मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गं सखे चैत्रपालवी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ गं सखे चैत्रपालवी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

गं सखे चैत्रपालवी! 

केलीस चैतन्याची उधळण  

तुझ्या केवळ चाहुलीने 

जर्जरतेला मिळे संजीवन  

*

तुझ्या स्वागता सज्ज जाहली 

हिरव्या मखमलीची पखरण 

आमराईच्या छायेखाली 

होई सोनकवडश्यांचे नर्तन  

*

इवली इवली रानफुलेही 

पाखरांसवे करिती गुंजन  

गुलमोहर ही फुलून येतो 

देऊ पाहतो तुला आलिंगन  

*

मोगऱ्याचा फाया  करतो 

भोवताली सुंगंधी पखरण 

सृष्टीचे हे रूप विलोभनीय 

पाहण्या ते रेंगाळे दिनकर  

*

तुझ्या स्पर्शाने खुलतो, फुलतो 

हर प्रहर अन् हर एक क्षण क्षण  

*

गं सखे चैत्रपालवी, 

केलीस चैतन्याची उधळण  

तुझ्या केवळ चाहुलीने 

जर्जरतेला मिळे संजीवन  

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 226 ☆ स्वप्ननगरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 226 ?

स्वप्ननगरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

परवाच एका मित्रानं,

बोलवलं सगळ्या मित्रमैत्रिणींना,

त्याच्या घरी,

खूप आपुलकीनं आणि आग्रहानं !

 

पाठवलेल्या गुगल मॅपवरून,

साधारण कल्पना आली होती,

त्याच्या  उच्च – उच्चभ्रू सोसायटीतल्या,

आलिशान घरकुलाची,

मित्र वर्तुळात सारेच श्रीमंत,अतिश्रीमंत…

काही स्वकर्तृत्वावर ऐश्वर्य मिळवणारे…

तर काही “बाॅर्न रिच…”

गर्भश्रीमंतच!

बरोबरचे सारेच “मल्टीमिलीओनर”

धनाने आणि मनानेही !

 

 पण जुना बंगला सोडून,

नव्या आलिशान सदनिकेत,

नुकतंच रहायला  आलेलं

 हे सारं कुटुंबच किती नम्र

आणि विनयशील !

 

थक्कच व्हायला झालं,

आदरातिथ्य पाहून!

सारं कुटुंबच उच्च शिक्षित,

शारदेच्याच वरदहस्ताने प्राप्त झालेली लक्ष्मी!

 

 कुणाच्याच वागण्यात,

कुठलाचं अॅटिट्युड नाही …

जेवताना आग्रहाने वाढणारे,

तरूण हात, बाल हात,

किती सुंदर, सुसंस्कारित!

 

म्हटलं त्या मित्राला,

लहानपणी एक सिनेमा पाहिला होता,

“एक महल हो सपनों का”

ते स्वप्न साकारंलस तू !

 

संध्याकाळ ते रात्रीपर्यंतचा …

त्या वास्तूतला,

काळ खूपच सुंदर आणि सुखाचा!

 

ती मंतरलेली संध्याकाळ अनुभवत,

त्या स्वप्ननगरीतून बाहेर पडताना…

 

वाटलं पृथ्वीवरील स्वर्गच आहे हा ,

 

आणि

 

तो स्वर्ग मित्राच्या घरातहीआहे,

समृद्धीत आणि संस्कारातही !

“शुभम् भवतु”

हेच शब्द  सर्वांच्याच ओठी,

त्या कुटुंबासाठी !

© प्रभा सोनवणे

१६ एप्रिल २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनात चालत राहायचं… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवनात चालत राहायचं…  ☆ सौ. वृंदा गंभीर

ना कधी थकायचे

ना कधी हरायचे

सुंदर विचार ठेवून

नेहमीच जिंकायचे

 

        ना कधी झुरायचे

         ना उदास रहायचे

           स्वतःवर विश्वास ठेवून

             स्वकष्टाने मिळवायचे

 

ना कधी रडायचे

ना कधी घाबरायचे

इतरांचे सुख बघून

आनंदाने हसायचे

 

     ना कधी लपायचे

      ना काही लपवायचे

      संकटांना दोन हात करून

        जीवन प्रवासात चालायचे

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #233 ☆ मोगलाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 233 ?

☆ मोगलाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दार उघडाया आता घाबरते चिऊताई

कावळ्याच्या रुपामध्ये नराधम दिसे बाई

*

रात्र झाली खूप होती झोपत का पिल्लू नाही

चिऊताई पिल्लासाठी गात होती गं अंगाई

*

पडताच अंगावर सूर्य किरणं कोवळी

झटकून आळसाला फुलल्या या जाई जुई

*

पाखरांची चिव चिव उठताच ही सकाळी

चारा शोधण्याच्यासाठी झाली साऱ्यांचीच घाई

*

तुला पाहताच घास बाळ आनंदाने खाई

साऱ्या बालंकांची तेव्हा असतेस तू गं ताई

*

चिमण्या ह्या गेल्या कुठे दिसायच्या ठायी ठायी

अचानक आली कशी त्यांच्यासाठी मोगलाई

*

नातं भावाचं पवित्र सांगा निभवावं कसं

आता तर गुंडालाही म्हणू लागलेत भाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्र… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ चैत्र ☆ श्रीशैल चौगुले ☆

रेशमाचे क्षण

चैत्रसुखी मन

पालवीचे धन

कोकिळेचे गान.

*

भारद्वाज शुभ

उन्हातच वारा

उकाड्यात गार

वसंताचा तोरा.

*

आम्रतरु लिंब

धरेचा उसासा

दिमाखात चैत्र

मानवी दिलासा.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुढी-पाडवा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

गुढी-पाडवा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

गुढी उभारु मांगल्याची

अस्मितेची,चैतन्याची

ज्ञानाची नि प्रगतीची

सहकार्याची,प्रेमाची ||१||

*

प्रतिष्ठेची,सन्मानाची

राष्ट्राला  उद्धरण्याची

बंधुभावा जपण्याची

समतेची, मित्रत्वाची||२||

*

अपुर्णातुनी पूर्णत्वाची

करुणेची ,कोमलतेची

निष्ठेची नि पावित्र्याची. 

गगनाला भिडण्याची ||३|

*

सजण्याची,सौंदर्याची

हर्षभरे नटण्याची

पुष्पांची नि सुपर्णांची

गंधित ही सुमनांची ||४||

*

चैत्रातील आमोदाची

पल्लवांची नि गंधांची

आकांक्षांची,उत्साहाची

अशी गुढी उत्कर्षाची ||५||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एक… काव्ये दोन… (१) संस्कार संस्कृतीचा… (२) बदलता काळ… ☆ सुश्री निलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  चित्र एक… काव्ये दोन… (१) संस्कार संस्कृतीचा… (२) बदलता काळ… ☆ सुश्री निलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?– संस्कार संस्कृतीचा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

उपचार म्हणून  सण करता

हळू  संस्कृती लयास जाते

घरात गोडधोड  होतेच पण

सण मात्र  इव्हेंट  बनते

*

गुढीवरचा  कळस उन्हात

सोन्यासारखा  चमकतो

कडुलिंबाचे पानही हळूच

साखरगाठीशी मैत्र करतो

*

आयुष्यातले गोड कडवट

एकमेकाला साथ देतात

तांब्याच्या स्वस्तिकाला

शुभ चिन्ह जतन करतात

*

सणामागील  विज्ञानाला

विचार  करू ,समजून घेऊ

जतन करून पुढच्या पिढीस

संस्कार संस्कृतीचा वसा देऊ

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर   

?– बदलता काळ… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

उंच आकाशास साद घालणारी गुढी,

वन बी एच के मध्ये सजते |

कशाला सोसाव्या उन्हाच्या झळा,

घरामध्येच सावलीत ती लपते |

*

बदलला काळ,

बदलली जगण्याची शैली |

ना राहिली रीतभात,

ना उरली माणसं आपली |

*

किलो किलो चक्का फेटून,

भांडभर करत नाही श्रीखंड |

शुगर बीपी कोलेस्ट्रॉल यांनी,

आखलेत खाण्याचे मापदंड |

*

मोबाईल भरतो शुभेच्छांनी,

पण  भेटायाला नसतो वेळ |

बंद दार संस्कृती आत्ताची,

सृजनशीलतेचा लागेना मेळ |

*

गतिमान जीवन पद्धतीत,

उत्सवाची औपचारिकता उरलीय |

पाश्चिमात्यांचे अनुकरण सर्रास,

संस्कृती हळू हळू लोप पावतीय |

*

सनातन हिंदू धर्म आपला,

सण वार उत्सवांना मांगल्याचे स्वरूप |

विसरून कसं सारं चालेल,

हिंदू प्राचीन जीवनपद्धतीचे प्रारूप |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चेहरा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ चेहरा☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

ओळखीला ओळखीने दाद देतो चेहरा

मौन होते बोलके मग हासतो तो चेहरा

*

जोडली जाते नव्याने जागृतीची साखळी

विसरलेल्या आठवांचे गीत गातो चेहरा

*

मागचा इतिहास सारा जाणिवांचा जागतो

आवडीने निवडलेला याद येतो चेहरा

*

वेगळा संवाद होतो थांबलेला बोलका

वेदना  संवेदनानी  शांत होतो चेहरा

*

अंतरंगी माजते काहूर जेव्हा वेगळे

वादळी वा-यात तेव्हा दूर जातो चेहरा

*

लाघवी संवाद होतो संयमाने बोलतो

देखणा नसला तरीही भाव खातो चेहरा

*

जाणत्याना भेटताना संगतीने खेळतो

भावनांच्या वेगळ्या सौख्यात न्हातो चेहरा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 168 ☆ स्वप्न… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 168 ? 

☆ स्वप्न… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अंत्य-ओळ काव्य…)

गालावरची तुझ्या खळी

कोडे पडले सखी मला

स्वप्न सुद्धा पडतांना

त्रास देते खळी मला.!!

 

त्रास देते खळी मला

मी बेचैन जाहलो

तुझ्या खळीच्या नादात

मलाच मी विसरलो.!!

 

मलाच मी विसरलो

नाही काही आता उरले

तुला भेटण्यासाठी

मनाने पक्के बघ ठरविले.!!

 

मनाने पक्के बघ ठरविले

भेट तुझी घेणार मी

स्वप्न जे पाहिले सदोदित

त्यास साकार, करणार मी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेटेल कां ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 😞 भेटेल कां… 🕺💃 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

शर जाता तिच्या नयनांचे

मम हृदयास भेदून

आज वाटे झाले सार्थक 

माझे या जन्मा येऊन

*

उगाच सावरी पदर

जरी तो नसे ढळला

चित्त विचलित करण्याचा

लागला जणू तिज चाळा

*

भासते सहजच करी

दो हातांचे ते हातवारे

मज सम प्रेमवीर समजती

त्या मागचे सूचक इशारे

*

बोलणे तरी किती लाघवी

कानी वाजे जणू जलतरंग

गोडी अशी तिच्या वाणीची

होईल सन्याशाचा तपोभंग

*

भेटेल कां खरोखरी मज

अशी स्वप्ननगरीची अप्सरा

कां येऊन फक्त स्वप्नात

मिरवेल आपलाच तोरा

मिरवेल आपलाच तोरा

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares