मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 207 ☆ दैवी वारसा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 207 – विजय साहित्य ?

दैवी वारसा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

भारत नाही, फक्त देश हा

भारत आहे, आदर्श व्यक्ती

मातृतुल्यही,पितृतुल्यही

अतूट नाते, जडली भक्ती…१

*

जन्मा आलो, झालो जाणता

अनुभवली, ममता माया

सदा सर्वदा, माझे वंदन

कुशीत याच्या,वत्सल छाया…२

*

हिमाचलाचे, मस्तक याचे

गौरी शंकर, विशाल अहा

काश्मिर आहे, शिरोभुषण

कुटुंब कर्ता,सौंदर्य पहा..३

*

चार दिशांचे, चार कोन हे

पुर्व पश्चिमी,प्रकाश दृष्टी

उत्तर आणि,दक्षिण प्रांती

देई भारत, विकास सृष्टि…४

*

विशाल बाहू, ऐक्य साधती

मानवतेचे, सुंदर धाम

सृजनशील , भारत माझा

भक्ती शक्तीचे, उज्वल नाम..५

*

कला संस्कृती,जरी वेगळी

पंजाब असा,बंगाल तसा

स्वर्ग धरेचा, गगनी दृष्टी

पेरीत जाई, संस्कार ठसा…६

*

रवी शशिचा, प्रकाश ठेवा

सागर आहे, याचे कोंदण

नर रत्नांचा, दैवी वारसा

देशभक्तीचे, लाभे गोंदण…७

*

भारत माझा,‌जन्मभूमी‌ ही

तना मनाचे, केले तर्पण

महाराष्ट हा,माहेर माझे

अवघ्या इच्छा,त्याला अर्पण..८

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लावा एक पणती ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? लावा एक पणती श्री प्रमोद वामन वर्तक ☆

राख झाली क्षणात लाखोंची

नाही फिकीर पर्यावरणाची,

वृद्ध, आजारी असतील कोणी

का काळजी करू कोणाची ?

*

हौसेला मोल नसलं तरी

थोडं तरी समाजभान ठेवा,

ज्या घरी नाही लागत पणती

त्यांची तरी आठवण ठेवा !

*

साध्या कंदील, रोषणाईने 

दिवाळी होते बघा साजरी,

मदत करून गोर गरिबांना

हास्य आणा त्यां मुखांवरी !

*

गडबडीत या दीपोत्‍सवाच्‍या

लावा एक पणती त्‍यांच्‍यासाठी,

नका विसरू शूर सैनिकांना

जे रक्षितात सीमा देशासाठी !

जे रक्षितात सीमा देशासाठी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 215 ☆ जिजाऊचे अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 215 ?

जिजाऊचे अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

जाधवांची कन्या

गाव सिंदखेड

पोर मोठी गोड

  जिजाबाई ॥

*

 लहानपणीच

असे पराक्रमी

बोलणे हुकुमी

कन्यकेचे॥

*

 तिला लाभे वर

भोसले कुळाचा

शहाजी नावाचा

पराक्रमी ॥

*

 जहागीरदार

आदिलशाहीत

परी केले हित

स्वकियांचे ॥

*

 उभयतापोटी

बालक जन्मले

तेज प्रकटले

  शिवाचेच ॥

*

 स्वराज्याची आस

 होती जिजाऊस

नेती पूर्णत्वास

बाळराजे ॥

*

“प्रभा” म्हणे माझ्या

हृदयात वसे

 रायगडी दिसे

   राजमाता ॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रामल्ल्ला मुखदर्शन ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

? कवितेचा उत्सव ?

रामल्ल्ला मुखदर्शन ☆ सौ. नीला देवल ☆ 

आयोध्या राम लल्ला मुखदर्शन

लोभस लडिवाळ संकर्षक राजस रुपडे

हास्य मनमोहक दिल खेचक, देखता क्षणी प्रीत जडे

किती पाहू जाता तरीही अपुरे

दीन वाणे चक्षु अपुरे पडे

प्रफुल्लित कमलही लाजून गेले तव चरणी पदीलीन झाले

नयनही हासरे, कपोल गोबरे,

अधरी मोहक हास्य फुललेले

असे अलौकिक पाहता रुपडे

पाहता पाहता मन खुळावले

नेत्री किती साठविले मोहक ते रूप

आनंद अश्रुनी चिंब ते भिजले

हृदयी कळवळा मनी मोह मोहित,

मोदे हिंदोळा झुले झुला आनंदाचा

मनमोहना, मेघश्यामा, रामा रघुनंदना

भुलविशी मनी मोह घालूनिया

पाहता पाहता पहातची राहिले

भान विसरले जगताचे

किती गोड, मधुर मधाळ ते हास्य

मध शर्करा ही फिक्की पडे

आश्वासक, शाश्वत अमूल्य हास्याने राम लल्ला मला भुलविले, नेत्र सुखावले.

© सौ.नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महात्मा गांधी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ महात्मा गांधी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

एक वकील नामांकित होते,

मोहनदास करमचंद गांधी.

ब्रिटिश विरोधी लढ्याची,

त्यांनी आफ्रिकेत केली नांदी.

*

मायभूमीला आले परतून,

लढा इथेही पुकारला.

शस्त्राविण सत्तेशी लढाई,

 साबरमतीचा संत बोलला.

*

दया क्षमा शांती मार्गाने,

दानवास मानव केले.

हिंसेला नमवीते अहिंसा,

विश्वाला पटवून दिले.

*

जनतेला बापुजी बोलले,

स्वातंत्र्याचा करूया जागर.

नका करू आपसात दंगे,

नका सांडू रक्ताचे सागर.

*

सत्य अहिंसा शांती पुढती,

झुकली सत्ता ब्रिटिशांची.

चले जावचा देऊन नारा,

लाट उठविली क्रांतीची.

*

अखेर आम्ही स्वतंत्र झालो,

गगनी तिरंगा फडफडला.

झाली फाळणी जातीय दंगे,

जीव बापूचा तडफडला.

*

कुणी वेड्याने वेधुन छाती,

गोळी तयांवर चालविली.

“हे राम” म्हणत शांतिदूताची,

 प्राणज्योत ती मालवली.

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #222 ☆ भाकरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 222 ?

 

☆ भाकरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मी एका हिरे व्यापाऱ्याला विचारलं

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती

तर तो म्हणाला “हिरा”

*

मग मी एका सराफाला विचारलं

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती

तर तो म्हणाला “सोनं”

*

त्या नंत मी एका भुकेल्या माणसाला विचारलं

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती

तर तो म्हणाला “भाकरी”

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

भूतकाळातील व वर्तमानातील

सर्व गोष्टी लक्षात राहणे

चष्म्याशिवाय बघता व वाचता येणे

कानाने सुमधुर संगीत व संवाद ऐकू येणे

बत्तिशी शाबूत असणे व

ऊस-चिक्की खाता येणे

सुंदर फुलांचा सुगंध घेता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

लिमलेटच्या गोळ्या व कॅडबरी खाता येणे

आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येणे

कुठल्याही कागदपत्रांवर

एकसारखी सही करता येणे

जिन्याच्या पायऱ्या आधाराशिवाय

पटापट उतरता येणे

डोक्यावरती केशसंभार

(फक्त त्याचा ) भार असणे

ही खरोखर साठीनंतरची श्रीमंती आहे

 

आपल्या गरजेपुरते निवृत्तीवेतन असणे

कर्जाचा कोणताही भार डोक्यावर नसणे

आपली मुलेबाळे आपल्या जवळ असणे

नातवंडांचे कोडकौतुक करायला मिळणे

मनात आले की सहलीला जाता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

शाळा-कॉलेजमधले

बालमित्र-मैत्रिणी संपर्कात असणे

नोकरीमधले सहकारी

अधूनमधून भेटणे

सहजच आठवण आली म्हणून

नातेवाईकांनी फोन करणे

आधुनिक काळातील सर्व

गॅझेट्स लीलया वापरता येणे

कुटुंबामध्ये सुसंवाद आनंद

व मनःशांती असणे

इतके सर्व असेल तर

हीच खरी

अगदी फुलटूस श्रीमंती आहे

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अमृतसिद्धी योग… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– अमृतसिद्धी योग…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

प्रजासत्ताक हा | गणराज्य दिन |

संविधानी लीन | भारतीय ||१||

*

दीडशे वर्षाचे  | संपे पारतंत्र्य |

भारत स्वातंत्र्य | संघर्षाने ||२||

*

स्वातंत्र्यानंतर |  संविधान भिस्त |

घटनेची शिस्त | सार्वभौम  ||३||

*

पंचाहत्तरावे | साजरे हे वर्षं |

मनी आहे हर्ष | घटनेच्या ||४||

*

अमृत सिद्धीचा  | योग आला आज |

विविधता साज | चढवोनी ||५||

*

राष्ट्राचे सामर्थ्य | कर्तव्य पथासी |

शस्त्रसज्जतेसी | कवायत ||६||

*

विश्वगुरु राष्ट्र | रामराज्य नांदी |

प्रजा हॊ आनंदी | भारताची ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नाती☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

समजून घेतजाऊ वहिवाट या जगाची

जपतात लोक येथे नातीच फायद्याची

*

या बेगडी जगाला असतेच हौस मोठी

दुस-या समोर नुसते चमकून लाजण्याची

*

लाचार भाट येथे घेतात की सुपारी

खोटी मधाळ बोली रेटून बोलण्याची

*

हे साळसूद ढोंगी झालेत भक्त भोंदू

मिळते मुभा तयाना खैरात मागण्याची

*

नादान टोळक्याना जपतोय आज आम्ही

देतात तेच धमकी जाळून मारण्याची

*

झडतात रोज फैरी बेफाम घोषणांच्या

होते शिकार जनता जातीय भांडणाची

*

जो तो इथे स्वतःला समजून थोर घेतो

आलीय वेळ त्याला हटकून रोखण्याची

*

स्वातंत्र्य स्वैरतेने गोत्यात येत आहे

नाही तमा कुणाला धुंदीत वागण्याची

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 158 ☆ हे शब्द अंतरीचे… हाक तुला अंतरीची…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 158 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… हाक तुला अंतरीची…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(अष्टअक्षरी)

हाक तुला अंतरीची

ऐक कृष्णा या दीनाची

नसे तुझ्या-विना कोणी

आस तुझ्या चरणाची…!!

*

दाव तुझे रूप देवा

भावा आहे माझा भोळा

पावा वाजवी कृपाळा

नको अव्हेरू या वेळा…!!

*

दोषी आहे मीच खरा

तुला ओळखलेच नाही

आता करितो विनंती

स्नेह भावे मज पाही…!!

*

राज नम्र शुद्ध भावे

दास म्हणवितो तुझा

प्रेम तुझे अपेक्षित

स्वार्थ पुरवावा माझा…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares