मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग चार) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी 

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग चार) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

संध्याकाळचा चहा करायच्या निमित्ताने मी ओट्याकडे गेले. बकूमावशींचा कप खिडकीत ठेवला. हळूच हात जोडून विनवणी केली,’घरचे वेड्यात काढतील हो मला. फार काही गोंधळ घालू नका. झाडावरच बसा गुपचूप .” त्या थोड्याशा हसल्या की काय कोणजाणे?

काही वेळाने ‘अग्गोबाई सासूबाई बघत गवार निवडत बसले होते . “अगं काय फास्टात काम चाललयं. बाकी सिरिअल्सच come back झाल्याची खुशी वाटतं?” मी दचकून खाली बघीतलं. गवार almost निवडून झाली होती .मी कावरीबावरी होऊन इकडंतिकडं  बघायला लागले . हाहाहा s वासू जोरजोरात हसू लागला . त्यात एक बायकी हसणंही ऐकू येत होत.???

रात्रीची आवराआवर झाल्यावर मावशींची चाहूल घेत होते. चांगलं ठणकवायचं यांना.गुपचूप रहा .मदतबिदत काही नक्कोच! देवघरातून रामरक्षा म्हंटल्याचा आवाज आला . बकूबाई? देवा!देवा!!

बैस,बैस इथं हातानंच खूण करून जवळच्या पाटावर त्यांनी मला बसायला सांगितलं .” मी चालले बर का सुधा आता.वेटिंग लिस्ट संपली बरं. कोरोना आवाक्यात येतोय हो. आज कोरोनामुळे झालेले डेथ्स् कमी होते.उद्या सकाळी आठ वाजता माझ्या नंबर हो. त्या मेल्या यम्यानं मेसेज केलाय बघ  WhatsApp वर.”

मला कसंतरीच वाटलं एकाएकी. गळा भरून आला.बकूमावशींच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्या हलकेच थोपटत राहिल्या. झोप कधी लागली कळलेच नाही . सकाळी उठले तर मावशी दिसल्या नाहीत. चटचट आवरून कपाटातून घडी न मोडलेली छानशी लेमन  यलो साडी काढली. चाफ्याची वेणी केली. हो, एक मास्क सुध्दा आठवणीने ठेवला. चाफ्याच्या झाडापाशी  जाऊन बकूमावशींची ओटी भरली. वाकून नमस्कार केला. त्या प्रसन्न हसल्या. पिवळी साडी लपेटलेल्या,आंबाड्याभोवती चाफ्याची वेणी घातलेल्या बकूमावशी हात हलवत आकाशाकडं  मार्गस्थ होताना दिसत होत्या.

त्या दिसेनाशा होईपर्यंत मी ही हात हलवत होते .. . . . . कोण बरं ? . . वासू , आबा . . . दोघंही  हाका मारतायत? काय झालं  बाई?

“अगं अशी देवघरातच का झोपलीस ? काय  झालं सुधा ?” दोघंही  माझ्या कडं वाकून बघत होती. मी दचकून उठले खरी परंतु माझा हसरा, प्रफुल्लित चेहरा बघून दोघही अचंबित झाले .गालात हसत हलकेच मानेला झटका देऊन मी दैनंदिन कामाला लागले.

 समाप्त

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग तिसरा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी 

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग तिसरा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

तरीही एक शंका होतीच.

“मावशी तुम्ही तुमच्या घरात का नाही गेलात मग?”

“तो भुतांच्या राज्यातला नियम आहे .आम्ही आमच्या खर्‍या घरात राहू शकत नाही .तुझ्या  बागेतील  चाफ्याच्या झाडावर राहतेय मी. बकेट लिस्ट नं. एक”

बकूमावशींना जगण्याचा केव्हढा सोस!  हं—–

“हे बघ, जा झोप आता. उद्या जोशांच्या कडं डबा द्यायचाय़ ना? पोळी भाजी चा? मला हे आवडलं हं तुझं. सगळ्यांना मदत करतेस. जोशी काकू  होम क्वारंटाईन आहेत म्हणे”.

मी पुन्हा अचंबित !

“गं हे वरदानच आहे . मनकवड्या असतो आम्ही . . . . . . ‘भूतबायका हं!’ (भुताटकिणी नव्हे)

. . . . . सकाळी सहाचा गजर वाजला. मी धडपडतच ऊठले.केसांना बो बांधून पदर खोचतच ओट्याकडे धावले आणी . . . . . थिजून ऊभीच राहिले.माझा डोळ्यावर विश्वासच बसेना !! पोळी भाजी तैयार!! डब्बेही भरून ठेवलेले. गॅसवर चहाचं आधण ठेवताना मी हळूच चाफ्याच्या झाडाकडं बघीतलं. बकूमावशी हसत होत्या फांदीवर बसून, केसात चाफ्याची फुलं घालून. मी वासूला चाफ्याची फुलं काढायला पाठवलं.तो काही मिनिटातच हाका मारत आला टोपली  s s s भर s s फुलं घेऊन !

“सुधा~ अगं सुधा ~~ आज जादू झाल्या सारखी फुलं टोपलीत पडली बघ ! आकड्याची काठी फुलाकडे नेण्याचीच खोटी फूल खालीच!.”

मी झाडाकडं पाहिलं. मावशी पाय हलवत फांदीवर. गालातल्या गालात हसत.हातात कप.

त्यांनी मला डोळा मारला. (कसंतरीच झालंहो. .

वासूनं सुध्दा कधी डोळा नाही मारला हो.~~)

हु~श्श~ वासूला त्या दिसल्या नाहीत तर!

आज सगळी कामे पटापट होत होती मुळ्ळीसुध्दा दमणूक झाली नाही .धावपळ तर नाहीच नाही. मावशी होत्या ना मदतीला. मनात एक विचार येऊन गेला. . नकोच त्यांचा नंबर लागायला. राहूदेत माझ्याकडंच. पण बाई मी मनातल्यामनात जीभ चावली. एकदा तर बाई फजिती होता होता वाचले. तर काय झाले . . .

मी हॉलची सफाई करत होते .मावशींनी माझ्या कडून झाडू काढून घेतला. त्या पटापट हॉल मध्ये झाडू मारू लागल्या. आबा आले की तेव्हढ्यात काठी टेकत टेकत. “अगं सुधा, जरा तो टी. व्ही. लाव बरं . मला कोरोनाच्या बातम्या ऐकायच्यात.मुंबईत unlock आणी पुण्यात lockdown असं काहीतरी वासू सांगत होता .”

मी T.V. कडे वळणार तोच आबांची काठी पडल्याचा आवाज आला. मावशींनी त्यांना मागच्या मागे अलगद पकडलं म्हणून बरं बाई!

‘रामा! शिवा!गोविंदा!!’ मी कपाळाला हात लावला.आबा बोलत बोलत हॉलमध्ये आले. त्यांना फक्त हलणारा झाडू दिसला बहुधा.मावशी कशा दिसणार ?त्यांना घाम फुटला होता. मावशींच्या मदतीनंच मी त्यांना खुर्चीत बसवलं.मावशी पाण्याचा ग्लास घेऊन येतच होत्या . . . . तेव्हढ्यात ‘सुधा , कसला आवा. . ‘ वासूची एंट्री झालीच. पटकन ग्लास हिसकावून घेतला. बापरे ! वासूला तरंगत येणारा ग्लास  दिसला तर नसेल? तर्रि बर्र . र्र. . . आबांना सावरण्याच्या गडबडीत दुसरं काही बोलणं शक्यच नव्हतं. घामानं डबडबलेल्या मला बघून त्याला वाटले आबांच्या तब्बेतीचं दडपण

आलेय ! मावशी केंव्हाच पसार झाल्या होत्या.

आबा सावध झालेले बघून मी मागच्या पावलीच आत खोलीत पळाले आणी धपकन् बेडवर बसले. बसले कसली आदळलेच!! परिस्थिती ओळखून वासूनं छानसा चहा करून आणला.

“घाबरतेस काय अशी? B.P. ची गोळी घेतली नाहिये ,त्यामुळे चक्कर आली असेल.घे चहा घे,  विश्रांती घे थोडी बरं वाटेल.”

“आबांना देतो मी चहा बिस्किटं.गोळी ही देतो. तू आराम कर.”असं म्हणत तो खोलीतून बाहेर पडला.या सगळ्या गोंधळात मावशींचे दुपारच्या जेवणाचं ताट करायलाच विसरले. पण भांड्यात ताटं मात्र चार पडली होती ? मलाच नाही कळलं तिथं त्या दोघांना काय कळणार म्हणा?

क्रमश: ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग दुसरा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग दुसरा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

परवाच तर heart attack ने अचानक गेल्या पंचावन्न च्या आसपासच्या बकूमावशी आख्ख्या कॉलनीत ख्यातनाम होत्या. बडबड्या, विनोद करून सगळ्यांना हसवणार्‍या, कुणाच्याही मदतीला तत्पर!सगळी कॉलनी हळहळली. मलाही दोन दिवस झोप नाही लागली.

म्ह.. म्ह.. म्हण… म्हणजे… म्हणजे …. माझी दातखिळी बसली. पाय लटपटू लागले.

मी धाडकन खाली कोसळले… जाग आली तेंव्हा माझे डोके बकूमावशींच्या मांडीवर होते. ताडकन ऊडी मारुन ऊठले. मोठ्याने ओरडणार एव्हढ्यात त्यांनी मला ओठावर बोट ठेऊन गप्प राहण्याची खूण केली! आणी कॉफीचा कप पुढ केला! काही कळण्याआधी मी कॉफी पिऊन टाकली. ‘वा! काय पर्फेक्ट जमलीय!’ त्याही स्थितीत माझ्या मनात विचार आला. ‘जमलीय ना?दे टाळी!’ बकूमावशींचा हात पुढं आला. मा..झा..हा.. त आखडला. गरमागरम कॉफी पिऊन सुध्दा गारे sगा ss र .

मावशी म्हणाल्या,  “होय, बरोबर आहे तुझा अंदाज. मी अजून भूतच आहे बकूचं.” ?

“खूप भूक लागली म्हणून आले. पिठलं झकास होत हं!”

माझा चेहरा भितीनं अजूनही पांढरा फटक__

“काय करणार?  स्वर्गात जागाच नाही. यमराजाने पावती तर फाडली पण स्वर्गाचे दार बंदच !.. एकदम हाऊसफुल्ल !! वेटिंग वर आहे!!! मेल्या त्या कोरोना मुळे नुसती गर्दी च गर्दी !!!! तिथेही सगळे मास्क घातलेले लोक रांगेत ऊभे. ब्रम्हदेवही घाबरून PPE kit घालून बसलेत.”ही… ही… ही .. ??

“आणी अगो तो अश्विनी देव तो दारातच  थांबलाय किट घालून. या कोरोन्याने देवालापण घाबरवलं बघ. “पुन्हा ही . .ही. . ही. . ही. .

“तुल सांगते स्वर्गाच्या दारातच digital gun ने temp. चेक करून ‘PO2 बघून च आत घेतायत.”

“मला काही प्रॉब्लेम नाही ग. वेटिंग लिस्ट मोठी आहे म्हणून खाली पाठवल त्या यम्यानं.पाठवतो म्हणाला रेडा नंबर आलाकी.”

माझ्या पोटात कोपर ढोसून म्हणतात कशा — “मी ही माझी ‘बकेट लिस्ट’ पुरती करुन घेईन .”?  बापरे मी अजूनही श्वासहीन!?संध्याकाळी  बागेत पाणी  घालत होतीस ना  sss तेंव्हाच हळूच आत आले.चहा काय फक्कड होता म्हणून सांगू. पूर्ण दोन दिवस ऊपाशी होते ग.”

“अस्सं! म्हणजे वासूचा चहा तुम्ही  प्यायलात तर?” मी आवंढा  गिळत म्हंटलं.

असं म्हणताना मी हळूच त्यांची पावलं ऊलटी आहेत का हे चोरून बघत होते. त्या अगदी नेहमीसारख्या नीटनेटक्या दिसत होत्या.केसात मोगऱ्याचा गजरा सुध्दा होता. मावशींनी माझी नजर हेरली होती. पटकन साडी वर करून त्यांनी पावलं दाखवली. ती नॉर्मल होती.माझ्या खांद्यावर हात ठेऊन मावशी म्हणाल्या, “त्या सगळ्या ‘भूतश्रध्दा’ असतात गं. आम्ही माणसां सारखेच दिसतो. हां पण सगळीच माणसं नशीबवान नसतात!!”

 क्रमश: ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

संध्याकाळचे सहा वाजले असावेत. नेहमीप्रमाणे मी गॅसवर चहाच भांडं ठेवलं.

वासू येईलच इतक्यात. एक तासभर समोरच्या बागेत फिरून सहा वाजेपर्यंत येतोच तो.चहा घेत घेत अर्धा तास Zee Business बघतो. नंतर रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत आबांच्या खोलीत पुस्तक वाचून दाखवयाला जातो. मी टेबलवर चहा बिस्किटं ठेवली आणी बागेला पाणी घालायला गेले. थोड्या वेळाने देवापाशी दिवा लावण्यापूर्वी रिकामा कप सिंक मध्ये ठेवला. तेव्हढ्यात . .

“सुधा –s s  सुधा चहा  . . .s s s ”

काय हे? केव्हढा ओरडतोय हा! आणी चहा ? परत ?

“वाजलेत किती बघ.आणी आज स्वारीला पुन्हा तल्लफ आलीय? आत्ताच तर घेतलास.”

“कुठे? तू दिलाच नाहीस? काय हो आबा? घेतला का मी चहा?” अरे, आत्ताच तर रिकामा कप धुतला मी. मग हा चहा प्यायला काय भूत आलं होतं कि काय!”

“विसरतेस तू अलिकडे. दिलाच नाहीस तू चहा मला.”

मी थोड्या घुश्शातचं पुन्हा चहा ठेवला.

रात्री नेहमीप्रमाणे झाकापाक केली. उरलेली पोळी भाजी use and throw च्या डब्यात ठेवली. किचनचे लाईटस् ऑफ केले. दारखिडक्या बंद आहेत ना बघून बेडरुमकडं वळले. WhatsApp चे messages चेक केले.

‘आजही वेदचा मेसेज नाही. आता कानच ओढले पाहिजेत याचे’ असं मनात म्हणत मी चादर अंगावर ओढली… काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी चरफडतच ऊठले. किचनची खिडकी ऊघडी राहिली असावी. छे: छे: स्वत: लाच टपली मारून मी किचन मध्ये आले. आणी… आणी… बघते तर काय …. ?

कोपर्‍यावरच्या घरातल्या बकूमावशी मनलावून पोळी भाजी खात बसल्या होत्या.किचनची खिडकीवार्‍याने ‘थाड  थाड’

वाजत होती .अगबा s s ई s s s. माझ्या

अंगावर सर्रकन काटा आला. या… या… इथे?

..   क्क .. क्क्. ..  क… शा?

 क्रमश:

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धडा ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

☆ जीवनरंग ☆ धडा ☆ सौ. नीला देवल ☆

सुजय चौदा वर्षांचा आठवितला मुलगा एके दिवशी रुसून बसला.”बघाना बाबा, दादा मला त्याच्या टू व्हीलर वर बसू देत नाही.” ‘ अरे परवाच तीवर बसून दादा बरोबर भेळ खाऊन आलास ना?”‘ आणि तुझी नवी  सायकल आहेच की” पण मी आता मोठा झालो आहे.दादा येव्वढा उंच ही झालो आहे . दादाची टू व्हीलर मला चालवायची आहे.”” आरे आठरा वर्ष पूर्ण होऊन लायसन्स मिळाल्यावरच चालावं तू”.”पण बाबा मला चालवायला येतीआहे.” सुजय हतून बसला.  “दादा तू

सांग ना रे बाबा ना.” सुजू तू हट्ट केलास म्हणून एकदाच ते ही मैदानावर तुला मी मागे बसून चालवायला दिली. तेव्हां ही ती तुला आवरता येत नव्हती. मीच ब्रेक दाबून. थांबवली”. बाबा, दादापुढे सुजयचे काही चालले नाही. टू व्हीलर ची किल्ली दादा नेहमी त्याच्यबरोबरच ठेवी.

एके दिवशी प्यांट धुवायला द्यायच्या नादात किल्ली टेबलावर ठेवून तो आंघोळीला गेला. सूजयचे लक्ष तिकडे गेले. प्फकत एक गल्लीत चक्कर मारून परत किल्ली टेबलावर ठेवून देवू असा मनाशी विचार करून झटकन किल्ली घेऊन सुजय गाडीपाशी आला. किल्ली फिरवून दुचाकी चालू केली.बसून गेट बाहेर आला. वेगात निघाला. पण  अचानक कुत्र्याचे पिल्लू चकासमोर आले त्याला वाचवण्यासाठी सुजयने करकचून ब्रेक दाबला. गडीबाजुला घेण्याच्या प्रयत्नात ती एका दगडी कुंपणाला जोरात आदळली. सुजय गाडीखाली आडकला. कुत्रे केकट त निघून गेले. लोक धावत आले. दोघा चौघांनी गाडी बाजूला काढून सुजयला उठवले. सुजय लंगडत होता. बरेच खरचटले होते. खांद्यावरून लोक त्याला घरी घेऊन आले. दुचाकी ची किल्ली दिली.

सारा प्रकार आई,बाबा, दादांना सांगितला. नाकोत्या वेळी नाकोते केले की अशी शिक्षा मिळते बर सुजय.”बाबा म्हणाले. आई, दादा त्याच्या जखमा पुसून   आऊ शाध लावू लागले. दुखतंय असे म्हणायची ही आणि रदयाचीही चोरी झाली सुजयला. आईने त्याला गोड सरबत करून प्यायला दिले. तेंव्हा कुठे धडधड कमी होऊ न थोडे बरे वाटले.

“आरे सुजु मोठ्या माणसांच्या सांगण्यात काही तथ्य असते. मोठी माणसे अनुभवी असतात. लहानांना सावध करत असतात. पण तुम्हा मुलांना तो फुकटचा उपदेश वाटतो. पण आलेना प्रत्यंतर? मिळाला ना धडा?”आईने विचारले” हो आई आता आठरा वर्ष पूर्ण झाल्या शिवाय मी टू व्हीलर ला हात नाही लावणार.” “सुजय थोडक्यात निभावले. आज एखाद्या मला माणसा च्या अंगावर जोरात दुचाकी गेली असती तर जीव गेला असता त्याचा. आपल्या चुकीच्या वागण्याने कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता नको का घ्यायला?”बाबा म्हणाले.”हो,आई,बाबा मी या पुढे सारे लक्ष्या त  ठेवीन. चुकीचे वागणार नाही. तुमचे आईकेन,” सुजय खरोखरच तसे वागू लागला.

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- [email protected]

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेलवात ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ जीवनरंग ☆ ? तेलवात ? ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

(साहित्य विवेक कथास्पर्धा लघुतम कथा विभाग, उत्तेजनार्थ पारितोषिक)

नवरात्राची घटस्थापना झाली.उमाने मनापासून देवीची पूजा-आरास केली. देव्हारा प्रकाशाने उजळून निघालेला होता. मन प्रसन्न होत होते. फोटोतली देवी सुद्धा समाधानाने हसतेय असे वाटत होते. उमाला खूप छान वाटत होते. आरती, प्रसाद झाला. तिने देवीला हात जोडून प्रार्थना केली,”आई,तू नेहमीच तुझ्या या लेकीची सेवा गोड मानून घेतली आहेस. सदैव माझ्या घरावर तुझ्या कृपेची पाखर घातली आहेस. माते, अशीच कृपादृष्टी असू दे . आम्हाला सगळ्यांनाच सद्बुद्धी दे, उत्तम आरोग्य दे आणि हातून चांगले काम घडू दे.”

उमा दरवर्षी देवळात नवरात्राच्या तेलवातीसाठी तेल देत असे. पण तिथे जमा होणारा तेलाचा मोठा साठा, वाया जाणार तेल पाहून तिला वाईट वाटे. ‘देवीच्या दिव्याला एवढे तेल कशाला? तिची तेलवात करणारे आपण कोण पामर ? तिच्या कृपेची दीपज्योती तर अहोरात्र तेवत असते आणि आपली आयुष्यं प्रकाशमान होत असतात.’

उमाने आता थोडा वेगळा विचार केला. तिने यंदा हे तेल एखाद्या गरजू कुटुंबाला द्यायचे ठरविले. चार दिवस तरी त्यांच्या घरच्या जेवणाला चांगली चव येईल. देवीची तेलवात नक्की उजळेल.  दुसऱ्या दिवशी पूजा- प्रसाद झाल्यावर कामाला आलेल्या शांताला तिने बसविले. तिला प्रसाद दिला, ओटी भरली आणि ती तेलाची पिशवी तिच्या हातात दिली. हातात तेलाची पिशवी घेतली आणि शांताचे एकदम रूपच पालटले. अत्यानंदाने तिचा चेहरा फुलून आला. तिला काय बोलावे तेच समजेनासे झाले.

“काय झालं ग शांता ?”

“वैनी मला किती आनंद झालाय म्हणून सांगू ?”

“अग ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरून. काय झालंय?”

शांताने देवीला हात जोडले आणि म्हणाली,”वैनी, आईच्या किरपेनं माजा संसार धड चाललाय बगा. नवरा आता माज्याशी नीट वागतोय. पोरगं चांगलं शिकतंय. आणकी काय हवो वो मला? देवीची तेलवात करायची असं लई दिसापास्न माजा मनात हुतं.पन जमतच नव्हतं. घराच्या खर्चाचं तोंड सारकं वासलेलंच की.पन वैनी तुमी माझ्या मदतीला धावला बगा. माजं मोठं काम केलसा.आत्ता हितूनच देवळात जाते आणि देवीला तेल वाहूनच येते.येते वैनी.”

उमाला काय बोलावे तेच कळेना.ती एकदा शांताकडे आणि एकदा देवीकडे पहात राहिली.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – आंधळी वाट (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – आंधळी वाट (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

रात्रीची वेळ,दार खटखटण्याचा जोरदार आवाज आला. तो ऐकून मिस्टर आणि मिसेस वर्मा खडबडून जागे झाले. त्यानी आतूनच

विचारलं,  ‘कोण?’

‘पोलिस.दार उघडा.’

वर्मानी दार उघडलं. शेजारी त्यांची पत्नी कमलाही होती.त्यांनी प्रश्नांर्थक नजरेने पोलिसांकडे पाहिलं. डी.एस.पी. शर्मा त्यांना परिचितसे वाटले.

‘तुमचा मुलगा लोकेश ना? त्याला बोलवा जरा.’

‘शर्मा साहेब, लोकेशने काय केलं? तो तर इंजिनिअरिंच्या शेवटच्या वर्षाला आहे. रात्रंदिवस अभ्यास करत असतो.’

‘तुम्ही मला काय विचारता? आपल्या मुलालाच विचारा ना.’

तोपर्यत  लोकेश उठून आला. त्याच्या डोक्याला नि हाताला पट्टया बांधलेल्या होत्या. शर्मा साहेबानी इशारा केला. पोलिसांनी झटकन त्याला पकडला.

‘शर्मा साहेब, काय ते सांगा तरी.’

‘आपला मुलगा उपद्रवी विद्यार्थ्यांचा नेता आहे. गेल्या चार दिवसांत आपल्या मित्रांना घेऊन त्याने शासकीय संपत्तीचं खूप नुकसान केलय्. आगी लावल्या, गाड्यांची तोडफोड केली, पोलिसांवर दगडफेक केली.’

‘काय लोकेश, शर्मा साहेब काय सांगताहेत?’

‘हो. आम्ही स्वतंत्र भारताचे नवयुवक आहोत. घटनेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अभिव्यक्ती  स्वातंत्र्यावर पहारे ठेवण आम्हाला पसंत नाही. आम्ही विरोध करणारच.’

‘वर्मा साहेब, ह्याला विचारा, ह्यांना कोणी भडकवलं? आम्हांला त्याचं नाव माहित आहेच. त्याने स्वतः भडकाऊ भाषणं करून, मुलांचा ब्रेनवाश करून दंगली मध्ये ओढलं आहे. आता तुम्ही कोर्टात लढत रहा. मुलाचं भविष्य तर बर्बाद झालंच, शासकीय नुकसानीची भरपाई तुम्हांलाच द्यावी लागेल.’

पोलिस लोकेशला घेऊन गेले. कमला रडायला लागली. वर्मानी  आपल्या ओळखीच्या वकिलाला चौधरीना फोन लावला. त्यांनी झोपेतच सांगितलं, ‘रात्री काही होऊ शकत नाही. सकाळी बोलू.’

‘मी खात्रीने सांगते, लोकेश अगदी साधा आहे. तो दंगा धोपा करूच शकत नाही.’

‘कमला, तू घरातल्या कामात असतेस, मी कालेजमध्ये. आपल्याला आपला मुलगा काय करतोय याचा पत्ताच नसतो. त्याची संगत, सवयी काहीच माहीत नसतं. त्याने जे जे मागितलं, ते आपण चौकशी न करता देत गेलो. आपल्या खोट्या, बेपर्वाईच्या संगोपनामुळेच आज ही वेळ आली आहे.’

‘त्या दंगा भडकवणाऱ्यांचा सत्त्यानाश व्हायला हवा. त्यांचं काही जात नाही, पण आमची उरलीसुरली उमेदही खचली.’

‘ह्यालाच म्हणतात, सुक्या बरोबर ओलंही जळणं. नेत्यांनी आपली नेतेगिरी चमकवली, लेकीच्या सासरच्या मंडळींचा सारखा फोन येतोय, ‘लोकेश कुठे आहे? त्याला काही झालं नाही ना?’ त्यांनी टीव्ही वर दंगलखोरांबरोबरच्या लोकेशला ओळखलंय. त्यांना काय उत्तर देऊ?

कमला, आपण दोघेही अयशस्वी आईबाप आहोत. आपल्या मुलावर आपण चांगले संस्कार केले नाहीत, आणि त्याची बिघडलेली वागणूक आपण ओळखू शकलो नाही.’

‘गरीब गायी सारखा नि शिकलासवरलेला आपला मुलगा आतून असा असेल असं कधी वाटलंच नाही. त्याला फार स्वातंत्र्य दिलं हे आपलं चुकलंच, पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि लँपटापसुध्दा नेलाय. त्यात आणखी काय काय आहे कोणाला ठाऊक.’

‘कमला, आता शांत हो. एकदा त्या सुरुंग लावलेल्या वाटेवर गेलेला, कोणी ही परत येऊ शकत नाही. सगळं त्या ईश्वरावर संपवूया. इथे प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब स्वतः लाच द्यावा लागतो. उद्या चौधरी वकिलांशी बोलतो.’

मूळ हिंदी लघुकथा-‘अंधी सुरंग’ – लेखक – श्री आनंद बिल्थरे

मो.79997858808

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तहान – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

फादर फिलीप आणि सिस्टर मारीया यांच्याविषयी अपार कृतज्ञतेची भावना तिच्या मनात उचंबळून आली. आपल्या भावना व्यक्त करायला जस्मीन उठली. पण आज तिला बोलायला शब्द सापडेनात. ती इतकच म्हणाली,’ या क्रेशनं मला घडवले. या क्रेशबद्दल माझंही काही कर्तव्य आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी इथेच येईन. इथे राहूनच मी लोकसेवेचं कार्य करीन. लेप्रसीवर अधीक संशोधन करायचा आपला मानसही तिने बोलून दाखविला. पुन्हा विचारांच्या उदंड लाटा तिच्या मनात उसळल्या. ती दिवास्वप्न बघू लागली.

आपण परत आल्यावर एक छोटसं निकेतन निर्माण करायचं. महारोग्यांसाठी स्वच्छ नेटकी वसाहत आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी एक अद्ययावत हॉस्पिटल. क्रेशाच्या आसपास कुणी ‘लेपर’ असता कामा नये. कुणी भीक मागता कामा नये. प्रत्येकाने आपल्या वसाहतीत काम करावं आणि पोटभर जेवावं.

प्रभू येशू आपल्या निश्चयावर दृढ राहण्याचं सामर्थ्य देवो. पण आपण येईपर्यंत चार-पाच वर्षे तरी जाणार. तोपर्यंत इथली कोण कोण जीवंत असतील. त्यात आपले आई -वडील असतील का?  आपल्या हातून त्यांची थोडी तरी सेवा घडेल का?

जस्मीनशी कुणी कुणी बोलत होतं. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी… तिच्या शाळेतल्या चिमखडया… सिस्टर्स, रूम पार्टनर … पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं. हॉलमध्ये  समोर एक मोठं तैलचित्र लावलेलं होतं. त्या चित्रात प्रभू येशू कुणा स्त्रीला पाणी देत होता. खाली लिहिलेलं होतं, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.

तिला फादर फिलीपचं सरमन आठवलं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा. त्या पापी स्त्रीला प्रभूने दर्शन दिलं. आपले आई-वडीलही पापी होते का? त्यांना पाणी कोण देणार? येशूने त्या पापी स्त्रीला जवळ केले…. जीवंत पाणी दिले. आध्यात्मिक पाणी… तिची तहान कायमची भागली. आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यात डुंबत असतो. आकंठ. फादरनी  आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. खूप तहान. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरतोय, इतकी तहान….

क्रेशच्या बाहेर पडताना जस्मीनच्या मनावर या सार्‍या विचारांची गडद छाया होती. सुनीता तिला पुन्हा पुन्हा लवकर येण्याविषयी सांगत होती. ती जस्मीनबरोबर मुंबईपर्यंत जाणार आहे. जस्मीन टॅक्सीपर्यंत येते आणि बाकी सारे गेटजवळ. टॅक्सीचं दार उघडता उघडता तिला समोरच्या फुटपाथवर परिचित भिकारी दिसतात. आपले थोटे हात कपाळाशी नेऊन येणार्‍या–जाणार्‍यांची करुणा भाकणारे भिकारी. जस्मीन भिकार्‍यांपाशी येते. पर्समधल्या काही नोटा-नाणी ती प्रत्येकाच्या थाळ्यात, वाडग्यात टाकते आणि मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, माझ्या कार्यात यश यावं, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’

जस्मीन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. ती हात हलवते क्रेशच्या गेटच्याजवळ उभे असलेल्यांच्या दिशेने आणि त्याविरुद्ध फुटपाथवर बसलेल्या भिकार्‍यांच्या दिशेनेसुद्धा.

चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पाहत राहतात.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कीर्ती प्राप्तीचा मार्ग ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ८. कीर्ती प्राप्तीचा मार्ग

पांचाल नगरात कोणी एक सुदर्शन नावाचा राजा होऊन गेला. त्याचा एक पुत्र होता. तो बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होता. राजाने सुसंस्कार करून त्याचे प्रेमाने लालन–पालन केले होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्या वर एक दिवस राजाला संबोधून तो म्हणाला, “आर्य, कीर्ती संपादन करण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. कसे आचरण केल्यास मला कीर्ती प्राप्त होईल ते कथन करावे.”

त्यावर राजा म्हणाला, “ तू राज्य चालवत  असताना प्रजेला कोणत्याही प्रकाराचे दु:ख होणार नाही याची काळजी घे. श्रीमंत  व गरीब जनता यांचा योग्य प्रकारे विचार करून गरिबांना वेळोवेळी अन्न वस्त्र दान करून  त्यांचे  सर्वतोपरी रक्षण कर.  त्यामुळे तुझी कीर्ति  सर्वत्र पसरेल. श्रीमंतांना भरपूर दान करून कीर्ती प्राप्त होत नाही. यासाठी मेघाचा दृष्टांत लक्षात घे.  जलाच्या  दुर्भिक्ष्याने जेव्हा धान्य उगवत नाही,   कोमेजून जाते अशा समयी जेव्हा मेघ बरसतो तेव्हा त्याची कीर्ती सर्वत्र गायली जाते. मात्र सागरात कितीही जलवर्षाव  झाला, तरी मेघाची कीर्ती कोणी गात नाही. “

आपला हा पुत्र राज्य चालवण्यास  सक्षम आहे हे  जाणून  राजाने अर्धे राज्य त्याला दिले. पुत्राने त्या राज्याचा स्वीकार करून राज्य शासनाचे नियम पाळून  उत्तम प्रकारे राज्य केले. विशेषतः दरिद्री प्रजेचा पूर्णपणे विचार करून,  त्यांना अन्न व वस्त्र देऊन अत्यंत आदराने त्यांचे पालन केले.  त्यामुळे त्याची कीर्ती वृद्धिंगत झाली.

तात्पर्य – बुद्धीमान मंत्री राजदरबारी असले तर राज्याच्या रक्षणाची चिंता नसते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तहान – भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

तिला भिकार्‍यांच्या बोलण्याचं हसू येई. त्यांना पैसे दिले, तर देव श्रीमंत करणार म्हणे. मग देव सरळ त्यांनाच का पैसे देत नाही, तिला वाटे. पण असं असलं, तरी प्रभू येशूच्या उपदेशाचे संस्कार तिच्या मनावर होत होते. ‘दीन-दलितांचे दू:ख निवारण करा…. तुम्ही केवळ स्वत:साठी जगू नका. इतरांसाठी जगा. प्रभू येशू जन्मभर तेच करत राहिला. चर्चचे फादर आणि सिस्टर्स तेच करताहेत. फादर फिलीपनी रसाळ भाषेत केलेलं सर्मन तिला आठवे. मग तिला वाटे, त्यांच्या पसरलेल्या हातावर काही नाणी टाकावी. यांच्यातच कुणी माझे आई-बाप असतील. त्यांना घोटभर चहा घेता येईल. पाव-बटर खाता येईल. क्षणभर तरी त्यांच्या दु:खी-कष्टी चहर्‍यावर आनंदाची छटा उजळून जाईल, पण तिच्याकडे पैसे नसत. क्रेशमधून तिला आवश्यक ते सगळं मिळे. पुस्तकं, वह्या, शैक्षणिक साहित्य, कपडे. सगळं काही मिळे. पैशाची तिला कधी गरजच नसे. नाताळ, ईस्टर आशा काही प्रसंगी क्रेशच्या वतीने तिथे जमलेल्या भिकार्‍यांना मिठाई वाटली जाई.  जसमीन ते वाटण्यात पुढाकार घेई.  ती मनातल्या मनात म्हणे, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यानो, तुम्ही मिठाई खा. तृप्त व्हा. रोज जेवताना जस्मीन प्रार्थना म्हणे, ‘प्रभू मला जसे सुग्रास भोजन मिळाले, तसे माझ्या आई-वडिलांना मिळो. तसेच इतरांनाही मिळो. आमेन…’

आई-वडिलांचा उल्लेख ती आवर्जून का करायची, कुणास ठाऊक? पण तसा होत असे. सहवासाने प्रेम, आपुलकी निर्माण होते म्हणतात. तिला काही त्यांचा सहवास लाभलेला नव्हता. तरीही आपल मन त्यांच्या भोवतीच का घुटमळत राहतं. सतत त्यांचाच विचार का करतं, तिला काळत नसे. की त्यामागेही काही ईश्वरी संकेत आहे? तिला वाटे. आपली आणि त्यांची पुन्हा भेट होणार आहे का?

क्रेशमधील सारी जण तिच्यावर प्रेम करत. पण आपण इथे उपर्‍या आहोत, आपण मुळच्या त्या भिकार्‍यांमधल्या… ही भावना आपली जीवनकहाणी ऐकल्यापासून तिच्या मनात जी रूजली, ती तिला कधी उपटून टाकताच आली नाही.

जस्मीनला निरोप देण्यासाठी आज चार वाजता क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये एक छोटासा कार्यक्रम झाला. तिच्या अभ्यासू वृत्तीचं, नम्र, गोड वागणुकीचं सिस्टर मारीयानं खूप कौतुक केलं. ‘क्रेशाच्या सार्‍यांना तिचा अभिमान वाटला पाहिजे. शाळेतल्या सार्‍यांनी तिचा अनुकरण केलं पाहिजे…’ असा खूप काही काही बोलल्या त्या. जस्मीनलाही भरून आल्यासारखं झालं.

कुठल्या कोण आपण? यांनी किती केलं आपल्यासाठी आणि आपल्यासारख्या अनेकांसाठी…. केवळ आपल्याला त्यांच्या कळपात ओढण्यासाठी? लोकं टीका करतात. इथल्या लोकांना बाटवण्यासाठी सारा उपद्व्याप आहे म्हणतात. पण, टीका करणार्‍यांनी, नावं ठेवणार्‍यांनी काय केलाय आमच्यासारख्या मुलींना आसरा, निवारा, सुरक्षितता

लाभावी म्हणून? केवळ धर्मप्रसार करणं, एवढाच त्यांचा आंतरिक हेतू नाही, हे नक्की. निखळ माणुसकीचा झरा त्यांच्या हृदयात पाझरतो. प्रभू येशूच्या त्या देवदूताच्या संदेशावर, उपदेशावर त्यांची अपार श्रद्धा आहे. तो संदेश इतरांपर्यंत पोचवणं, म्हणजेच कळपात ओढणं की काय? आपल्या मातृभूमीपासून किती तरी लांब येऊन ते इथे राहिले. इथल्या लोकांची जमेल तशी सेवा केली. सार्‍यांना कुठे त्यांनी आपल्या कळपात ओढलय. आपण तर त्यांचे जन्माचे ऋणी….

क्रमशः … भाग 4

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print