(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी एक पुरानी कविता “सोनपरी ”. सुश्री प्रभा जी ने की लेखनी में वर्तमान ही नहीं अपितु बीते हुए दिनों के संस्मरणात्मक लेखन की अद्भुत क्षमता है। उनकी कविता के एक एक शब्द और एक एक पंक्तियाँ हमें स्वप्न सा अहसास दिलाती हैं। ऐसा अनुभव होता है जैसे वे क्षण चलचित्र की भांति हमारे नेत्रों के समक्ष व्यतीत हो रहे हों। वे पुराने दिन, वो गांव का घर, वो स्वप्निल वातावरण और ऐसे में स्वप्नों में सोनपरी का आगमन। अद्भुत, अद्भुत कविता । मैं यह लिखना नहीं भूलता कि सुश्री प्रभा जी की कवितायें इतनी हृदयस्पर्शी होती हैं कि- कलम उनकी सम्माननीय रचनाओं पर या तो लिखे बिना बढ़ नहीं पाती अथवा निःशब्द हो जाती हैं। सुश्री प्रभा जी की कलम को पुनः नमन।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 28 ☆
☆ सोनपरी ☆
(एक जुनी कविता)
मी झोपेत असते की जागेपणी?
मनाच्या गुहेत दाटून येतात,
असंख्य आठवणी!
एक चिमुकलं गाव मला साद घालतं,
तेव्हा आठवणींचे कळप
बेलगाम धावू लागतात,
शेतातून, मळ्यातून, फळांच्या बागातून, चिरेबंदी वाड्यातून!
आठवत रहाते….बैठकीची खोली,
माजघर, स्वयंपाकघर….खोल्याच खोल्या…
शेणानं सारवलेली हिरवीगार जमीन,
माडीवर जाणारा लाकडी जीना,
दारंच दारं….खिडक्याच खिडक्या….
दारादारास अडविणारा उंबरठा!
वाड्याभोवती दाट झाडी,
पिंपर्णीच्या झाडाखाली..
आजोबांची काळी घोडी!
पक्षांची किलबिल, ओढ्याची खळखळ…
मुलं माणसं, लगबग, वर्दळ!
पेटलेल्या चुली, पाट्यावरचं वाटण,
रांजणातलं लोणी, साखरेच्या गोणी,
धान्यांची पोती, शेंगा चे ढीग,
सारेच होते शिगोशिग!
तेव्हाच तिथे शिरली मनात,
एक स्वप्नाळू सोनपरी,
गोष्ट फार जुनी नाही,
याच काही वर्षातली !
सोनपरी चा नाॅस्टेल्जिया छेडत रहातो,
तिच धून, तिच गाणी….
मी झोपेत असते की जागेपणी?
मनाच्या गुहेत दाटून येतात….
असंख्य आठवणी!
-प्रभा सोनवणे
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]