मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पवित्र पैसा….भाग 2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आज महाविद्यालय पोहचताच मी रमेश शिपायाला बोलावून घेतले आणि ताराचंद ची माहिती घेणे सुरू केले. चौकीदार माणूस पाच मुलींचा शैक्षणिक खर्च करतो हे माझ्या अनुभवाला पटत नव्हते. त्याचा पगार किती असेल रे… मी शिपायाला विचारले… सर खूप झाले पाच हजार रुपये. अरे मग हा खर्च त्याचा मालक पाठवितो काय? कोण तो कोल डेपो वाला मालक….सर तो धड गणपतीची वर्गणी देत नाही….. तो काय पाठवितो सर.. अरे मग कोण पाठवितो रे पैसे. माझी खात्री आहे ते ताराचंद चे पैसे नक्कीच नाही… का जाणे सर पण पैसे दरवर्षी येते. तुम्ही याच वर्षी प्राचार्य झाले पण मागील चार वर्षांपासून पैसे नियमित ताराचंदच  देतो सर. आता माझे कुतूहल आणखी जागे झाले आणि सत्य शोधण्यासाठी मी बाहेर पडलो.

कोल डेपो समोर कार उभी करून मी एका ट्रक ड्रायव्हर ला विचारले, ताराचंद कहाँ मिलेगा? त्याने बोटानेच एका टीन पत्र्याच्या झोपडीकडे निर्देश केला. कोळशाची धूळ तुडवत मी त्या दिशेने निघालो.

झोपडी जवळ जाऊन ताराचंद जी अशी हाक देताच थोड्या वेळाने आत हालचाल सुरू झाली. बहुतेक रात्र पाळीमुळे तो झोपला असावा. टीनेचे दार उघडून ताराचंद आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिला….. सर आप यहाँ! क्या बात है सर? मुझे बुला लेते… त्याच्या बोलण्याची वाट न पाहता मी आत शिरलो आत एक लाकडी पलंग त्यावर कोळशाच्या धुळीने माखलेली गादी व एक ब्ल्यांकेट कोपऱ्यात एका लाकडाच्या पेटाऱ्यावर एक विजेरी त्यातच यफ एम ब्यांडचा रेडिओ, एक मजबूत लाठी,पाण्याचे मडके त्यावर मातीचे झाकण एक ग्लास. मला कुठे बसवावे हा त्याच्या समोर प्रश्न होता मीच पडलेले एक जुने वर्तमान पत्र पसरवून पलंगावर बसलो. ताराचंद ने बाहेर निघून चहा टपरी वाल्याला जोराने आवाज दिला.. गणपत दो स्पेशल कम शक्कर अद्रक डालकर जलदी भेजना. मी ही त्याला नाही म्हटले नाही. त्यानेच विषयाला हात घातला….. सर बात क्या है? क्या पैसे कम थे? रमेश को भेज देना था.आपने क्यो तकलीफ की सर? त्याला माझे येणे आवडले नव्हते हे मात्र खरे होते. तेव्हड्यात गणपत चहा घेऊन आला. दोन घुट चहा पिऊन मीच सुरवात केली. ताराचंद जी आप जो पाँच गरीब लाडकियों का खर्चा करते हो ये पैसे कौन भेजता है? मुझे जानकारी होना चाहिए.  सर ये मईच करता हुं जी खर्चा…….थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी त्याला विस्वासात घेत. तले आप अच्छा काम कर रहे हो, पर मुझे विस्वास है,आप किसिके पैसे लाकर दे रहे हो. औंर आप नहीं बताओगे तो मैं पैसे वापस कर दूँगा. माझी मात्रा बरोबर लागू पडली. ताराचंद चरकला, सर एैसा मत करना. पैसे मेरे नही है ये सही हैं. पर किसके है मै बता नहीं सकता, मुझे कसम डाली है सर………. और सुनेंगे तो आप पैसे लेंगे नहीं………. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन मी त्याला विस्वास दिला… तू बता मै पैसे लूंगा,पर सत्य बता……….

थोडा वेळ शांततेत गेला आणि ताराचंद ने जे सागितले ते ऐकून मी हादरलो. तो म्हणाला सर ये पैसे रत्ना नामकी वेश्या भेजती है…….

मी तडक बाहेर आलो व निघालो.

क्रमशः……

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

आजची सकाळ नेहमीप्रमाणे खूप प्रसन्न होती. सोनेरी किरणांनी गुलमोहोर( तांबट) आणि शिरिषांच्या(जांभ्या आणि किऱ्या) दोन्ही झाडांना हलकेच कुरवाळले. तशी उंच फांद्यांवरील पोपटकंची पाने हसून उघडली. काल सुर्यास्तानंतर ती निद्राधीन झाली होती. त्यांच्या हसण्याची खसखस खालच्या फांद्यांवरील पानांनी ऐकली आणि तीही झोपाळू डोळे किलकिले करून बघू लागली. अजून रविकिरणे त्यांच्या पर्यंत पोहोचली नव्हती ना! उन्हं वर आली तरी डोक्यावरून चादर ओढून झोपणाऱ्या नाठाळ मुलांप्रमाणे त्यांनी आपले डोळे बंद केले.?? तरीही एक गोडसे स्मित पानापानांवर रेंगाळलेच. पलीकडील गल्लीतल्या आंब्याच्या झाडानेही आपली पाने किंचित हलवून दव शिंपडले आणि जागे होण्याची खटाटोप करु लागले.

जांभ्या आणि किऱ्या समोरासमोरच तर रहात होते. जांभ्याने त्याच्या लगतच्या घराचा टेरेस थोडा झाकूनच टाकला होता. त्या घराची मालकीण थोडी नाराज होती.हं….. जांभ्याच्या सावलीत तिच्या  छोट्या कुंड्यांमधील झाडे पुरेशी वाढत नसत ना!? पण जांभ्या काही ऐकत नसे.तो फांद्या विस्तारुन, हलवून तिच्या गुलांबांबरोबर गप्पा मारे, शेवंतीला गुदगुल्या करे आणि मधुमालतीला निवांत आपल्या

कडेखांद्यावर चढू देई. जांभ्या हळूहळू जागा होऊ लागला आणि फांद्या हलवून थोडी थोडी सूर्यकिरणे या सवंगड्यांना देऊ लागला.

किऱ्याचा पानपिसारा सगळीकडे छान पसरला होता. जांभ्या सारखी त्याच्याजवळ कोणती लतिका फुले वा फळंबाळं नव्हती. तोही तसा प्रेमळच होता. परंतु बिच्चारा! किऱ्या जवळच्या घरातील एक १७-१८ वर्षांची नवयौवना रोज बाल्कनीत येई. गुलमोहोर (तांबट)आणि शिरीष (जांभ्या आणि किऱ्या) यांच्या कडं प्रेमानं बघे.गालातच हसे. आज अचानक किऱ्याची फुलांनी बहरलेली एक फांदी तिच्या बाल्कनीत घुसली होती.किऱ्याला तिचेही गाल आरक्त झाल्यासारखे वाटले. फांदीला प्रेमानं कुरवाळून तिनं एक गिरकी मारली.

किऱ्या रोजच त्याच्यापासून काही फूटांवर असलेल्या तांबटा बरोबर गप्पा मारे. त्याच्या मोरपंखी पिसाऱ्याबरोबर खेळे. हं..  पण आता ग्रीष्म ऋतू सुरू झाला होता. त्याचा मोरपिसारा केंव्हाच गळून पडला होता. केवळ काड्यांचा किरीट. प्रकाशसंश्लेषण नाही. तांबट्याची चूल पेटत नसे ग्रीष्मात. नुसत्या साठवलेल्या अन्नावर तो पोट भरत असे. तसंही पर्णसंभार नसल्याने त्याला ऊर्जाही कमीच लागे.परंतु आत कुठेतरी काहीतरी धडपड चालू असावी बहुधा! ? तांबटाच्या एकाच फांदीला लालचुटुक फूल उमलले. जांभ्या आणि किऱ्या मान तिरकी करून त्याच्याकडं बघत राहिले.किऱ्यानं पानं हलवून दवबिंदूंचं अत्तर वाऱ्याबरोबर फवारलं. एक पिवळी पाकळी लाजत लाजत खाली झुकली आणि तिनं किऱ्याचं अत्तर आवडल्याचं सांगितलं. जांभ्या तांबटापासून थोडा लांब होता. काय बरं करावं? हो!हो!! त्यानं फांद्या हलवून शीतल हवेची झुळूक पाठवली. तांबट मनोमन हरखला आणि बघताबघता नावाप्रमाणेच तामस पिसाऱ्यानं फुलून गेला. काही दिवसातच त्याला पोपटी नाजूक पानंही फुटली. आपल्या छोट्या पर्णतलांच्या टाळ्या वाजवून. तो आनंद व्यक्त करु लागला. बघता बघता हिरव्या चपट्या शेंगांनी तो तरारला. गर्भार स्त्री सारखा जडावला. डोहाळे जेवणाच्या वेळी दिसणाऱ्या मातेसमान सजला. लाल, केशरी, पिवळ्या फुलांचे मोहोर; नाजूक मोरपिसांसारख्या पानांचे नृत्य!! जांभ्या आणि किऱ्या त्याच्याकडं बघतच रहात.

तिन्ही झाडांवर अनेक पक्षी विसाव्याला येत. अगदी पहाटे पहाटे दयाल शीळ घालून सगळ्यांसाठी भूपाळी म्हणे. कावळा, चिमण्या,मैना हळूहळू हजेरी लावत. बुलबूलाच्या जोडीनं बांधलेल्या घरट्यातून त्यांची पिल्लं चोची बाहेर काढून डोकावत. राघूंचा थवा विठू विठू चे भजन करे. थोडासा लांब असलेला, आता मोहरलेला अंबाही कोकीळकूजनात सामील होई. शेजारपाजारच्या खिडक्यांमधून, बाल्कनीतून छोटुले चेहरे डोकावत. त्यांच्या टाळ्या आणि हसरे चेहरे बघून तो झाडोरा कृतकृत्य होई.

पण…

पण….

…. पण हे काय? सूर्यदेव थोडेसे वर आले. माणसांची वर्दळ वाढली. ऑफिसला जाणारे टू व्हीलर वरुन पळू लागले. आणि झाडाखाली गर्दी जमू लागली. प्रथम खूष होत किऱ्यानं फांद्या हलवून गार वाऱ्याची झुळूक सोडली. सावली जास्त दाट केली. वाराही लकेर देत शीतलता पसरवू लागला. पण मग करवत, कुऱ्हाड, फावडी दिसू लागली.. भले मोठे जेसीबी आ वासून पुढं सरसावले. तसा किऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. जांभ्याही भेदरलेला दिसत होता. तांबट तर भितीनं कापायलाच लागला. खाली माणसांची वर्दळ वाढली. आवाज चढले. जेसीबी चा स्टार्टर दाबला गेला आणि तांबटाच्या पायाखालची ज मी न हादरली. भूकंप झाल्याप्रमाणे सगळेच थरथरु लागले. जेसीबी नं चांगलंच सात-आठ फूट खणून काढले आणि….. आणि तांबट मुळासकट आडवा झाला..करवती, कुऱ्हाडीनं तांबटाच्या फांद्या तोडण्यात आल्या. खोडाचे मध्ये कापून तीन चार तुकडे केले गेले. तांबटाचे आक्रंदन जांभ्या आणि किऱ्या पर्यंत पोहोचत होते. पण त्यांची भाषा माणसांना कळत नव्हती.

फुललेल्या तांबटाची एक फांदी हातात धरून ती नवयुवती बाल्कनीत ऊभी होती. दोन्ही डोळ्यातून पाणी पाझरत होते.. तिचा मूक साथी पिसारा मिटून, जागीच जमीनदोस्त झाला होता.तांबटाचे रस्ताभर विखुरलेले अवयव गोळा करून टेंपो धूर ओकत निघून गेला…..

…… रस्ता मात्र लाल, पिवळ्या, केशरी गालिच्यानं आणि पोपटी पिसांनी मखमली झाला.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पवित्र पैसा….भाग 1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

अरे कोण आहेरे तिकडे…,रमेश…तुकाराम….गेले कुठे सगळे…

दोन तीन वेळा टेबलावरची बेल वाजवुन देखील कुणी आत आले नाही. त्यामुळे माझा आवाज चढला होता. शेवटी  बडेबाबु उठून आत आले.  .सर तुकाराम पोस्टात डाग द्यायला गेला आहे. आणि रमेश बाहेर गेला आहे, सर कोणी चपराशी नाही आहे  सर. काय असेल तर सांगा सर…. बडेबाबुच्या विनयशील बोलण्याने माझा आवाज बराच खाली आला. अहो बडेबाबू  दोन वाजायला आले, आज परीक्षा फी चा डी. डी.निघाला पाहिजे उद्या पाठवायचा आहे. आणि या रमेशचा पत्ता नाही केव्हा जाईल हा ब्यांकेत, मी चिंताग्रस्त स्वरात बडेबाबूना विचारले, मात्र बडेबाबुंची नजर रस्त्याकडे लागली असून ते कुणाचीतरी वाट बघत आहे हे माझ्या लक्षात आले. अहो बडेबाबु कुणाला शोधताय…. थोडा वेळ असाच गेला नी एक नीस्वास टाकून बडेबाबु बोलते झाले. सर मीच रमेशला पाठविले आहे. तो ताराचंदला शोधायला गेलाय. अरे कोण हा ताराचंद आणि रमेश चपराष्याला त्याचाकडे कशाला पाठविले. माझ्या प्रश्नार्थक नजरे कडे दुर्लक्ष करून बाडेबाबु शांतच राहिले. मला मात्र ब्यांकेत जायचे सोडून रमेश कोण्या ताराचंद ला शोधायला का गेला हे कोड उलगडतं नव्हतं.

माझी अस्वस्थता पाहून बडेबाबू सांगायला लागले, सर त्याच अस आहे, दरवर्षी पाच गरीब मुलींना हा ताराचंद दत्तक घेतो. त्यांची फी पुस्तके ड्रेस सर्व खर्च हाच करतो. मागील पाच वर्षांपासून तो हे करतोय सर. पण यावर्षी त्याने पैसे अजून आणून दिलेले नाही, त्यामुळे रमेश त्याला शोधायला गेलाय सर. त्या पाच गरीब मुलींचा परीक्षेचा प्रश्न आहे सर…. ऐकून मलाही चिंता वाटायला लागली. व कुतूहल ही जागृत झाले.

थोड्याच वेळात रमेश सोबत एक गृहस्थ येताना दिसले. पण मला अपेक्षित असलेले व्यक्तिमत्त्व मात्र दिसत नव्हते, पाच गरीब मुलींना दत्तक घेणारा म्हणजे एखादा श्रीमंत पालक असावा अशी माझी धारणा होती पण येणारी व्यक्ती मात्र अपेक्षाभंगाचा धक्का देणारी होती. एव्हाना दोघेही पायऱ्या चढून माझ्यासमोर उभे झाले. सर हाच तो ताराचंद, हाच पाच गरीब मुलींचा खर्च करतो. बडेबाबूनी मला माहिती दिली, ताराचंद नी ही मला नमस्कार केला व पैशाचे पाकीट काढून बडेबाबुंना पैसे देऊ लागला. ताराचंद कडे माझी नजर गेली, कोळशाच्या धुळीने भरलेले त्याचे कपडे, तेल न लावल्यामुळे उभे झालेले केस, बोट बोट दाडी किमान दोन दिवसापासून आंघोळ न केल्यामुळे घामाचा वास येणारे शरीर, रंग गोरा असूनही दिवसभर उन्हात व दगडी कोळशाच्या सहवासात राहून रापलेला त्याचा चेहरा. एकूण एक गबाळ व अस्वच्छ व्यक्ती असे रूप ताराचंद चे होते. पैसे देऊन ताराचंद गेला. रमेशला ब्यांकेत पाठवून मी बडेबाबुना आवाज दिला, कोण हो हा ताराचंद…..

बडेबाबुनी जी माहिती दिली ती ऐकून मी चाट पडलो….. सर हा ताराचंद.. अग्रवाल कोल डेपोचा चौकीदार कम सुपरवायझर आहे. तिथेच राहतो. एकटाच असतो. तोच पाच मुलींचा खर्च करतो. एक चौकीदार मुलींचा खर्च कसा उचलतो. माझा विस्वासच बसत नव्हता पण हे सत्य होते. व ते जाणून घेण्याचे मी ठरविले.        .

क्रमशः….

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शारदारमणांची सेटी – भाग 2 (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी- भाग 2 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात – जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली.  आता इथून पुढे )

जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली. नंतर त्यावर चहा घेता घेता असं ठरलं की शारंच्या कवितांच्या १० – १५ प्रेस कॉपीज तयार करायच्या आणि आपल्या पुठ्ठयातल्या म्हणजे जवळीक असलेल्या प्रकाशकांना द्यायच्या. इतक्या ठिकाणी खडे मारल्यावर कुठे तरी लागणारच की. प्रत्येकाने खात्रीपूर्वक सांगितले के नवांकूर प्रतिभा मंडळाच्या अध्यक्षांचं काम म्हणजे मंडळातील प्रत्येक सभासदाचं स्वत:चं काम.

पुढच्या १५ दिवसात नवांकूर प्रतिभा मंडळाच्या सभासदांनी शारंकडून माफक प्रवासखर्च घेऊन त्यांच्या कविता आपआपल्या परिचयाच्या प्रकाशकांकडे पोच केल्या. त्यानंतर सहा महीने उलटले. कुणाचं तरी स्वीकृतीचं पत्र आलेलं असेल, या आशेने शारं रोज पोस्टात जाऊ लागले. पण पोस्टमन, त्यांनी कुठे कुठे पाठवलेलं आणि साभार परत आलेलं साहित्यच त्यांच्या हाती ठेवी आणि कधी तरी बदल म्हणजे कुठल्या कुठल्या मासिकाची वर्गणी संपल्याचे पत्र. शारंनी पुरं वर्षभर म्हणजे १२ x ३० x २४ इतके तास दम खाल्ला. मग मात्र त्यांचा धीर खचला. तेव्हा मग नवांककुरांनी ठरवले, दस्तुरखुद्द स्वत:चं प्रकाशकाकडे जाऊन चौकशी करायची. यावेळी त्यांनी शारंकडून प्रवासाचे निम्मेच पैसे घेतले. निम्मे स्वत:चे घालू म्हणाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाऊन आलेले वेगवेगळे अंकुर एकच गोष्ट सांगू लागले, ‘हल्ली आम्ही आमच्या खर्चाने कुणाचाच कवितासंग्रह  काढत नाही. अगदी ज्ञानपीठ विजेत्या कवींचासुद्धा. कवितासंग्रह काढायचाच असेल, तर सर्व खर्च कवीने द्यावा. आम्ही योग्य भावात संग्रह काढून देऊ.’

नअंप्रमचा ( नवअंकुर प्रतिभा मंडळाचा ) उपाध्यक्ष शरद साजणे म्हणाला, ‘खरंच शारंजी तुम्ही स्वत:चं का काढत नाही तुमचा कवितासंग्रह. म्हणजे काय की प्रकाशन संस्थेला तरी पैसे द्यायचेच. त्यापेक्षा आपणच आपल्या देखरेखीखाली अगदी चांगला, उत्कृष्ट, सुबक, सुंदर कवितासंग्रह काढू या कसं?’

‘ते खरं… पण पैसे…’ इति शारं.

‘किती पैसे लागतील असे? आठ नाही तर दहा हजार रूपये फक्त…’ के ज्ञानेश्वरन् याने की ज्ञानेश्वर केडगे, फक्त आठ किंवा दहा रुपये असावेत, अशा थाटात म्हणाला.

शेवटी ठरलं, नअंप्रमंतर्फे शारंजींचा कवितासंग्रह काढायचा. मंडळाचे ५० सभासद आहेत. प्रत्येकाने २०-२० प्रती खपवल्या तरी पुस्तके केव्हाच खपतील. जेवढे पैसे घालू, तेवढेच नव्हे, तर त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील. एव्हाना शारंनी मनात गणित करायला सुरुवात केली होती. समजा हजार प्रती काढल्या, त्यासाठी दहा हजार खर्च आला, पुस्तकाची किंमत फक्त पंचवीस रुपये ठेवली, तरी पंधरा हजार रुपये फायदा. प्रॉव्हिडंड फंडातून पैशाची जुळणी करायचे त्यांनी मनोमन ठरवून टाकले. गिनीज बुकात ‘बहुप्रसव कवी’ म्हणून आपल्या नावाची नोंद व्हावी, यासाठी ज्या अनेकानेक कविता त्यांनी गिनीज बुकच्या ऑफिसकडे रवाना केल्या होत्या, त्याच्या पोस्टेजमधे त्यांच्या रमणीच्या दागिन्यांना वाट फुटली होती. त्यामुळे शारंना आता फक्त प्रॉव्हिडंड फंडाचाच काय तो आधार होता. त्यातून ते नॉन रिफंडेबल लोन घेण्याचा विचार करू लागले.

‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या प्रती गेल्या तर..’

‘गेल्या तर… .म्हणजे जाणारच… म्हणजे गेल्यातच जमा आहेत. ’ नवांकुरांनी शारंना आश्वासन दिले.

नअंप्रमंच्या कार्यकारिणीने शारंचा कवितासंग्रह काढण्याचे काम युद्धापातळीवर हाती घेतले. संस्थेच्या अध्यक्षांचा कवितासंग्रह निघणं म्हणजे संस्थेच्या मानात पिसांचा तुरा… किंवा तुर्‍याचं पीस… किंवा काय असेल ते… समजून घ्या. योग्य असेल ते वाचतो, तो वाचक. कुणी डी.टी.पी. ची जबाबदारी स्वीकारली. कुणी चित्रकार शोधायला गेले.

चित्रकार कोण असावा, पुस्तक छापायला कुणाकडे द्यावं, याबद्दल सस्थेच्या अंकुरांमध्ये बरीच बाचाबाची व वादंग झाले. शेवटी नव्यानेच या व्यवसायात पडलेल्या पासलकरांकडे पुस्तक छापायला द्यायचे ठरले. तो धंद्यात नवा. पक्का मुरलेला नाही. . पैसे कमी घेईल, सवडी-सवडीने देता येतील अशी मंडळींची अटकळ, पण पुस्तक उघडताना शारंना अगदी कृतार्थ वाटत होतं. आपण लिहीलेल्या शब्दांच्या रूपाकडे पाहताना मात्र, ही कृतार्थता पार लोपून गेली. भात खाताना घासाघासाला खडे लागावेत, तसं त्यांना प्रत्येक कविता वाचताना वाटू लागलं. प्रत्येक कवितेत, छे: छे: कवितेतल्या प्रत्येक ओळीत, शुद्धलेखनाच्या चुका होत्या. प्रुफं तपासण्याची जबाबदारी पत्करलेला नामदेव गळ्याजवळची कातडी चिमटीत ताणून म्हणाला,

‘आईच्यान्… मी ओळ न् ओळ, शब्द न् एसएचबीडी करेक्ट केलेला… नंतर या लोकांनी काही तरी गफलत केलीय.’

त्यावर मधु कांडकेची मल्लीनाथी अशी-

‘आता कवितेच्या दारजाविषयी प्रसन्न उपस्थित झाला, तर प्रिंटिंग मिसतेक्समुळे दर्जा उनावल्यासारखा वाटतोय, असं म्हणून वेळ मारून नेता येईल.’

शारंनी पुस्तक बंद केलं. आता त्यांचं लक्स मुखपृष्ठाकडे गेलं.मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूला दोन बोटे रुंदीची पांढरी पट्टी उभी होती. राखी रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक लाल रंगात लिहिलं होतं, ‘बकुळीची फुले’ बकुळीचे अर्धे झाड मुखपृष्ठावर होते, तर अर्धे झाड मलपृष्ठावर. एवढेच नव्हे, तर फुले वेचणारी तरुणीही, अर्धी मुखपृष्ठावर होती, तर अर्धी मलपृष्ठावर होती. पुस्तके स्टीच करणार्‍याने चक्क त्या तरुणीच्या काळजातच पीन खुपसली होती. चित्र दोन बोटे डावीकडे सरकल्यामुळे असं झालं होतं. पुढे दोन बोटांची अपांढरी पट्टी आली होती. याची जबाबदारी छपाईवाल्याने, स्कॅनिंगवाल्यावर, स्कॅनिंगवाल्याने चित्रकारावर आणि चित्रकाराने छपाईवाल्यावर टाकत त्यांच्या अकलेचे दिवाळे काढले आणि त्यांनी धंदा बंद करून घरी बसावं असा अनाहूत सल्लाही दिला.

क्रमश: – भाग ३ ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी   क्रमश: भाग 1 (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी   क्रमश: भाग 1 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

दोस्तांनो, आणि दोस्तीणींनो तुम्हीसुद्धा… अलीकडे आपल्या शारदारमणांकडे जाऊन आलात की नाही? नसाल तर एक चक्कर टाका आणि त्यांच्या 50,000 च्या सेटीवर बसून या. कोण शारदारमण? कमाल करताय बुवा तुम्ही? आपले तेच हो… गिनीज बुकात जास्तीत जास्त कविता लिहिणारी व्यक्ती म्हणून नाव छापून येण्यासाठी जंग जंग पछाडणारे आणि अखेर जास्तीत जास्त शब्द लिहिण्यासाठी का होईना, पण गिनीज बुकात नाव नोंदलं गेलं म्हणून खूश होणारे शारदारमण! तर त्यांच्या नऊ बाय आठच्या दिवाणखान्यात आता पन्नास हजाराची सेटी ठेवलीय. एकदा तरी या सेटीवर बसून धन्य होऊन या.

आता पन्नास हजाराची सेटीया एवढ्याशा जागेत काशी आली? तर ती करामत शारदारमणांच्या रमणीची. तो किस्सा त्यांच्याकडूनच ऐकायला हवा.  त्याचं काय झालं की शारंचं (शारदारमणांचं) नाव गिनीज बुकात आलं, तरी बुजुर्ग कवींनी त्याला धूप घातली नाही. त्यांचा म्हणणं असं की शारंच्या कविता या कविताचं नाहीत. म्हणून तर त्यांची नोंद गिनीज बुकात कवी म्हणून न होता, जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून झाली. तेव्हा गिनीज बुकात नाव आलं म्हणून त्यांना एवढं महत्व द्यायचं कारण नाही.’

आमच्या गावात एक प्रतिभा मंडळ आहे. त्यातल्या  नव्या अंकुरांना फारसं कुठे इकडे तिकडे लवलावायची संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी ‘नवांकुर प्रतिभा मंडळ’ नावाचा सावता सुभा मांडला. हे मंडळ नवोदित कवींचे असले, आणि शारंच्या १०, ००० हून जास्त कविता लिहून झालेल्या असल्या, तरी मंडळातील नवोदित कवींनी मोठ्या आदराने मंडळाचे अध्यक्षपद शारंना दिले. मुले म्हणाली, ‘आमच्या पोरा-टोरात कुणी अनुभवी नको का?’ लवलवत्या नवांकुरांनी शारंना हरभर्‍याच्या झाडावर चढवले आणि शार चढले. ५०० रुपये संस्थेचे आजीव सभासद म्हणून आणि ५०० रुपये अध्यक्ष झाले, इस खुशीमें मंडळाला देणगी म्हणून, मुलांनी त्यांच्याकडून वसूल केले. याशिवाय मंडळाच्या नावांकूरांना त्यांनी खुशीने चहा-वडा दिला, ते वेगळेच.

एक दिवस शरद नामे नवांकुराने म्हंटले, ‘शारदारमणजी, कविता संग्रह निघाला पाहिजे तुमचा. त्याशिवाय काही खरं नाही. संग्रह असल्याशिवाय या क्षेत्रात प्रतिष्ठा नाही.’

‘तुमच्याइतक्या कविता असत्या, तर आम्ही ५० कविता संग्रह काढले असते एव्हाना…’ दूसरा अंकुर उद्गारला.

‘ते खरय. पण कविता संग्रह काढणार कोण?’ कवी शारं उर्फ आरोळे सदाशिव शंकर  उसासत म्हणाले. आज-काल प्रस्थापित, प्रथितयश वगैरे… वगैरे… कवींच्या कविताही प्रकाशक लोक हातात धरत नाहीत.’

‘ते तुम्ही आमच्यावर सोडा हो…’ बाळा चौगुले खास कानडी ढंगात म्हणाला.

‘म्हणजे माझी काही खास मानधनाची अपेक्षा नाही.’ इति  शारं.

’का नाही? मी म्हणतो का नाही? एका कवितेला कमीत कमी ५०-१०० रु. तरी मिळायलाच पाहिजेत.’

‘हो ना! जास्तीत जास्त शब्द लिहिल्याबद्दल का होईना, गिनीज बुकात नाव आलंय तुमचं. म्हणजे तुम्ही तसे जागतिक कीर्तीचे…’

‘कसचं कसचं..’ म्हणत, शारंनी हंनुमांप्रसादमध्ये चहा – वडा सांगायला एका अंकुराला पाठवलं.

‘कशाला… कशाला… म्हणत चहा – वडा सांगायला गेलेल्या अंकुराने चक्क किलोभर जिलबीही सांगितली, तोंड गोड करायला म्हणून.

शरद साजणे म्हणाला माझा मावस आतभाऊ मेहतांच्या वर्तुळातला आहे. त्याच्याकडे कविता संग्रह देऊ या. ‘

‘पण मेहता कोण?’

‘सध्या माराठीतले अग्रगण्य प्रकाशक…’

‘अच्छा ते होय? म्हणजे पुण्यातले?’ शारंच्या विचारांची झेप  मेहता प्रकाशनपर्यंत कुठली जायला.

‘मी स्वत: जाऊन प्रेस कॉपी त्यांच्याकडे देऊन येतो.

‘किंवा आपण हा संग्रह मौजेकडे देऊयात. ही भागवत मंडळी आमच्या अगदी घरोब्यातली आहेत…. फॅमिली रिलेशन्स… ’ गोटू गटणे आपले आणि आपल्या घरच्यांचे मोठमोठ्या लोकांशी किती घरगुती संबंध म्हणजे फॅमिली रिलेशन्स आहेत, हे सांगायची एकही संधी सोडत नाही.

त्यापेक्षा ‘साकेत’शी कॉँटॅक्ट करूयात. ‘साकेत’ नवोदितांचे काव्यसंग्रह काढतात म्हणे. म्हणजे आपले शारं काही नवोदित नाहीत, पण त्यांचा अजून एकही काव्यसंग्रह निघाला नाही ना, म्हणून म्हणायचं!’

जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली.

क्रमशः ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 5 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 5 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

“कोण टँली करून बघतय” हे सरांचं पालुपद सारखं चालूच होत. शेवटची ‘संकीर्ण ‘  नावाची फाईल होती. सरांची भाषणं, कुटुंब नियोजनाची केस करणं, साक्षरता प्रसार अशा कामांच्या बातम्या, फोटो, शीर्षकासह त्यात होत्या.

“तुम्ही ही जी कार्य करता तिथले फोटो कसे मिळतात?”

“फोटो काढतातच तिथे. एक दोन कॉप्या मागूनच टाकतो. शिपाई बरोबर असतो. तो मोबाईल वरुन फोटो मारतो. क्लार्क बातम्यांच्या चार पाच झेरॉक्स काढून ठेवतो. सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे.

“चार पाच झेरॉक्स? त्या कशाला?”

“म्हणजे बघा ,एकच बातमी-उदा. व्रुक्षारोपणाची बातमी शालेय विकास, मूल्य शिक्षण, नवोपक्रम ह्या सगळ्या फाईलीत टाकायची.”

“पण पुरस्काराचे तपासनीस हरकत नाहीत घेणार?”

“हरकत काय घेतात!फायलीचे नि फोटोंचे ढिगारे बघून डोळे दिपतात त्यांचे. कपाटभर कागदं बघून पार चक्रावतात.

“त्यानीन च सगळीकडे माझ्याबद्द्ल सांगितलंय्, “पाकुर्ड्याचे ढेकळे सर म्हणजे अफाट गावचा अचाट माणूस. डोंगरा एव्हढं काम केलय शाळेसाठी. पुराव्यासकट सगळं जिथल्या तिथं. ब्र काढायचं काम नाही.”

“पण एव्हढं सगळं करायला वेळ कसा काढता?निकालही चांगले लागतात बोर्डाचे, शिकवता कधी ?”

“माझा हिंदी विषय,तो सुधरायचं काम टीव्ही, सिनेमे करतात की. माझी सगळी पोरं हिंदीत पास. आता बोर्डपण हिथच. एखादी चक्कर मारायची. अधिकाऱ्यांना द्राक्ष बाग लावायची होती. लाऊन दिली. तोंडं गोड करावी लागतात. गेल्या वर्षी ग्रामीण भागात , मागासवर्गात तिसरा आणला.”फोटो, शीर्षक होतच. ‘शाळेचं भूषण !’

“आता ह्या फायली मी केल्या म्हणता? स्टाफ, पोरं काम करतात. अँडमिनिस्ट्रेशनच कडक आहे.”

“सर, तुम्ही मुख्याध्यापक कधी झालात? ह्या पदावर असल्याशिवाय एव्हढं अवाढव्य काम करणं शक्यच झालं नसतं.”

“नेमणूकच झाली त्या पदावर.” सर अभिमानाने म्हणाले.

कुणाला ठाऊक! आपल्याला ते पद मिळावं म्हणून शाळाच काढली असावी. माझ्या मनात आलं.

“मी परीक्षक असते ना तर तुम्हाला आणखी एक पुरस्कार दिला असता.”

“कोणता?” सर निरागस आशाळभूतपणे म्हणाले.

“प्रयत्न आणि चिकाटी पुरस्कार.” मी दिलखुलासपणे म्हटलं. सरानी माझं बोलणं  भलत्याच गांभीर्याने घेतलं. एक नक्षिदार कागद माझ्यासमोर  ठेऊन ते म्हणाले, “हां. ह्यावर लिहा मजकूर.”

सरांच्या कर्तृत्वपूर्ण कारकिर्दीने मी आधीच पुरती भारावून, भांबावून, चक्रावून वाकले होते. त्यामुळे त्या कागदाकडे दुर्लक्ष  करून मी म्हणाले “राष्ट्रीय पुरस्कारासाठी शुभेच्छा! “हसऱ्या बाईंसकट सर्वांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले. सुटलेच तिथून.”

“शुभेच्छा लेखी कळवा.” सर हात हलवून मला मोठ्याने सांगत होते.

समाप्त 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 4 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 4 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

तेव्हढ्यात एक तरूण मुलगा शाळेचं काही काम घेऊन सरांच्या सहीसाठी आला. “हे  आमचे क्लार्क. म्हणजे आमच्या मंडळींचा भाऊच आहे.”

महत्त्वाची ठाणी कशी सुरक्षित ठेवलेली होती हे माझ्या लक्षात आलं. कार्यकारी मंडळातही अशी नाती संभाळलेली होती. शिपाई तेव्हढे बाहेरचे. एक मुलगा नि मुलगी शिक्षक होते.

“तुमच्या नंतर पुढची पिढी हे. मा. होतील ना सर? म्हणजे सिनिऑरिटी आहे ना? मी विचारलं. मी त्यांच्यासारखच बोलायला लागले होते.

“यादीत बसवला. प्रयत्न करावे लागले, पण काम झालं.” “वा,वा” असं मी म्हणतेय तोवर सरांच्या सुविद्य पत्नी पोह्यांची डिश घेऊन बाहेर आल्या. “दमला असाल ना?  जरा नाश्ता करा” म्हणून माझ्या शेजारी बसल्या. मग घरगुती गप्पा सुरु झाल्या.

“तुमच्या सुना काय शिकल्यात?”

“एक बी.ए. एक बी.काँम झाली. नोकरी नाही करीत त्या. मुंबई पुण्यासारख्या आपल्याकडे नोकऱ्या कुठे मिळतात?”

“दोघीना बी. एड. करून सोडा की”.

“ते कसं? ती अँडमिशन पण अवघड झालीय् म्हणे.”

“मिळते. प्रयत्न करावे लागतील.” –सरच उत्साहाने म्हणाले.

‘प्रयत्ने वाळूचे’ हे सुभाषित मला पूर्वी खोटं वाटायच, पण आता मला ते पटल.

“सुनाना शाळेत चिकटवा. तुमचं नांव राखतील पुढे पर्यंत.”

“पण सर, बीकॉमवालीचा शाळेत काय उपयोग?” आणखी ज्ञान मिळवण्याच्या हेतुने मी विचारलं.

“आता आठवीला अर्थशास्त्र आहेच की. नाहीतर तिला प्रायमरीला घ्या. ”

“पण आमच्या शाळेत प्राथमिकचे वर्ग नाहीत” माझ्या शंका प्राथमिक होत्या, पण सरांकडे प्रत्येक प्रश्नावर तोडगा होता.

“आता तुम्हीच हे. मा. नाही का? पहिली ते चौथी काढून सोडा की.”

“परवानगी?”

” मिळत्येय की. प्रयत्न करावे लागतील.” वाकय मला पाठच झालं होतं.” न्हाई तर असं करा की.” आता सौ. ढेकळे सरसावून म्हणाल्या. त्या काय युक्त्या सांगतात ह्या उत्सुकतेने मी त्यांच्याकडे पाहिलं.

“अव, आमच्या वन्संच्या पोरीला आम्ही क्लार्क केली की. तसं करा बीकॉम वालीला. बी.एड. काय करायला नको” सर आपल्या कार्यवाहू पत्नीकडे कौतुकाने बघायला लागले. आपण आपल्या घरात शिक्षण प्रेमाच्या बिया पेरल्या त्या आता चांगल्या रुजून आल्या की. हा भाव त्यांच्या डोळ्यात होता.

“बाई,  तुमचे चिरंजीव? ते काय करतात?”

“एक वकील आहे नि दुसऱ्याचा पंपाचा बिझिनेस आहे. माझे मिस्वटर दोन तीन वर्षात रिटायर्ड होतील.” मी  सगळ्याचा प्रश्न मिटवून टाकला.

“चांगलय. तुमचं पहिलं पोरगं शाळेच्या बाबतींत कायदेशीर सल्ला देईल नि धाकट्या कडून शाळेत पंप बसवा. मिटिंगच्या वेळी मुलाची कार्ड वाटायची. म्हणजे त्यालाही तुमची मदत.”

सरांकडून मुख्याध्यापक ह्या विषयावर पी.एच्.डी करता येईल एव्हढा विश्वास मला मिळाला होता.

मग मी पुन्हा फायलींकडे वळले. व्रुक्षारोपन- न चा ण केलेला. आर.आर. आबा, सा.रे. कोरे सगळ्या नेते मंडळींचे झाडं लावतानाचे फोटो होते.

“बापरे. ही थोर माणसं आली होती शाळेत?”

“फोटो मिळतात की. “सरनी अंदरकी बात सांगितली. शै. करिअर -ह्या विषयात मात्र फार फोटो नव्हते. चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेला बसले इथपासून मध्यभारत युनिव्हर्सिटी ची बी,ए., बी.एड., बी.पी.एड्.अशी खूप सर्टीफिकिटांच्या झेरॉक्स फायलीत नीट लावलेल्या होत्या. सरांच्या नांवापुढे लांबलचक पदवी गिचमिड अक्षरात होती. ती वाचायच्या भानगडीत कोण पडणार?

क्रमशः ….

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मला लग्न जमवायची आवड बरीचशी नात्यांतली लग्न मी जमवली.

मी आणि ती जोडपी पण यशस्वी झाली.आनंदी सुखी समाधानाने नांदतात. हे मैत्रिणीकडून कळल्यावर मीराताई त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो, जुजबी माहिती घेऊन माझ्याकडे आल्या

म्हणाल्या, “आमच्या मधुरासाठीं चांगलेसे स्थळ सांग बाई. माझी लाडांत वाढलेली लेक, करियरवाली, हुशार आहे थोडी गहुवर्णी आहे. पण स्मार्ट आहे. उंचीला कमी आहे पण बुटक्यातली नाही. हिल्स घालून काय चालते ती टकाटक. आमच्या फार काही अपेक्षा नाहीत. पण तिला अनुरुप, हुशार, तिच्यापेक्षा जास्त शिकलेला. जास्त मिळकत असलेला. ह्या तर किमान सगळ्याच मुलींच्या अपेक्षा असतात. पण मुख्य म्हणजे त्याचा स्वतःचा मोठा फ्लॅट पाहिजे. घरी माणसांचा त्यातून वयस्कर माणसांचा फाफट पसारा नको. सासू सासरे असतील तर चालतील. पण कसे दुसरीकडे रहाणारे असले तर बरे म्हणजे वेळा काळाला एकमेकांना उपयोग होतो हो. पुढे बाळंतपण, लहान मुलांच्या कुरबुरी, आजारपण हल्लीच्या आईवडिलांना कुठे जमतयं त्यांच्या नोकरीधंद्यात. शिवाय नातंवंडावर प्रेमं, संस्कार आजीआजोबाच चांगले करतात. पुन्हा दोन्ही पिढ्या वेगळ्या रहात असल्या की बरं. बरं आपापल्या घरी आनंदात रहातील. एकमेकांना बंधन नाही. भांड्याला भांडं नको लागायला. असं आपलं मला वाटतं.

माझ्या मधुरेनी साडी कधीच नेसली नाही आणि नेसणार पण नाही म्हणते जीन्स आणि टॉप कसे सोईस्कर वाटतात. तशाच मॉड विचाराची माणसं पाहिजेत बाई. मग वाद नकोत. तसेच तिला रोजच्या स्वयंपाक बनवण्याची आवड नाही. आणि येत पण नाही. कारण आमच्याकडे स्वयंपाकाच्या काकू आज किती वर्ष तरी आहेत. त्यामुळे हिच्यावर कधी वेळच आली नाही. आता सासरी हल्ली काय सगळ्याकडेचं नोकरचाकर असतात. आणि हल्ली मुलांना काय ग पिझ्झा, बर्गर झिंदाबाद. मधुराचे डीटेल्स तुला सांगितले. अनुरुप असाच मुलगा बघ बाई माझ्या मधुरासाठी”.

“बरं तिचा फोटो, डिटेल्स मला व्हाट्सेप वर फॉरवर्ड करा. मी बघते.” मी म्हटलं

“बरं आता दुसरं म्हणजे माझ्या मानस साठी पण एक चांगलीशी मुलगी बघ. तिच्याबद्दल पण आमच्या काही फार अपेक्षा नाहीत. अगदी चार चौघांसारख्या माफक.

माझा मानस तू बघितला आहेस. हँण्डसम, शिकलेला, नम्र. तशीच सुंदर, शिकलेली, मनमिळाऊ, समजूती, स्मार्ट मुलगी त्याला बायको आणि आम्हाला सून म्हणून हवी.

आम्हाला माणसांची आवड आमच्याकडे माणसांचं येणंजाणं, असते. त्यांचं हसतमुखानं स्वागत, त्यांची उठबस करणारी पाहिजे. बरं माझ्या सासूबाई आता 80 वर्षाच्या आहेत. घरांत त्यांच्यासमोर तरी ती साडीत वावरली पाहिजे. बाहेर मानसबरोबर फिरताना काहीही घालू दे. माझं काहीही बंधन नाही. सासूबाईंच सोवळंओवळं कडक आतापर्यंत मी सांभाळले. पण आता बाई माझ्याच्यानं झेपत नाही. माझी सून आली म्हणजे कसं मी सुटले. ती हाताळेल ना सासूबाई प्रकरण. आणि त्याचं सोवळ॔ओवळं. हो आणि एक, अगदी सुगरण नसली तरी चालेल. पण रोजचा स्वयंपाक कधी, सणावारी गोडधोड करायला तिला आलं पाहिजे. ह्यांना,  मानसला स्वयंपाकीण काकूंच्या हातचं आवडत नाही. दोघेही ते खाऊन खाऊन  कंटाळले.सूनबाई आल्यावर कसं ती करेलच की शिवाय काकू हाताखाली आहेतच ग.मग काय मुख्य स्वयंपाकाला कितीशी मेहनत आणि वेळ लागतो. कधी संकष्टीला मोदक तर सणावाराला कधी पुरणपोळी. रविवारी चिकन किंवा चिंबो-या केल्या म्हणजे झालं. आता बाबा माझा किचनला रामराम.

तर अशी दोन माणसं जावई आणि सून मनासारखी मिळवून द्यायची जबाबदारी तुझी.

पाहिलंत ना. हे चित्र आणि ते चित्र.

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

डोक्यावर पदर,मोठं रुपयाएव्हढ कुंकू, झळझळीत दागिने असं एकूण ‘आमदार सौभाग्यवती’छाप व्यक्तिमत्व.ओळखपरेड पुढे चालुच होती.सरांचं अख्खं कुटुंब शाळेशी अगदीं एकरूप झालेलं.शाळा ही मुख्याध्यापकांच्या आयुष्यात कशी मुरवता येते याचे धडे सरांच्या बोलण्यातून मला मिळत होते खरे, पण मी तर पुरस्काराच्या ‘प्रयत्ना’साठी आले होते.मी घाईघाईने म्हणाले, “मला ती कागदपत्रं दाखवताय ना सर?”

“हो. या. हिथच आहेत कपाटं. तीन आहेत बघा.” गोदरेजच्या तीन कपाटांकडे बोट दाखवत सर म्हणाले.

“बापरे! इतकी कागदपत्रं?” मी आश्चर्यचकित.

“तर हो. हे जिल्हा, हे राज्य नि तिसरं राष्ट्रीय साठी. आता ते सुद्धा भरेल” सरांनी जिल्हा पुरस्काराचं लाल कपाट उघडलं. “हा मँडम, घ्या फायली बाहेर.”

“बापरे! इतक्या जाडजूड फायली?” मी त्या काढताना थक्क झाले म्हणजे थकले. “अहो, त्यात घटनांचे पुरावे आहेत. म्हणजे पंधरा नंबरची माहिती, त्याचा फोटो पंधरा नंबरला. पुरावा पायजेल की. फायली नीट लावलेल्या होत्या. त्यावर विषयांची नांव होती. एकूण  सोळा विषय होते.”

“सर, तुमच्या कार्याचा अफाट सागर पुढे पसरलेला, माझ्या कार्याचा झरा सुद्धा नाही. कशाला मी नसती आशा धरू! हे चाळायला सुद्धा आठ दिवस लागतील. मी फक्त खात्यांची नांव लिहून घेऊ शकेन.”

“काय असतं कार्याचा पसारा आपणच वाढवायचा. कार्य मूठभर, पसारा हातभर. एखादी फाईल उघडून बघा. एव्हढ्या आलायसा, तर चिकाटी पायजे.”

मी काव्यलेखनाची फाईल उघडली. अल्बम मध्ये साताठ लग्नांचे फोटो होते. सर कोटबिट घालून हसऱ्या चेहऱ्याने वधुवरांना आशिर्वाद देत होते.

“सर, ही लग्न शाळेतल्या अनाथ मुलींची वगैरे —”

“त्या नंबरची  फाईल बघा.”

मी पाहिलं तर तिथे काव्याक्षतांची छापील प्रत डेकोरेशन करून लावलेली.

कवी–शी.आर. ढेकळे. पुढे लांबलचक अनाकलनीय पदवी.”मंगलाष्टकं लिहितो.

गावात कुणाचं लग्नं ठरलं की नावांच्या याद्या घेऊन माणसं येतात. मग चालीवरच मंगलाष्टकं रचतो. काव्य तेच, नांवं बदलायची. सरस्वती प्रसन्न आहे. लग्न अटेंड करायचं मग फोटो नि काव्य. फायली तुडुंब भरतात. प्रयत्नांती परमेश्वर.”

मी पुढची पानं पलटत गेले. आसपासच्या नेतेमंडळींचे वाढदिवस, ‘जीवेत् शरदाः शतम्’ नि खाली त्यांच्या अफाट कार्याबद्दलची, शुभेच्छांची शब्दाला शब्द जोडून केलेली काव्य. कवी–शी.आर्. ढेकळे सर. त्या नंबर च्या अल्बममध्ये त्या I नेत्याबरोबरचा सरांचा नतमस्तक फोटो. एकूण सरांच्या काव्यलेखनाचा पसारा माझ्या लक्षात  आला.

मग पुढची ‘देशसेवा’ ही फाईल उघडली. त्यात ध्वजारोहण, एन.सी.सी. कँप्स. मुलांना समुहगीतांच्या स्पर्धाना पाठविण्याचे फोटो, त्याच्या बातम्या, आणि अनेक देशभक्तीपर सुभाषितं— ‘जिंकू किंवा मरू’, ‘सदैव सैनिका, ‘यशवंत व्हा, खचू नका, मुलं सैनिकांच्या वेशात, त्यांच्या बरोबर सर, भिंतीवर मोठा भारताचा नकाशा —- फोटो आणि बातमी. “ही सगळी आमच्या ड्राईंग टीचरची किमया बरका.” असं म्हणत सरानी आणखी एक फाईल उचलली. ती व्रुक्षारोपणाची होती. तो सोहळा आल्या आल्या पाहिलाच होता. शाळेसमोर बरीच झाडं,  त्यांचा वरचा संभार सरांच्या बंगल्यासमोर आलेला. मुलांची समाजसेवा, शिपायांची पगारी सेवा, शाळेचं कचरा खत, मुलांचं डबे धुतलेलं पाणी त्यामुळे झाडं भराला आली होती. तिथे गीतेतला संदेश मराठीत लिहिलेला मुलांसाठी. “कर्म करीत रहा, फळांची आशा धरू नका” ही फाईल हिरव्यागार चित्रानी सजवलेली .

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

 

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही.वेड्यासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा वीस वर्षांनी मागे जावा.किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काहीतरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं तेव्हा नाकारली मानसीने. ठाण्याचा  एक मुलगा तर अगदी परफेक्ट मॅच होता मानसीला.  पण ‘त्याची माझी उंची जवळजवळ सारखीच आहे’ असलं खुसपट काढून मानसीने त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची.त्यावेळी  मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर……” उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.

उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली  ” जॉर्जबद्दल तर तुला माहितेय.  चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसर्‍या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून, अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला. आणि ‘आता मला लग्नच करायचं नाही’ म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.”

“आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.”

“ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं  वाटतं आताशा”. नलू खिन्न होऊन  म्हणाली.

“मला तर हल्ली जवळच्या नात्यात सुद्धा कुठल्या कार्याला जावसं वाटत नाही. तिकडे आडवळणाने गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर  येते.”

“परवा मुंजीला  गेले होते, तेव्हा ओळखीच्या  एका बाईंनी चंदा साठी घटस्फोटित स्थळ सुचवलं. धीर करून घरी बोलले मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिने घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.”

“अगबाई,मग? अरुणाने समजुत काढली का तिची?”

“काढणारच. सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आजकाल. चंदा सढळपणे घरात खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. ‘आत्या आत्या’ करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅटचं उत्पन्न थोडंच  सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरूणा  मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजा-राणीचं  दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं.” नलूने मनातली खंत  व्यक्त केली.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print