरातच मज

घडली हो माये 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares