मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 256 ☆ तिळगुळ… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 256 ?

☆ तिळगुळ… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

संक्रातीच्या गोड दिवसाच्या ,

अनेक आहेत आठवणी,

हेडसरांच्या घरी,

मिळायची मोठ्ठी तिळवडी!

आईच्या चंद्रकळेवर,

चांदण्याची खडी ,

संक्रातीचा दिवस खूपच छान,

लहानपणी नव्हतंच कसलं भान !

  आत्ताच आला ,

बालमैत्रीणीचा फोन,

“तिळगुळ घे गोड बोल”

म्हटलं, “तिळगुळ घे गोड बोल”!

 

“ओवसून आलीस का ?”

म्हटलं , “नाही गं , तसलं काही नाही करत !”

पूर्वी हे सर्व केलंय रूढी परंपरेनं,

अंतर्मुख झाले तिच्या फोन नं !

पारंपरिक जगणं,

सोडून माणूस म्हणून,

जगण्याचा ध्यास घेतला —

तेव्हापासूनच आयुष्य,

मुक्त होत गेलेलं!

जगण्याचे दोन प्रवाह,

समांतर!!

बदललं आयुष्य पण—

तिळ आणि गुळ तोच —

जीवनाची गोडी वाढवीत,

दरवर्षीच तो संदेश देणारा–

  तिळगुळ घ्या गोड बोला

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सण संक्रांतीचा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ सण संक्रांतीचा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 सण संक्रांतीचा येता,

 सुगीचा हा काळ आला!

निसर्गाच्या लयलुटीचा,

 बहर सर्वत्र पसरला !… १

 *

 निरभ्र आकाशात जमला,

 रंगीत पतंगांचा मेळा!

 आनंद त्याचा लुटण्याला,

 सान – थोर झाले गोळा!… २

 *

 तिळगुळ आणि हलव्याचा,

 सुगंध मनी दरवळला!

 थंडीत शेकोटीचा आनंद,

 जमले सगळे लुटण्याला!… ३

 *

 जात, धर्म, पंथ सगळे,

 विसरून जाती आनंदात!

 एकमेकाप्रती सौहार्दाचा,

 तिळगुळ देऊन सौख्य लुटत!… ४

 *

 होता सूर्याचे संक्रमण,

 दिवस होई मोठा मोठा!

 ऋतुचक्राच्या संगतीत,

 लुटु या आनंदाचा साठा!… ५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिंदमाता- हिंदपुत्र… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ हिंदमाता- हिंदपुत्र… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंती थोरवीस)

 एक ज्ञानयोगी एक राजमाता

थोर शौर्यगाथा जिजा नरेंद्र.

*

दोन्ही सुसंस्कारे हिंदवी धर्माशी

सज्ञाने कर्माशी अहंः विनाशा.

*

भुमी उपासना देशास अखंड

गुलामीस बंड विचार निती.

*

 विवेक शिवबा जन्मा प्रजारक्षे

स्वरुप प्रत्यक्षे दुष्टासंहार.

*

माऊली जिजाऊ नरेंद्र ज्ञानेश

भारता संदेश हिंदवी गाथा.

*

 वंदावे प्रार्थना मुर्तींचे चरण

असावे स्मरण सुस्वराज्याशी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भिडू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ भिडू ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जोमात फार आहे बाजार भामट्यांचा

सौदे करून खोटे आयुष्य लाटण्याचा

*

कोणी तरी म्हणाले वाटा चुकू नका रे

चकवा बसेल बरका गोत्यात गुंतण्याचा

*

अंधार सांडणारी काळोख रात आहे

होईल खेळ चालू चंद्रास झाकण्याचा

*

दाटून मळभ आले वारा सुसाट झाला

अंदाज आज आहे आभाळ फाटण्याचा

*

स्वप्ने विकावयाला आल्या अनेक टोळ्या

त्यांचा विचार नाही जनता सुधारण्याचा

*

स्वातंत्र्य भोगण्याचे अधिकार द्या जरासे

हळवा पुकार आहे भाऊक चांदण्यांचा

*

सामान्य माणसेही होवून दंग गेली

ऐकून रोज खोटा वर्षाव देणग्यांचा

*

डोळे मिटून बोका खातोय दूध लोणी

शोधू उपाय त्याला जाळ्यात बांधण्याचा

*

एकी करून आता साधेच डाव खेळू

खोट्या भिडूस येथे शोधून काढण्याचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 199 ☆ विश्वबंधु हा भाव धरावा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 199 ? 

☆ विश्वबंधु हा भाव धरावा☆ महंत कवी राज शास्त्री ☆

सत्यमार्ग हे जीवन व्हावे,

धर्ममूल जे, तेचं स्फुरावे।

प्रत्येक कृतीत सत्य नांदो,

प्रेमस्वरूप तेचं प्रकटावे।

 *

सन्मार्गी चालत राहावे,

सुखदुःख समभावी मानावे।

प्रीत हे सत्याशी जुळले,

मन आनंदी निर्मळ व्हावे।

 *

वैरभाव तो, नच उरावा,

विश्वबंधु हा भाव धरावा।

कर्मयोगाने जीवन रंगावे,

परमार्थी उद्गार उमटावे।

 *

एकसंध हे जीवन व्हावे,

किंतु परंतु काही नं उरावे

श्वास हा कृष्णमय होऊनि

राज विश्व प्रत्यक्ष घडावे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्रिवार वंदन… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

 

? कवितेचा उत्सव ?

☆ त्रिवार वंदन☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

आज १२ जानेवारी .. स्वामी विवेकानंद यांची जयंती .. 

त्यांना ही काव्य-पुष्पांजली श्रद्धापूर्वक अर्पण – – – 

करितो नमन । त्रिवार वंदन।

भारत नंदन | नरेंद्रासी ।। धृ ॥

*

भूवनेश्वरी मां। विश्वनाथ पिता।

जन्म कोलकाता। नरेंद्राचा || ०१ ||

*

शोध अद्वैताचा । गुरू रामकृष्णा।

भागविली तृष्णा । नरेंद्राची|| ०२ ||

*

भारत भ्रमण । विचार श्रवण ।

शुद्ध आचरण । नरेंद्राचे ।। ०३ ।।

*

शिकागो सभेत । मिळविली दाद।

बंधुभावा साद | नरेंद्राची ।। ०४ ।।

*

शिवाचे आगार । आत्मसाक्षात्कार ।

दिला हा विचार | नरेंद्राने || ०५ ।।

*

कर्म भक्ती ज्ञान । आणि राजयोग।

हेची सारे जग । नरेंद्राचे ।। ०६ ।।

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांचे गाठोडे… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

 

? कवितेचा उत्सव ?

शब्दांचे गाठोडे☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

शब्दांचे गाठोडे, घेऊन फिरतो

शिदोरी ठरतो, शब्द माझा

 *

शब्दांनी बांधतो, शब्दांनी सांधतो

आधार ठरतो, शब्द माझा

 *

शब्द व्यवहारी, नित्य देतो घेतो

तारण ठरतो, शब्द माझा

 *

शब्द भांडताना, सीमा ओलांडतो

बोचरा ठरतो, शब्द माझा

 *

तरी काळजीने, शब्दांना मांडतो

ठसका ठरतो, शब्द माझा

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरं सुख … – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री ए. के. मराठे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खरं सुख … – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री ए. के. मराठे

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

एकमेकांची सोबत

हेच असतं खरं सुख

सोबत असल्यावर

सहज पेलवतं दुःख

*

जन्म गाठ बांधली की

बांधलकी येते आपसूक

विश्वासाची उशाला मांडी

उघड्यावर मिळे झोपसुख

*

 खडतर कितीही असो वाट

हातात साथ देणारा हात

चालण्याची उमेद मिळते

यश येतच मग टप्प्यात

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ ) 

लोड, तक्क्ये हवेत कशाला

तुझी मांडी असतांना ??

सुख वेगळं काय हवंय 

तुझी सोबत असतांना !!

☆ ☆ ☆ ☆

कवी : श्री ए के मराठे

 कुर्धे, पावस, रत्नागिरी

 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

आयुष्य आपले नेहमीच

असते तडजोडीचा झूला

त्यातच दिसते नेहमीच

आयुष्य पूर्तता मला

 *

मने जूळवते तडजोड

अन् आगळी नवे नात

जेथे नसते तडजोड

तेथे निश्चित आहे भिंत

 *

भिंत असे ती मतभेदांची

त्याचेच पडसाद उठती

मग बीकट वाट जीवनाची

क्षणोक्षणी आस सुखाची

 *

मतभेद अन् तडजोड

एका नाण्यांच्या दोन बाजू

करा मतभेदात तडजोड

मग सुखी जीवन विराजू

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #262 ☆ भावना के दोहे – कोहरा☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं भावना के दोहे )

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 262 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे – कोहरा ☆ डॉ भावना शुक्ल ☆

राह चले हम देखते,  कोहरे की मुस्कान।

रात घनी अब दिख रही,  दिनकर से  अंजान।।

*

नाम धूप का है नहीं,   थर थर काँपे लोग।

लहर शीत की पड़ रही,    कुहरे  का संयोग।।

*

सुबह अभी दिखती नहीं,   दिन   में  जैसे  रात।

कुहरे   की   चादर  बड़ी,   ठिठुरा अभी प्रभात।।

*

बढ़ी शीत की लहर है,   कुहरा है घनघोर।

ओढ़ रजाई दुबकते,   हुई  नहीं है भोर।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares