मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #193 ☆ नोबेल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 193 ?

नोबेल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

शांतीसाठी नोबल मिळते

युद्ध तरीही रोजच घडते

रणांगणावर किती मारले

कीर्तिमान तर त्यावर ठरते

शांतम पापम् मुखात तरिही

रक्त आतले सळसळ करते

धर्तीवरचा अकांत पाहुन

बुद्धाचीही मूर्ती रडते

मानवतेचा हात सोडता

नितळ मनावर जळमट धरते

रक्त पाहुनी रक्त गोठता

तमोगुणांचे आसन ढळते

नाही झाली वर्षा तरिही

दवबिंदूने अंगण भिजते

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जाग ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जाग ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

तोडिलेस वृक्ष किती,

अविचारी मानवा,

केले अनिकेत किती,

पक्षी, रानपाखरां..

 

सोयरे मानून जया

बहरली ही संस्कृती,

देव-धर्म पूजनी का,

जपली यांची महती.

 

 वाढली जनसंख्या ही,

 साधन-संपदा उणी,

 जंगले  काँक्रिटची,

 टाहो.. पाणी.. पाणी.

 

प्रदूषित झाली हवा,

 रोगराई रोज नवी,

जाणूनी आता तरी,

 सांभाळी वनराई.

 

रोपे नवीन लावूनी,

जपूनी, वृक्ष वाढवी,

प्राणवायूवाचूनी ही,

लेकरे जगतील कशी?

©  सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – वाट चाले पंढरीची…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– वाट चाले पंढरीची– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

वाट चाले पंढरीची,

आनंदवारीत वारकरी दंगला !

ओसंडला आनंद,

विठ्ठल रंगांनी चेहरा रंगला !

भगवी पताका खांद्यावर,

फेटा बांधला शिरी !

मार्गस्थ देह झाला,

मुखी नाम रामकृष्ण हरी !

कशाला चिंता संसाराची,

विठ्ठल भार त्याचा वाहतो !

ओढ त्याची लागे मना ,

वारीची वाट आनंदे चालतो !

हृदयी भक्ती भाव

आत्मा झाला पांडुरंग !

वाट न वाटे खडतर,

सावळा देव चाले संग !

भेटी  संतसज्जन,

वैष्णवांचा रंगला सोहळा !

कपाळी झळकती गंध,

तुळशीमाळ घालुनी गळा !

रामकृष्ण हरीनामाचा घोष,

नाद करी टाळ मृदूंग !

आसमंत विठ्ठलमय झाला,

मुखी संतांचे अभंग !

माऊली वाट पाहे,

कर कटेवर ठेवुनी !

भेटी लागे जीवा,

लेकरं निघाली धावुनी !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी गझल…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆ एक मातला दोन शेर ☆

मानतो मी गझल माझा श्वास आहे

मी तिचा तर एक साधा दास आहे

स्वैर झाल्या भावनांना कोंडतो मी

 सोसला मी एवढा वनवास आहे

देव सा-या माणसांना मानतो मी

 हा मलाही फसवणारा भास आहे

(मंजुघोषा)

 

☆☆☆☆☆

माझी गझल

बोल माझ्या अंतरीचे बोलते माझी गझल

या मनाचे त्या मनाला सांगते माझी गझल

गोठलेल्या आसवान मोल मोत्यांचे असे

 हार मोत्यांचे खुबीने गुंफते माझी गझल

वेदना संवेदनांच्या मी पखाली वाहतो

प्रेम ओलावा जिव्हाळा जाणते माझी गझल

शब्द  सुमनांच्या इथे मी एक बागा लावल्या

सोनचाफा मोगऱ्यासम भासते माझी गझल

माणसाने चेहऱ्यांना चेहऱ्यांनी झाकले

 नाटकी सारे मुखवटे वाचते माझी गझल

विरहवेडे दुःख सारे सारले बाजूस मी

आत्मशांती शोधताना रंगते माझी गझल

पीक प्रेमाचे मिळाया पेरतो आनंद मी

सावलीचे झाड होते वाढते माझी गझल

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 136 ☆ पहिला पावसाळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 136 ? 

पहिला पावसाळा… ☆

पहिला पावसाळा, सुचते कविता कुणाला

पहिला पावसाळा, चिंता पडते कुणाला.!!

 

पहिला पावसाळा, गळणारे छत आठवते

पहिला पावसाळा, राहते घर प्रश्न विचारते.!!

 

पहिला पावसाळा, शेतकरी लागतो कामाला

पहिला पावसाळा, चातकाचा आवाज घुमला.!!

 

पहिला पावसाळा, नदी नाले सज्ज वाहण्या

पहिला पावसाळा, झरे आसूसले कूप भरण्या.!!

 

पाहिला पावसाळा, थंड होय धरा संपूर्ण

पहिला पावसाळा, इच्छा होवोत सर्व पूर्ण.!!

 

पहिला पावसाळा, शालू हिरवा प्राची पांघरेल

पहिला पावसाळा, चहू बाजू निसर्ग बहरेल.!!

 

पहिला पावसाळा, छत्री भिजेल अमर्याद भोळी

पहिला पावसाळा, पिकेल शिवार, मिळेल पोळी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-12… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-12…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

या आपुल्या भेटीद्वारे अरूप

तुज दाविले तव आत्मस्वरूप

निजप्रकाशे पाही दीप स्वरूप

तैसे पाही तू तव ब्रम्हस्वरूप॥५६॥

 

उघडी तव अंतःचक्षु चांगया

कार्यकारण जाण भेटी या॥५७॥

 

महाप्रलयी पाणी जैसे दावी

सर्वात्म एकरूपता एकार्णवी

उगम, प्रवाह, संगम न उरे

न राहती नामे, रूपे, आकारे

एकरूप होती एकमेकांशी

तसेच हो समरूप अर्णवांशी

तसाच तूही उगम तुझा गिळुनि

तद्रूप हो अज्ञान सर्व सांडुनि॥५८॥

 

नाम रूपा वेगळे आत्मस्वरूप

हो सुखी जाणुनि स्वानंद रूप॥५९॥

 

नश्वर देह, रूप, मन, बुद्धी

सांडुनि, जाण आत्मसिद्धी

अंतःकरणी येता ही ज्ञानसंपत्ती

ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान न राही त्रिपुटी

सच्चिदानंद पदी आरूढ होवा

सांगे ज्ञानया तुजप्रती चांगदेवा॥६०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

आपल्या समूहाचे साक्षेपी संपादक, चतुरस्त्र लेखक आणि कवी श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा … “ प्रेम रंगे, ऋतूसंगे “ …  हा दुसरा काव्यसंग्रह आज प्रकाशित होतो आहे.

💐श्री. पंडित यांचे आपल्या सर्वांतर्फे अगदी मनःपूर्वक अभिनंदन, आणि उत्तरोत्तर त्यांच्या हातून अशीच दर्जेदार साहित्य-निर्मिती होत राहू दे अशा असंख्य हार्दिक शुभेच्छा !!💐

हा प्रकाशन समारंभ सांगलीमध्ये संपन्न होत आहे, त्यामुळे सांगलीतील काव्य-रसिकांसाठी या कार्यक्रमाची माहिती देणारी पत्रिका  —

या नव्या संग्रहातली एक नवी कोरी सुंदर कविता आपल्या सर्वांसाठी सादर —

? शब्दरंग… ?

कुंचल्याचे रंग ओले उतरले शब्दांतून

रंग शब्दांतून फुलले कल्पनांचे पंख लेऊन

मोरपंखाची निळाई  पसरली ओळींतून

पाखरांची पाऊले ही खुणविती पंक्तीतून

पुष्पगुच्छांच्या परि ही जोडलेली अक्षरे

झेप घेती शब्द  जैशी आसमंती पाखरे

शब्दवेलीतून फुटते कल्पनेला पालवी

स्पर्श  होता भावनांचा अर्थ  भेटे लाघवी

गर्भितार्थाच्या  गुहेतून अर्थवाही काजवे

गंधशब्दांतून  येती जणू फुलांचे ताटवे

प्रकृतीच्या हर कृतीतून गीत जन्मा ये नवे

अंतरंगातून उडती शब्द  पक्ष्यांचे थवे

रंगले हे शब्द आणि शब्दांतूनी  रंगायन

शब्द  आणि रंग यांचे अजब हे रसायन

कुंचला  की लेखणी ? मी धरू हातात आता

शब्द  फुलले,रंग खुलले,मी अनोखे गीत गाता.

सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “दगडांचे झाले गोटे” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “दगडांचे झाले गोटे” ☆ श्री आशिष मुळे ☆

दगडांचे झाले गोटे

प्रवाहात परंपरांच्या 

घासून रगडून वाहून 

सारखे सगळे झाले —

 

दगडांचे झाले गोटे

कमावून बसले खोटे

काळाच्या वाहत्या पाण्यात

निरर्थक निद्रिस्त ओझे —

 

दगडांचे झाले गोटे

मारण्यास उपयुक्त मोठे

वा पाडण्यास ठिणगी

अति उत्साहीत माठे —

 

दगडांचे झाले गोटे

काही रंग लावून बसले

काही रंग देत बसले

आतून बेरंगच् राहिले —

 

दगडांचे झाले गोटे

कोणीतरी मांडून ठेवले

दुसऱ्याने येऊन विस्कटले

गोटे मात्र गोटेच राहिले —

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – बदक आणि मासोळी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– बदक आणि मासोळी…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

मस्तीमध्ये जली विहरता

उसळूनी थोडे खेळू म्हटले

चोच उघडूनी मृत्यूचे रूप

क्षणात नजेरेपुढे ठाकले

काही कळेना काही सुचेना

तशीच क्षणभर स्तब्ध  राहिले

पाण्यामधली मासोळी मी

सळसळकरीत तळात गेले

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आयुष्याची बाग” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “आयुष्याची बाग” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

यशाच्या शिखरावर जावून

दुःखाच्या खाईत आपण डोकावतो

सुख क्षणभरात सरतं

दुःख मात्र पुरून उरतं…

 

सुखाच्या आभाळाला

दुःखाचे गालबोट लागते

सुख बरसून मोकळे

दुःख मात्र साचून राहते…

 

सुख दुःखाचे चक्र

आयुष्यभर फिरतच राहते

दुःख अनुभवल्यावरच

सुखाची खरी किंमत कळते…

 

जो येईल जसा येईल

प्रत्येक क्षण निघून जाईल

सुख दुःखाच्या ऊन पावसात

आयुष्याची बाग फुलत राहील …

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares