मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 108 ☆ भाजीवाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 108 ☆

☆ भाजीवाला ☆

आहे कोरोना हा आला

विश्वाला हे सांगण्याला

धंदा भाजीचा देखील

खूप असतो चांगला

 

होतो आयटीत मीही

घरामध्ये राजेशाही

गाडी बंगला कर्जाने

होता मीही घेतलेला

 

होती नोकरी सुटली

सारी प्रगती खुंटली

पोटासाठी विकला मी

गाडीमध्ये भाजीपाला

 

नशिबाची आहे खेळी

वेळ आली काय भाळी

भाजीवाला काय आहे

आज कळले हे मला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या नक्षत्रांचे लक्ष दिवें…

निळ्या नभावर रांगोळीसम उडती चंचल पक्षि-थवें…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

वेलींवरती फुलें उमलती रोज लेउनी रंग नवे…

वृक्ष बहरती, फळें लगडती गंध घेउनी नवे नवे…

हरिततृणांच्या गालीच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

डोळयांमधली जाग देतसे नव-दिवसाचे भान नवे..

अमृतभरल्या जीवनातले मनी उगवती भाव नवे…

प्रसन्न होउन निद्रादेवी स्वप्न रंगवी नवे नवे …

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

कोण आप्त तर कोणी परका उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे, नाम तयाचे नित ध्यावे…

नको अपेक्षा, नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

जय गजानन, गण गण गणात बोते,

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवे जग खुले आहे ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ नवे जग खुले आहे ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

सुखभऱ्या क्षणातल्या

खूप साऱ्या आठवणी

संकटाच्या वेळी उरे

फक्त डोळ्यातले पाणी ।।१।।

 

निसर्गाच्या आपत्तींना

पर्यायच नसे काही

मनातल्या वादळांना

साथ देण्या कोणी नाही ।।२।।

 

जीवनाच्या वाटेवर

भेटतात खूप जण

संघर्षाच्या काळी असे

आपलेच गं आपण ।।३।।

 

हरवल्या वाटेवर

  नवी वाट शोधायची

खवळल्या सागरात

नौका तूच हाकायची ।।४।।

 

राणी लक्ष्मी,सावित्रीचा

वसा संघर्षाचा घेऊ

सांभाळत स्वतःलाच

एकमेंका साथ देऊ ।।५।।

 

आदिमाया आदिशक्ती

तुझ्या ठायी सदा वसे

घेता जाणून शक्तीला

आव्हानच तुला नसे  ।।६।।

 

भार अवघ्या जगाचा

पेलण्याचे बळ आहे

टाक पाऊल जोमाने

नवे जग खुले आहे  ।।७।।

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गावचा दिस…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गावचा दिस…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

झुंजूमुंजू झालं

नभी तांबडं फुटलं

दिनमणी उगवला

कोंबडं आरवलं……

 

जलभरण्या निघाल्या

आयाबहीणी नदीतीरी

घरट्यातल्या पक्षिणी

पिल्ला दाणापाणी चारी…..

 

दारी अंगणी तुळस

पुजिते गृहस्वामिनी

बहरली वृंदावनी

चिंती सौभाग्य मनोमनी….

 

बैल जोडूनी गाडीला

बळीराजा तो निघाला

कांदा भाकरी न्याहारी

पिका पाणी पाजायाला…..

 

न्यारं औंदाचं वरीस

कृपा वरूण राजाची

डोले वावर शिवार

बोंडे भरली मोत्याची…..

 

सणासुदीचे हे दिस

घर आनंदे भरले

सदा सुखी ठेव बाप्पा

हेच मनी इच्छियेले…..

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 52 ☆ महिमा भक्तीचा… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 52 ? 

☆ महिमा भक्तीचा… ☆

(सदर रचनेमध्ये दोन दुवे आहेत… एक अष्ट-अक्षरी.. आणि दुसरे… अंत्य-ओळ…)

 

कसे सांगू सांगा तुम्ही

गोड महिमा भक्तीचा

भक्ती-विना होत नाही

मार्ग मोकळा मुक्तीचा…०१

 

मार्ग मोकळा मुक्तीचा

करा धावा श्रीप्रभुचा

तोच आहे वाली आता

अन्य कोणी न कामाचा…०२

 

अन्य कोणी न कामाचा

सर्व लोभी आहेत हो

अर्थ असेल तरच

मैत्री, ती  करतात हो…०३

 

मैत्री, ती करतात हो

धर्म हा लोप पावला

अंध-वृत्ती वर आली

सुज्ञ इथेच  वेडावला…०४

 

सुज्ञ इथेच  वेडावला

पाश-मोह आवळला

जाण इतुकीही न आता

ज्ञान-दीप मावळला…०५

 

ज्ञान-दीप मावळला

राज सहज बोलला

कृष्ण-भक्ती, ही सोज्वळ

स्मरा त्या श्रीगोविंदाला …०७

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 17 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 17 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८५]

जळणार्‍या ओंडक्याची

धडधडती ज्वाळा बनली.

’हा माझा फुलण्याचा क्षण

आणि हाच मृत्यूचाही…’

 

[८६]

तुझा साधेपणा पोरी

किती आरस्पानी

निळ्याशार तळ्यासारखा

तुझ्या सच्चेपणाचा तळ

स्वच्छ दाखवणारा.

 

[८७]

तुझ्या दिवसाची गाणी

गात गातच तर इथवर आलो.

आता या कातर सांजवेळी

वादळ घोंगावणार्‍या

या भयद रस्त्यावर

वाहू देशील का मला

तुझाच दीप

 

[८८]

दुनियेचं काळीज

पुरं वेढलस तू

दाईते,

आपल्या आसवानं

जसं

समुद्रानं पृथ्वीला

कवळून असावं

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शुभेच्छांचा महापूर ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? कवितेचा उत्सव ?

☆ शुभेच्छांचा महापूर ☆ श्री विजय गावडे ☆  

गटांगळ्या मी खात आहे

थोपवू कवण्या उपायी

‘व्हाट्सअँप,’ रुपी ये खतायें

 

फेस आला फेसबुकी

पाहुनी अगणित फोटो

का सहावा जुल्म मी हा

अंगावरी येतात काटे

 

सुप्रभात ने होई सुरु दिन

अन ओघ लागे दिनभरी

नको तितक्या न नको तसल्या

मेसेजीस भाराभरी

 

जन्मदिन अन श्रद्धांजली च्या

येती मेसीजिस संगे

कोणी फोटो टाकी ऐसा

जन्मदिनी बापडा अंतरंगे

 

बरे नाही जीवास म्हणुनी

करावा आराम जरी हा

‘गेट वेल सून’ संदेशे

वैताग पुरता येई पहा हा

 

पस्तावतो होऊनी मेंबर

कळपांचा अशा काही

अर्धमेला होतसे वाचूनी

अर्थहीन सल्ले सवाई

 

असो उरली न आशा

यावरी कवणा उतारा

बदलतील वारे माध्यमे

अन बदलेल हा खेळ सारा.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीमन ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीमन ☆ श्रीशैल चौगुले ☆

मना सावर आता वादळे

स्मृतीत होशील घायाळ

बेट आयुष्याचे सुख-दुःख

दैव वेदनांचे  आयाळ.

 

किती प्रसंगे नाती नि गोती

विरले क्षणात तुझिया

झडतात फुले तसे ऋतू

तुटले सारे पंखबळ.

 

हताश होऊ नको तरिही

अजून,आशा या क्षितीजा

प्रबळ काळीज भाव निष्ठा

घरटे शब्दांचे सकळ.

 

नजर जिथवरती जाई

लाटा डोळ्यात मेघ होतील

घाव सोसता कविता होई

वादळाची शमेल झळ.

 

प्रतिभेचा दास थोर कवी

संघर्षाची होई ऐसी तैसी

अलौकीक ज्ञान तुजपाशी

गगनभेदी संपदा दळ.

 

सुर्य चंद्र तारका गातील

गुणगान अमर तेजस्वी

जीवन धन्य तुझिया जन्मा

सरस्वती प्रसन्न प्रांजळ.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवरंगी दसरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ नवरंगी दसरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

पिवळ्या रंगाने आरंभ झाला,

शेवंती, झेंडू ने रंग भरला!

पीत रंगाची उधळण झाली,

पिवळ्या शालूत देवी सजली!

 

प्रसन्न सृष्टी हिरवाईने नटली,

दुसऱ्या माळेच्या दिवशी!

करड्या रंगाने ती न्हाली,

देवी तिसऱ्या माळेची !

 

चवथीची सांज केशरी

रंगात न्हाऊन गेली !

पाचवीची शुभमाळ,

शुभ्र पावित्र्याने उजळली!

 

कुंकवाचा सडा पसरला

देवीच्या सहाव्या माळेत!

आभाळाची निळाई दिसे,

दुर्गेच्या सातव्या माळेत!

 

गुलाबी, जांभळा आले

आठव्या माळेला !

शुभ रंगांची बरसात

करीत देवीला !

 

हसरा,साजरा देवीचा चेहरा,

खुलविला नऊ रंगाने !

सिम्मोलंघनी दसरा सजला,

झळाळी घेऊन सोन्याने!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 76 – आई अंबाबाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 76 – आई अंबाबाई ☆

अगं आई ,अंबाबाई

तुझा घालीन गोंधळ ।

डफ तुण तुण्यासवे

भक्त वाजवी संबळ।

 

सडा कुंकवाचा घालू

नित्य आईच्या मंदिरी।

धूप दीप कापूराचा

गंध दाटला अंबरी.

 

ताट भोगीचे सजले

केळी, मध साखरेने।

दही मोरव्याचा मान

फोडी लिंबाच्या कडेने .

 

ओटी लिंबू  नारळाची-

संगे शालू  बुट्टेदार।

केली अलंकार पूजा

सवे शेवंतीचा हार.

 

धावा ऐकुनिया माझा

आई संकटी धावली।

निज सौख्य देऊनिया

धरी कृपेची सावली।

 

माळ कवड्यांची सांगे

मोल माझ्या जीवनाचे।

परडीत मागते मी

तुज दान कुंकवाचे।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print