मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बातमी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बातमीश्री प्रमोद वामन वर्तक ☆

दृष्ट लागली माहेरघराला 

पडला विळखा पबवाल्यांचा 

दिवसा ढवळ्या निघू लागला 

धूर असली अमली पदार्थांचा

वाया चालली तरुण पिढी   

करू लागली विखारी नशा   

वारे वाढले गुंडगिरीचे अन्

भरकटली तरुणाई दाही दिशा

घेतली वाटे जणू समाधी 

गल्ली बोळातील देवांनी 

ऱ्हास विद्येच्या माहेर घराचा 

न पहावे म्हणती डोळ्यांनी

वाताहत ही पुण्यनगरीची 

बघवत नाही ठाणेकराला 

सद्बुद्धी द्यावी ‘त्या तरुणाईला’

विनवितो इथून दगडूशेठला

         विनवितो इथून दगडूशेठला …… 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हरवत चाललं आहे बालपण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – हरवत चाललं आहे बालपण  – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

हरवत चाललं आहे बालपण,

मोबाईलच्या व्यसनात |

अभ्यास, मैदानी खेळ, वाचन 

गुंडाळून ठेवलंय बासनात |

*

भूलभुलैय्या या आभासी दुनियेत,

सगळेच झालेत रममाण |

कोवळ्या वयात डोळे मेंदूवर,

पडू लागलाय असह्य ताण |

*

दोन जीबी डेटाचा रोजचा,

मोबाईलला लागतो खुराक |

अनलिमिटेड वायफाय असेल 

तर सर्वच वेळ बेचिराख |

*

लुडो, पब्जी , ऑनलाइन रमी,

क्रिकेट सारेच ऑनलाईन गेम |

भावी पिढीचे व्हावे नुकसान,

हाच आहे एकमेव नेम |

*

असामाजिक तत्व मोबाईल आडून,

मुलांच्या आयुष्यात घुसत आहेत |

तुमचं आमचं साऱ्याच राष्ट्राचं,

उज्वल भविष्य नासवत आहेत |

*

प्रिय सुजाण पालकांनो,

नका पुरवत जाऊ असे बालहट्ट |

वेळ देत रहा पाल्याला,

नात्यातील वीण होऊ द्या घट्ट |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू, मी, आणि पाऊस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – तू, मी, आणि पाऊस ?  सुश्री संगीता कुलकर्णी ☆

बरसू दे

अंगावरूनी थेंबांना

गालावरूनी निथळू दे

पापण्यांवरून ओघळू दे..

झोंबू दे वारा

मनात पसरू दे गारवा

तुझ्यासवे गंध मातीचा

झिरपू दे मनात..

घेता तुझा हात हाती

मोहक तुझ्या त्या स्पर्शाने

अंगी चमकेल वीज

गारवा पळून जाईल दूर..

स्पर्श तुझ्या नजरेचा

करतो बेधुंद माझ्या मना

बेभान होऊनी 

ओंजळीत घे या

अनमोल प्रीतीच्या क्षणांना..

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वटवृक्ष… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – वटवृक्ष – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

कुटुंबवत्सल वटवृक्ष,

पसरला दाट दुरवर!

घनदाट  छाया त्याची,

वाटसरूच्या शिरावर!

*

लहान मुले खेळती बागडती,

खेळती सुरपारंब्या मनसोक्त!

मोठ्यांना मोह न आवरे खेळाचा,

टांगाळून घेती आनंद होऊन  मुक्त!

*

प्राणवायूचे संतुलन राखतो,

विषारी वायू  स्वतः शोषून!

सहवास त्याच्या सोबत असावा,

सांगती शास्त्र आपणा उद्देशून!

*

भूजल साठा करतो मुळाशी,

सोडतो बाष्प उन्हाळ्यात!

अक्षयवृक्ष म्हणती यासी ,

हिरवागार साऱ्या ऋतूकाळात!

*

सुहासिनी पूजती यास,

मागती  दीर्घायुष्य पतीचे!

जन्मोजन्मीची साथ मांगे,

पूजन करती  पतिव्रतेचे!

*

उपयोग याचे असती अनेक,

दूर करी दंतदुखी असो मधुमेह!

लेप याचा ठरे  मोठा गुणकारी,

आयुर्वेदात महत्व नि:संदेह !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोलका निसर्ग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ बोलका निसर्ग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

गजरा ल्यायली जणू वाटते

हिरवीगार फांदी

नैसर्गिक सौंदर्याची असावी 

खरी हीच नांदी

*

निसर्ग झुलतो तोच डोलतो

निसर्ग शृंगार करतो     

निरामय मन जवळ जयाच्या

निसर्ग त्यासवे बोलतो

*

निसर्गास कितीतरी वेदना

मानवनिर्मित 

मूकपणाने तरी साधत जातो

तो जगताचेच हित

*

ज्यांच्यासाठी झटतो जीवनभर

तयाला जवळ करावे

निसर्गासही असते ना मन

ते संवादे सुखवावे

*

निसर्ग मानव समतोलाला

जरा स्वतः पुढे यावे

जपा जपुया सृष्टी श्रीमंती

नव्या पिढीच्या सुखास्तव

 ….. तुम्ही ,आम्ही अन सर्वांनी

 ….. जाणुया खरे वास्तव

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पावसाची फुलं… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ पावसाची फुलं… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

भूईवर टपटपणारी 

पावसाची फुलं

तुझ्यासाठी साठवेन म्हंटलं

पण तू पावसात चिंब भिजलेलीस

माझ्यासाठी.

पावसाच्या थेंबातून फुगे फुटत होते .

आणि तू म्हणालीस –

जोर आहे रे पावसात आजच्या.

मी मात्र; 

थुईथुईणाऱ्या 

पावसाच्या फुलांत मग्न

फक्त तुझ्यासाठी.

आणि 

आजचा पाऊस 

मनसोक्त कोसळत राहिला

तुझ्या माझ्यासाठी

अशी पावसाची फुलं होऊन..!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मृगाचा पाऊस… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – मृगाचा पाऊस – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

 मृग नक्षत्राच्या | कोसळती धारा |

पोट पाणी चारा | प्राणीमात्रा ||१||

*

बळीराजा पाहे | पावसाची वाट |

अन्नधान्य ताट | जगासाठी ||२||

*

पेरून बियाणं | आपल्या शेतात |

आशा ती मनात | समृद्धीची ||३||

*

जगाचा पोशिंदा | मागे एक दान |

पीक पाणी छान | हंगामात ||४||

*

उघडे आभाळ | सर्वस्व त्या खाली |

निसर्ग हवाली | शेतीभाती ||५||

*

चार मास नाही | घेणार विश्रांती |

साठवणी अंती | समाधान ||६||

*

बिब्बा म्हणे मृगा | तुझे आगमन |

सुखावते मन | सर्वार्थाने ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सृजनता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ सृजनता … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

करवतीने कापा करकर

घाव कुऱ्हाडीचे दणादण

पाण्यामधे करा प्रवाही

कुजेन मी मग तेथे कणकण

*

पाण्यामधे कुजता कुजता

शेवटपर्यंत जपेन सृजनता

जलावरच्या देही जन्मली

म्हणूनच ही सृष्टी संपन्नता

*

या निसर्ग वृत्तीमुळेच आहे 

अजूनही जगी या हिरवाई

अमानुष कत्तल  वृक्षांची

 अन कसरत ही समतोलाची

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वटपौर्णिमा… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – वटपौर्णिमा – ? ☆ श्री राहूल लाळे ☆

तो वड एक महान

घालून प्रदक्षिणा ज्याला

परत  मिळवले सावित्रीने

आपल्या प्रिय पतीचे प्राण

*

तो आणि असे अनेक वड

अजूनही उभे आहेत

पाय जमिनीत रोवून घट्ट

ऐकतात दरवर्षी ते

नवसावित्रींचें  पतीहट्ट

*

वडाला फेऱ्या मारणाऱ्या

दोरीचे बंध बांधणाऱ्या,

सगळ्याच स्त्रिया का  सावित्री असतात ?

ज्यांच्यासाठी  त्या व्रत करतात

सगळे का  ते सत्यवान असतात ?

*

सात जन्मी हाच मिळावा जोडीदार

यासाठीच  होते जरी प्रार्थना

मनात दोघांच्या असतात का

नक्की तशाच भावना ?

*

सावित्रीला आजच्या.. खरंच का हवा आहे

सत्यवान तो जन्मोजन्मी ?

आणि ज्याच्यासाठी उपास करतात

सत्यवानाला त्या  हवीय का तीच सावित्री पुढल्या तरी जन्मी !!!

*

सावित्री -सत्यवान महती त्यांची थोर

त्यांच्यापुढे आपण सारे लहानथोर

महत्वाची आहे तरी प्रेमभावना

*

सात जन्म कोणी पाहिलेत ?

हाच जन्म महत्वाचा

मिळाली ती सावित्री

आहे तो सत्यवान जपायचा

*

संस्कार म्हणून  वटपौर्णिमा

सण साजरा करत राहूया   …

पतीपत्नी सारे विश्वास अन् प्रेमाचं रोप सतत फुलवत ठेऊया

© श्री राहुल लाळे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ज्ञानमंदिर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ज्ञानमंदिर – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

चित्रकाव्य : “ ज्ञानमंदिर “ 

*

शैक्षणिक वर्ष | आज सुरुवात |

मुले आनंदात | शाळेमध्ये ||१||

*

शिक्षकांच्या मनी | ओसंडला हर्ष |

स्वागत सहर्ष | विद्यार्थ्यांचे ||२||

*

दोन महिन्यांची | संपलीय सुट्टी |

जमणार गट्टी | वर्षंभर ||३||

*

शाळेतली घंटा | रोज वाजणार |

प्रार्थना होणार | शारदेची ||४||

*

सरस्वती पूजा | विद्येचा संकल्प |

नवीन प्रकल्प | अभ्यासात ||५||

*

नवीन पुस्तकं | वही व लेखणी |

रोज उजळणी | अभ्यासाची ||६||

*

किलबिल गुंजे | ज्ञान मंदिरात |

शुभ सुरवात | मांगल्याची ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares