मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोजागिरीची लावणी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ कोजागिरीची लावणी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

रात अवघी प्यायली, चांदणं हो पुनवेचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
चांदोबाही हसला, आला खुशी-खुशीतच

लाडात आला खाली, धरतीच्या जवळच

जमवून चटकचांदण्या, आवतन मैत्रीचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
धरती म्हणाली त्याला, तू चंद्रमा एकच

ये तूच जरा खाली, निमित्त आहे प्रेमाचं

दिसलं केशरी दुधात, बिंब हो चंद्राचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
मित्र जमले अवघे, चांदणं पूनवेचं

लुटू या सारे मजा, देणं लाभलं आनंदाचं

आजच्या दिवसाला हो, महत्व जागरणाचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*

रात अवघी प्यायली, चांदणं पुनवेचं 

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निखळला तारा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ निखळला तारा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

निखळला तारा अद्भूत एक

जयाची गगनावेरी झेप..

 निखळला….

 

अस्सल होती प्रीत तयाची

सेवा करी भारतमातेची

नीतिही होती त्याची नेक…

 निखळला….

 

आदर्शाचा महान मेरू

उभा ठाकला जणू कल्पतरू

उद्धरूनी गेले ते कित्येक..

 निखळला…

 

माणुसकीचा खराच पाझर

कल्पतरू तो होता सागर

चालला, वापरून विवेक…

 निखळला….

 

जन्म घेई बा पुन्हा एकदा

तू होता तर नव्हत्या आपदा

देशिल… पुन्हा का तू संकेत…

 निखळला….

© प्रा.सौ.सुमती पवार 

 दि: १० ॲाक्टोबर २०२४

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभिजात भाषा-मराठी ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

अभिजात भाषा-मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आज भाषा मराठी ठरे अभिजात 

लाभे सन्मान तिला अखिल विश्वात

गीतेचे सार थोर घुमतसे जगता|त

होतसे मराठी अभिमानास पात्र ||१||

*
ज्ञानदेवे रचिलासे पाया

तुकयाने केला कळस

मराठीचा तो नामघोष

कळू दे आता जगास ||२||

*
सारस्वत थोर-थोर

वर्णिती तिची गाथा

नतमस्तक. मी होते

मराठीचे गुण गाता ||३||

*
मराठीचा परिमल दरवळे

शब्दफुले लेती लेणे

साहित्याची मांदियाळी 

शब्दातुनी गाती गाणे ||४||

*

मराठीचे गुण महान

गाती मुखे थोर-सान

अमृताते पैजा जिंके

मराठीची अशी शान ||५||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही…. ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

तो माझा अन् मी त्याची दुग्धशर्करा योगच हा 

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात 

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*
अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात 

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे, गजेंद्राशी विष्णू तसा…

*
महाजन, साधूळ संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*
“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*
निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता 

आतच होता, आहे, असशी 

जाणीव याची तू देता…

*
कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही 

जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू 

(मम)हृदयाचा आराम खरा…

*
कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या 

अयोनिसंभव बीज अंकुरे 

सात्विक, शुध्द हृदयी सख्या..

*
प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे

केशव देतो (जसा)प्रिय पार्था…

*

आदिशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्तीने जाणीव होते भगवंत असे जेथे…

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तू सदा ऑनलाइन रहा – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ तू सदा ऑनलाइन रहा – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

शुक्र तारा, मंद वारा,

गूगल वर व्हेदर पहा…

वायफाय आहे, ब्रॉडबैंड आहे,

चांदणे स्क्रीनवर पहा…

फेसबुकवरती शेअर करुनी,

माझी तू कॉमेंट पहा

तू सदा ऑनलाइन रहा…

 

मी कशी फेसबुकवर सांगू

भावना माझ्या तुला…

तू मला समजून घे रे

व्हॉट्सअपवरूनी साजणा…

मेसेजिंगचा छंद माझा

आज तू पुरवून पहा…

तू सदा ऑनलाईन रहा…

 

लाजरा तू फ्रेंड माझा

मेसेंजर उघडून पहा

व्हायबर आणि स्काईपवरुनी

तू माझ्या डोळ्यात पहा

हेडफोन आणि माईक लावुनी

तू आता युट्यूब पहा…

तू सदा ऑनलाईन रहा…

 

शोधिले मी नेटवरुनी

पीसी टॅब मोबाईलवरी

फोटो बनुनी आलास तू रे

आज माझ्या फेसबुकवरी…

भरलीस माझी रॅम सारी

हँग झाले मी पहा…

 

तू सदा ऑनलाईन रहा…

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नवदुर्गा — नारीशक्तीचे रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नवदुर्गा — नारीशक्तीचे रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

एकरंगी रंगात रंगुनी

नवदुर्गेचे पुजन करा

श्रीसुक्त लक्ष्मीस्तोत्र

देवीचे जपजाप्य करा

*
एकरंगी वस्त्रे लेऊन

नको फक्त फोटोसेशन

सनातनी उत्सव मोठा

करूया धर्मवर्धीत वर्तन

*
 वरवरच्या प्रसाधनाहून

 आचरणी भक्ती मोठी

 नवदुर्गेच्या नव रूपांची

 नावे असोत आपल्या ओठी

*

 नवरात्रीची नऊ रूपे ही

 स्त्री वाढीची रूपे असती

 कौमार्य ते परिपूर्णता 

 या रूपातून दर्शन देती

*

 नारीशक्तीच्या या रूपाला

 अंतःकरणी जपून घ्यावा

 फक्त सनातन धर्मच जपतो

 सणांमधून हा अमुल्य ठेवा

*

 मोल सणांचे जाणून घेऊ

 इव्हेंट नको दुर्गोत्सव हा

 नवरूपातील देवी पुजुनी

 नंतर दांडियात गर्क व्हा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माय मराठी तुला हवा तो मान मिळाला 

सरस्वतीने तुझ्या मस्तकी टिळा लावला

*

परंपरागत मराठमोळा 

साज तुझा तर खराच होता

महाराष्ट्रातील किती पिढ्यांनी 

तुझा गिरवला आहे कित्ता 

ऐश्वर्याला तुझ्या खुलवण्या 

इथे नांदल्या अनेक सत्ता

तुझ्या लाडक्या सहवासाने

समाज येथे सुखी नांदला………

*

जुन्या पुराण्या लोककलाना

सामर्थ्याने तूच जगवले

संतांनी तर भक्ती करण्या

मनोबलाने तुला निवडले

अमृतवाणी तुझी ऐकता

देवमुखातून तेज प्रगटले

तुझेच त्याना रूप भावले 

कधीच नाही मार्ग बदलला…….

*

अविट गोडी तुझ्या लाघवी 

रचने मधली

लळा जिव्हाळा माया ममता

यानी आहे तेजस झाली 

समृद्धीच्या वाटेवरती 

गती मतीने पुढे चालली

आता नाही चिंतित काही

वैभव आले तुझ्या रूपाला……..

*

कर्तृत्वाचा तुझा दाखला

सर्व जगाला माहीत झाला

तुझ्यामुळे जीवदान मिळाले

इतिहासाला 

तुझ्या कीर्तीचा भगवा झेंडा

नित्य फडकला

राज्य हिंदवी स्थापायाचे 

तेज लाभले तलवारीला………

*

आता नाही चिंता काही

प्रगती पथावर दौडायाची

आस लागली असे आम्हाला

शिखरावरती पोहचायाची

करू तयारी जबाबदारी 

पूर्णपणाने पेलायाची

मानमरातब देऊ मिळवून

 सदैव सुंदर महाराष्ट्राला………

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रार्थना… ☆ सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रार्थना… ☆ सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

हे जगदीश्वरी हे जगदंबे जननी तू जन्मदा 

लीन होउनी पदकमलांशी वंदिन तुज शतदा ।

नकोच मजला धनसंपत्ती नको रूपसंपदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

*

तुझ्यासंगती जगकल्याणा व्हावे उमा शिवानी

निर्दाळावे दुष्ट होउनी महिषासुरमर्दिनी 

हरण्या दुःखे दीनांची मी असावे कामदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

*

कधी अन्नपूर्णेच्या रूपें भुकेजल्या घरी धान्य भरावे 

अन्यायी जन समोर येता उग्र चंडिका काली व्हावे 

ज्ञानदीप उजळावे जगती होउनिया शारदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

*

तुझ्या निवासें आदिशक्ति गे जीवन माझे सार्थ ठरावे 

धूपकांडीसम जळता जळता विश्व सुगंधित करून जावे 

अंती मोक्ष दे मोक्षदे मला पुरव कोड एकदा 

हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥

© सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर

मुंबई

ईमेल – [email protected] मोबाइल – ९९२०४३३२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सालंकृत मराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ सालंकृत मराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

काय सांगू सखे बाई

माझ्या मराठीची गोडी

ज्ञानेश्वर, तुकयानी

रचली अभंगवाणी

*

किती कविराजांनी

तिची गोडी चाखविली

साहित्यिकांनी किती लिहिली

कथा, चरित्र, कादंबरी

*

लोकसाहित्यातून जपला

महाराष्ट्राचा वारसा

भूपाळी ते भैरवीतून

सारा आसमंत निनादला

*

पोवाड्यातून उसळे रक्त

मराठ्यांच्या धमनीतून

शिवाजीचे आम्ही वंशज

मिरवितो स्वाभिमान

*

अशी आमची मायमराठी

साऱ्या जगात गाजते ही

काना, मात्रा, वेलांटीचे साज

लेऊन जशी झाली सालंकृत

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री दुर्गा स्तोत्रम्… – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

श्री दुर्गा स्तोत्रम्… – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(नवरात्रीच्या निमित्ताने) 

वृत्त :  शार्दूलविक्रीडित 

दुर्गे विश्वमपि प्रसीद परमे सृष्ट्यादि- कार्यत्रये।

ब्रह्माद्याः पुरुषास्त्रयो निजगुणै-

स्त्वतस्वैच्छया कल्पिताः ॥

नो ते कोऽपि च कल्प कोऽत्र

भुवने विद्येत मातर्यतः ।

कः शक्तः परिवर्ण्णितुं तव गुणां

ल्लोके भवेद्-दुर्गमान् ॥१॥

*

त्वामाराध्य हरि-निहत्य समरे

दैत्यान् रणे दुर्जयान् ।

त्रैलोक्यं परिपाति शम्भुरपि ते धृत्वा पदं वक्षसि ॥

त्रैलोक्य क्षयकारकं समपिवद्दतकालकूटं विषं ।

किं ते वा चरितं वयं त्रिजगतां

व्रुमः परित्र्यम्विके ॥२॥

*

या फुसः परमस्य देहिन इह स्वीयैगुणैर्मायया ।

देहाख्यापि चिदात्मिकापि च परिस्पन्दादि शक्तिः परा ||

त्वनमाया-परिमोहिता- स्तनुभृतो यामेव देह स्थिता ।

भेदज्ञान वशाद् वदन्ति पुरुषं

तस्यै नमस्तेऽम्विके ॥३॥

*
स्त्रो पुंसत्व-प्रमुखै-रूपाधिनिचयै-हिनं परं ब्रह्म यत् ।

त्वत्तो या प्रथमं वभूव जगतां सृष्टौ सिसृक्षा स्वयम् ॥

सा शक्तिः परमाऽपि यच्छ

समभून्-मूर्त्तिद्वयं शक्तितस्त्वन् माया-मयमेव तेन हि

परं ब्रह्मापि शक्त्यात्मकम् ॥४॥

*
तोयोत् थं करकादिकं

जलमयं दृष्ट्वा यथा निश्चय

स्तोयत्वेन भवेद्- ग्रहोऽप्यभिमतां

तथ्यं तथैव धृवम ॥

ब्रह्मोत् थं सकलं विलोक्य

मनसा शक्त्यात्मकं ब्रह्म तच्छक्तित्वेन विनिश्चितः पुरुषधीः

पारं परा ब्रह्मणी ॥ ५ ॥

*
षट्चक्रेषु लसन्ति ये तनुमतां

व्रह्मादयः षट् शिवास्ते प्रेता भवदा- श्रयाच्च

परमे- शत्वं समायान्ति हि ॥

तस्मादीश्वरता शिवे नहि

शिवे त्वय्येव विश्वाम्विके ।

त्वं देवि त्रिदशैक-वन्दितपदे

दुर्गे प्रसीदस्व नः ॥६॥

*
:: श्री दुर्गा स्तोत्र ::: मराठी भावानुवाद ::

*
सृष्टी पालन तू लयास करिशी विश्वा प्रसीद होशी

ब्रह्मा विष्णु महेश यास अपुल्या इच्छेनिया निर्मिशी

माते कोण तुझ्या समान असतो कल्पात या भूवरी

वर्णाया तव या गुणा समर्थ विश्वात नाही तरी ॥१॥

*
आराधून तुला रणांगणात हरिने दैत्यासि निःपातिले

ठेवोनी पद आपले तव उरी त्रैलोक्य शिव रक्षिले

हालाहाल पिऊनिया गे माते विश्वासि संरक्षिले

कैसे वर्णु चरित्र सांग तव हे माते तुझे त्र्यंबिके ॥२॥

*
मायायुक्त स्वभाव गूण भरुनी परमात्म जीवातुनी

चित्तात्मा तनु रूप घेउनी येई शक्ती परा होउनी 

मायेने तुझिया मनात मोहुन चरणावरी लीन मी

ज्ञानी पंडित भेद जाणुनी नमती शिवरूप ही पाहुनी ॥३॥

*
स्त्री रूपे पुरुषत्व ही प्रकटते तुजठायि ब्रह्म वसे

इच्छेने तव सृष्टीचे सृजन या विश्वात होते असे

शक्ती ती परम प्रकट जगती मूर्तिद्वयी रूप हे

मायेने तव ब्रह्म शक्तिरूपे तव शक्तिचे रूप हे॥४॥

*
पाहूनी घट पाणी  रूप तुझिया सर्वोच्च शक्ती स्थित

शक्तीने तव गोलग्रह अपुल्या स्थानावरी निश्‍चित

ब्रह्मोत्पन्न बघूनिया  जगत हे ब्रह्माची  ही पूजना 

ठायी अंतर्यामि  पुरुष तत्व तुझियातूनी ब्रह्मना ॥५॥

*
ब्रह्माच्या सह साही शीवरुपे षट्चक्रातुनी दर्शती 

प्राण्यासी परमत्व  प्राप्त शरणी येता तुझीया पदी 

तूची शक्ती उच्च सर्व तुजला रूपे शिवे पूजिती

माता तूचि कृपा करी गे तुजला देवाही ते पूजिती ॥६॥

*
॥ इति निशिकान्त भावानुवादित श्री दुर्गा स्तोत्र संपूर्ण ॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print