सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ स्त्री कधी रिटायर्ड होते का?… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
स्त्री कधी रिटायर्ड होते का
लग्नाच्या अक्षदा पडतातच
जबाबदाऱ्या तिच्यावर पडतात
प्रेम करते फक्त ती कुटुंबावरच
*
त्याग संयम एक गुप्त शक्ती
कुठून येतअसेल हो तिच्यात
समजदार पणा नीटनेटकेपणा
जीवन जातं तीच काटकसरीत
*
अर्ध जीवन संपत लगेच
मुलांची लग्न नातवंड होतात
त्यांना सांभाळता सांभाळता
दिवस भर भर निघून जातात
*
जबाबदारीचं ओझं उतरत नाही
तीची काम कधीच सरत नाही
करती हो ती सर्व आनंदाने
कौतुकाची थाप कुणी देत नाही
*
स्वतःसाठी जगायचं सोडून
इतरांसाठी जगत असते
स्वतःला विसरून दुसऱ्याला जपते
सांगा स्त्री कधी रिटायर्ड होते?
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈