मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विठू भेट… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? विठू भेट… ? सुश्री वर्षा बालगोपाल 

सगळ्या वीटा गोळा केल्या

उचलूनी त्या डोई घेतल्या

जाहला असेल पदस्पर्श ज्याला

खुणा तयाच्या का पुसोनी गेल्या ||

नाही जमत येणे पंढरपूरी

सल हीच होती माझ्या उरी

तुझ्या भेटीची आस अधूरी

वीट रूपाने होईल पुरी ||

विठुराया नाही खेद उरला

माझ्या भेटीला तू वीट रूपे आला

सेवा कुटुंबा साठी जनता जनार्दनाची

हा पुंडलिक भाव तुला भावला ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 211 ☆ आनंदी आनंद गडे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 211 ?

आनंदी आनंद गडे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

या वर्षाअखेर ठरवलं आम्ही भावंडांनी

थर्टी फर्स्टला भेटायचं,

 

गेली काही वर्षे,

एका वेगळ्याच मैत्रीणींच्या

ग्रुप मधे,

करायचे साजरा हा आनंदोत्सव!

 

तेवीस साल सरता सरता,

 नात्यातले,

“अनिल- सुनील”

अचानक निघून गेले,

आणि मन धसकलं,

आपल्याहून लहान असलेले निघून गेले !

 

पुढील वर्षा अखेर आपण

असू ,नसू!

 

ए जिंदगी के मेले,

दुनिया में कम न होंगे….

अफसोस हम न होंगे

 

हे तर अंतिम सत्य…..

सत्तरी जवळ आली आणि,

तब्येतीच्या तक्रारी सुरू……

लागोपाठ दोघांनाही

 थंडीतली दुखणी,

नवरा गावाला आणि

मी दिवसभर दुखण्यानं आडवी !

गावावरून आल्यावर

 “आता माझी पाळी” म्हणत,

नवराही आडवा– अर्थात कुरबुरी किरकोळच!

 

पण बाईचं दुखणं गौण

आणि बाप्याचं मोठंच

असतं नेहमी !

 

दुखणं झटकून बाहेर पडले

 सकाळी,

मैत्रीणींच्या घोळक्यात,

संध्याकाळी ,

तळ्यात मळ्यात करता करता ,

माहेरच्या गोतावळ्यात!

आपल्या आयुष्याच्या

प्रत्येक क्षणावर , लिहिलेलं

असतं जणू….

आज जगायचं….रडे..रडे…..कि

आनंदी आनंद गडे!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवीन हे वर्ष  सुखाचे जावो… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नवीन हे वर्ष सुखाचे जावो!… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

वर्ष नवे घेऊन येवो,मनीमानसी हर्ष, 

दुःख, काळजी, चिंता, सारी राहावी अस्पर्श!

 जरी हरवले अमूल्य काही, विसरू या ते सर्व,

 हाती गवसले जे जे काही, मानू त्याचा हर्ष!

रूसवे-फुगवे, हेवेदावे, चला फुंकुनी टाकू,

उरले-सुरले जीवन कितीसे? आनंदाने जगू!

पैसा-अडका भोग-साधने, स्पर्धा- ईर्षा विसरू,

माणुसकीचे, आनंदाचे, बीज मनी या पेरू!

स्वागत करूया नववर्षाचे, संकल्प करू उत्कर्षाचे,

एकजुटीने, सहकार्याने, आव्हान पेलू लक्ष्य पूर्तीचे!

असो वर्ष इंग्रजी /मराठी, किंतु मनी ना आणू,

चला मंडळी आयुष्याचे, गीत सुरीले गाऊ!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जुने आणि नवे… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

जुने आणि नवे… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

जाणारे जुने असते

येणारे नाविन्यानी नटते

तारीख, वार ,महिने

आपल्या क्रमानेच येत असतात

येणाऱ्या दिवसाला मात्र

लेबल काळाचं लावून जातात

पलटलेल्या पानासोबत

काळ पुढे सरकत राहतो

बघता बघता नाही कळत

वर्षाचा शेवट कधी येतो

नव्या वर्षांच्या स्वागताला

एका रात्रीचा जल्लोष होतो

कधी श्वास मुठीत घेऊन

तर कधी कष्टात झिजून

कधी दु:खात, कधी सुखात

वर्षातला प्रत्येक दिवस

दिवसातला क्षण क्षण जगला जातो

आणि किती सहजतेने  त्याला

आपण टाटा ,बाय-बाय करतो

जुनं  कॅलेंडर उतरून ठेवून

भिंतीवरती नवे टांगतो

खरोखर इतके का सोपे असते

जुन्याला सहज घालवणे

नव्याला सहजतेने  स्विकारणे

काळजातला अंधार मिटवून

आणि सुंदर पहाटेला जागवणे

तितकेच सोपे झाले नसते का

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक

घटका, दिवस, वार,महिने यांना

तितक्याच सुंदरतेने नटविणे

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवीन वर्ष… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ नवीन वर्ष… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नवीन दिवस, नवीन वर्ष ,

कालचक्रातील पुढची आरी !

कितीक गेल्या फिरत फिरत,

आत्ताची ही आहे न्यारी !….१

काळाच्या गतीतील एक वर्ष,

देऊन गेले कितीक गोष्टी ,

जगण्यासाठी समृद्ध अनुभव,

बांधला गेला अपुल्या गाठी !…२

रहाटगाडगे कालचक्राचे,

विश्वामध्ये फिरत रहाते !

प्रत्येक पोहरा भरून येतो,

अनुभव त्याचे करित रिते !….३

कालचक्रावर असतो आपण,

एक अस्तित्व ते बिंदू मात्र ‌!

त्या बिंदू चे नाते असते,

परमात्म्याशी परम पवित्र!….४

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पदार्पण नववर्षात… ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆

सुश्री निलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव ?

☆ पदार्पण नववर्षात… ☆ सुश्री निलांबरी शिर्के

नववर्षात पदार्पण  करता

मागे सोडू  नकारात्मकता

हेवा ,मत्सर ,द्वेशही सोडू

पाठीमागे  पुढती  जाता

 

 खुप काहीसे आनंदी क्षण

  काळीजकुपी जपून  नेऊ

  लळा जिव्हाळा आपुलकी

  रेशमलडीसम  संगती घेऊ

 

  घडले काही  आनंददायक

  शिदोरीसम   बांधून  घेऊ

  यातनादायक सारे सारे

  इथेच पुरते  गाढून जाऊ

 

  हातामध्ये हात घेऊ  या

  आपुलकीचा संदेश देऊ या

  संकट समयी मी आहे ना!

 एकमेकांना विश्वास लेऊ या

© सुश्री निलांबरी शिर्के

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #218 ☆ सूर्य मावळला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 218 ?

सूर्य मावळला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

होता सूर्य मावळला, गेल्या वर्षाला घेऊन

काही बुडाले दारूत, होते सामिष खाऊन

सारे नव्हतेच तसे, काही पहाटे उठले

नव्या वर्षाच्या सूर्याचे, त्यांनी दर्शन घेतले

त्याचे रूप पाहुनीया, मन जाते हे मोहून

संध्या स्नान जे करून, अर्घ्य देतात देवाला

ऊर्जा सूर्यकिरणांची, सूर्य देतो त्या देहाला

आहे कोवळी किरणे, त्यात घेऊया न्हाऊन

झाले जीवन गढूळ, शुद्ध संकल्प करुया

घडा पापाचा जरासा, चला रिकामा करुया

गेलेल्याच्यासोबतीने, जावे पापही धुऊन

परप्रकाशी चंद्राला, नका कुणी नावे ठेवू

त्याच्यामुळे धुंद रात्र, त्याला कुशीमध्ये घेऊ

चंद्रावर जाणे सोपे, चला येउया भेटून

स्वप्ने सत्यात येताना, आहे पाहतो हा देश

साऱ्या जगात पोचला, आहे आमुचा संदेश

असो संकटात कोणी, जातो देश हा धावून

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चीssssssssअsssssर्सssss-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चीsssssssssssssर्सssss…”🍾 ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला 

“हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही

आपलं वर्ष गुडीपाडव्याचं “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो

“ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

मला रोजची तारीख माहिती

माझं सगळं नियोजन तारखेवर

म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

मग पाडवा? 

तो ही माझा आहेच.

मी आनंदाचा प्रवासी,

जिथे आनंद तिथं मी.

शादी कीसीकी हो, अपना दिल गाता है.

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड.

खरं तर प्रत्येक सकाळ ही,

एका नववर्षाची सुरुवात असते.

सवेरेका सूरज हमारे लिये है,

असं म्हणणारा कलंदर मी.

पण रोज साजरा करायला

जमतंय कुठं? जमलं तर ते ही करावं.

कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.

म्हणूनच,

आनंदाचे डोही आनंद तरंग…

असं म्हणत मित्रांनो साजरा करूया

निखळ आनंद, 

मग तो कुणाचा का असेना,

आणि कधीही का असेना !!!

तर चीssssssssअsssssर्सssss

हॅप्पी    न्यू    इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन वर्षा तुझ्या स्वागता… लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन वर्षा तुझ्या स्वागता… लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

 ☆

कुठले पुस्तक कुठला लेखक

लिपी कोणती कसले भाकित

हात एक अदृश्य उलटतो

पानामागून पाने अविरत

गतसालाचे स्मरण जागतां

दाटून येते मनामधे भय

पान हे नवे यात तरी का

असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर

कणाकणाने खचते वाळू

तरी लाट ही नवीन उठता

सजे किनारा तिज कुरवाळू

स्वतः स्वतःला देत दिलासा

पुसते डोळे हसतां हसतां

उभी इथे मी पसरुन बाहू

नवीन वर्षा तुझ्या स्वागता

 ☆

लेखिका : शांता शेळके

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्रिगुणात्मक हो… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– त्रिगुणात्मक हो… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

त्रिगुणात्मक हो | गुरुदेव दत्त |

प्रसन्न हे चित्त | दर्शनाने ||१||

अनुसया अत्री | लाभे माता पिता |

ध्यान सर्वज्ञाता | दत्तात्रेय ||२||

ब्रम्हा विष्णू शिव  | एकत्र साकार |

दत्त अवतार | सृष्टीतत्व ||३||

कामधेनू उभी | चार वेद श्वान |

अवधूत ध्यान | गुरुदेव ||४|

दत्त संप्रदाय | कठीण साधना |

आनंद  जीवना | भक्तीमार्ग ||५||

दत्त महाराज |  व्हावी मज कृपा |

भवसिंधू सोपा | तारायासी ||६||

श्री दत्त जयंती  | उत्सव सोहळा |

भक्तीमय मेळा | साधकांचा ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares