मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांद्रयान मोहीम ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ चांद्रयान मोहीम ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 काल चांदणे खुदकन हसले,

   नभांगणी या रात्री !

अवनी वरच्या यान भेटीने,

   केली जगाशी मैत्री !……१

 

यान उतरले चंद्रावरती,

  पहात होत्या चांदण्या!

चमचम करीत सज्ज जाहल्या,

  स्वागतास जाण्या !…..२

 

पहात होते अनुपम सोहळा,

 पृथ्वीवरचे जन !

आनंदाने न्हाऊन  गेले ,

भारतीयांचे मन !……३

 

भारत भूचा विजय दिन,

  असे हा अवर्णनीय!

चांद्रयानाने कोरले वरती,

   सुवर्णाचे ते पाय……४

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘चांद्रयान – ३’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘चांद्रयान – ३‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आकाशाशी जोडले नाते धरणीमातेचे,

 चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके!

 

 शास्त्रज्ञांनी देखियले हो स्वप्न भव्य येथे,

  इस्त्रोमधूनी हालवली मग पहा त्यांनी सूत्रे,

 प्रयत्न त्यांचे आज पहा हे यशस्वी झाले,

चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||१||

 

  चंद्रावरती प्रथम उतरूनी, विक्रम हा केला ,

  जगामध्ये या  वाजतसे हो भारताचा डंका,

  बांधली  राखी चांदोबाला, आज वसुंधरेने,

 चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||२||

 

  कडकडाट टाळ्यांचा झाला, दुमदुमली अवनी,

  शास्त्रज्ञांच्या डोळ्यांमधूनी आनंदाश्रू झरती,

  सार्थक झाले आज वाटते त्यांच्या तपस्येचे,

  चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||३||

 

    अपयशातून रचली आम्ही आज  यशोगाथा,

       ठेवू उन्नत सदैव आम्ही भारतभूचा  माथा,

     रवी-शुक्र हे लक्ष्य आमुचे, आता या पुढचे,

    चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||४||

 

    आकाशाशी जोडले नाते धरणीमातेचे,

     चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सोनेरी तारा… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सोनेरी तारा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गच्च  काळोखाची रात

तारा सोनेरी प्रकाशला

माणकांचा इवला तुरा

त्यास कोणी जडविला …. 

 तारा  चमचम करी

 काळ्या पार्श्वभूमीवरी

 मोतियाची ही आरास

 शोभतसे  तयावरी …. 

 तारा आकाशात  उगवला 

सुवर्ण  झळाळी अंधाराला 

दुधाळ चांदणे नित्य पसरते

आजची रजनी गुरूपुष्याला …. 

 गुरूपुष्य नक्षत्र  आभाळाला

 दान मिळाले कुठून आजला

 निशाराणीच्या  तमशालीवर

 सोनेरी तारा जडला गेला …. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांद्र मोहीम ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🚀 चांद्र मोहीम ! 🌝🛰️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

फत्ते झाली मोहीम इस्रोची

उतरले चंद्रावर चांद्रयान,

अथक परिश्रमांनी शास्त्रज्ञ

वाढवती भारतभूची शान !

 

जो तो सांगे ज्याला त्याला

भरला अभिमानाने ऊर,

तो वक्री मंगळ पत्रिकेतला

नसे आता फारसा दूर !

 

ठेवा लिहून सुवर्णक्षरांनी

आजचा सोनियाचा दिवस,

रचून इतिहास भारताने

जगी नांव उंच केले खास !

जगी नांव उंच केले खास !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्रयान – ३ ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्रयान – ३ ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

खेळे चांदणे उन्हात

भान आज हरपले

चंद्रमाला भेटावया

भूलोकीचे स्वर्गी आले.

 

स्वप्न हळव्या अंतरी

पाहिले साराभाईंनी

सत्यात उतरवले

थोर त्या वैज्ञानिकांनी

 

अपार कष्ट झेलले

प्रज्ञा श्रेष्ठ प्रमाणिले

अधिष्ठान श्रीशंभूचे

यत्ने ध्येय प्रकाशले.

 

धन्य ते भारतवासी

दक्षिण ध्रुवी पातले

प्रथम चंद्रयान-३ ने

ध्वज अति उंच नेले.

 

पावन ही चंद्रभूमी

तिरंगा तो फडकला.

भारतीय सुपुत्रांचा

गर्व उरात दाटला.

 

बुद्धीदायी, कीर्तीदायी

जय जय हे भारती

निष्ठा कधी ना ढळू दे.

प्रेरक ही देशभक्ती.

 

ओजस रूपात तुझ्या

सदैव लीन असावे

भारत भूवरी आम्ही

पुन्हा पुन्हा जन्मा यावे.

     🇮🇳जय हिंद🇮🇳

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 167 – देशभक्ती गीत – साद ही आईची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 167 – देशभक्ती गीत – साद ही आईची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

धावले वीर हो, साद ही आईची।

शृंखला तोडण्या, भारती माईची।।धृ।।

मातल्या यवना, माझा शिवबा पुरे।

 पाहूनी धार ती, तक्त का हादरे।

स्वराज्य हिंदवी, मनिषा आईची।।१।।

 

तुझी संपंन्नता, मोहविले जगा।

व्यापारी सोंग रे, घेऊनी दे दगा।

 प्रलोभने जाळली, ती सुखसोयीची।।२।।

 

पाहुनी शौर्य ते, शत्रू धास्तावले।

वंदे मातरम् ,घोष निनादले।

पुत्र चढले सुळी, मुक्तता आईची।।३।।

 

दुस्तर संग्राम , पुन्हा होणार ना।

 वक्र दृष्टी कधी ती ऊठणार ना।

 पडसे धाडसी, माय जिजाईची।।४।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला श्रावण श्रावण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🦚 आला श्रावण श्रावण ! 🌴 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आला श्रावण श्रावण

धरली पावसाने धार,

नव्या नवरीच्या मनी

नाचे आनंदाने मोर !

 

आला श्रावण श्रावण

सय येते माहेराची,

दारी उभी वाट पाहे

माय तिची कधीची !

 

आला श्रावण श्रावण

सख्या माहेरी भेटतील,

होतो सासरी का जाच ?

लाडे लाडे पुसतील !

 

आला श्रावण श्रावण

सण ये मंगळागौरीचा,

पुजून देवी अन्नपूर्णेला

रात खेळून जागायाचा !

 

आला श्रावण श्रावण

व्रत वैकल्याचा मास,

ताबा ठेवून जिभेवर

करा उपास तापास !

करा उपास तापास !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सृष्टि… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सृष्टी…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(सृष्टी वृत्त ~मंजूघोषा(गलगागाx३))

श्रावणाच्या पावसाने स्नात आहे

खोडकर वार्‍यासवे ती गात आहे

 

सूर्य डोकावे ढगाआडून विलसे

तेज त्याचे सावळ्या मेघात आहे

 

शाल हिरवी ही धरेने पांघरावी

शुभ्र मोत्यांची जणू बरसात आहे

 

मोगरा जाई जुईचा गंध सुटला

केतकीचा दर्प हा श्वासात आहे

 

शंकराला वाहताना बिल्वपत्रे

पारिजातक गालिचा परसात आहे

 

धुंद केले श्रावणाच्या या सरींनी

हासते सृष्टी कशी दिनरात आहे

 

देखणे हे दृष्य अवघे श्रावणाचे

शांतता जीवास लाभे ज्ञात आहे

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #187 ☆ 🇮🇳 यशस्वी मोहीम चांद्रयान-३ !! 🚀 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 187 – विजय साहित्य ?

☆ 🇮🇳 यशस्वी मोहीम चांद्रयान-३ !! 🚀 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

यशवंत यशोगाथा

अंतराळी चांद्रयान

भारतीय शास्त्रज्ञांचे

संशोधक अभियान…! १

 

धृव दक्षिण चंद्राचा

तिथे यान उतरले

चार वर्षे परीश्रम

मोहिमेत सामावले…! २

 

वैज्ञानीक प्रगतीचा

उत्तुंगसा अविष्कार

चांद्रयान तीन जणू

तिरंग्याचा पदभार…! ३

 

खगोलीय ज्ञानालय

इस्त्रो शास्त्रज्ञ अभ्यासू

गुणातीत चंद्रकला

मती सकल प्रकाशू..! ४

 

देऊ कौतुकाचे बोल

जयहिंद मुखी नारा

अंतराळी विश्वामाजी

बुद्धी चातुर्याची धारा..! ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ श्रावण तो आला आला…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ श्रावण तो आला आला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

गर्भ रेशमी हिरवागार शामियाना..

पसरला घरा घराच्या अवतीभवती…

निळे पांढरे आभाळ…

हरखून थबकले माथ्यावरती..

मेघडंबरी कोंदणातून…

सुवर्ण रश्मीचे दान सुटले अवनीवरी..

सोनेरी मुकुट शोभले…

तृणपाती तरूवरुंच्या शिरी…

मंद मंदसा हलकासा …

वारा गोंजारून जाई शरीरी..

झुकले तन मान लवून …

आनंद वाहे लहरी लहरी..

खगांनी फुंकली मंजुळ सनई,

अन मधूनच वर्षा बरसून जाई..

खिल्लारे चरती कुरणी…

निर्भर होऊनी रानीवनी..

 उल्हासाची इंद्रधनूची …

तोरणं आकाशी झळकली..

सणवारांची  फुले उमलली…

आनंदाची पालवी बहरली..

बलाकमाला उडती गगनी…

संदेश देण्या माहेरवाशीणी..

सय दाटता मायेची…

मनात गुंजली रूदनगाणी..

माय ती वाट पाही…

दूर दूरच्या लेकीसाठी…

खळबळ माजे तिच्या अंतरी…

खळखळणाऱ्या ओढयातल्या जलापरी..

सांगत आली, वाजत गेली…

गावागावातून वाऱ्याची तुतारी…

.. श्रावण तो आला आला…

 घरोघरी अंगणी नि परसदारी..

..श्रावण तो आला आला…

घरोघरी अंगणी नि परसदारी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares