☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ९ व १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा ९ व १०
देवता : अग्नि
आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी अग्नि देवतेला उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील बाविसाव्या सूक्तातील नऊ आणि दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
अग्ने॒ पत्नी॑रि॒हा व॑ह दे॒वाना॑मुश॒तीरुप॑ । त्वष्टा॑रं॒ सोम॑पीतये ॥ ९ ॥
अग्निदेवा ऐका आर्त अमुची ही प्रार्थना
त्वष्टादेवा सवे घेउनीया सोमप्राशना
देवपत्निही सिद्ध जाहल्या यज्ञी साक्ष व्हाया
यागास्तव हो त्यांना संगे यावे घेऊनिया ||९||
☆
आ ग्ना अ॑ग्न इ॒हाव॑से॒ होत्रां॑ यविष्ठ॒ भार॑तीम् । वरू॑त्रीं धि॒षणां॑ वह ॥ १० ॥
अग्निदेवा हे ऋत्विजा कृपा करी आता
घेउनि या देवी सरस्वती धीषणा वरुत्रा
चिरयौवन त्या असती जैशी सौंदर्याची खाण
बलशाली ही करतिल अमुचे सर्वस्वी रक्षण ||१०||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)