सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
वाचताना वेचलेले
☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..
मला हे थोडंफार पटलंही….
एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….
या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….
माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..
मला हे थोडंफार पटलंही….
एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतीली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….
या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….
लेखक – अज्ञात
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈