कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 75 – विजय साहित्य – सासर माहेर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
कधी कधी
स्वप्न ही सासरी जातात.
सासर घरी सुखानं नांदतात.
स्वप्नांचे सासरी नांदण म्हणजे
नियतीनं वाढून ठेवलेलं सत्य
बिनबोभाट स्वीकारणं….!
मग तो अगदी त्याचा तिचा
नकार असला तरीही ….!
स्वप्नांना नांदावच लागतं ….
सासर घरी…
स्वप्न अशी नांदायला लागली ना
तरचं घरात येणं जाणं सुरू रहात
यश, कीर्ती, समृद्धी आणि
अनुभव संपन्न जीवनानुभूतींच…!
स्वप्नांनी सासरीचं रहायला हवं
तरचं मिळेल सत्याला माहेर घर
पुन्हा पुन्हा माहेरी येण्यासाठी….!
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈