मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अष्टविनायक…! ☆ श्री सुजित कदम  ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ अष्टविनायक…! ☆ 

☆ 

मोरगावी मोरेश्वर

होई यात्रेस आरंभ

अष्ट विनायक यात्रा

कृपा प्रसाद प्रारंभ….!

*

गजमुख सिद्धटेक

सोंड उजवी शोभते

हिरे जडीत स्वयंभू

मूर्ती अंतरी ठसते….!

*

बल्लाळेश्वराची मूर्ती

पाली गावचे भूषण

हिरे जडीत नेत्रांनी

करी भक्तांचे रक्षण….!

*

महाडचा विनायक

आहे दैवत कडक

सोंड उजवी तयाची

पाहू यात एकटक….!

*

थेऊरचा चिंतामणी

लाभे सौख्य समाधान

जणू चिरेबंदी वाडा

देई आशीर्वादी वाण…!

*

लेण्याद्रीचा गणपती

जणू निसर्ग कोंदण

रुप विलोभनीय ते

भक्ती भावाचे गोंदण….!

*

ओझरचा विघ्नेश्वर

नदिकाठी देवालय

 नवसाला पावणारा

देई भक्तांना अभय….!

*

महागणपती ख्याती

त्याचा अपार लौकिक

रांजणगावात वसे

मुर्ती तेज अलौकिक….!

*

अष्टविनायक असे

करी संकटांना दूर

अंतरात *निनादतो

मोरयाचा एक सूर….!

© श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आकाश माझे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आकाश माझे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

नात्यास आपल्या जरीही,

रुढ नाव कोणतेच नाही.

तरी  कसे निक्षून सांगू,

आपल्यांत नातेच नाही.

*

भान ठेऊ अंतराचे,

जे आजही रुंदावले.

थंडावले आवेग सारे,

मनोवेगही मंदावले.

*

मेघ कांही भरुन आले,

आत्ताच ते बरसून गेले.

मागमूस अवघे पुसोनी,

आकाश माझे स्वच्छ झाले.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – हळवे स्मृतीचित्र – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – हळवे स्मृतीचित्र – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

हिरवा निसर्ग सभोवताली 

उंच झेपावणारी गर्द झाडी 

त्यात वसलेली आजोळाची 

सुबक ठेंगणी माझी वाडी ||

*

सारवलेले स्वच्छ अंगण 

त्यात देखणे तुळशी वृंदावन 

बागेमधली फुले मनोहर

घालती सुगंधी संमोहन ||

*

अंगणातल्या उनसावल्या 

भुरळ घालती मनाला

बालपणीचा खेळ रंगला 

आठवतो याही क्षणाला ||

*

शुभ्र गोबरी मनी माऊ 

पायांमध्ये घोटाळत राही 

सागरगोटे काचाकवड्या 

ओसरी सदा निनादत राही ||

*

गाण्यांमध्ये रमून जाई 

चित्रामधुनी जुन्या स्मृतींना 

पुन्हा नव्याने जगून घेई ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 259 ☆ कृष्णार्पण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 259 ?

☆ कृष्णार्पण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गॅसवरचं दूध ऊतू जाणं

तसं नित्याचंच

आणि बोलणं खाणं अटळ!

कानकोंडं होणं, अपराधी वाटणं,

चुटपूट लागणं, हे ही वर्षानुवर्षे!

दूध ऊतू गेलं की वाईट वाटतं ते

साय वाया गेल्याचं,

अंशानं लोणीतुपाचंही नुकसान!

अनेकदा ठरवूनही,

नाही थांबवता आलं ऊतू जाणं!

फायद्याची गणितंही

 नाहीच साधता आली!

आजी म्हणाली होती एकदा,

“आवडत नसलं तरी ,

 कपभर दूध घेत जा रोज, कॅल्शियम असतं त्यात!”

अंगी लागण्यापेक्षा ऊतूजाणंच

अंगवळणी पडत गेलं!

नवरा म्हणतो कुत्सितपणे,

“आमच्या घरी रोजच रथसप्तमी”

स्वतःच्या वेंधळेपणाचं समर्थन न करता ,

मी ही गॅसवर दूध ठेवून,

उचलते फोन, घुटमळते टीव्ही समोर, डोकावते वर्तमानपत्रात…..

गॅसवरच्या दूधासारखंच

मनाचंही ऊतूजाणं !

मनाला शिस्त लावण्याऐवजी,

कृष्णार्पण म्हणून टाकावं,

सा-याच ऊतू जाण्याला!

हेच तेवढं हाती उरलंय ……

ऊतू जाणं अटळ झालंय!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत ऋतुच्या शुभेच्छा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत ऋतुच्या शुभेच्छा ..☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

(अष्टाक्षरी)

वसंताला येता भर

वारा हळुंच झुलतो

गुलाबाच्या कळीसह

गीत प्रणयाचे गातो

*

आनंदाने डोलणार्‍या

कळीसवे बागडतो

उद्या पूर्ण फुलण्याचे

स्वप्न तिला दाखवतो

*

फुलणार्‍या कळीसंगे

झिम्मा फुगडी खेळतो

चार दिवस सुखाचे

आनंदाने घालवतो

*

एक फुल कोमेजते

दुजे सुरेख खुलते

भुंग्याचाही गुंजारव

कळी डौलात डोलते

*

वसंताचा जाई थाट

रोपे बनती उदास

ग्रीष्म करतो कहर

वर्षा देई पुन्हा श्वास

*

ऋतुराज पावसाळा

येतो जरी सालोसाल

दरवर्षी आनंदाचे

वाण वाटे हरसाल

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बोध… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बोध… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

लहान होवून

याचक व्हावे

काहीच न मागून

मोठेपण घ्यावे…

 

जन्माला येण्याचे सार्थक

पुन्हा जन्माला न येणे

आणि उत्तम मरण म्हणजे

पुन्हा मरावे न लागणे..

 

विषारी विष

विषयातच आहे

दु:खाचे मूळ

जो विषयासक्त आहे..

 

येते जग जिंकता

ज्याने जिंकले मना

सद्गुरू कोण?

जो बोट धरून मोक्षापर्यंत नेई जना…

संदर्भ:- डॉ श्री.द.देशमुख – आद्य शंकराचार्य कृत प्रश्नोत्तरी

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #270 ☆ शोकांतिका (धृतराष्ट्र उवाच)… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 270 ?

शोकांतिका (धृतराष्ट्र उवाच) ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

संजया, तू जरी कौरवांच्या बाजूने

उभा असलास तरी

तुझ्या बोलण्यातून

मला पांडवांच्या विजयाची गाथा

ऐकू येते आहे.

मी आंधळा असलो तरी

उघड्या कानांनी

आपल्या अपयशाची लक्तरे

वेशीवर टांगलेली पहातो आहे

तुझ्या या रोजच्या संभाषणातून

कौरवांच्या कुठल्याही यशाचा मार्ग

मला समोर दिसत नाही

एकेक करून, आपले सैनिक

रोज आपल्याला सोडून जात आहेत

परतीचा कुठलाच मार्ग

आपल्यासमोर राहिलेला दिसत नाही

अपयशाच्या शेवटपर्यंत

तू असाच बोलत राहणार आहेस का?

तुझ्या या दिव्यदृष्टीपुढे

माझे काहीच चालत नाही

मी तुला आणि मलाही

थांबवू शकत नाही

हीच आजची शोकांतिका आहे…!

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिशिर हवा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शिशिर हवा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

उजाडताना हिरव्या पदरी

पाचू मोती हे काठावरती

आणि सप्तरेशीम चैतन्य

शृंगार ल्याली माता धरती.

हसर्या वेलीवर मोगरा

प्राजक्ताचा उत्कर्ष फुलवा

शिशीर प्रारंभाची चाहुल

मस्त भाव काळीज गारवा.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – प्रजासत्ताक दिन… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रजासत्ताक दिन? श्री आशिष  बिवलकर ☆

प्रजासत्ताकाचा! रंगला सोहळा !

तिरंगा जिव्हाळा! देशप्रेम !!१!!

*

लोकशाही नांदे ! देशात सुखाने!

हो अभिमानाने ! सांगा जगा!!२!!

*

स्वातंत्र्य, समता ! बंधूता त्रिसूत्र !

मानवता मंत्र ! जोपासतो !!३!!

*

लाल किल्ल्यावर ! फडके तिरंगा!

विकासाची गंगा ! येथे वाहे !!४!!

*

राजपथ नव्हे ! हा कर्तव्यपथ !

त्यागाची शपथ ! देशासाठी !!५!!

*

त्रिदल सामर्थ्य! चाले संचलन !

अभिमाने मन ! भरे आता !!६!!

*

आशिष म्हणतो ! विकासाचा कित्ता !

होऊ महासत्ता ! भविष्यात!!७!!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शोध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ शोध ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

शोधून सापडेना आनंद हरवलेला

गुंता कसा सुटेना गुंत्यात गुंतलेला

 *

नाजूक बंधनानी हळव्या व्यथा पुरवल्या

आहेच जाच त्यांचा पदरास बांधलेला

 *

सोडून सर्व काही झालो फकीर आता

झोळीत माल भरला नाहीच संपलेला

 *

वैराग्य मिरवताना दडपून जीव जातो

उरतो मनात मागे संसार भोगलेला

 *

आदर्श जीवनाचे चुकते गणीत तेव्हा

छळतो तना मनाला अंधार दाटलेला

 *

जगणे जगावयाचे साधे सुबोध नाही

असते शिवावयाचा अंदाज फाटलेला

 *

जगण्यास लागणारा आधार मागण्याला

माणूस माणसाने असतोच शोधलेला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares