मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 210 ☆ मौलिक आधार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 210 – विजय साहित्य ?

☆ मौलिक आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

(अष्टांक्षरी रचना…)

एक धागा सुखाचा रे

पदोपदी गुंफलेला

आठवांच्या मागावर

ताना बाना सांधलेला,..! १

*

बाल तारूण्य वार्धक्य

एक धागा जरतारी

वस्त्र तीन रंगातले

आत्मरंगी कलाकारी…! २

*

आठवांचे मोरपीस

बंध हळव्या शब्दांचे

भावनांचे कलाबूत

हार काळीज फुलांचे…! ३

*

सुख नाही रे जिन्नस

त्याचा नसावा व्यापार

काळजाच्या वेदनेला

सुख मौलिक आधार…! ४

*

एक धागा सुखमय

ठेवी नात्यांना बांधून

स्वभावाचे दोष सारे

घेती आयुष्य सांधून…! ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवाघरी गेली आई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ देवाघरी गेली आई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

देवाघरी गेली आई नाही सांगून ती गेली

अन्यायाची परिसीमा आई अशी कशी केली..

*

हक्काचे ते माझे ठाणे असे हरवून गेले

निराधार निराधार अगदी उघडी पडले

आठवता आई तुला मनी घालमेल झाली..

                  देवाघरी गेली आई …

*

कष्ट आठवता तुझे फार कणव ग येते

खंत वाटतेच मनी काही समजत नव्हते

आली समज ग जेव्हा माझी लढाई ठाकली..

                 देवाघरी गेली आई…

*

जातांना तरी भेटायचे बोलायचे होते आई

एका श्वासाचे अंतर तुला कळलेच नाही

छप्पर उडाले बघ गार सावली ती गेली..

                 देवाघरी गेली आई…

*

आहे तोवर भेटावे मनी गुज ते सांगावे

उद्याचा ना भरवसा आज प्रेम द्यावे घ्यावे

नको नको पश्चाताप प्रिय देवाला तू झाली..

                 देवाघरी गेली आई….

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ।।११।।

*

त्यागुनी आसक्ती  अंतःकरण शुद्धीस्तव कर्मा आचरत

स्वभाव जाणुनी देहमनबुद्धीचा कर्मयोगी कर्मा आचरत ॥११॥

*

युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।

अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।१२।।

*

त्यागुनी कर्मफला कर्मयोगी शांति करितो प्राप्त

त्याग न करता फलाकांक्षेने लोभी बद्ध बंधनात ॥१२॥

*

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।१३।।

*

कर्मासी जो आचरितो समर्पित वृत्तीने 

नवद्वार नगरी स्थित  तो परमात्म स्वरूपाने॥१३॥

*

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।१४।।

*

परमेशे ना निर्मिले कर्तृत्व कर्मफल वा कर्म

प्रकृती स्वभावे घडत जाते कर्त्या द्वारे कर्म ॥१४॥

*

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।१५।।

*

ब्रह्मात्मा कधी न करतो पाप वा पुण्य

अज्ञानाने झाकोळूनी जाते जसे ज्ञान

जीवन हा निर्मल नितळ अथांगसा डोह

कर्म करिता मनुजा मात्र लोभवितो मोह ॥॥१५॥

*

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।१६।।

*

तिमीर हटता अज्ञानाचा उजळे तत्वज्ञान 

सूर्यप्रकाशाने सृष्टी जैशी येत उजळून

अनावृत होता ज्ञान झुगारुन  झापड अज्ञान

विश्वात्म्याचे स्वरूप स्पष्ट मानव घेइ जाणून॥१६॥

*

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।१७।।

*

तद्रुप बुद्धी तदाकार मन परमात्म्याशी अद्वैत

आत्मज्ञाने ते निष्पाप मोक्ष तयांना हो प्राप्त ॥१७॥

*

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।१८।।

*

विद्या-विनयाची ज्याने बाणविली अंगी वृत्ती

कुंजिर श्वा गो चांडाळाशी असते त्याची समदृष्टी ॥१८॥

*

इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता: ।।१९।।

*

इह जन्मी संसारजेता समदृष्टी जयाची स्थित

ब्रह्मासम ते दोषरहित ब्रह्माठायी असती स्थित ॥१९॥

*

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।

स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।२०।।

*

मोद नाही प्रियप्राप्तीने ना उद्विग्नता अप्रियाने

स्थितप्रज्ञ ब्रह्मवेत्ता नित्य स्थित ब्रह्मी ऐक्याने ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेरपण… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ माहेरपण… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

*

एकदा नवऱ्याने तिला सहज विचारले,

बरेच दिवसात माहेरी गेली नाहीस ?

*

हल्ली नसतं का तुझ माहेरपण…?

आता जाऊन, परत नसतं का जगायचे तुला रम्य ते बालपण…?

*

पूर्वी जरा काही झाले की, माहेरची आठवण यायची,

अन् काम करता करता डोळ्यातून आसवं गळायची…

*

यावर तिचे मार्मिक अन् मनाला भिडणारे उत्तर

ऐकताच क्षणार्धात तो झाला निरूत्तर…

*

ताई ताई म्हणणाऱ्या बहिणी, गेल्या सासरी त्यांच्या घरी…

वहिनी तशी चांगली पण, होत नाही त्यांची बरोबरी…

*

सागरगोटे खेळणाऱ्या मैत्रिणी लग्न होऊन गेल्या परगावी,

कुणाशी हितगुज करणार अन् सांगणार कल्पना भावी…

*

भाचरंही मोठी झाली आपापल्या विश्वात रममाण झाली,

अवतीभवती नाचत नाहीत आत्या आली आत्या आली…

*

आईच्या गळ्यात पडून जे काही सांगायचं असतं,

तिला कमी ऐकू येतं म्हणून सांगताच येत नसतं…

*

बाबांची नजरही अधू झालीय समोर गेले तरी कळत नाही,

मला बघून होणारा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहता येत नाही…

*

तिकडे गेले तरी मन इथेच अडकलेले असते आपल्या घरी,

उगाचच वाटत राहतं तुमचं अडेल माझ्यावाचून परोपरी…

*

बरीय मी आता इथेच माझ्या कोषात संसारी रमलेली,

इथल्या सुखदुःखांशी आता माझी गट्टी जमलेली…

*

म्हणून कल्पनेतच अनुभवते आता मी पूर्वीचे माहेरपण,

अन् आठवणीतच जगून घेते रम्य ते बालपण…

*

ऐकता ऐकता नकळत नवऱ्याचे दोन्ही बाहू पसरले,

अन् त्याच्या हक्काच्या स्पर्शाने भिजताच, तिचे माहेरपण विसरले

*

कवी :अज्ञात

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळाच रंग तुझा… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सावळाच रंग तुझा…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सावळाच रंंग तुझा भुलवी मनमोहना

सांग कधी भेटशील अधीर तव दर्शना॥धृ॥

*

मेघ शाम अंबरात

कृष्ण सखा अंतरात

नभातली श्रावणसर चिंब भिजवी तनमना

सांग कधी भेटशील……….॥१॥

*

अधरी  शोभत बासरी

मम चित्ता धुंद करी

देहभान हरवले हीच एक भावना

सांग कधी भेटशील ……….॥२॥

*

प्रियकर तू  माझा हरि

वर्ण गंध बकुळीपरि

सर्वस्व तुजसी वाहीन मी नच दुजी कामना

सांग कधी  भेटशील……….॥३॥

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ राममय… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? राममय ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

पणतीच्या नावेमधूनी फुलवातरूपी राम जाणार

नाव सुगंधी करण्यासाठी गुलाबपाकळ्या अंथरणार ||

*

प्रत्येकाच्या मनात राम प्रत्येकाची नाव वेगळी

नावा तरंगती शरयू वरती वाटे अवघी अयोध्या सजली

राम नामाने पुण्य पदरी नाव सुखरूप पार होणार

नाव सुगंधी करण्यासाठी गुलाबपाकळ्या अंथरणार ||

*

कोण शबरी आली आहे पाहुनी तिजला आज वाटे

कानात खोऊनी गुलाब पुष्पे  तपासले नाहीत काटे

पदस्पर्शाने रामाच्या मनशीळेची अहिल्या होणार

नाव सुगंधी करण्यासाठी गुलाबपाकळ्या अंथरणार ||

*

आज संपला वनवास वाटे आज राम परतणार

सेवा माझी छोटीशी मरूत भाग्य लाभणार

राममय मी मन मंदिरी राम वसणार

नाव सुगंधी करण्यासाठी गुलाबपाकळ्या अंथरणार ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 218 ☆ राजा शिवछत्रपती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 218 ?

☆ राजा शिवछत्रपती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

प्राणाहून प्रिय आम्हा

राजा शिवबा आमुचा

पराक्रमी, धीरोदात्त

रखवाला जनतेचा …..१

*

नाही या सम दुसरा

एकमेव   शिवराज

स्वराज्याचा ध्यास ज्यास

कावा गनिमी अंदाज…..२

*

माजलेली मोगलाई

थोपविण्या सज्ज असे

लेकीबाळी रक्षिण्यास

कटिबद्ध नित्य दिसे….३

*

जमविले शूरवीर

किती,मावळे अफाट

होते तानाजी, गोदाजी

बाजीप्रभू ते विराट…..४

*

शत्रू होता बलदंड

बादशहा शिरजोर

त्यास आणले जेरीस

हातावर देत तूर…..५

*

आग्र्याहून सुटकेचा

नामी डाव आखला

प्राण देण्या सज्ज साथी

पाया त्यायोगे रचला…..६

*

महा पराक्रमी गाथा

माझ्या शिवाजी राजाची

साक्ष माता भवानीची

राजे शान भारताची…..७

© प्रभा सोनवणे

१९ फेब्रुवारी २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुलजार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गुलजार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त गुलजार यांना.💐💐

माझे घर रावीपार

अजून एखादी तार

अधीरुन वारंवार

माणूसकीचा शिवार.

*

तुटले तेंव्हा जिव्हाळे

मनात दुःख वेदना

भिंतींना जातोच तडा

कर्माची एक साधना.

*

काय घडले घडावे

लेखणी हाती फिरते

सहज शब्दांची किमया

शब्दात काव्य तरते.

*

फुलांचे बन शब्दभार

मी नावाचा गुलजार

भारतमातेचा स्वीकार

जन्मोजन्मी उपकार.

*

या ज्ञानपिठाचे हे रत्न

रावीपार स्मृतींचा बिंदू

मी लिहीतच जातो प्रेम

भक्ती हिंदवी ज्ञानसिंधू.

*

किती मित्र जिवाशी भिड

कुणी वीर,हुतात्मा थोर

काव्यांने दिला मज धीर

शब्द-शब्द स्वातंत्र्याचा  शेर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #225 ☆ वाकळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 225 ?

☆ वाकळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दिशाहीन ही वणवण केवळ

आयुष्याचे झाले वादळ

*

अश्रू करती सांत्वन माझे

डोळ्यांमधले रडते काजळ

*

छोटे मासे आत उतरले

मला गाठता येईना तळ

*

नाही म्हणणे शिकून घ्यावे

आश्वासन ना द्यावे पोकळ

*

रितीच होती रितीच आहे

लेकुरवाळी नाही ओंजळ

*

सभ्य पणाचा मुखडा त्याचा

हुबेहूब तो करतो भेसळ

*

तुझ्या नि माझ्या प्रेमासाठी

दोघांपुरती शिवते वाकळ

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी साजूक तुपातली… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

मराठी साजूक तुपातली… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(शनिवार दि १७ रोजी श्री.विश्वास  देशपांडे यांच्या लेखावर (बाळा मला समजून घेशील ना?) प्रतिक्रियात्मक काव्य)

मराठी ईंग्लीश प्रेमानं समदा समाज झालाय बाद ;

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥

*

अाई बाप म्हणजे मदर फादर

वाटत न्हाई जराबी कदर

करत न्हाई म्हणती आदर

गळ्यातली वाटतीया ब्याद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ १॥

*

ढवळ्या शेजारी पवळा बांधला

वाण न्हाई पण गुण लागला

ईंग्लीशचा पगडा येवढा पडला

पिझ्झा बर्गरलाच स्वाद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ २ ॥

*

ईंग्लीश वरती न्हाई पकड

मराठी सुद्धा  बोलेना धड

वाक्यात अनेक ईंग्लीश शब्द

घालू किती मी वाद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ३॥

*

टिळक आगरकर रानडे गोखले

मराठीतच शाळा शिकले

ईंग्लीश ज्ञान जरी संपादले

मराठीचीच ऐकली साद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ४॥

*

शेव शेव म्हणता करतोया दाढी

सर सर म्हणता होतोया गडी

रोज रोज म्हणता गुलाब हाती

मागू कुणाला दाद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ५ ॥ 

*

देणा-याने देत जावे

घेणा-याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणा-याचे हात घ्यावे

ईंग्लीश देते मराठी घेते

ईंग्लीशचाच होणार का माद (Mad)

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ६ ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares