मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र-माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली, शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती अलगद तरळून गेली.)

“हं.. चला हतंच ” बेलीफ म्हणाला.

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. भुसभुशीत भिंतीच्या आधाराने कसंबसं तग धरून उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता बेलीफ अलगद आत शिरला. मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो. 

“साहेब, .. आत या ” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती ! )

पडे निघालेल्या भिंतींसारखं त्या अंधाऱ्या खोलीतलं मलूल वातावरणही बोचणारं होतं. लाकडी फळ्यांच्या काॅटवर कुणीतरी झोपलेलं होतं. मास्तरच असावेत. आतल्या विझू लागलेल्या चुलाण्याजवळ सावली हलल्याचा मला भास झाला.

“ताईसाब, बॅंकेचं सायब आल्यात” बेलीफने मुद्द्यालाच हात घातला.

मांडीवरल्या पोराला खांद्यावर टाकून ती पुढे आली. त्या भग्न वाड्याच्या कृश सावलीसारखा रापलेला रंग, वाळलेल्या अंगकाठीवर लोंबणारं जुनेरं.. त्रासलेल्या चेहऱ्यावर उदासीत कालवलेले .. मला शापणारे भाव.. !

काय बोलावं, कशी सुरुवात करावी मला समजेचना.

एवढ्यात काॅटवरच्या अंधारात थोडीशी हालचाल जाणवली. बेलीफ पुढे झाला.

“मास्तर, ब्याकेचं सायब आल्यात.. “

“या.. या.. “कुलकर्णी धडपडत उठायचा प्रयत्न करु लागले. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा बेलीफ त्यांना सावरायला पुढे झेपावला. 

“या.. बसा असे.. ” पायथ्याजवळची कळकट चादर गोळा करुन लाकडी काॅटचा एक कोपरा रिकामा करुन देत नाना भिकू कुलकर्णीनी मला थरथरते हात जोडत बसायची खूण केली. विरघळू पहाणारी माझी नजर रंग उडालेल्या भिंतींवरुन मास्तरांच्या वाळून गेलेल्या चेहऱ्यावर येऊन स्थिरावली.

“बोला.. काय म्हणताय?”

“हे बेलीफ. यांच्यामागोमाग आम्ही आलो. म्हणजे.. यावं लागलं.. ” मी बेलीफकडे पाहिलं.

“मास्तर, कोरटाचं वारंट निघलंय. तुमाला अटक कराय आलोय आमी.. “

“तुम्ही जामिनदार आहात ‘प्रसन्न इलेक्ट्रीकल्स’च्या कर्जाला. दोन वर्षांपूर्वी कोर्टाचा

हुकूमनामा मिळूनही कर्जखात्यात कर्जदाराने पैसे भरलेले नाहीत. त्यांची कांही मालमत्ताही नाही. आता त्यांच्या कर्जाचे जामिनावर म्हणून त्यांच्या पश्चात तुम्हीच बॅंकेचे एकमेव ऋणको आहात. एकूण व्याज, कोर्टखर्च मिळून वीसएक हजार रुपये भरावे लागतील… ” मी म्हणालो. ते विचारात पडले. गप्प बसले. शून्यात नजर लावून कांहीतरी शोधत राहिले.

मग बेलीफच पुढे झाला.

“मास्तर.. “

“अं.. ?”

“अटकेचा पंचनामा करायला हवा… “

“अं.. ? हो.. रितसर जे असेल, ते करा. तयारी आहे माझी. ”  बेलीफला काय बोलावं कळेना. तो जागचा उठला. दाराजवळ जाऊन मला खूणेनं बोलावून घेतलंन्.

“काय करायचं?” हलक्या आवाजात मला विचारलं.

“कायद्यानुसार जे काही असेल ते करायचं. “

“त्ये झालंच. पन सायब मास्तर द्येवमानूस हाय हो. जावयानं पुरता धुतलाय याला. तुमचा मेल्याला कर्जदार जावईच की ह्येंचा. जाताना सोताचं न् ह्येंचं दोनी घरं पार धुळीला मिळवून मेलाय बगा. हाय खाऊन मास्तरांची बायकू गेली. सोन्यासारक्या यांच्या पोरीची जावयानं पार दशा करुन टाकलीया बगा. दोन पोरींच्या पाठीवरचं त्ये एक लेकरु हाय तिच्या पदरात. दोन घरी सैपाकाची कामं करुन चूल पेटती ठेवतीया. मास्तरांच्या पेन्शनीत  त्येंचं औषदपानीबी भागत न्हाईय” बेलीफ सांगत राहीला. मी ऐकत होतो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरुन राहिलेला कळकट अंधार.. आणि माझ्या मनात भरुन आलेलं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला….. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

बेलीफचं ते चार ओळींचं पोस्टकार्ड माझ्या उत्साहावर विरजण ओतायला पुरेसं होतं. एका हुकूमनामा मिळालेल्या कर्जखात्यातील जामिनादारावर अटक वाॅरंट बजावण्यासाठी बॅंकेमार्फत मला केळघर ग्रामपंचायतीत हजर रहायला सांगणारं ते पत्र!

कामाच्या घाईगर्दीतला एक अख्खा दिवस कर्जवसुलीची कांहीही आशा नसलेल्या एका खात्यासाठी  फुकट घालवायचा ही कल्पना मनाला पटणारी नव्हतीच. पण कायद्याचा एकदा उगारलेला बडगा कोणत्याही आदेशाविना शेवट गाठण्याआधी केवळ माझ्या इच्छे न् मतानुसार आवरणं बँकेच्या नियमात बसणारं थोडंच होतं?

मला जाणंच भाग होतं.   

बेलीफच्या पत्रानुसार मी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधे हजर रहाणं आवश्यक होतं. पण मी गेलो साडेनऊ वाजताच. कारण ‘बेलीफ’या व्यक्तीपासून मी आधीपासूनच सावध रहायचं ठरवलं होतं.  त्याला कारणही तसंच होतं.  जिथे जायचं त्यांना आधीच भेटून, वर्दी देऊन त्यांच्याकडून बक्षिसी उकळायचं त्यातील काहींचं तंत्र आणि कसब राष्टीयकृत बॅंकेचा मॅनेजर म्हणून मला ऐकून माहिती होतं. आज इथेसुध्दा संशयाला जागा होतीच. कारण माझ्या आधीच बेलीफ हजेरी लावून कामानिमित्त बाहेर गेल्याचं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून मला समजलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली.  सहजासहजी आपली अशी फसवणूक करायचा त्याचा प्रयत्न असल्याचा संशय मला तिडीक यायला पुरेसा होता. पण डोक्यात राख घालून चालणार नव्हतं.  मी शांत रहायचं ठरवलं.  आता एक तर पुरेसा पुरावा नसताना चिडून संतापून उपयोग नव्हताच.  त्यामुळे त्याच्या कलाने घेणे माझ्या दृष्टीनं सोयीचंच नव्हे तर

आवश्यकसुद्धा होतंच. पाच-दहा रुपयांसाठी स्वत:चं इमान विकायचीही तयार असणाऱ्या या माणसाची मला आता किंव वाटू लागली.

पुढे अर्ध्या-पाऊण तासानंतर बेलीफ आला.

धोतर, वर पांढराच पण मळकट शर्ट,डोक्यावर कळकट टोपी,तोंडात पानाचा तोबरा, ओबडधोबड मातकट चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट,आणि हातात लोंबती पिशवी. तो माझ्याकडेच पहात थोडा घुटमळलाय हे लक्षात येताच सावध अंदाजानेच त्याच्याकडे पाहून मी ओझरता हसलो.

“मॅनेजर सायब का ?”

“हो. तुम्ही बेलीफ?तुम्ही तर मघाशीच आला होतात ना?”

“हां.. म्हंजी.. तुमच्या म्होरं घटकाभर आधी तर आलोतो.. पन.. ”  

“मग गावात गेला होतात कां?”

तो बावचळला.

“हा़.. म्हंजी काम हुतं वाईच”

“नाना कुलकर्ण्यांकडे ?” मी वर्मावर बोट ठेवल्यासारखं तो दचकलाच एकदम.. थुंकायचं निमित्त करून मला नजर द्यायचं टाळत त्याने मान वळवली.

“म्हंजे त्ये मास्तर व्हय. ? अवं तेंच्याकडं आत्ता तुमच्यासंगट जायचं नव्ह का.. “तो सव्वाशेर निघाला होता. मी स्वतःशीच हसलो. गप्प बसलो. रस्त्यातून जाताना मी विचारलेल्या प्रश्नांना तो न अडखळता मुद्देसूद उत्तरे देत होता.

“नाना कुलकर्णी असतील, भेटतील का हो घरी?”

“व्हय तर. जात्यायत कुटं?हांतरुन सोडता याय नगं?”

“म्हणजे?”

“अवं समद्या हातापायाच्या काटक्या झाल्यात. वाळून कोळ झाल्यालं म्हातारं मानूस त्ये. दिस मोजत पडून आसतंय. “

“अस्सं? मग त्याना अटक कशी करायची. ?”

“आता कायदा म्हणतोय न्हवं अटक करा म्हणून..  आपण करायची. अवं ही काय फौजदारी अटक हाय का ?सादी शिव्हील अटक ही. ततं जायाचं. त्येना म्हनायचं,’मी बेलीफ. ह्ये बॅंकेचं सायब. आन् ह्ये कोरटाचं वारंट. नाना भिकू कुलकरनी , आमी तुमाला अटक केलीय. ‘ त्ये व्हय म्हनतील. पन त्यो वाळका ओंडका उचलून न्याचा कसा न् ठिवायचा कुटं?म्हनून मंग अटकंचा पंचनामा करायचा. त्येचा कोर्टात रिपूर्ट लिवायचा. मंग कोर्ट नोटीस काढंल,पुलीस धाडंल. त्ये समद त्येंचं काम.  कोर्टात हजर नाही झालं तर  पुलीस त्यांना बेड्या घालून नील. त्ये समदं त्येंचं काम. आपनाकडं त्येचं काय नाय. “

मी ऐकत होतो. कायदा कोळून प्यालेला तो बेलीफ किती निर्विकारपणानं सांगत होता सगळं! माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली,शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती नकळत तरळून गेली… माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहाणारी.. दयेची भीक मागणारी..

“हं.., चला हतंच. “

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. अवशेषांच्या रुपात डुगडुगत कसाबसा उभा असणारा दिंडीदरवाजा.. वाळवीनं पोखरलेलं त्यावरचं नक्षीकाम..  पुढचा कोंदट अरुंद बोळ..  वाटेतला गंजका नळ..  धुण्याच्या दगडाजवळची सुकलेली केळ.. वाळून गेलेला आळू..  जांभळाचं वाळत चाललेलं म्हातारं झाड..

भुसभुशीत भिंतीच्या आधारानं कसंबसं तग धरुन उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता, बेलीफ अलगद आत शिरला.  मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो.

“साहेब, या..आत या” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो.. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती.. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? जीवनरंग ❤️

My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

(कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….) इथून पुढे —

माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावे म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले.पण त्यांनी लग्न केले नाही. माझ्या आजी आजोबांनी  नैतिक, अनैतिक, भावनिकरित्या बाबांना प्रवृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केला,पण बाबा ठाम राहिले.. शेवटी तर आजीआजोबांनी  Ultimatum दिला….” तू जर आमचे ऐकले नाहीस तर ही शेती,जमीनजुमला,घर यातला छदामही मिळणार नाही, या सर्वातून  तुला बेदखल केले जाईल. “

बाबा दुसऱ्यांदा विचार करण्यासाठीसुद्धा थांबले नाहीत आणि क्षणार्धात सगळ्यावर पाणी सोडले. सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण सुखी जीवनावर पाणी सोडले व मला घेऊन या मोठ्या शहरात एक सडाफटींग माणूस म्हणून अतिशय कठीण, कष्टप्रद जीवन स्विकारलं. रात्रंदिवस काम करुन मला वाढवलं,जपलं, प्रेमानं माझी काळजी घेतली.  .

आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत… ज्या मला आवडायच्या !

पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्यांनी म्हंटलं की तो मीच संपवायचे…..कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही…

खरी ग्यानबाची मेख इथंच होती….त्यांच्या समर्पणाची.

त्यांच्या आवाक्याबाहेरचे,पण जे जे चांगले आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

या शाळेनं मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथं प्रवेश दिला.

Love, Care ..defines Mother.म्हणजे प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो.

Compassion….म्हणजे करुणा म्हणजे जर आई असेल,तर माझा बाबा यात फिट्ट….

Sacrifice…समर्पण हे आईचे रुप असेल तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर….

संक्षेपात……

आई जर प्रेम,काळजी,करुणा,समर्पण यांची मुर्ती असेल तर…..

  …..   MY FATHER IS THE BEST MOTHER ON EARTH THEN…

On Mother’s day I Salute him and say it with great Pride that, the hardworking GARDENER  working in this School is MY FATHER…

On Mothers day..या पृथ्वीवरचा  एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते.

कदाचित शिक्षकांना मी हे लिहलेलं आवडणार नाही,पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी, ज्यानी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केले.

टांचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली….आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोंडलेल्या हुंदक्यांचाच.

बागकाम करतांना तळपत्या उन्हाने कधीही घामाघुम न झालेला गंगा… आपल्या मुलीच्या या मृदु मुलायम शब्दांनी  त्याची छाती अश्रुंनी भिजून चिंब झाली..तो हात बांधून उभा होता….

शिक्षकाच्या हातातून गंगानं तो कागद घेतला आणि ह्रदयाच्या जवळ धरला.अद्यापही हुंदक्यांनी त्याचं शरीर थरथरत होत…….

प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या. गंगाला त्यांनी खुर्चीत बसायला सांगितले, पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या….

आवाजातला प्रशासकीय करड्या स्वराची जागा आता मुलायमतेनी घेतली होती..

“ गंगा अरे तुझ्या मुलीला 10/10 गुण मिळाले. शाळेच्या इतिहासात मदर्स डे च्या दिवशी आईवर लिहलेला हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे. आपल्या शाळेत Mother’s Day निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित  केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने यासाठी मुख्य अतिथी म्हणून तुला बोलवण्याचे ठरवलेयं. आपल्या मुलांना वाढविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेम आणि समर्पण करणाऱ्या  व्यक्तिचा सन्मान आहे हा. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळी तुझ्या मुलीनं तुझ्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाला Appreciate केलं तर तिलाही अभिमान वाटेल आणि शाळेलाही, आपल्याकडे असणाऱ्या सर्वोत्तम पालकाचा….खरंतर एका अर्थाने बागशिल्पकारच तू. A  Gardner…. बागेतील झाडांची काळजी घेतोस,जपतोस.  एवढच नाही तर  तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन, पालन पोषण अप्रतिम पद्धतीने करतोयस……

“So Ganga ….. will you be the chief guest for tomorrow’s event?”

—समाप्त

लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ My father is the best mother… भाग – 1 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? जीवनरंग ❤️

My father is the best mother… भाग – 1 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

“ My Father is the Best Mother on Earth !! ” —-हे वाक्य उच्चारल्या बरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आजूबाजूला पाहिलं तर अख्ख ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेलं होतं .त्या टाळ्यांच्या Rhythm मध्ये मीही सहभागी झाले होते.

पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे अनेकांचे पाणावलेले डोळे….माझ्यासह…।।

प्रसंग होता एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत साजरा होणारा….MOTHERS DAY CELEBRATION चा..

इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून असे कार्यक्रम घेतले जातात.

आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शाळेतल्या हिरवाईनं सजलेल्या, विविध वृक्षसंपदा असलेल्या बगिच्यातील झाडांना उन,धूळ याची पर्वा न करता “तो” पाणी देत होता…..तेवढ्यात शाळेच्या शिपायाने त्याला सांगितले..

“ गंगादास..प्राचार्य मँडमनी तुला बोलवलयं…आत्ता लगेचच.. “ 

शेवटल्या दोन शब्दावरचा  जोर  निरोपाची तीव्रता अधोरेखित करत होता.

हात स्वच्छ करुन गंगा निघाला मँडमच्या केबीनकडे.

त्याची छाती धडधडत होती.रोजचा पायाखालचा रस्ता संपता संपत नव्हता. डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.

कशासाठी बोलवलं असेल  मॅडमने ? खूप शक्यता पडताळून पाहिल्या गंगाने.. All permutations, combinations…पण छे !आपल्या कामात चोख होता तो.

टकटक…टकटक…त्यानं दार वाजविले…

बाहेरुनच विचारले….

“ मॅडम, तुम्ही मला बोलावलंत ? “

“ आत ये.”..आतून एक जरब असणारा आवाज ..

तो आणखीनच Nervous…

दार लोटून तो आत गेला…

करडे,रुपेरी केसांची फ्रेंच नॉट घातलेली आणि धारदार नाकावर आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या प्राचार्यांनी त्याच्याकडे बघितले आणि टेबलवरच्या एका कागदाकडे बोट दाखवले……

म्हणाल्या….

“ वाच हे ! “

गंगा बावचळला पण लगेच म्हणाला…

“ मॅडम अहो मी निरक्षर माणूस, मला लिहता वाचता येत नाही.. आणि इंग्रजी तर फारच लांबची गोष्ट.

माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा…एक संधी द्या मॅडम मला….मी आजन्म ऋणी राहीन तुमचा. तुमच्या या बड्या शाळेत तुम्ही माझ्या मुलीला फुकटात शिकण्याची संधी दिली. मी तर स्वप्नातही हा विचार केला नव्हता….” 

तो थरथर कापत, स्फुंदून स्फूंदून बोलत होता.

 

“ थांब जरा तू. शांत हो.खूप गोष्टी गृहीत धरल्यास तू. तुझ्या मुलीला शिक्षणाची संधी आम्ही दिली कारण ती खूप हुशार आहे आणि तू आहेस आमच्याकडचा आज्ञाधारक  Gardner…माळी…..थांब जरा.”

बेल वाजवून शिपायाला त्यांनी एका शिक्षिकेसाठी निरोप धाडला… “ ही शिक्षिका आली की वाचून दाखवेल आणि अर्थही सांगेल तुला. “  कागदाकडे निर्देश करीत म्हणाल्या, “ हे तुझ्या मुलीनं लिहलयं आणि मला वाटत होतं  की तू हे वाचावंस…

तेवढ्यात टीचर आल्याच. टीचरने वाचायला सुरवात केली आणि प्रत्येक ओळीचं हिंदी भाषांतर करत वाचलं. 

ते लिहलेलं असं होतं….।

…. “ आज आम्हाला आमच्या “आई “बद्दल लिहायला सांगितले…. कारण Mother’s day…. 

बिहारमधल्या एका छोट्या खेड्यातून मी आले. शिक्षण आणि आरोग्यसुविधांची वानवाच तिथे. कित्येक माता बाळांना जन्म देतांना  मृत्युला कवटाळतात. माझी आई त्यातलीच एक….मी या जगात आल्यानंतर मला कौतुकानं कवटाळताही आले नाही तिला. माझा बाबा हा पहिला व्यक्ती होता ज्यानी मला हातात घेतलं….आणि कदाचित एकमेव… प्रत्येक जण दुःखी होता…

कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….

— क्रमशः…

लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन रिचार्ज – रिचार्ज !! – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

मन रिचार्ज – रिचार्ज !! – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच.

रविवार…निवांत, आरामाचा दिवस…आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती. 

सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज ‘लो बॅटरी’..

चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.

अरे बापरे…?? काय करावे तेच सुचेना…

मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.

माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”

“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.

“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतोस ,इतके त्याला जपतोस .. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”

—- पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.

“मनाचे चार्जिंग ?? हे काय नवीन.???”

“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, ॲप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतु, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते, ते मनाकडे.”

“भारी, इंटरेस्टिंग बोलत आहात” सहजपणे वडिलांच्या शेजारी बसलो.

लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.

 माझे धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरंतर वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.

मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली. 

किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.

बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.

एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!

“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!” 

“दोस्ता…” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.

क्लासवरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार ?” 

“नको..तू हरलास तर मला बरे वाटणार नाही..”

“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”

बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.

मुलाने स्पोर्टींगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.

आता काय करायचे…?

अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणि लगेच परत आली.

“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.

दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले. बॅगमध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गंमत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पेटारा उघडत होता.

जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!

आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मुलं जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात… अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वत:चे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो. 

चटकन आरशात पाहिले.

“अरे..! फारसा फरक पडला नाही”. 

उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली. तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते. बराच वेळ पाहत राहिलो.

मन गलबलून आले .खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.

काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले ,’कसं असतं ना आपलं मन..?

अचानक आनंदून जाते..क्षणात गहिवरते, हळवे होते..

एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.’

—या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.

“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”

“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”

समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”

मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो.  त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.

लग्न पुन्हा एन्जॉय केलं.

“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचास तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेलास . उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”—डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.

“ थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अॅम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो. आपण मोठे झालो की मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरतो . रुटीन सोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे ,कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”

“ मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”

“ चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतो ” 

—बायकोला जोरात ठसका लागला.

“ मन जरा जास्तच चार्ज झालंय वाटतंय ” बायकोने चिमटा काढलाच….. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

(मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.) इथून पुढे —-

मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी।  पण फँक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिने मला सांगितलं. फँक्टरीच्या प्राँडक्ट्सची ,त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगबद्ल  तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती.

जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता.त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्यातला नम्रपणा, साधेपणा,तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी, हे सर्व पाहून मी खूप  भारावून गेलो होतो.

“थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते”. 

मी होकारार्थी मान हलवली.

ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला.मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना.  म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पँसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा ! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा.एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो गोड वाटत होता.मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला. तेवढ्यात ती आली.

“रडत होता वाटतं!” तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.

थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हाला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.

“मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो.तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय” तिनं स्पष्टीकरण दिलं.

सकाळ झाली. आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो.

एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.

“घरी कोणकोण असतं?” तिनं अचानक प्रश्न केला.

” मी, आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीय”

“म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे”. 

“हो तर! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार?”

तिनं पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली.बोलणं झाल्यावर मला म्हणाली “तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मँनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना एसएमएस करते”. 

मी नाव सांगितलं।  तिनं एसएमएस केला.

“तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून”

“संजना कोण?” मी विचारलं

"मीच। माझंच नांव संजना” ती हसून उत्तरली.

” थँक्यू व्हेरी मच अँड सॉरी”

” सॉरी ?कशाबद्दल?” तिनं आश्चर्याने विचारलं

“काल मी तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो.मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात ,एका मुलाची आई आहात.माझी चूक झाली.आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर देट”

तीनं हलकसं स्मित केलं. म्हणाली.” फरगेट इट.अशा नजरांची मला सवय आहे.स्वतःची बायको सुंदर असतांना दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमँरीड आहात. आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते”

थोडं थांबून ती म्हणाली, “आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहिजेत. खरं ना?”

” नाही नाही” मी घाईघाईने म्हणालो. ” अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढेन”.  तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला.

नागपूर आलं. मी खाली उतरलो.तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली.निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले.तो लगेच माझ्याकडे झेपावला.मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले.मग त्याला तिच्याकडे दिलं.रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.

“बेस्ट आँफ लक फाँर युवर इंटरव्ह्यू” ती म्हणाली.

“थँक्स” 

जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला.

इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारुन एकशे साठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली.त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की.

संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही.पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच.  पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खूप चांगली शिकवणही देऊन गेली.

समाप्त 

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अदृश्य लेबल – भाग – 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ अदृश्य लेबल – भाग – 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

 माझ्याकडे बघून एक लहानसे पण छानसे स्माईल दिले. ………) – आता पुढे 

 त्या एका प्रसंगाने माझ्या गाडीने नाही तर माझ्या डोक्यातल्या  विचारांनी आता प्रचंड वेग घेतला होता. खरं तर मी घरून उशिरा निघून दुकानांत वेळेवर पोचायचा अट्टाहास करत होतो. जरा उशीर झाला असता म्हणून खूप काही मोठे नुकसान किंवा कोणाला दिलेला शब्द मोडणार नव्हता. घरातून उशिरा निघणे ही माझी चूक होती. पण कारण नसतांना मी त्याचे उट्टे, हे त्या पुढच्या गाडीवर काढत होतो आणि महत्वाचे म्हणजे पुढचा गाडीवाला गाडी हळू  चालवत असेल तर प्रत्येकानी त्याचे कारण गाडीच्या मागे लिहिणे खरंच गरजेचे आहे का ? का मी माझा सोशिकपणा दाखवून जरा धीराने विचार करू शकत नाही ?  आजच्या घडीला घरातून बाहेर पडणारा, कामाला जाणारा, रोज कमाईला निघणारा प्रत्येक माणूस काही ना काही दडपणाखाली असतो. प्रत्येकाच्या मनात असंख्य विचार घोळत असतात. कोणाची नोकरी गेलेली असते, तर कोणीतरी कॅन्सरसारख्या महाआजाराशी लढत असतात. कोणीतरी कोर्टातल्या भावनिक अशा घटस्फोटाच्या विचारात अडकलेला असतो, तर कोणीतरी आपला जवळचा प्रेमाचा माणूस गमावलेला असतो. कोणीतरी  त्याच्या धंद्यातल्या मोठ्या नुकसानाशी लढत असतो, तर कोणीतरी विजेच्या बिलाचे पैसे आजच्या शेवटच्या तारखेला कुठून आणू ह्या विचारात असतो. प्रत्येकजण आज आपल्या आव्हानात्मक आयुष्याबरोबर लढत असतो. कोणाच्याही चेहऱ्यावर त्याच्या मनात काय चाललंय, तो आज परिस्थितीशी कसा लढतोय, सुखाने सोडा पण समाधानाने जगण्यासाठी तो कुठच्या मनस्थितीत आहे ह्याचे लेबल लावलेले नसते, तसे त्याच्या कपाळावर लिहिलेले नसते. अशा वेळेला आज प्रत्येकाने एकमेकांना सोशिकतेने, धीराने बघितले पाहिजे. आज प्रत्येकाने फक्त आपल्याच समस्या, आपल्याच अडचणींचा विचार न करता समोरचाही काही अडचणीत आणि समस्येला सामोरे जात असेल हा विचार करून त्याचा आदर केला पाहिजे. माझीच समस्या मोठी आणि माझ्यापेक्षा मोठी समस्या दुसऱ्या कोणालाच नाही असा समज करून घेणे योग्य नाही.

प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करून धीराने थोडी सहनशीलता, सोशिकपणा आणि सबुरीने घेतले पाहिजे. महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपल्यासमोर आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर लिहिलेल्या अदृश्य लेबलचा मान राखला पाहिजे. प्रत्येकाने ते अदृश्य लेबल वाचायची आपली क्षमता वाढवली पाहिजे, तरच आपल्याही कपाळावर लिहिलेल्या अदृश्य लेबलचा दुसरे मान  राखतील.

चांगल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन अदृश्य लेबल नेहमीच असतात. एक सहनशीलता आणि दुसरे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दुसऱ्यांना दिसून देत नाही आणि सहनशीलता त्याचे प्रश्न कमी करते.

चला प्रत्येकाच्या कपाळावरील अदृश्य लेबल वाचायचा प्रयत्न तरी करूया आणि त्याचा आदरही करूया.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

०१-०५-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

रेल्वेने नागपूरला इंटरव्ह्यूसाठी चाललो होतोे.रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं.पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती.ए.सी.डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते.

नाशिक आलं तसा एक देखणा तरुण ब्यागा घेऊन आत चढला.माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बँग ठेवली.तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली.तिला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाँड ! काय सुंदर होती ती !

“कुठं जाताय?”तो तरुण मला विचारत होता.

“नागपूरला “मी शुध्दीवर येत म्हंटलं.

” थोडं लक्ष ठेवाल का?मिसेस गोंदीयाला जातेय.एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे” 

तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.

” हो ठेवेन की.त्यात काय विशेष!”

मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली.गाडी निघाली तसा तो उतरुन गेला.तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं.समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली.माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती.खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती.मी माझ्या काँलेजच्या मुली आठवून पाहील्या.त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती.तिचे डोळे,नाक,ओठ, त्वचा,केस फारच सुरेख होते.विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती.माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती.बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे.पण तीची फिगर अतिशय सुरेख होती.मनात विचार आला,स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का?की हिच्यापेक्षा जास्त?नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.

मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो.ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती.मुलाला बाटलीने दुध पाजतांना,त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती.अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.

एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं.तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली.नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती.जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती.पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा,भडकपणा नव्हता.घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती.काँलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं.ती जर विवाहित नसती तर मीसुद्धा  तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती.

मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती.

आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो.भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बँगेतून डबा काढून जेवण केलं.साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा.तिनं बँगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.

“या जेवायला”

अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम  गडबडून गेलो.

” मी आताच जेवलो बघा”

ती सौम्य हसली. मग म्हणाली

” हो पाहिलं मी.हे स्वीट तरी घ्या” एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली.मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं.

” नागपूरला रहाता?”

तिनं जेवता जेवता विचारलं.

“नाही.इंटरव्ह्यूला चाललोय”

” कोणत्या कंपनीत?”

मी कंपनीचं नाव सांगितलं.

“इंजीनियर आहात?”

“हो मी बी.ई. केलंय केमिकल मध्ये” मी जरा अभिमानानेच सागितलं.

“मी सुध्दा इंजीनियर आहे”ती म्हणाली.”एम.ई.केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये”

मी वरमलो.माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.

” मग जाँब करताय कुठे?”मी विचारलं

” नाही.करायची खुप इच्छा होती. पण एम.ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं.”

” मिस्टर काय करतात तुमचे?”मी थोडं इर्ष्येने विचारलं.

” ते सुध्दा इंजीनियर आहेत.एम.एस.केलंय अमेरिकेतून आणि आता फँक्टरीज सांभाळतात.” 

” फँक्टरीज?”

” हो.नाशिकमध्ये आमच्या तीन फँक्टरीज आहेत आणि पुणे,मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फँक्टरीज आहेत.अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात “

बापरे!मी गार झालो.एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो.तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरीद्री होतो.माझ्यासारखे अनेक इंजीनियर तिच्या फँक्टरीत पगारी नोकर असतील.तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती.कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.

” तुम्ही एकट्याच जाताय?नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं?”

एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं

“का? कशासाठी?नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं.गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच.एका रात्रीचा तर प्रश्न होता.तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत.त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं “

” तरीपण कुणीतरी..….”

“अहो मागच्या महिन्यात  मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले,आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला.हा तर आपला महाराष्ट्र आहे.इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.

क्रमशः…

© श्री दीपक तांबोळी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-4☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागत आपण पाहिले,- ‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’  ‘नको. गावाकडची  दोघे-तिघे  आहेत.’ आता इथून पुढे )

ती आनंदाला सोडून गेली. तिला यायला दुपारचे तीन वाजले होते. नंतर तिने आंघोळ केली. मी दिलेली साडी नेसली. तिला जेवायला वाढलं. त्याक्षणी जीवनातील तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याप्रमाणे,  ती एकेक घास मनापासून खाऊ लागली.

जेवण झाल्यावर तिला विचारलं,  ‘असं कसं झालं?’

ती म्हणाली, ‘रात्री दारूच्या नशेत गवताच्या गंजीवर जाऊन झोपला. झोपेत कधी तरी साप चावला. ओरडलासुद्धा  नाही. सकाळी  बघितलं तर काळा-निळा पडलेला. झोपण्यासाठी खाट आणायला  दोनदा पैसे साठवले होते. दोन्ही वेळा दारूत उडवले.’

मी  म्हंटलं,  ‘आता कसं  करणार?  डोंगराएवढं आयुष्य पुढे पडलय….’

‘मी  कष्टांना  घाबरत  नाही.’  मग जरा घुटमळली मग म्हणाली,  ‘मला थोडं  बोलायचय. आनंदाचं शाळेत जायचं वय झालय. त्याला तुमच्याकडे  ठेवू का? तुमच्याकडे  राहिला,  की चांगला शिकेल.  फुकट ठेवणार नाही. त्याच्या खर्चाची पै न पै मी देईन. मुलाला पोसायला माझे हात समर्थ आहेत. शे-सव्वाशे तरी दुध्या कोहळ्याचेच होतील. शिवाय भाजीपाला आहे. एखादी गाय पाळीन. म्हणजे दुभतं होईल. थोडं घरात. थोडं विकायला. माझ्या आनंदानं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, असं वाटतय मला. तसंही तो असता, तरी मी आनंदाला इथेच ठेवायचं ठरवलं होतं. त्याच्या सावलीत मला माझ्या मुलाला मुळीच वाढू द्यायचं नव्हतं.’

मग पुढे म्हणाली, ‘गावात तूर मका उगवेन. पेरू,  डाळिंबाची लागवड करेन. गावातील घर-शेत संभाळेन आणि इथे तुमचं अंगण, परसूही बघेन. साफ-सूफ करेन. फुला-फळांची रोपे लावेन.’

मी मुग्ध होऊन ऐकत राहिले. तिच्या बोलण्यातली जादू मला संमोहित करत होती. मला घरातले हंडे-कळशा झळझळलेल्या दिसू लागल्या. मागच्या बाजूच्या मुलूल पडलेल्या लिंबा-डाळिंबाच्या डहाळ्या टवटवित झाल्या. अंगणात चारी बाजूंनी पांढर्या  पिवळ्या फुलांच्या वेलींवर फुलांचे झुबके झुलू लागले.

मी म्हंटलं,  ‘हे घर तू आपलंच घर समज. तुझ्या मुलाला इथे कष्ट होणार नाहीत.’

ती थोडी थांबली. नंतर एखाद्या दु:स्वप्नातून मुक्त होत असल्यासारखी म्हणाली,

‘कुणाला आवडणारी लाजरी,  नखरेल कटाक्ष टाकणारी सुंदर पत्नी होणं, माझ्या आवाक्यात नव्हतं. हा देह,  हे रूप माझ्यासाठी सगळ्यात मोठी बाधा होती. पण चांगली आई होऊन दाखवणं, तर माझ्या हातात आहे ना?  आई-मुलामध्ये कुरुप शरीर कधीच बाधा आणत नाही. हा मोठ्ठाच फरक आहे मर्द आणि मुलगा यात!’

तिचा सहा वर्षाचा मुलगा कधीपासून बावचळून आईच्या पदराला चिकटून उभा होता.

‘निघते….’ तिने मुलाचं बोट धरलं. ‘घराचं छप्पर मोडलय. ते दुरुस्त करायचय. दुसर्या् नांगराची व्यवस्था करायला हवी. ‘

ती गेली. दूरवर जात दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्या पाठमोर्याो  आकृतीकडे पहात राहिले.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.)

पुढे आणखी काही दिवसांनी आणखी काही बातम्या आल्या. याच्या विपरितशा. मामाला दारूचं व्यसन लागलय. पैसे हाती आले, की नशापाणी करतो. पैसे नाही मिळाले, तर घरातल्या हाताला लागतील त्या वस्तू विकतो. तिने आपला कोल्हापूरी साज विकून नांगर आणला, तर मामाने पुन्हा तो नांगर विकून टाकला. कारण विचारलं, तर बाळंतपणाचा खर्च कुठून करायचा म्हणाला.

तिला मुलगा झाला. तिच्यासारखा नव्हे. मामासारखा गव्हाळी वर्णाचा. गोंडस. तो तिचा आनंद होता. तिचं सुखनिधान होतं. तिने मुलाचं नाव आनंद ठेवलं. मामाला असं झालं होतं, की ती कधी एकदा बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर येते आणि नेहमीसारखी विहिरीवरून पाणी आणणं, शेतात खपणं वगैरे कामे करते. रोजच्या रोज विहिरीतून कोण पाणी ओढणार? आपल्याच्यानं नाही होणार!

दहा दिवस सरले आणि तिने बाळंतिणीची खोली सोडली. ती पुन्हा कामाला लागली. घरात-शेतात राबू लागली. काटकी काटकी जोडून संसार बांधू लागली. शेतात पीक उभं राहिलं. लोक मामालाम्हणाले, ‘सगळं बायको करतेय. तू निदान राखण तरी कर. ‘ तो रात्रीचा राखणीला गेला. दारूचा अंमल जरा जास्तच झाला होता. मचाणावर आडवा पडला. रात्री चोरांनी उभं पीक कापून नेलं. याला जाग आली नाही. नंतर एकदा कोहाळे काढून ढीग लावून ठेवला होता. रात्री रानांजरं आली. कोहाळ्यांचा सत्यानाश झाला. हा दारूच्या नशेत.

मामाचं दारूचं व्यसन आता खूपच वाढलं होतं. ती काटकी काटकी जोडत होती. तो मोडून खात होता. अशातच तिचा आनंद वाढत होता. आता तो रांगायला लागला होता. ती एकदा विहिरवर धुणं धुवयला गेली. तिथेच असलेल्या सदाला त्याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणून सांगून गेली. ती धुणं धुवून येते, तर आनंदाने रांगत जाऊन चुलीतल्या गरम राखेत हात घातला. चटका बसताच रडायला लागला. सदा तिथेच, पण दारूच्या अमलाखाली. आनंदला जाऊन उचलणं, त्याला सुधारलं नाही. पुढे त्याला शहरातल्या दवाखान्यात नेऊन औषधपाणी करावं लागलं. आता तिने आनंदच्या बाबतीत त्याच्यावर विसंबणं सोडून दिलं.

दिवसामागून दिवस, रात्रीमागून रात्री, दिवस, महिने, वर्षं सरत होती. आमच्या घरातली मुलेही कुणी शिकण्यासाठी, कुणी नोकरीधंद्यासाठी शहरगावी जाऊन स्थिरावली. इथे आम्ही चार-सहा जणच उरलो. सगळ्या गावची अशीच तर्हार.

एक दिवस सुनुमामी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला हाताशी धरून माझ्या दारात उभी राहिली.

‘सुनुमामी तू?… आणि मामा कुठाय?’ तिने गल्लीच्या तोडाशी उभ्या असलेल्या हातगाडीकडे बोट दाखवलं. त्यावर मामाचं प्रेत बांधलं होतं. तिथे आणखी दोघे-तिघे उभे होते.

‘म्हणजे मामा…’ मी न बोललेले शब्द जसे तिने ऐकले.

‘तो जिवंत होता कधी?’ प्रश्नाचं उत्तर तिच्या डोळ्यात होतं.

इथपर्यंत याला घेऊन आले. इथून पुढे नेणं काही शक्य नाही. आनंदाला इथे ठेवते. मला यायला दोन-तीन तास तरी लागतील.’

‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’

‘नको. गावाकडची दोघे-तिघे आहेत.’

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print