ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

लक्ष्मण बळवंत भोपटकर

लक्ष्मण बळवंत ऊर्फ आप्पासाहेब भोपटकर (1880 – 24 एप्रिल 1960) हे पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी वं वकील होते. ते केसरी वृत्तपत्राचे संपादक, महाराष्ट्र मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक, हिंदू महासभेचे अध्यक्ष, एवढेच नव्हे, तर व्यायामशास्त्रतज्ज्ञही होते.

ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वकील होते.गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले त्यांनी एक पैसाही न घेता चालवले.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी सोलापूर नगरपरिषदेवर राष्ट्रीय झेंडा फडकवला.1937च्या हैद्राबाद सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगावास भोगावा लागला.

त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ‘ऐतिहासिक कथापंचक’, ‘नवरत्नांचा हार’आदी ऐतिहासिक पुस्तके, ‘कुस्ती’, ‘माझी व्यायाम पद्धती’, ‘स्त्रियांचे व्यायाम’ इत्यादी व्यायामविषयक पुस्तके, ‘काँग्रेस व कायदेमंडळ’, ‘स्वराज्याची मीमांसा’, ‘हिंदू समाज दर्शन’ इत्यादी राजकीय व सामाजिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

‘केसरी प्रबोध’, ‘केळकर’, ‘पुणे सार्वजनिक सभा ज्युबिली अंक वगैरेचे त्यांनी संपादन केले.

☆☆☆☆☆

रघुनाथ पांडुरंग करंदीकर

रघुनाथ पांडुरंग करंदीकर (21 ऑगस्ट 1857 – 24 एप्रिल 1935) हे पेशाने वकील होते. ते मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते.

ते जेथे जात, तेथून ऐतिहासिक साधने गोळा करून आणीत.1918मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचा भारताच्या रेसिडेन्टबरोबर झालेला पत्रव्यवहार नकलून आणला. मेणवली येथील नाना फडणवीस यांचे दप्तर त्यांच्या वंशजांकडून मिळवून त्यांनी ते दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्याकरवी प्रसिद्ध करविले.

त्यांची पुस्तके :केदारखंड -यात्रा हे 1936मधील पत्ररूपी प्रवासवर्णन.  विलायतेहून धाडलेली पत्रे. र. पां. करंदीकर यांची दैनंदिनी.

ते 1905 साली साताऱ्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

☆☆☆☆☆

पुरुषोत्तम नारायण फडके

पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री (1 मे 1915 – 24 एप्रिल 2015) हे रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक होते.

फडकेंनी अत्यंत कठीण अशा परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेची व्याकरण चूडामणी व काशीच्या संस्कृत विद्यापीठाची व्याकरणाचार्य अशा दोन पदव्या मिळवल्या. त्याशिवाय बडोदे व म्हैसूर संस्थांनाच्या व्याकरण परीक्षेत त्यांनी उच्च श्रेणी मिळवली.

फडकेशास्त्रींनी संस्कृत व प्राकृत (अर्धमागधी) या भाषांचे अध्यापन केले. पुढे संस्कृतपाठशाळेत प्रधानाध्यापकपदही भूषवले.

निवृत्तीनंतर त्यांनी आचरणास अत्यंत कठीण असे गायत्रीपुरश्चरण केले. रत्नागिरीसह अनेक ठिकाणी त्यांनी स्वाहाकार, वेदांचे घनपाठ, याग व होम पार पाडले.

फडकेशास्त्रींनी विविध विषयांवर दहा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. सुबोध उपनिषत्सार आणि सुबोध योगवासिष्ठसार या प्रमुख ग्रंथांसह सहा पुस्तके त्यांनी लिहिली.

फडकेशास्त्रींनी शिक्षक कल्याण निधी, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी संचय सहकारी सोसायटी अशा संस्था स्थापन करून त्यांना पुढील काळात स्थैर्य प्राप्त करून दिले.

शंभर वर्षे पुरी व्हायला फक्त सात दिवस बाकी असताना त्यांचे देहावसान झाले.

लक्ष्मण बळवंत भोपटकर, रघुनाथ पांडुरंग करंदीकर व पुरुषोत्तम नारायण फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ स्पंदन – समर्पित साहित्यकारों के संग – भारतीय स्टेट बैंक का गरिमामय आयोजन ☆ हेमन्त बावनकर ☆

ई-अभिव्यक्ति:  संवाद

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ स्पंदन – समर्पित साहित्यकारों के संग – भारतीय स्टेट बैंक का गरिमामय आयोजन ☆

प्रिय मित्रो,

सादर अभिवादन,

आज की शाम ई-अभिव्यक्ति परिवार के गौरवमय क्षणों में से एक है जब ई-अभिव्यक्ति से संबद्ध लेखकगण सर्वश्री जय प्रकाश पाण्डेय  (जबलपुर), सुरेश पटवा  (भोपाल), अरुण दनायक (भोपाल), शांति लाल जैन (उज्जैन), दीपक गिरकर (इंदौर), श्याम खापर्डे (भिलाई)) सम्मानित किए जाएंगे। भारतीय स्टेट बैंक के विशाल परिवार से सम्बद्ध होना अपने आप में सौभाग्यशाली होना है। स्टेट बैंक एक ऐसा संस्थान है जो अपने सेवानिवृत्त सदस्यों को कई सुविधाओं के साथ ही समय समय पर उन्हें उनकी उपलब्धियों के लिए गौरवान्वित होने के अवसर भी प्रदान करता है। भारतीय स्टेट बैंक, केंद्रीय कार्यालय, मुंबई की पत्रिका Second Innings का प्रकाशन एक ऐसा ही सराहनीय कदम है, जिसमें उनकी रचनाएँ, उपलब्धियों एवं महत्वपूर्ण जानकारियाँ प्रकाशित की जाती हैं। 

इस कड़ी में भारतीय स्टेट बैंक, स्थानीय प्रधान कार्यालय, भोपाल द्वारा आज 23 अप्रैल 2022 की शाम आयोजित कार्यक्रम स्पंदन – समर्पित साहित्यकारों के संग – भारतीय स्टेट बैंक के सुप्रसिद्ध लेखक एवं कवियों का सम्मान समारोह एक अत्यंत सराहनीय कदम है।

इस आत्मीय आयोजन के लिए साधुवाद एवं सभी सम्माननीय साहित्यकारों एवं बतौर भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त कर्मी मेरी ओर से काव्यात्मक अनुभूति सादर समर्पित है।

यह नियति का चक्र जहां

ताउम्र बहुत कुछ पाना

अंत में

सब कुछ खोना है।

जीवन के जिस पल में हैं

हम आज

वहाँ कल तुमको होना है।  

विशाल वटवृक्ष से

स्टेट बैंक परिवार का सदस्य होना

स्वयं में गौरवान्वित होना है

इस पर

अपनों द्वारा अपनों का सम्मान

वास्तव में स्नेहांकित होना है।  

प्रगति पथ पर सदैव

चढ़े नए सोपान

हमारा संस्थान

बस यही एक स्वप्न सलोना है।

💐 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से सभी आदरणीयों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं 💐

हेमन्त बावनकर,

पुणे (महाराष्ट्र)

23 अप्रैल 2022

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

जयंत श्रीधर टिळक

जयंतराव टिळक हे लो.टिळकांचे नातू. टिळकांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ वर्तमानपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. १९५० साली त्यांनी ‘केसरी’च्या संपादकपदाची धुरा हाती घेतली. पूर्वी केसरी आठवड्यातून २ वेळा निघायचा. नंतर ३ वेळा निघू लागला. गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्रया दोन्ही लढयांचा ‘केसरी’ने पाठपुरावा केला. त्यामुळे पुढच्या काळात केसरी दैनिक वर्तमानपत्र झाले. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘केसरी’ दैनिक झाले.

पुढे ‘केसरीत अनेक बादल झाले. जयंतराव पुढे कॉंग्रेसमध्ये गेले. नंतर राज्यसभेवर गेले. ‘केसरीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा पुरस्कार झाला. ८० नंतर ‘केसरी’ दलिताभिमुख झाला. जयंतरावांनी ‘‘केसरी’त नाविन्य आणायचा प्रयत्न केला. जयंतराव मंत्री झाल्यानंतर केसरीचे संपादन अनुक्रमे चंद्रकांत घोरपडे, शरच्चंद्र गोखले, अरविन्द गोखले इ.नी  सांभाळले.

लो.टिळकांच्या काळात जहाल असलेला ‘केसरी जयंतरावांच्या कारकिर्दीत मवाळ झाला..

जयंतरावाववी ‘वारसा’ हे पुस्तक लिहिले. विविध विषयांवरील आत्मचरित्रात्मक लेखांचा हा संग्रह आहे.    

जयंतरावांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला प्रणाम ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  २२ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्री.सुनील चिंचोळकर

श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि प्रचारक श्री.सुनील चिंचोळकर यांनी आपले आयुष्य समर्थ तसेच अन्य संतांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी वाहून घेतले होते.त्यांनी प्रा.शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार सज्जनगड येथे वास्तव्य करून वीस वर्षे समर्थांच्या दासबोधाचे अध्ययन केले.दासबोध ग्रंथ तरूणांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी ते विशेष आग्रही होते.अत्यंत अल्प किंमतीत दासबोध ग्रंथ उपलब्ध व्हावा व तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा अशी त्यांची इच्छा होती. दासबोधातील श्लोकांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून देण्यासाठी त्यांनी लेखन तर केलेच पण विपुल प्रमाणात व्याख्याने दिली.प्रवचने व कीर्तने  यांच्या माध्यमातून समर्थ विचारांचा प्रसार केला.संतविचार व अध्यात्म याविषयी त्यांनी चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.त्यातील काही ग्रंथ याप्रमाणे:

आजच्या संदर्भात दासबोध

दासबोधाचे मानसशास्त्र

दासबोधातील कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग

दैनंदिन जीवनात दासबोध

मनाच्या श्लोकातून मनःशांती

समर्थ रामदासांचे व्यवस्थापन

श्री समर्थ चरित्र:आक्षेप आणि खंडन

समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद

शिवाजी आणि रामदास

मानवतेचा महापुजारी:स्वामी विवेकानंद

पारिव्राजक विवेकानंद पत्रे समर्थांची…इत्यादी

समर्थसेवक चिंचोळकर यांचे 22/04/2018 ला आकस्मिक निधन झाले.

आजच्या स्मृतीदिनी त्यांचे पुण्यस्मरण 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भारताचार्य चिंतामणी  विनायक वैद्य  

चिंतामणी  विनायक वैद्य  यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ मधे झाला. ते विद्वान होते. संस्कृत भाषेचे चांगले जाणकार होते. थोर ज्ञानोपासक होते. रामायण- महाभारताचे संशोधक, मीमांसक, चतुरस्त्र ग्रंथकार होते. माहितीप्रचुर अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागावर त्यांनी प्रकाश टाकला.    

चिं. वि. वैद्य यांनी १८८९ ते १९३४ या काळात मराठी आणि इंग्रजी मिळून एकूण    ५०,००० पृष्ठे इतके लेखन केले. त्यांचे स्फुट लेखन केसरी, विविध ज्ञान विस्तार, इंदुप्रकाश इ. नियतकालिकातून प्रकाशित झाले. त्यांनी एकूण २९ ग्रंथ लिहिले. त्यापैकी २० ग्रंथ मराठीत, तर ९ ग्रंथ इंग्रजीत होते.    

चिं. वि. वैद्य यांचे प्रकाशित साहित्य

१. संक्षिप्त महाभारत , २. संस्कृत वाङ्मायाचा त्रोटक इतिहास ३. संयोगीता ( नाटक ), ४. श्रीकृष्ण चरित्र , ५. रीडल ऑफ रामायण, ६. मानव धर्मासार, ७. मध्ययुगीन भारत     (३ खंड) , ८. दुर्दैवी रंगू ( कादंबरी) ९. अबलोन्नती ( लेखमाला) १०. चिं. वि. वैद्य यांचे ऐतिहासिक निबंध

चिं. वि. वैद्य यांना मिळालेले सन्मान

  • लो. टिळकांनी त्यांचे तर्कशुद्ध, सखोल लेखन, प्रगाढ अभ्यास करून महाभारताची मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून भारताचार्य ही पदवी दिली.
  • १९०८ मध्ये पुणे येथे भरलेल्या ६व्या साहित्य संमेलनाचे (ग्रंथकार संमेलनाचे – त्यावेळी साहित्य संमेलनाला ग्रंथकार संमेलन असा शब्द रूढ होता. ) ते अध्यक्ष होते.
  • भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे ते आधी अजीव सभासद होते. नंतर अध्यक्ष झाले.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते.

☆ ☆ ☆ ☆ ☆

रामनाथ चव्हाण

रामनाथ चव्हाण हे दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते आणि लेखक. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे भटक्या, विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन असं विपुल लेखन त्यांनी केलय. पुणे विद्यापीठाच्या आण्णाभाऊ साठे  अध्यासनाचे ते प्रमुख होते.

‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत हे ५ खंडात प्रकाशित झालेले त्यांचे लेखन महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. ‘जाती व जमाती’ हेही त्यांचे पुस्तक महत्वाचे मानले जाते.

रामनाथ चव्हाण यांची पुस्तके –

१. भटक्या विमुक्तांचे अंतरंग, २. पारध, ३. बिन चेहर्‍याची माणसं ४. गवगाडा : काल आणि आज ५. घाणेरीची फुले , ६. नीळी पहाट, ७. पुन्हा साक्षीपुरम ८. वेदनेच्या वाटेवरून ९. दलितांचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

इ. त्यांची महत्वाची पुस्तके आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कमलाबाई ओगले

कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला. मराठीतील पाककृती संग्रहाच्या या लेखिका, संपादिका. त्यांनी संकलित केलेल्या पाककृतींचा ‘रुचिरा’ हा संग्रह अतिशय लोकप्रीय झाला. एके काळी नववधूला रुखवताबरोबरच हा संग्रहही दिला जाई. (अजूनही दिला जातो.)  हे पुस्तक १९७० साली ‘मेहता’ने प्रकाशित केले. हा संग्रह २ भागात प्रकाशित झालेला आहे. या संग्रहाच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्यात.    

भारताचार्य चिंतामणी  विनायक वैद्य , रामनाथ चव्हाण आणि कमलाबाई ओगले या तिघांचाही आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला प्रणाम . ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १९ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष.

म.वि.राजाध्यक्ष हे मराठीतील नामवंत समीक्षक व ललित लेखक होते.त्यांनी आपले शिक्षण मुंबई येथे पू  केले.शिक्षण काळात त्यांनी इंग्रजी साहित्यातिल वर्डस्वर्थ पारितोषिक प्राप्त केले.त्यांनी पुढील काळात अहमदाबाद,मुंबई,कोल्हापूर या ठिकाणी इंग्रजीचे अध्यापन केले.

‘अभिरुची’ या मासिकातून त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली.या मासिकात निषाद या टोपणनावाने लिहिलेले वाद संवाद हे सदर लोकप्रिय झाले. रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा,ज्योत्स्ना या मासिकातूनही त्यांनी लेखन केले आहे.

पाच कवी हे त्यांचे पहिले पुस्तक. यात त्यांनी पाच आधुनिक कवींच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यांचे अन्य साहित्य असे:

समीक्षा: भाषाविवेक, शब्दयात्रा

लघुनिबंध: अमलान, पंचम, आकाशभाषिके, खर्डेघाशी, पाक्षिकी, मनमोकळे, शालजोडी.

इतर : कुसुमावती देशपांडे यांच्यासह लिहीलेले ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’

श्री.राजाध्यक्ष हे पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळाचे काही वर्षे मुख्य संपादक होते. तसेच नॅशनल बुक ट्रस्ट चे विश्वस्तही होते. ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे सदस्य व साहित्य अकादमीच्या मराठी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.

दि.19/04/2010 ला म.वि.राजाध्यक्ष यांचे निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस   विनम्र अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रकाश खरात

प्रकाश नथू खरात (25 जानेवारी 1952 – 18 एप्रिल 2021) हे मराठी कवी व लेखक होते.

त्यांचा जन्म जुन्नर येथे झाला. राज्यशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम ए केलं.

सेंट्रल बँकेत असिस्टंट मॅनेजर असताना 2001 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम. ए. च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असत.

‘निर्मितीचा प्रदेश’, ‘पार्थिव – अपार्थिव’, ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ हे कवितासंग्रह, ‘अनिकेत’  हा कथासंग्रह, ‘अस्तित्वाचे धागे’ ही आत्मपर कादंबरी इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

सौंदर्यवेधी कल्पना, अर्थपूर्ण प्रतिमा, व्यामिश्र वास्तवाचा शोध, चिंतनशील काव्यात्मकता या वैशिष्ट्यांमुळे खरातांची कविता रूढ दलित काव्याची चौकट ओलांडून गेली.

‘आरंभ’ या अनियतकालिकाचे ते संपादक होते.

बेळगाव, नाशिक, नागपूर येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात त्यांचा सहभाग होता.

खरातांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती या भाषांत अनुवाद झाले आहेत.

त्यांच्या ‘अनिकेत’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

‘अस्तित्वाचे धागे’ या आत्मपर कादंबरीस ‘साद’ पुरस्कार मिळाला.

दलित साहित्य संसद, दिल्ली या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.

इंदूरचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

18 एप्रिल 2021 ला करोनामुळे त्यांचा देहांत झाला.

खरातांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, ‘जन्म – मरण वर्दळीवर येताना ‘:परिचय व प्रस्तावना.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

१७ एप्रिल संपादकीय – वि. आ. बुवा.

वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६चा. विनोदी लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. .१९५० पासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. त्यांची १५० हून अधीक विनोदी पुस्तके आहेत. त्याचबरोबर आकाशवाणीवर अनेक श्रुतिकांचं लेखन त्यांनी केलय. आकाशवाणीवर त्यांचे ६०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाले. त्यापैकी ‘-पुन्हा प्रपंच’ या कौटुंबिक  श्रुतिका मालेचे ४०० पेक्षा जास्त भाग त्यांनी लिहीले  आहेत. याशिवाय पटकथा, विनोदी निबंध, तमाशाच्या संहिता, , विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केलेले आहे.

१९५० मध्ये ‘इंदुकला’ हा हस्तलिखित साहित्याचा अंक त्यांनी प्रकाशित केला होता. त्यात अनेक मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. पुढे प्रभाकर पाध्ये यांच्या प्रेरणेने त्यांनी वृत्तपत्रातून लिहावयास सुरुवात केली. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, कल्पकता, उत्स्फूर्त विनोद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अनेक दिवाळी अंकातून त्यांनी लेखन केले. ‘अकलेचे तारे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५३  मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर ते अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम बघत होते.    

वि. आ. बुवा यांची काही पुस्तके –

१. अकलेचे दिवे, २.असून अडचण नसून खोळंबा, ३. अफाट बाबुराव, ४. इकडे गंगू तिकडे अंबू,  ५. खट्याळ काळजात घुसली. ६. झक्कास गोष्टी , ७.फजितीचा सुवर्ण महोत्सव, ८. फिरकी, ९. शूर नवरे, १०. हलकं फुलकं

गिरिजा कीर यांनी आपल्या ‘ दीपगृह’ या पुस्तकात वि.आ. बुवांवर लेख लिहिला आहे.

या हरहुन्नरी लेखकाचा आज स्मृतीदिन ( १७ एप्रिल २०११ ) . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १६ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गो.मा.पवार

गोपाळराव मारूती पवार उर्फ गो.मा.पवार हे मराठीतील नामवंत समीक्षक. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी तेहतीस वर्षे मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर सोलापूर येथे वास्तव्य करून विपुल प्रमाणात साहित्य लेखन केले.

मराठवाडा साहित्य परिषद, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळ या संस्थांमध्ये त्यांनी कलेले कार्य संस्मरणीय आहे. सोळा ग्रंथ व साठ शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पी.एच् डी. प्राप्त केली आहे.

त्यांची काही साहित्य संपदा:

निवडक मराठी समीक्षा

मराठी विनोद: विविध आविष्कारणे.

महर्षि वि.रा म.शिंदे.. जीवन व कार्य

साहित्य मूल्य आणि अभिरुची सुहृद् आणि संस्मरणे ..इ.

पुरस्कार:

साहित्य अकादमी 2007

डाॅ.व.दि.कुलकर्णी स्मृती पुरस्कार

भैरू रतन दामाणी पुरस्कार, सोलापूर

शिवगिरिजा प्रतिष्ठान, कुर्डूवाडी

महाराष्ट्रफाउंडेशनचा मराठी साहित्य पुरस्कार.

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

जीवन गौरव पुरस्कार..सोलापूर विद्यापीठ 2016

आज त्यांची  पुण्यतिथी आहे.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मोरेश्वर रामचंद्र पराडकर

मोरेश्वर रामचंद्र पराडकर ऊर्फ मोरोपंत किंवा मयूर पंडित (1729 – 15 एप्रिल 1794) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते.

सुमारे 45 वर्षे अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75 हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे.त्यामध्ये ‘आर्याकेकावली’, ‘आर्याभारत’, ‘केकावली’ वगैरे असंख्य ग्रंथांचा समावेश आहे.

मोरोपंतांनी 60हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने वा महिलांसाठी ओवीबद्ध गीते रचली.

त्यांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत. हा प्रकार मराठीत पहिल्यांदा त्यांनीच हाताळला.

‘आर्याभारत’ हे त्यांनी आर्यावृत्तात रचलेले समग्र महाभारत आहे.

विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी त्यांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.

बारामतीतील त्यांच्या वाड्याच्या एका खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द त्यांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून ते आपली काव्ये सजवत असत.

‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु यासम हा ‘ व ‘बालिश बहू बायकांत बडबडला ‘ या त्यांच्या उक्ती आजही वापरल्या जातात.

त्यांचे चरित्र व त्यांच्या काव्याची चर्चा करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

☆☆☆☆☆

डॉ. विनायक रा.करंदीकर

डॉ. विनायक रा. करंदीकर (27 ऑगस्ट 1919 – 15 एप्रिल 2013) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालय येथे प्राध्यापक होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते.

त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता

त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्ये काम केले.

दैनिक ‘तरुण भारत’ प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते.

त्यांनी मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही केले आहे.

ते पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.

‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ (आत्मचरित्र),

‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण, ‘गोपवेणू’ (कवितासंग्रह), ‘स्वामी विवेकानंद जीवनदर्शन'(स्वामी विवेकानंदांचे त्रिखंडात्मक चरित्र), ‘ज्ञानेश्वरीदर्शन’,’Three Architects of RSS'(इंग्रजी) वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

साहित्य अकॅडमीने प्रकाशित केलेल्या ‘इंडियन मास्टरपीस ‘ या संपादित ग्रंथात त्यांनी ज्ञानदेव- तुकारामांवर लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नड व अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

कवी मोरोपंत व डॉ. विनायक रा. करंदीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, लोकसत्ता.कॉम – पंकज भोसले.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares