मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #19 – नऊ रंगांची वस्त्रे ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एकसामयिक एवं सार्थक कविता “धूर्त सारथी”।)

 

 ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 19 ☆

 

 ☆ नऊ रंगांची वस्त्रे ☆

 

नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे लेऊन

ती समाजात मिरवते आहे

तरीही मला नाही वाटत

ती माझी जिरवते आहे

 

अक्षराच्या माथ्यावर असलेल्या

अनुस्वाराइतकी लाल टिकली

आणि स्लीवलेस ब्लाउजवर

नेसलेली तिची लाल भडक साडी…

मी कपाळभर रेखाटलेलं भाग्याचं कुंकू

ते मात्र तिला असभ्य पणाचं लक्षण वाटतं

 

आजच्या पिवळ्या रंगालाही

मी सांभाळलंआहे

हळदी कुंकाच्या साक्षीने

 

हिरव्या रंगाची साडी नसली तरी

हातभार हिरव्या रंगाचा चुडा

असतो माझ्या हातात कायम

 

निळ्या आकाशाखाली

मी रांधत असते भाकर

गरिबीच्या विस्तवावर

निसर्गाच्या सानिध्यात

 

राख-मातीने माखलेल्या, राखाडी रंगाच्या

दोनचार जाड्याभरड्या साड्या

आहेत माझ्याकडे, त्याच नेसते मी

ग्रे रंग असेल त्या दिवशी

 

सकाळी सकाळी सूर्याने केलेली

केसरी रंगाची उधळण

दिवसभरासाठी

उर्जा देऊन जाते मला

 

पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा

माळला आहे मी केसांच्यावर

त्याचा गंध सोबत करतो मला दिवसभर

 

आजचा रंग आहे गुलाबी

अगदी माझ्या गालांसारखा

पावडर लावून

पांढराफटक नाही करत मी त्याला

 

अंगणात लावलेल्या वांग्यानी

परिधान केलेला जांभळा रंग

आज माझ्या भाजीत उतरून

कुटुंबाच्या पोटाची सोय करणार आहे

 

नऊ रंगांची नऊ वस्त्रे

माझ्याकडे नसली तरी

निसर्गाच्या नऊ रंगांचा आनंद कसा घ्यायचा

हे शिकवलंय मला निसर्गानंच…!

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मराठी कविता ☆ श्रीतुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है.  आज उनकी कविता  धार्मिक एवं सामयिक है.  उनके ही शब्दों में – “श्री छत्रपती शिवरायांना भवानी मातेने प्रसन्न  होऊन तलवार दिली.म्हणून तुळजाभवानी मातेची “तलवार अलंकार” पूजा नवरात्रात केली जाते. त्या फोटोवरुन रचिलेल्या तुळजाभवानी चारोळ्या” – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे)

 

☆ श्रीतुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा ☆

 

छत्रपती शीवाजींना

तलवार ती भवानी

धर्म रक्षणाचेसाठी

दिली प्रसन्न होऊनी !!१!!

 

श्रीकृष्ण प्रसन्न होता

केली मुरली अर्पण

माता तुळजाभवानी

केले दैत्यांचे मर्दन !!२!!

 

राक्षसांना मारल्याने

भयभीत देवा सर्व

भवानीच्या मुरलीने

स्वर्ग प्राप्ती अनुभव!!३!!

 

शक्तीरुप महापूजा

आवर्जून बांधताती

अलंकार महापूजा

होतं असे नवरात्री !!४!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा

दिनांक:-५-१०-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #-17 – स्वार्थ वळंबा ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज  प्रस्तुत है मानव के स्वार्थी ह्रदय पर आधारित एक भावप्रवण कविता  – “स्वार्थ वळंबा। )

 

 ☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 17 ☆ 

 

 ☆ स्वार्थ वळंबा  ☆

 

आज मानवी मनाला स्वार्थ  वळंबा लागला।

कसा नात्या नात्यातील तिढा वाढत चालला।।धृ।।

 

एका उदरी जन्मूनी घास घासातला खाई।

ठेच एकास लागता दुजा घायाळकी होई।

हक्कासाठी  दावा   आज कोर्टात चालला ।।१।।

 

मित्र-मैत्रिणी समान , नाते दुजे न जगती ।

वासुदेव सुदाम्याची जणू येतसे प्रचिती

विष कानाने हो पिता वार पाठीवरी केला ।।२।।

 

माय पित्याने हो यांचे कोड कौतुक पुरविले।

सारे विसरूनी जाती बालपणाचे चोचले।

बाप वृद्धाश्रमी जाई बाळ मोहात गुंतला।।३।।

 

फळ सत्तेचे चाखले मोल पैशाला हो आले ।

कसे सद्गुणी हे बाळआज मद्य धुंद झाले।

हाती सत्ता पैसा येता जीव विधाता बनला।।४।।

 

सोडी सोडी रे तू मना चार दिवसाची ही धुंदी।

येशील भूईवर जेव्हा हुके जगण्याची संधी।

तोडी मोहपाश सारे जागवूनी विवेकाला।।५।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मराठी कविता ☆ श्रीतुळजाभवानी मातेस सविनय अर्पण ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है.  आज उनकी कविता  धार्मिक एवं सामयिक है.  उनके ही शब्दों में – “आज दिनांक:-५-१०-१९ रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्रीभवानी मातेच्या आजच्या फोटोवरून विनाविलंब रचिलेल्या चारोळ्या श्रीतुळजाभवानी मातेस सविनय अर्पण” – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे)

 

☆ श्रीतुळजाभवानी मातेस सविनय अर्पण ☆

 

श्रीविष्णूदेव असती

शेषाच्या शय्येवरती

अंबामाता घेत होती

नेत्रकमळी विश्रांती !!१!!

 

मलापासून निर्माण

झालेल्या दोन दैत्यांचा

ब्रह्मदेवे केली स्तुती

अंबा वध करी त्यांचा !!२!!

 

श्रीविष्णूंनी केली शैय्या

अंबामातेस अर्पण

शेषशायी अलंकारे

तिचे होतसे पूजन !!३!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा

दिनांक:-५-१०-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 8 ☆ चामुण्डेश्वरी – चरणावली ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी कविता चामुण्डेश्वरी – चरणावली जो वैद्यकीय विषय  पर आधारित  प्रयोगात्मक कविता है. श्रीमती उर्मिला जी  को ऐसी सुन्दर कविता के लिए हार्दिक बधाई. )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 8 ☆

 

☆ चामुण्डेश्वरी – चरणावली ☆

(नवदुर्गांची औषधी न ऊ रुपे)

 

उपासना नवरात्री

आदिमाया देवीशक्ती

महालक्ष्मी महाकाली

बुद्धी दात्री सरस्वती !!१!!

 

नवरात्री तिन्हीदेवी

युक्त असे नवू रुपे

औषधांच्याच रुपात

जगदंबेची ती रुपे !!२!!

 

श्रीमार्कण्डेय चिकित्सा

नवु गुणांनी युक्त ती

श्रीब्रह्मदेवही त्यास

दुर्गा कवच म्हणती !!३!!

 

नवु दुर्गांची रुपे ही

युक्त आहेत औषधी

उपयोग करुनिया

होती हरण त्या व्याधी!!४!!

 

शैलपुत्री ती पहिली

रुप दुर्गेचे पहिले

हिमावती हिरडा ही

मुख्य औषधी म्हटले!!५!!

 

हरितिका म्हणजेच

भय दूर करणारी

हितकारक पथया

धष्टपुष्ट करणारी!!६!!

 

अहो कायस्था शरीरी

काया सुदृढ करीते

आणि अमृता औषधी

अमृतमय करीते !!७!!

 

हेमवती ती सुंदर

हिमालयावर असे

चित्त प्रसन्नकारक

ती तर चेतकी असे!!८!!

 

यशदायी ती श्रेयसी

शिवा ही कल्याणकारी

हीच औषधी हिरडा

सर्व शैलपुत्री करी !!९!!

 

ब्रह्मचारिणी दुसरी

स्मरणशक्तीचे वर्धन

ब्राह्मी असे वनस्पती

करी आयुष्य वर्धन!!१०!!

 

मन व मस्तिष्क शक्ती

करिते हो प्रदान ही

नाश रुधीर रोगाचा

मूत्र विकारांवर ही!!११!!

 

रुप तिसरे दुर्गेचे

चंद्रघण्टा नाम तिचे

चंद्रशूर, चमशूर

करी औषध तियेचे !!१२!!

 

चंद्रशूरच्या पानांची

भाजी कल्याणकारिणी

चर्महन्ती नाव तिचे

असे ती शक्तीवर्धिनी !!१३!!

 

चंद्रशूर, चंद्रचूर

कमी लठ्ठपणा करी

अहो हृदय रोगाला

हे औषध लयी भारी !!१४!!

 

रुप चवथे दुर्गेचे

तिला म्हणती कुष्माण्डा

आयुष्य वाढविणारी

तीच कोहळा कुष्माण्डा!!१५!!

 

पेठा मिठाई औषधी

पुष्टीकारी असे तीही

बल वीर्यास देणारी

युक्त हृदयासाठी ही !!१६!!

 

वायू रोग दूर करी

कोहळा सरबत ही

कफ पित्त पोट साफ

खावा कुष्माण्ड पाकही!!१७!!

 

रुप दुर्गेचे पाचवे

ही उमा पार्वती माता

हीच जवस औषधी

कफनाशी स्कंदमाता !!१८!!

 

रुप सहा कात्यायनी

म्हणे अंबाडी,मोईया

कण्ठ रोग नाश करी

हीच अंबा,अंबरिका !!१९!!

 

हिला मोईया म्हणती

हीच मात्रिका शोभते

कफ वात पित्त कण्ठ

नाश रोगांचा करीते !!२०!!

 

रुप दुर्गेचे सातवे

विजयदा,कालरात्री

नागदवण औषधी

प्राप्त विजय सर्वत्री !!२१!!

 

मन मस्तिष्क विकार

औषध विषनाशिनी

कष्ट दूर करणारी

सुंदर सुखदायिनी !!२२!!

 

रुप दुर्गेचे आठवे

नाम तिचे महागौरी

असे औषधी तुळस

पूजतात घरोघरी !!२३!!

 

रक्तशोधक तुळशी

काळी दवना,पांढरी

कुढेरक,षटपत्र

हृदरोग नाश करी!!२४!!

 

रुप दुर्गेचे नववे

बलबुद्धी विवर्धिनी

हिला शतावरी किंवा

अहो म्हणा नारायणी !!२५!!

 

बलवर्धिनी हृदय

रक्त वात पित्त शोध

महौषधी वीर्यासाठी

योग्य हेच हो औषध !!२६!!

 

दुर्गादेवी नवु रुपे

अंतरंग भक्तीमय

करु औषधी सेवन

होऊ सारे निरामय !!२७!!

 

साभार:- लेखक:-विवेक वि.सरपोतदार

लेखक भारतीय विद्येचे  lndologist व आयुर्वेद अभ्यासक.

संकलन :- सतीश अलोणी.

 

©®उर्मिला इंगळे, सातारा

दिनांक:-४-१०-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता – ☆ आई आंबाबाई ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आज  प्रस्तुत है  नवरात्रि पर विशेष कविता  – “आई आंबाबाई। )

 

☆ आई आंबाबाई  ☆

 

अगं आई आंबाबाई
तुझा घालीन गोंधळ ।
डफ तुंणतुण्यासवे
भक्त वाजवी संबळ।
सडा कुंकवाचा घालू
नित्य आईच्या मंदिरी।
धूप दीप कापूराचा
गंध दाटला अंबरी।
दही दुध साखरेत
केळी नि मधाची  धार।
ओटी लिंबू  नारळाची
संगे साडी बुट्टेदार।
धावा ऐकुनिया माझा
 आई संकटी धावली।
निज सौख्य देऊनिया
धरी कृपेची सावली।
माळ कवड्यांची सांगे
मोल माझ्या जीवनाचे।
परडीत मागते मी
तुज दान कुंकवाचे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ महात्मा गांधी……! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

ई-अभिव्यक्ति -गांधी स्मृति विशेषांक-2

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। इस अवसर पर प्रस्तुत है उनकी मराठी कविता- महात्मा गांधी….!)  

☆ मराठी कविता – महात्मा गांधी…. ! ☆

 

लढा अहिंसेचा बापू

अजूनही  आठवतो

जग जोडण्याचा वसा

महात्म्यात विसावतो.

 

चरख्याचा मूलमंत्र

एकसूत्री गुंफियेला

बांधवांचा राष्ट्र पिता

शासनाने संबोधिला.

 

धोती पंचा हाती काठी

सत्याग्रह चळवळ

देश राहो एकसंध

हीच मनी तळमळ.

 

अहिंसेच्या तत्वातून

देशसेवा  आकारली.

रूपयांच्या नोटांवर

गांधी छबी साकारली.

 

दिडशेवा जन्मदिन

तत्वनिष्ठ कोंदणात.

न्याय, निती प्रणालीत

आहे नेता स्मरणात…. !

 

विचारांचा झाला घात

झाली हत्या मानवाची

मना मनात राहिली

मूर्ती  एक कर्तृत्वाची… !

 

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ बापू ☆ श्री सुजित कदम

ई-अभिव्यक्ति -गांधी स्मृति विशेषांक-1 

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  मैं श्री सुजितजी की  प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं । इस अवसर पर श्री कदम जी की इस कविता के लिए हार्दिक आभार. ) 

बापू

 

तुमच्या स्वप्नातला देश बापू

खूप खूप लांब राहिलाय.

तुमच्या स्वप्नातला भारत  आता

*खळ्ळ खट्याक* झालाय.

तुमची  अहिंसेची तत्व आता

कुणी सुद्धा पाळत नाय.

तुम्ही सुद्धा बापू

असं राजकारण करायला हवं होतं

स्वतःपुरते स्वातंत्र्य ठेवून

बाकीच्यांना गुलाम म्हणूनच

राहू द्यायला हवं होतं.

बापू,  तुमची किंमत हल्ली

आता पैशामध्येच होते.

मोठा छोटा गांधी म्हणून

ओळख तुमची होते.

तुमची अशी  अवहेलना

खरच आता पहावत न्हाय.

काय सांगू बापू

तुमच्या नावाचे कागदी घोडे हल्ली

लाॅकरमध्येही मावत नाय.

तुमच्या फोटोच्या

भ्रष्टाचाराच्या इथे नको इतक्या पावत्या  आहेत

तरीही त्याच्या सभ्यतेचे पेपरमध्ये

भले मोठे थाट  आहेत.

बापू,  शेतातला शेतकरी  आता

फासावरती दिसू लागलाय

उपोषणाने कित्येकांचा

रोजचा बळी जाऊ लागलाय.

बापू तुमच्या स्वप्नातला देश

खूप खूप बदललाय.

माणसा माणसातला जातीयवाद

आता नको इतका पेटलाय.

आणखी बरच काही बापू

तुमच्याशी बोलायचं राहून गेलं

*मोहनदास करमचंद गांधी*

इतकच नाव काळजात राहून गेलं. . . !

 

© सुजित कदम, पुणे

मो.7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #18 – धूर्त सारथी ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एकसार्थक कविता “धूर्त सारथी”।)

 

 ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 18  ☆

 

 ☆ धूर्त सारथी ☆

 

झालो गुलाम आहे सत्तांध या गटाचा

होतो विचार कोठे माझ्या इथे मताचा

 

सत्ता जरी बदलली मी हा तिथेच आहे

नेता धनाढ्य इतका व्यापार हा कशाचा

 

आश्वासने दिलेली होतील का पुरी ही

द्यावा कसा भरवसा सत्त्येतल्या ठगांचा

 

चारा दिसेल तिकडे घोडे असे उधळले

हो धूर्त सारथी मी होतो जरी रथाचा

 

सत्तेस भोगताना मी हात मारलेला

कारागृहात शेवट होणार या कथेचा

 

शिक्षा नकोच इतकी या सेवकास तुमच्या

मस्तीत गैरवापर होतो कधी पदाचा

 

पडलाय प्रश्न साधा जनतेस भाकरीचा

नापाक हा इरादा युद्धात झोकण्याचा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #-16 – गारवा ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज  प्रस्तुत है  उनकी एक भावप्रवण कविता  – “गारवा। )

 

 ☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 16 ☆ 

 

 ☆ गारवा   ☆

बहरला निसर्ग हा मंद धुंद  ही हवा।

तना मनास  झोंबतो आसमंत  गारवा। ।धृ।।

 

वृक्ष वल्ली उधळती गंध हा दश दिशा।

तारकाच उतरल्या  शोभिवंत.. ही नीशा।

चंद्र जाणतो कला  मनात प्रीत मारवा  ।।१।।

 

स्वप्न रंगी हा असा मन मयूर नाचला  ।

ह्रदय तार छेडताच प्रेमभाव जागला

धुंद  मधुर  नर्तना ताल पाहिजे  नवा ।।२।।

 

तेज नभी दाटता तने मनात नाचली ।

कधी कशी कळेना भ्रमर मुक्ती जाहली ।

रुंजी घालतो मना भ्रमर हा हवा हवा ।।३।।

 

वेचते अखंड मी  मुग्ध धुंद  क्षणफुलां।

क्षणोक्षणी सांधल्या अतूट रम्य शृंखला।

अर्पिली अशी मने सौख्य लाभले जीवा ।।४।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares
image_print