मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण झुला… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण झुला… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रावणाचा मासाचा झुला

झाडांनीच गं बांधियला

हिरव्या कच्च फांद्यांनी

पानाफुलांनीच त्याला

सुंदर सजविला !

 

राघू मैना अन् चिमण्या

झुल्यावर झोके घेती

आकाशातील पक्षीही

झुल्याकडे झेपावती !

 

असा श्रावणाचा झुला

पावसाने चिंब केला

झाडावरचे पक्षी त्याला

दाखविती वाकुल्या !

 

झुला खुणवितो सर्वांना

आकाशातील इंद्रधनूला

त्याच्या सप्तरंगांचे वाटे

आकर्षण झुल्याला !

 

अनोखीसा श्रावणझुला

झेपावतो उंच आकाशी

गुज बोलतो त्याच्याशी

आपुल्या धरतीचे !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 199 ☆ मोहून घेई मना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 199 ?

मोहून घेई मना ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तुझ्या व्यक्तिमत्त्वातले सारे सारे….

आवडायचेच सा-या गोकुळाला,

तू मित्र..सखा..प्रियकर..

 तुझ्या निळाईत….

 सारेच आकंठ बुडालेले,

राधेचा तरी कुठे होता,

अट्टाहास,

तू तिचा एकटीचाच

असावास असा ?

तू गगनासारखा विशाल,

सागरासारखा अथांग!

प्रत्येक जन्मी,

पुरून उरणारा….

तुझी सुरेल सानिका,

आणि नजरेतील,

तरल प्रेमभावना…

रे..मनमोहना…

मोहून घेई मना….

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्वविक्रम… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ विश्वविक्रम… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

उंचावत भारताची शान

पोचले चंद्रावरती यान ||ध्रु||

 

वेध मनी नित खगोलाचे

ग्रहताऱ्यांना अभ्यासण्याचे

संशोधकांची जिद्द महान

पोचले चंद्रावरती यान ||१||

 

विज्ञानाची कास धरूनिया

समन्वयाचे तंत्र जपुनिया

साधले अचूक ते संधान

पोचले चंद्रावरती यान ||२||

 

ठसा उमटवला देशाचा

अथक साधना संकल्पांचा

यश जाहले प्रकाशमान

पोचले चंद्रावरती यान ||३||

 

अवकाशी कितीतरी गुपिते

अज्ञाताला शोधत फिरते

होतसे संशोधन आसान

पोचले चंद्रावरती यान ||४||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवाड… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कवाड… ☆ श्रीशैल चौगुले ☆

आठवणींना ऊजाळा

जगणे गोपाळकाला

यमुनेचा गोपी तीर

गोपगडी कृष्ण लिला.

तन-मन,अवयव

गोकुळाचा आनंद

भव ,आशा,भक्ती रास

मुक्ती आस,जन्म छंद.

हृदय बासरी राधा

नंद-यशोदा, गोपाल

गोवर्धन रक्षाधारी

असूर वध,त्रिकाल.

ऐसा भुलोकी ऊत्सव

कृष्ण जन्माष्टमी सृष्टी

युगांतरीची गणती

संजीवन कृपादृष्टी.

दही-हंडी नि मटकी

भोग जीवाचे लबाड

खेळ रंगे आयुष्याचा

कृष्ण कायेचा कवाड.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #205 ☆ विश्वविक्रमी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 205 ?

☆ विश्वविक्रमी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सहजासहजी आयुष्याला भिडतो तेव्हा

कर्मभूमिवर विश्वविक्रमी ठरतो तेव्हा

तोच सिकंदर प्रेमामधले युद्ध जिंकतो

बाण मारुनी हृदय प्रियेचे चिरतो तेव्हा

देहामधल्या अग्नी ज्वाळा तिला भावती

शेकोटीसम तिच्या सोबती असतो तेव्हा

दशाननाची लंका देखील जळून जाते

चारित्र्याला तो नारीच्या छळतो तेव्हा

चंदन होणे तसे फारसे अवघड नाही

होतो चंदन दुसऱ्यासाठी झिजतो तेव्हा

वयोपरत्वे जरी वाकलो धनुष्य झालो

बाण निशाणा अजुन साधतो लवतो तेव्हा

लोक म्हणाले जाणारच हा वय हे झाले

मृत्यूलाही भिती वाटते नडतो तेव्हा

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हरे कृष्णा! ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हरे कृष्णा! ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

जन्म तुझा कारागृही, बालपण नंदा – घरी,

 तूच बाळकृष्ण आणि,  थोर युगंधर तूची !

 

तुझ्या सावळ्या रूपाची, भूल प्रत्येक मनाला,

 धून बासरीची तुझ्या, पाय धरतात ठेका !

 

 जमवूनी गोपालांना, दही, दूध, लोणी, काला,

 भेदाभेद जाती लया, एकवटले गोकुळा !

 

 प्रिती राधेची आगळी, भक्ती मीरेची वेगळी,

  भामा-रूक्मिणीचा पती, उद्धरी सोळा-सहस्त्रांसी !

 

  द्रौपदीचा भाऊराया,  अर्जुनाचा तू सारथी,  

  मारिलेस तूच कंसा, मैत्री भाव सुदाम्याशी !

 

  रूपं आगळी-वेगळी, तुझी वर्णावी किती?

  तूच द्वारकेचा राजा , आणि विठू पंढरीसी !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – रक्षाबंधन…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– रक्षाबंधन… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

दगडांच्यात आयुष्य,

दगडाचा बसायला पाट !

पारणं डोळ्यांचं फिटलं ,

पाहून रक्षाबंधनाचा थाट !

रस्ता बनवता बनवता,

मुलं बाळं वाढती रस्त्यावर !

सणवार त्यांनाही असतात,

पण हक्काचे कुठे नाही घर !

विंचवासारखे बिऱ्हाड,

फिरे गावोगाव पाठीवर !

पोटासाठी मोलमजुरी,

नशिबाने बांधल्या गाठीवर !

रंक असो वा राव ,

भावा बहिणीत तेवढीच ती ओढ !

आपल्या आपल्या परीने ते,

साजरा करती सण आनंदाने गोड !

राखीचा धागा,

सोन्याचा असो वा रेशमचा !

मनगटाला शोभे,

भाव दोघांच्या मनी आपुलकीचा !

औक्षणाचे ताट  नसले तरी,

नेत्रज्योतीने बहीण करते औक्षण !

रक्षण कर छोट्या भाऊराया,

तुझे प्रेम तिच्यासाठी जगी विलक्षण !

चिंधी बांधे द्रौपदी,

हरी धावला तिच्या रक्षणाला !

रक्ताचे नव्हते नाते,

जागला चिंधीच्या बंधनाला !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चर्चा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ चर्चा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

चर्चा बरीच झाली आभाळ जिंकण्याची

होती खरी लढाई दारिद्र्य झाकण्याची

भाऊक भावनांचे होते पतंग हाती

होती मनात उर्मी स्वर्गात पोचण्याची

झाल्या पराभवाने पदरात हार आली

मोठीच चूक झाली अंदाज बांधण्याची

पुतळे कशास वेडे बघतात रोज स्वप्ने

नाही तमाच त्यांना संसार मांडण्याची

मैफील रंगवाया पायात चाळ आले

झाली सजा अनोखी तालात नाचण्याची

प्रगती करावयाच्या करतात रोज बाता

आहे कुठे तयारी आदर्श मानण्याची

सोडून काम सारे झालेत देवध्यानी

बघतात वाट सारे वनवास संपण्याची

माझे तुझे म्हणाया आहेच काय हाती

चर्चा कशास करता परतून मागण्याची

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 143 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 143 ? 

☆ अभंग…

मंगल श्रीकृष्ण, संपूर्ण श्रीकृष्ण

अजोड श्रीकृष्ण, वासुदेव.!!

ब्रह्मांड नायक, विमल कोमल

निर्मोही श्यामल, श्रीकेशव.!!

वाजवी बासुरी, सर्वांना भुलवी

जैसी की भैरवी, मोहविते.!!

अनंत प्रचंड, निर्गुण कृपाळू

शुद्ध नि मयाळू, मनोहर.!!

कवी राज म्हणे, द्वारकेचा राणा

जाणतो भावना, पूर्णपणे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वागेश्वरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

वागेश्वरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(लगागा  लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा)

तुझ्या सारखा तूच आहे वरूणा , कुणाशीच तुलना तुझी रे नसे

जुळावे तरीही जगाचे तुझ्याशी पिता पुत्र नाते कुटुंबी जसे

जगाच्या सुखाला मिळावा भरोसा म्हणोनी प्रभूने तुला धाडले

मिळाला उसासा मिळाला दिलासा , फिटे पारणे नेत्र भारावले

गुलाबी शराबी नशेने  चढावे जमीनीत अंकूर वाढे तसे

जुळावे तरीही जगाचे तुझ्याशी पिता पुत्र नाते  कुटुंबी जसे

किती वाट पाहू तुझ्या स्वागताला तयारी कशी बघ असे जाहली

पुन्हा तू नव्याने जगावे उरावे निमंत्रण राशीच उंचावली

हिवाळा उन्हाळा तसा पावसाळा ऋतूचक्र  नेमात चाले असे

जुळावे तरीही जगाचे तुझ्याशी पिता पुत्र नाते  कुटुंबी जसे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares